|| विनायक प्रभू प्रसन्न ||
हॉल क्रमांक पाच.
वरीष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा
पेपर इंग्रजीचा.
मास्तरानं प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका वाटल्या.
पहिला तास सहज निघून जातो.
सो-सो, विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या हालचाली.
मास्तर कॉप्या काढून घेतात.
वर्गात थोडीशी हालचाल.
पुन्हा नियमितपणे प्रोसेस सुरु.
शेवटची पाच मिनिटे.
एका पोरानं चौथ्यांदा कागदं काढली.
मास्तरानं पुन्हा त्या चिठ्ठ्या जमा केल्या.
आणि आता उत्तरपत्रिकाही घेतली.
सर, उत्तरपत्रिका द्या ना !
सर, उत्तरपत्रिका द्या ना !
''तुझ्या कितीदा नकला घ्यायच्या''
''सर, सर्वच पोरं नकला करतात.
मी केल्या तर काय चुकलं ?''
''उत्तरपत्रिका मिळणार नाही.
आता वेळही संपत आली आहे''
''सर, उत्तर पत्रिका द्या ना ...!''
वेळ संपली.
मास्तर, उत्तर पत्रिका जमा करतात.
''सर, उत्तरपत्रिका देणार का?''
''नाही''
''मी इमारतीवरुन उडी मारेन.''
पहिल्या मजल्यावरील
गज नसलेल्या खिडकीकडे त्याची धाव
मास्तर त्याला मिठीत घट्ट पकडतात.
कॉलेजचीच पोरं ती...
पोरा-पोरींचा गदारोळ.
''सर सोडा त्याला तो मरणार नाही''
''मरु द्या''
''सर, किती घाबरतात नै ”
''सर, पेपरातल्या बातम्या वाचून आलाय तो”
मास्तरानं पोराला पेपर देण्याचं
खोटं आश्वासन दिलं.
गप्पात रंगवून ठेवलं.
तो पर्यंत पोराचा राग उतरलेला.
''सर, चूक झाली.
असं पुन्हा करणार नाही,
रागाच्या भरात वाहून गेलो”
मास्तरानं वरवर हिम्मत दाखवली तरी,
नोकरीच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच,
मास्तराची खिंडीतून सुटका झाली.
प्रतिक्रिया
22 Mar 2010 - 7:51 pm | प्रमोद देव
पोरं लैच फुडं गेली म्हनायची...
मास्तुरेला बी ढोस देत्यात...
मास्तुरे सांबालून रे...कंदी तरी स्टिंग ऑप्र्सेसन करतील तुजं! :(
22 Mar 2010 - 11:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पोरं लैच फुडं गेली म्हनायची...
आवं ती पुढंच हाय. आपून लै मागं :)
प्रतिसादाबद्दल आभारी...!
>>कंदी तरी स्टिंग ऑप्र्सेसन करतील तुजं!
देव साहेब, काय कल्लं नाय ?
-दिलीप बिरुटे
22 Mar 2010 - 10:51 pm | विसोबा खेचर
वा सर! छान कविता..
तात्या.
22 Mar 2010 - 11:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> वा सर! छान कविता..
ऑ ! मी तर गद्य लेखन केले होते, ते पद्य वाटतंय का ?
[ लिहितांना गद्य पद्य असा काहीच विचार केला नव्हता म्हणा]
असो, तात्या लेखनाच्या कौतुकाबद्दल धन्यु...!!! :)
-दिलीप बिरुटे
22 Mar 2010 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते
बाप रे... कठिणच प्रसंग म्हणायचा...
बिपिन कार्यकर्ते
22 Mar 2010 - 11:40 pm | टारझन
व्वा !! प्रा.डॉ. एकदम फुल्टू फॉर्म मधे (नेहमीच असतात :) )
ह्या लेखणप्रकाराला पद्य म्हणावं की गद्या ? की मुक्तक ? ह्यात वाचकांना कनफ्युज करण्याचं कसब वाखाणन्याजोगं आहे. तसे पाहता लेखनातला विषय अगदीच अनसिन आहे ... आजवर कोणाच्याही ध्यानी मनी नव्हता आणि पहाण्यातही नव्हता ! कोणाला माहित आहे ? परिक्षांना कॉपी ही केली जाते ते ? कॉपी करणं सोडाच .. पण आपल्या शिक्षकांसमोर असा चिरका आवाज काढुन "सर, उत्तरपत्रिका द्या ना !" असं म्हणालेलं कधी आपल्या स्वप्नकल्पनांतही होतं ? पण लेखकानं आपल्या लेखण कौशल्याने कसा नटरंगी साज चढवलाय जणु ! नव्या पिढीचे कुसुमाग्रज म्हणुन गणता येईल असं काव्य आहे हे. सुरेख .. शब्द आटले ... :)
- (प्राडॉश्रीचा फॅन) टार्या.
22 Mar 2010 - 11:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>वाचकांना कनफ्युज करण्याचं कसब वाखाणन्याजोगं आहे.
वाचक काय इथे लिहिणाराच कनफ्युज आहे. :)
>>नव्या पिढीचे कुसुमाग्रज म्हणुन गणता येईल असं काव्य आहेवाटतंक
बाप रे ! कौतुक जरा जास्तीचेच झाले. पण, राहू दे...! :)
>> परिक्षांना कॉपी ही केली जाते ते ?
हम्म, त्यावर नंतर कधीतरी...!
असो, आपले प्रतिसाद चांगले लेखन करायला बळ देतात हे काय वेगळे सांगणे न लगे. तेव्हा आपले मन:पुर्वक आभार....!
[खरं तर मला वरुन चौथा, दुसरा असे अपेक्षीत होते] :)
-दिलीप बिरुटे
[टा-याच्या [चक्क चांगल्या]प्रतिसादाने भारावलेला]
23 Mar 2010 - 12:46 am | शुचि
प्रसंग मस्त रंगवलाय. मास्तर होणं खायचं काम नाही बा हे माहीत होतं पण इतकं अवघड असेल हे माहीत नव्हतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
23 Mar 2010 - 3:59 am | राजेश घासकडवी
मधल्या सीनची आठवण झाली... बाकी मास्तरांनी खिंड छान लढवली.
राजेश
23 Mar 2010 - 8:20 am | अक्षय पुर्णपात्रे
सर, कमीत कमी सिलॅबस तरी नीट सांगायचा. 'अपेक्षित' नसलेले प्रश्न देणे म्हणजे विद्यार्त्यांना खिंडीत गाठणे.
23 Mar 2010 - 10:39 am | झकासराव
अगाबाबौ!!
भारीच आहे हा इमोशनल अत्याचार....
23 Mar 2010 - 1:02 pm | अवलिया
खिडकीला गज बसवुन घ्या. टेंडर पास करुन द्याल तर पाच टक्के तुमचे.
--अवलिया
23 Mar 2010 - 7:30 pm | चतुरंग
खरंतर मुक्ततेला अटकाव पण मास्तरांवर जी वेळ आली अशावेळी गज असणे म्हणजे मुलांच्या आततायीपणाला अटकाव असेच वाटले!
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या जागी एखादी विद्यार्थिनी असती तर मास्तरांना तिला पकडून ठेवणेही अवघड झाले असते? धरलं तर ओरडतंय, सोडलं तर उडी मारतंय! :( )
चतुरंग