फर्निचर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
17 Jan 2010 - 3:31 am

ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता
चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता

कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे
म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले?

म्हटले अग सारे नवीनच घेतले
लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले

तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे
आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे

अग आमच्याकडे जुने सामान नाही
जुने ठेवायला येवढी जागाही नाही

तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले
आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले

लग्नानंतर जागेची मला गरज भासणार
सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार?

जुने फ़र्निचर!!! अचानक बाउन्सर तिचा
डोसक्यात पसरला माझ्या तिखटजाळ लोचा

तडकावून म्हटले माझी ट्यूब आत्ता पेटली
आधुनिक मुलींची फ़र्निचरची व्याख्या कळली

तसेच म्हणायचे तर आहे माझ्या कडे
जुने फ़र्निचर, जपतो मी जिवापलीकडे

बाबा, नेहमी लाकडाचा घोडा झालेले
आईने मांडीच्या पा्ळण्यात झोके दिलेले

खांदे बाबांचे हाय बॅक चेअर माझी
लहानपणचा पलंग होता आईची कुशी

मी लग्नाचा झालो तरी त्यांच्या मनात
अजून मला लहानासारखेच जपतात

जुन्या फ़र्निचरची तुला अडचण वाटत असेल
फ़ाईव्ह स्टार वाल्याशीच मोट तुझी जुळेल

नवीन बेडसारखा वापरुन टाकेल तुला मोडीत
जुने फ़र्निचर फ़ेकून तोही घेईल नवे मस्तीत

तिच्या बाऊन्सरला फ़ाऊल ठरवून
मॅच मधूनच तिला टाकले काढून

X( X( X( X( X(

भयानकबिभत्सकरुणअद्भुतरसकवितासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

17 Jan 2010 - 8:17 am | अमृतांजन

आजकालच्या मुली बर्क्ष्याच प्राक्टीकल झाल्यात. त्या स्पष्ट बोलून दाखवतात हाच त्यातील फरक.

नवरे बायको की आई ह्या मानसिक व्दंव्दात अडकून बसतात व कॉन्फ्लिंक्ट रीझोल्युशन करु शकत नाहीत व लवकरच सगळ्या प्रश्नांना अक्राळविक्राळ रुप येते व प्रोब्लेम सुधारणेच्या पलिकडे जातो.

ह्यावर पर्याय म्हणजे वेगळे राहणे हाच तोडगा आहे असे पक्की समजूत करुन घ्यायला वरील कारण पुरेसे असते.

मागील पिढी - आज जे रीटायर्ड आहेत (आपण नेहमी आपल्या विचारांना आपल्या सोशल - इकॉनॉमी ग्रुपमधे येतील त्यांचाच विचार करतो) त्यांना त्यांच्या स्वतच्या घ्राचे स्वप्न उतारवयात पूर्ण कर ता आले- त्यांनी त्यांना मिळालेल्या पैशत जमेल तेव्हढे मोठे घर घेतले/बांधले.

आज जे उतार वयात आहेत पण कमावते आहेत, त्यांनी त्यांच्या कमावत्या काळात पण बरेच उशीरा त्यांना झेपेल एव्हढे घर घेतले आहे.

आज जे तरुण आहेत ३०-३५ चे, व कमावते आहेत त्यांची घरे झाली आहेत.
त्यांनीही त्यांना झेपेल एव्हढी घरे घेतली आहेत- ही पिढी वेगळी आहे- त्यांच्या आई-वडीलांची वेगळी घरे असणे कदाचित आज नाही पण कालावधीने असणे शक्य आहे.

पुढील पिढीच्या बाबतीत मात्र सुदैवाने आइ-वडील व मुले ह्यांनी वेगवेगळी घरे असणे सहज शक्य होईल त्यामुळे सासू-सून हा प्रश्न कायमचा निकाली लागेल असे वातते.

