ऑर्कुटिंग

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in जनातलं, मनातलं
8 Apr 2010 - 4:33 am

ऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे. पण ऑर्कुट आपल्या पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात.

१. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २ दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात?

२. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं?

३. ऑर्कुटमध्ये तुम्ही जर काही डीटेल्स अपडेट केले तर ते तुमच्या मित्र - मैत्रीणीना त्यांच्या होम पेज वर दिसतात. त्यामुळे लोकं चिन्धी चिन्धी गोष्टी अपडेट करत बसतात. उदाहरणार्थ: स्टेटस मध्ये "आयपीएल इज कमिंग" किंवा काहीतरी अगम्य इंग्लिश कोट टाकतात. काही लोक तर फर्स्ट नेम आणी लास्ट नेम अपडेट करतात आणी तिथे काहीतरी मेसेज टाकून ठेवतात. आता ही काही अपडेट करायची गोष्ट झाली का? जन्मापासून मरेपर्यंत तुमचं नाव काही बदलत नाही (अपवाद मुलींचा, ते पण फक्त एकदा). बर हे नाव अपडेट केल्यावर हा/ही ओरीजनल कोण होता/होती ते जाम कळत नाहीत. मग लोक त्याला/तिला scrap टाकून विचारतात की बाबा/बाई तू नक्की कोण? ह्यावर त्याने/तिनी सरळ सरळ सांगावं की नाही? पण पब्लिक पण जाम वस्ताद असतं. ओळख बर मी कोण आहे? ह्या टाईपचे खेळ सुरु करतात.

४. काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. ह्यावर कडी म्हणजे समजा लोक उटीला हनिमूनला गेले असतील तर रोज रात्री तिकडच्या निसर्गदृश्यांचे फोटो अपलोड करतात. ह्या लोकांना एवढा वेळ आणी मुख्य म्हणजे अशा वेळी ही भलतीच इच्छा कशी होत असावी?

५. काही चतुर लोक तर समजा त्यांना १० फोटो अपलोड करायचे असतील तर रोज एक फोटो अपलोड करतात. म्हणजे होत काय की त्यांच्या फ्रेंड सर्कलला रोज ह्यांचे "रिसेंट अपडेट्स" दिसतात.

६. टेस्टीमोनिअलला ऑर्कुट मध्ये जाम महत्व आहे. म्हणजे क्ष व्यक्तीला य व्यक्तीबद्दल जर काही लिहावस वाटल तर तो त्याच्या/तिच्याबद्दल मजेदार गोष्टी लिहितो. खर तर ही गोष्ट ऐच्छिक आहे. पण काही काही पब्लिक जाम माग लागत की माझ्याबद्दल तू काहीतरी लिही. बर त्याच्या/तिच्याबद्दल खर लिहून पण चालत नाही. य ची अशी अपेक्षा असते की असं काहीतरी लिहावं की त्याचं/तिचं फ्रेंड सर्कल जाम फिदा व्हायला हवं. हा एक दबाव ऑर्कुट वर नेहेमी असतो :-)

७. तुम्हाला रोज/वारंवार भेटणारे लोक समोरासमोर काही बोलत नाहेत, पण तिकडे ऑर्कुट वर scrap टाकत बसतात. हाऊ आर यु? खूप दिवस झाले no scrap from you. त्याला म्हणावस वाटत की भल्या माणसा, आपण इतक्या वेळा भेटतो तेव्हा तर तू काही बोलत पण नाहीस. पण तिकडे ऑर्कुट वर गेल्यावर ह्यांच्या उत्साहाला एकदम उधाण येत.

८. पब्लिक मध्ये जाम स्पर्धा असते की कोणाचे फ्रेंड्स जास्त आहेत. मग मित्राचे मित्र वगैरे आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात. आता ज्या माणसाला आपण कधी पाहिलं नाही त्याची रिक्वेस्ट कशी स्वीकारणार? बर समजा झाले तुमचे १००० फ्रेंड्स, पुढे काय? मला नाही वाटत की ऑर्कुटनी सगळ्यात जास्त फ्रेंड्स असणार्‍याला काही बक्षीस वगैरे ठेवलं असेल.

विनोदसमाजमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Apr 2010 - 4:48 am | शुचि

लेख फार विनोदी आहे. ह. ह. पु. वा.
>>काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. >> =)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

हे प्रश्न इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग पोर्टल/प्लॅटफॉर्म साठी लागू पडतातच. या सगळ्या प्रश्नांचे सामाईक उत्तर मनुष्याच्या समाजशील असण्याच्या गरजेत, त्याच्या मनात काय काय चालू/येऊ असते/शकते याच्या अभ्यासात - आणि पर्यायाने मानसशास्त्राच्या अभ्यासात - दडलेले आहे.
(सोशल नेटवर्कर)बेसनलाडू

सुचेल तसं's picture

8 Apr 2010 - 5:03 am | सुचेल तसं

पण हा एक विनोदी लेख आहे....सो टेक इट इझी :-)

अनामिक's picture

8 Apr 2010 - 5:31 am | अनामिक

चुकीने लग्नाच्या रात्रीचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात...असं वाचलं... ही ही ही... म्हंटल, असतील बां असेही उत्साही लोक!
लेख अगदी खुमासदार झालाय!

-अनामिक

फ्रॅक्चर बंड्या's picture

8 Apr 2010 - 12:38 pm | फ्रॅक्चर बंड्या

मी पण असेच वचले :))
binarybandya™

प्रभो's picture

8 Apr 2010 - 5:34 am | प्रभो

आपला एवढा मोठा स्टेटस मेसेज वाचून मजा आली.. :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

गोगोल's picture

8 Apr 2010 - 7:06 am | गोगोल

लोक माझ्या प्रोफाइल मधील मुलींना परस्पर बिनधास्त "फ्रेंडशिप देशील का" अशी रिक्वेस्ट टाकून कसे मोकळे होतात?
कॉमन फ्रेंड्स मध्ये फक्त माझ नाव दिसल्यावर त्या मुली नंतर माझी साल काढतात.

Nile's picture

8 Apr 2010 - 7:11 am | Nile

ऑर्कुट पण भलतंच वस्ताद आहे, स्वतःहुन रीक्वेस्ट पाठवतं असा माझा डाउट आहे.

नीलकांत's picture

8 Apr 2010 - 8:02 am | नीलकांत

ऑर्कुट असं करतं हे मला सुध्दा जाणवतंय. पण फेसबुक सुध्दा असं करतं का?

Nile's picture

8 Apr 2010 - 8:12 am | Nile

आत्तापर्यंत मला फेसबुकवर अशी एकच संशयास्पद रीक्वेस्ट आली आहे. ऑर्कुटवर आठवड्याला एक येते (तेही कॉमन फ्रेंड वगैरे काही नसताना!) जर रीक्वेस्ट डीनाय केली तरी उपयोग नाही, त्याच व्यक्तीक्डुन लगेच पुन्हा रीक्वेस्ट येते. त्या व्यक्तीला इग्नोर केल्याशिवाय पर्याय नाही.

अरुंधती's picture

8 Apr 2010 - 2:04 pm | अरुंधती

ओर्कुट व फेसबुक हे अतिशय आगाऊ लोक आहेत :-)
आपण होऊन तुम्हाला इतर पब्लिकबद्दल रेकमेन्डेशन देत राहतात...... कधी तुम्ही चुकून ओके केलं की तुमची फ्रेन्ड रिक्वेस्ट जाते त्या अनोळखी व्यक्तीकडे.... आणि मग तुम्ही अर्र च्च्च.....करून काय पण फायदा नस्तो.
तसेच अनेकदा डमी आय.डी.ज वरून फ्रेन्ड रिक्वेस्ट येतात.... माझे मत, ज्याची विनन्ती आहे त्याची प्रोफाईल पूर्ण चेक करून मगच मान्य करणे.... न्हायतर पस्तावायची पाळी येते राव......

