ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता
चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता
कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे
म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले?
म्हटले अग सारे नवीनच घेतले
लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले
तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे
आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे
अग आमच्याकडे जुने सामान नाही
जुने ठेवायला येवढी जागाही नाही
तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले
आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले
लग्नानंतर जागेची मला गरज भासणार
सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार?
जुने फ़र्निचर!!! अचानक बाउन्सर तिचा
डोसक्यात पसरला माझ्या तिखटजाळ लोचा
तडकावून म्हटले माझी ट्यूब आत्ता पेटली
आधुनिक मुलींची फ़र्निचरची व्याख्या कळली
तसेच म्हणायचे तर आहे माझ्या कडे
जुने फ़र्निचर, जपतो मी जिवापलीकडे
बाबा, नेहमी लाकडाचा घोडा झालेले
आईने मांडीच्या पा्ळण्यात झोके दिलेले
खांदे बाबांचे हाय बॅक चेअर माझी
लहानपणचा पलंग होता आईची कुशी
मी लग्नाचा झालो तरी त्यांच्या मनात
अजून मला लहानासारखेच जपतात
जुन्या फ़र्निचरची तुला अडचण वाटत असेल
फ़ाईव्ह स्टार वाल्याशीच मोट तुझी जुळेल
नवीन बेडसारखा वापरुन टाकेल तुला मोडीत
जुने फ़र्निचर फ़ेकून तोही घेईल नवे मस्तीत
तिच्या बाऊन्सरला फ़ाऊल ठरवून
मॅच मधूनच तिला टाकले काढून
X( X( X( X( X(
वाचने
4651
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजकालच्या
उहापोह
In reply to आजकालच्या by अमृतांजन
>>ह्याच
In reply to उहापोह by अरुण मनोहर
आम्ही
अशाच आणखी तुमच्या पार्टीत येवो!
In reply to आम्ही by पर्नल नेने मराठे
अगदी झक्कास कविता.....
जुने फर्निचर?
अगदी ..
कविता
वास्तवदर्शी...
असेच म्हण्तो
कविता
+ १ सहमत!
In reply to कविता by बिपिन कार्यकर्ते
मान्य
In reply to कविता by बिपिन कार्यकर्ते
मास्तरांश
In reply to मान्य by विकास
खुप छान..