[फक्त नवरा-बायको ह्यांना एकत्र राहणे जमेल की नाही ही शंका आहे]

अरुण मनोहर's picture

18 Jan 2010 - 6:00 pm | अरुण मनोहर

ह्या प्रश्नाच्या उहापोहाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद.
(अशा प्रकारच्या) प्रत्येक प्रश्नाला बहुआयामी उत्तरे असतात, व सर्वमान्य तोडगा, ज्याचा त्याने सर्वांगीण विचार करून काढायचा असतो हे ही खरे. सर्वांना लागु पडणारा असा एकच रामबाण उपाय असु शकत नाहीच.
पण ह्या कवितेतल्या भावना वेगळ्याच आहे. नाही, मुला मुलींनी प्रॅक्टीकल देखील असावेच. पण भारतीय संस्कृतीत शिकवल्या प्रमाणे वडील मंडळींचा आदर करून एकमेकात विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा की नको? की असंस्कृत गवारासारखे "फर्निचर" बगैरे संबोधून आपली पातळी दाखवायला हवी? (मी ऐकलेल्या खर्या गोष्टीत "डस्ट बीन" हा शब्द वापरला होता. मला लिहायला देखील लाज वाटली म्हणून मी तो बदलून "फर्निचर" केला.)

ह्याच मुली लग्न झाल्यावर नवर्याशी कशा वागतील हे समजून घेणे फार कठीण नसावे! असो.

अमृतांजन's picture

18 Jan 2010 - 8:39 pm | अमृतांजन

>>ह्याच मुली लग्न झाल्यावर नवर्याशी कशा वागतील हे समजून घेणे फार कठीण नसावे! असो.
>>

नवरे ही नंतर कसे वागतील ह्याची काहिच शाश्वती देता येत नाही.

पर्नल नेने मराठे's picture

17 Jan 2010 - 3:55 pm | पर्नल नेने मराठे

:O आम्ही बर्याच बर्या मग ह्याच्यापुढे /:)
चुचु

:)

वेताळ's picture

17 Jan 2010 - 5:02 pm | वेताळ

मस्तच सिक्सर मारली हो तुम्ही. जाम खुश आहे आपण ह्या कवितेवर...
अजुन येवुद्यात अश्या मस्त कविता.
वेताळ

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2010 - 2:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

मनोहर राव

कविता उगाचच वाचली असे वाटले आणि "जुने फर्निचर, डस्ट बिन" ह्या उपमा वाचुन अजुनच अस्वस्थ वाटले. मी काही श्रावणबाळ वगैरे नाही. पण "जुने फर्निचर" काढुन भंगारात टाकावे हा विचार सुध्दा मला नकोसा वाटला.

असा अमानुष विचार जर कुणी करु शकत असेल तर अश्या व्यक्ती पासुन लांबच राहीलेले बरे.

आपण पाश्चिमात्य जगाचे अंधानुकरण करत आहोत हेच खरे. अनुकरणच करायचे असेल तर सगळ्याच गोष्टींचे करावे. फक्त सोयीच्या गोष्टींचे नको.

त्या मुलीला विचारा की बाई तू लग्ना ऐवजी दोन वर्ष "कॉनट्रॅक्ट" वर कुणा बरोबर रहायला तयार आहेस का? म्हणजे कसे "फर्निचर आवडले तर त्याचे पैसे देउ नाहीतर उगाच जन्मभराची आडगळ कशाला सांभाळायची"

तुमची कविता, कविता म्हणुन चांगलीच आहे. पण उगाच हळवे करुन गेली.

पैजारबुवा.
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

कराडकर's picture

18 Jan 2010 - 3:57 pm | कराडकर

अगदी मनातले शब्द उतरविलेत तुम्ही...
तरी या मुलीने आधीच तिचे विचार सांगीतले म्हणून ठीक,
नाहीतर अशी सुद्धा उदाहरणे आहेत की ज्यांना हे विचार लग्नानंतर येतात..
कविता छानच आहे..

मदनबाण's picture

18 Jan 2010 - 7:36 pm | मदनबाण

कविता वास्तवदर्शी आहे.

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

विकास's picture

18 Jan 2010 - 11:28 pm | विकास

वास्तवीक मी कविता कधीतरी वाचायला येतो. नाव वेगळे वाटले म्हणून काय आहे हे बघायला गेलो तर खरेच वास्तवदर्शी कविता वाटली. वरती काही विचार आले आहेतच...