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

8 Apr 2010 - 2:08 pm | टारझन

पस्तावायची पाळी का म्हणे ? एनिटाईम इग्नोर / ब्लॉक करण्याची फॅषिलिटी आहेच की :)

- द्रुतगती

अरुंधती's picture

8 Apr 2010 - 2:29 pm | अरुंधती

ते त्या आय.डी ने काही आचकट विचकट उपद्व्याप केल्यानन्तर...... एका आय.डी. ला चुकून अ‍ॅड केले.... त्या पठ्ठ्याने पोर्नो फोटोज व व्हिडियोज त्याच्या प्रोफाईलवर अपलोड केले....आता ओर्कुटावर फ्रेन्ड लिस्ट मध्ये सर्वांनाच दिसतं कोण काय उपद्व्याप करत आहे ते.... मग मी ब्लॉक केलं त्या इसमाला.... काही दिवसांनी स्क्रॅप.... अहो, माझा आय.डी./अकाऊन्ट कोणीतरी हॅक केलाय.... मला पुन्हा फ्रेन्ड लिस्ट मध्ये अ‍ॅड करा....... हड्ड्ड्ड!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Nile's picture

8 Apr 2010 - 3:36 pm | Nile

ते खरं का खोटं माहीत नाही. पण ऑर्कुट प्रोफाइल सर्रास हॅक(ऑर्कुट वरच्या अ‍ॅप्समुळे असं माझं ऑब्सर्व्हेशन आहे) होतात. माझ्या एका मैत्रिणीचं असंच हॅक झालं, अश्लील फोटो लावले गेले. तिने ऑर्कुटला संपर्क साधुन ते खातं बंद करवलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2010 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>ऑर्कुट पण भलतंच वस्ताद आहे, स्वतःहुन रीक्वेस्ट पाठवतं असा माझा डाउट आहे.

आरं तिच्यामायला, अशीबी भानगड असते व्हय...!

-दिलीप बिरुटे

देवदत्त's picture

12 Apr 2010 - 10:57 pm | देवदत्त

मला नाही वाटत तसे. मला तरी नाही आले असे एखादे आमंत्रण गेल्या एवढ्या वर्षांत.
आणि ते एखाद्या मित्राच्या यादीत असलेलेच संपर्क दाखवते. अर्थात ऑर्कूट ने इतरांची भरपूर नक्कल केली आहे हे आहे.

उलट फेसबुक मध्ये काही संदर्भ नसलेले संपर्कही दाखवले जातात, मित्र जोडा म्हणून :)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2010 - 8:13 am | प्रकाश घाटपांडे

तुम्हाला रोज/वारंवार भेटणारे लोक समोरासमोर काही बोलत नाहेत, पण तिकडे ऑर्कुट वर scrap टाकत बसतात. हाऊ आर यु? खूप दिवस झाले no scrap from you. त्याला म्हणावस वाटत की भल्या माणसा, आपण इतक्या वेळा भेटतो तेव्हा तर तू काही बोलत पण नाहीस. पण तिकडे ऑर्कुट वर गेल्यावर ह्यांच्या उत्साहाला एकदम उधाण येत.

सर्व नेटकरांनी पहावे असे उत्तम नाटक म्हणजे व्हाईट लिलि आणि नाईट रायडर
ते हिरो हिरॉईन प्रत्यक्ष भेटतात तेव्हा कसे अस्वस्थ होतात. मग पीसीव गेल्यावर त्यांना कस मोकळ मोकळ वाटत याचे यथार्थ चित्रण त्यात आहेच
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

Nile's picture

8 Apr 2010 - 8:16 am | Nile

काका, (तुम्हाला थोडा उशीरच झाला आहे, आधी पाहिले नसल्यास ;) ) 'यु हॅव गॉट मेल पहा!' :)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2010 - 8:27 am | प्रकाश घाटपांडे

ते अजुक काय पघितल नाय! आता पघायलाच लागन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मुक्तसुनीत's picture

8 Apr 2010 - 9:48 am | मुक्तसुनीत

यु'व्ह गॉट मेल मनोरंजक आहे खरा. पण एखाद्या परीकथेप्रमाणे आहे राव. त्यात अशा प्रश्नांबद्दलची उत्तरे नाहीत. बाकी "मित्र" सारख्या हिंदी चित्रपटाबद्दल अगदी बोलू नये काही.