पाश्चात्य जगतात, विशेष करून या संदर्भात आपण कायम अमेरिकेचा विचार करतो. त्या संदर्भात त्यांची एकूणच पद्धती वेगळी असते. मात्र त्यातील सोयीचा भाग घेणे हा प्रकार होतो. जेंव्हा आमच्याकडे आई-बाबा येणार आहेत म्हणून एकदा आनंदाने एका अमेरिकन मित्रास सांगितले, तेंव्हा त्याने अरे वा! असे कौतुकाने म्हणत पुढे विचारले की, कोणत्या हॉटेलात उतरणार आहेत? :-(

मात्र सर्वच असे नसतात, जसे सर्वच श्रावणबाळ नसतात की राम नसतात की पुंडलीकही नसतात... अनेक एकत्र राहणारी कुटूंबेही पाहीली आहेत तसेच जवळ जवळ घरे करून स्वतःचे स्वातंत्र्य आनंद लुटणारीही पाहीली आहेत. यातील कुठलीच गोष्ट गैर नाही. एक स्वैयपाक घर आणि दोन पिढीतील दोन बायका, ये बडी नाइन्साफी है! असे म्हणायची कधी कधी वेळ येते. :-) तसेच बदललेल्या जीवन पद्धतीत कधी कधी आई-वडील त्यांच्या पद्धतीने सामाजीक अथवा व्यावसायीक दृष्ट्या अ‍ॅक्टीव्ह असू शकतात आणि मुलांचे म्हणून वेगळी जगण्याची पद्धती असू शकते... त्यामुळे अमुक एक म्हणजेच बरोबर अथवा आदर्श असे कोणी वाटून घेऊ नये असे वाटते.

तरी देखील एकंदरीत वृत्ती ही असल्या म्हणजे फर्निचरच्या भाषेतून दिसते... याचेच अजून एक टोकाचे उदाहरण ऐकलेले आहे ते म्हणजे, मुलीने "फोटोतील आई-वडील हवेत" असे म्हणलेले. X(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jan 2010 - 9:50 am | प्रकाश घाटपांडे

तरी देखील एकंदरीत वृत्ती ही असल्या म्हणजे फर्निचरच्या भाषेतून दिसते... याचेच अजून एक टोकाचे उदाहरण ऐकलेले आहे ते म्हणजे, मुलीने "फोटोतील आई-वडील हवेत" असे म्हणलेले

असेच म्हन्तो! आपणही एक दिवस फोटोत जाणार आहोतच हे कळते पण वळत नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jan 2010 - 10:48 am | बिपिन कार्यकर्ते

कविता म्हणून छानच. पण त्यातून मांडलेली समस्या मात्र बहुआयामी आहे. त्याबद्दल सविस्तर ऊहापोह इतरत्र होऊ शकतो. पण या कवितेच्या अनुषंगाने इतकेच म्हणावेसे वाटते की, पुरूषांनी पण बायकोच्या आई वडिलांना आदराने आणि प्रेमाने वागवले पाहिजे. अगदी स्वतःच्या आईवडिलांसारखे. ते मात्र खूपच क्वचित होताना दिसते, अजूनही. ताली दोनो हाथसे बजती है...

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

20 Jan 2010 - 5:52 pm | चतुरंग

(मुलगा आणि जावई)चतुरंग

विकास's picture

20 Jan 2010 - 11:09 pm | विकास

पूर्ण (सक्रीय) सहमत.

ताली दोनो हाथसे बजती है...
अहो दोन हाताने टाळी वाजण्याकरता हात जास्तवेळेस जवळ येण्यापेक्षा , भांड्याला भांडे जास्त लागते त्याचे काय करायचे? ;)

----

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2010 - 10:43 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तरांशिवाय इतर कोणाचेही समुपदेशन घेऊन बघा. ;)

बिपिन कार्यकर्ते

चिऊ's picture

20 Jan 2010 - 12:02 pm | चिऊ

बाबा, नेहमी लाकडाचा घोडा झालेले
आईने मांडीच्या पा्ळण्यात झोके दिलेले..

विशेष आवडले.."जुने फ़र्निचर " जपणारी नक्कि मिळेल. शुभेच्छा