Nile's picture

8 Apr 2010 - 10:07 am | Nile

इथे कुणाला असे प्रश्न हवे आहेत तर कुणी उत्तरे शोधतंय.. ;)

निखिलचं शाईपेन's picture

8 Apr 2010 - 9:26 am | निखिलचं शाईपेन

-- ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं? --
:)

-निखिल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2010 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त लिहिलं रे...! :)

-दिलीप बिरुटे
[ऑर्कूटर]

ज्ञानेश...'s picture

8 Apr 2010 - 10:58 am | ज्ञानेश...

आणखी काही:

-मेसेज पाठवतात, आणि वर मेसेज पाठवला आहे, पहा असा स्क्रॅपही पाठवतात! =))

-स्वतःच्या चिरकुट मोबाईल कॅमेर्‍याने काढलेले छपरी फोटो खुशाल डीपी म्हणून लावतात! B)

-फेक प्रोफाईलने स्वतः स्वतःचे धागे/कविता वर आणत राहतात. >:)

-मुले आपल्या फ्रेंडलिस्ट मधल्या जवळपास प्रत्येक मुलीला 'क्रश लिस्ट' मधे टाकून ठेवतात. (चुकून लागला एखादा खडा तर..!) :X

-"मी अमुकतमुक कम्युनिटीवर माझी कविता टाकली आहे, वाचा आणि रिप्लाय करा- ही घ्या लिंक!" :T
बरं, यांना रिप्लाय पण तिकडेच पाहिजे असतो. स्क्रॅप केला तर चालत नाही!

अजून बरेच काही काही ! :)

टारझन's picture

8 Apr 2010 - 10:59 am | टारझन

"आयपील इज कमिंग"

(अपवाद मुलींचा, ते पण फक्त एकदा)

=)) =)) =)) =)) =)) भलतेच गोड समज !

बाकी ऑर्कुटावर " हाय हाऊ आर यु ? " किंवा फॉरवर्डेड स्र्कॅप कम टेस्टीमोनियल पाहुन अंमळ मौज वाटतेच वाटते.
ऑर्कुट नविन आलं तेंव्हाचं एखाद वर्षभर स्क्रॅपींग्/फेंड्स जमा करण्याचा नाद होता .. आता फक्त कामाचेच स्क्रॅप होतात. :)

असो ! कमिंग हा शब्द काळजाला भिडला :)

-(कमिंग प्रेमी) पचेल तसं

मेघवेडा's picture

8 Apr 2010 - 11:53 pm | मेघवेडा

टार्‍या!! तुजप्रत साष्टांग दंडवतु रे बाबा!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

सुचेल तसं's picture

9 Apr 2010 - 2:23 am | सुचेल तसं

टायपो होता.. आयपील च्या जागी आयपीएल केलंय आता...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Apr 2010 - 5:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"मी ऑर्कुट फारसं वापरत नाही" यावर एका (खर्‍या) मित्राने आधी माझ्यावर विश्वास ठेवला नाही; नंतर मलाच विचारत होता, "फक्त सहाच मित्र/मैत्रिणी!" म्हणून!

अदिती

दिपक's picture

8 Apr 2010 - 5:35 pm | दिपक

ऑर्कुटच्या ‘पु.ल.’ कम्युनीटीमुळे मला ‘पु.ल. प्रेम’ ब्लॉग तयार करण्याची कल्पना मिळाली. फक्त त्यासाठी ऑर्कुट आवडते.

अनामिक's picture

8 Apr 2010 - 6:23 pm | अनामिक

सुरवातीला दिडेक वर्ष ऑरकुट लै वापरलं, पण मग ऑरकुटॅडिक्ट होतोय की काय असं वाटल्याने वापरणंच सोडलं... आता ४ महिन्यातून एकदा जातो तिकडे आणि सगळ्या रिक्वेस्ट्/स्क्रॅप्स क्लीन करून येतो.

बाकी "आयपील इज कमिंग" वाचून प्रभू मास्तरांची आठवण आली... आणि वाटलं उन्हाळ्यात नवरात्र कसं आलं?

-अनामिक

संदीप चित्रे's picture

8 Apr 2010 - 7:54 pm | संदीप चित्रे

वापरायला लागल्यापासून ऑर्कुटकडे फार फिरकलो नाहीये...
आणि प्रोफेशनल नेटवर्कसाठी लिंक्डइन खूप भरवशाचे आहे.
ट्विटर वापरून बघतोय पण त्याच्यावर अजून खूप प्रेम बसलं नाहीये

रेवती's picture

8 Apr 2010 - 8:11 pm | रेवती

चेहरापुस्तक!!
खी खी खी!
मस्त रे!

रेवती

निमिष सोनार's picture

9 Apr 2010 - 10:35 am | निमिष सोनार

चेहेरापुस्तक ... भलतेच विनोदी...
ह ह ह
:-)
:-)
:-)

हा हा हा

अजूनी एक भाषांतर- "बडबडकर" म्हणजे आपले ट्वीटर हो!

रेवती's picture

8 Apr 2010 - 8:14 pm | रेवती

सुचेल तसं साहेब,
छानच लेखन! मनोरंजक!
ते लग्नाचे फोटू आणि हनिमूनचे फोटू वाचून तर फार हसले.
काय लोक असतत एकेक! खरच!
मी ऑर्कुट वर नाहीये पण अंदाज आहे तुम्ही काय म्हणताय त्याबद्दल!

रेवती

मदनबाण's picture

9 Apr 2010 - 9:47 am | मदनबाण

मी ऑर्कुटवर आहे,पण जास्त वापरत नाही...एखादा नोटिफिकेशनचा मेल जी-मेल मधे आलाच तरच डोकावुन पाहतो...जास्त रस नाय आपल्याला त्याच्यात...
हल्लीच माझा शाळेतला मित्र मला तिथे भेटला...जवळपास १३ वर्षांनी,त्याला माझे नाव लक्षात होते आणि त्यावरुनच त्यानी मला हुडकले...असो हल्ली बझिंग करण्यातच बराचसा टेम जातो...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

"सूचेल तसं" यांचा लेख आवडला आणि मला " सूचलं तसं" मी त्याबद्दल या प्रतिक्रीयेत लिहितो आहे :-)

लेख विनोदी आहे. आणि जे लिहिलेंय ते सत्य पण आहे..

...अगदी "सूचेल तसं" यांच्या बाबतीतही ते सत्य आहे. कारण हा लेख वाचून मला अचानक "सूचलं" की लेखकाचा प्रोफाईल बघावा, आणि
कारण मी त्यांचा प्रोफाईल बघायला गेलो, तर त्यांनी प्रोफाईलवर आपलं नावच टाकलेलं नाही....
आत पुन्हा ओळखायला आली का पंचाईत?

:-)
:-)

असो!

मात्र लेख लिहिण्याची इष्टाईल चान....
असेच "सूचेल तसे" लिहित राहा...

-------
मला "सूचलेल्या" कार्टून्स ला मी "आंतरजालावर" उतरवले आहे- http://cartoonimish.blogspot.com

आनंदयात्री's picture

9 Apr 2010 - 11:24 am | आनंदयात्री

दणक्का जमलाय लेख !!

-

अविनाशकुलकर्णी's picture

9 Apr 2010 - 8:48 pm | अविनाशकुलकर्णी

लेख फार विनोदी आहे. ह. ह. पु. वा.
>>काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. >

लग्नाच्या रात्रीच कि लग्नाच्या रात्रीचे

नितिन थत्ते's picture

9 Apr 2010 - 10:51 pm | नितिन थत्ते

मला ओर्कुट, फेसबुक, हाय फाय इत्यादि प्रत्येक साईटवर २००-३०० 'मित्र' असलेल्यांबद्दल फार आश्चर्य वाटते. एखाद्याला इतके मित्र कसे असू शकतात. (मी २०० * ३ इतके मित्र समजत नाहिये).

कदाचित माझी मित्र शब्दाची कल्पना जुनाट असावी. ;) सध्या नुसती तोंडओळख असली तरी त्याला मित्र म्हणण्याची पद्धत असावी. (मज्या शि मय्तरी क्रनार क? हा त्यातलाच प्रकार असेल का?)

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

प्रियाली's picture

9 Apr 2010 - 11:11 pm | प्रियाली

हाहाहा! मस्त लेख.

१. हल्ली लग्नेच्छु मुला-मुलींची खरी माहिती मिळण्याची पंचाईत होते. मध्यस्थही भरवशाचे नसतात. फेसबुक आणि ऑर्कुटमधली त्यांची प्रोफाईल्स बघून त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे मित्रमंडळ, त्यांचे स्क्रॅप वाचून वगैरे माणसाची पारख करता येणे शक्य असावे.

२. माझा बॉस मागे सांगत होता - इंटरव्यूला कोणी आले की मी लगेच त्याला फेसबुकवर शोधतो. मद्यधुंद पार्ट्यांचे फोटो दिसले तर गडी कटाप. ;)

३. आमच्या इथे बहुधा अर्बन लेजंड असेल पण प्रसिद्ध झाले आहे "ऑन वेकेशन", "गोईंग टू कॅनडा" असे लिहिले असेल तर घरी चोरीला वाव आहे. चोर तुमच्या मित्रमंडळापैकीच एक हे सांगायला नकोच. ;)

४. माझ्या एका सहकार्‍याने मला सर्वत्र माझे अकाउंट उघडण्याची भुणभुण केली. मीही गुमान केले आहे. " तू अकाउंट उघडले नाहीस आणि तुझे नाव घेऊन इतर कोणी उघडले तर?" अशी भीती घातल्याने आणि मलाही भीती वाटल्याने मी सर्वत्र संचार करत असते. ;) अर्थातच, या सर्व सुविधांचा वापर करते असे मात्र नाही. लोकांकडे इतका वेळ कसा असतो हे वेळेचं गणित कधीच सुटत नाही.

टारझन's picture

10 Apr 2010 - 2:19 am | टारझन

हाहाहा ... जब्री .. चौथा मुद्दा तर =))

चतुरंग's picture

10 Apr 2010 - 3:09 am | चतुरंग

अकाउंट उघडले तरी पुढे मागे काड्या करुन काही नावे डुप्लिकेट झाली तर मग "आमच्या पुढे, मागे, वर, खाली, बाजूला कोठेही काड्या नाहीत" असे सांगायची सुद्धा वेळ कधीकधी येते! ;) (संबंधितांनी हलकेच घेणे ;) )

(सगळीकडेच अकाउंट उघडावे असे वाटणारा काड्याघालू)चतुरंग

टारझन's picture

10 Apr 2010 - 3:21 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अरारारा =)) =)) =)) आज खपलो !!

प्रियाली's picture

10 Apr 2010 - 3:31 am | प्रियाली

अकाउंट उघडले तरी पुढे मागे काड्या करुन काही नावे डुप्लिकेट झाली तर मग "आमच्या पुढे, मागे, वर, खाली, बाजूला कोठेही काड्या नाहीत" असे सांगायची सुद्धा वेळ कधीकधी येते! (संबंधितांनी हलकेच घेणे )

पडले खुर्चीवरून. =)) =)) =)) =))

II विकास II's picture

12 Apr 2010 - 11:37 pm | II विकास II

=)) =))

टारझन's picture

12 Apr 2010 - 11:44 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

II टारझन II
काड्या प्रायोगिक तत्वावर लावलेल्या आहेत. ह्यात आमचा कोणताही विकास झालेला नाही.

मिसळभोक्ता's picture

10 Apr 2010 - 6:46 am | मिसळभोक्ता

इंटरव्यूला कोणी आले की मी लगेच त्याला फेसबुकवर शोधतो. मद्यधुंद पार्ट्यांचे फोटो दिसले तर गडी कटाप.

माझ्याकडे मी उल्टे करतो. तसे फोटो नसतील तर बाळाला/बाळीला मित्रमैत्रिणी नाहीत असे समजावे, आणि कम्युनिकेशन्स स्किल्स कमी पडतात, हे जाणावे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रियाली's picture

10 Apr 2010 - 5:31 pm | प्रियाली

माझ्याकडे मी उल्टे करतो. तसे फोटो नसतील तर बाळाला/बाळीला मित्रमैत्रिणी नाहीत असे समजावे, आणि कम्युनिकेशन्स स्किल्स कमी पडतात, हे जाणावे.

फार मित्रमैत्रिणी आणि नको तेवढ्या कम्युनिकेशन्स स्किल्सचा प्रचार आणि प्रसार झाल्याने आपली मूळ ओळख लपवून सर्वकडून गाशा गुंडाळावा लागतो असे एक उदाहरण पाहिलेले असल्याने आपणच असे उल्टे प्रकार करत असाल यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. ;)

शानबा५१२'s picture

10 Apr 2010 - 7:13 pm | शानबा५१२

काय लेख न काय त्या प्रतिक्रिया................चांगल्या आहेत का?
मी काही लिहित नाही माझ्या प्रतिक्रिया विनाकारण उडवतात सुचेल तश्या.

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

अम्रुताविश्वेश's picture

22 Apr 2010 - 2:53 am | अम्रुताविश्वेश

एक नम्बर आहे लेख
=))