मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय.
हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय.
जरा जरा दादा कोंडके यांच्या लिखानासारखी हाय. नाय आधीच विचारून घ्येतो. लागलं तर परतिक्रीया देवू नगा पन वाचा आन तुमाला आनंद मिळल ही गॅरंटी.
एखांद्याला ह्या काव्यासारखंच दुसरं दादांचं काव्य माहीत आसल तर त्ये बी सांगा म्हनजे माला "प्रेरणा" लिवता येईल.
ही कविता म्या माझ्यावाले फेव्रेट आसलेल्ये शाहिर दादा कोंडके यांना अर्पण केल्येली हाय.
वाचा तर मंग आता.
माझा धरशिल का हातात...हात
माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात || घृ ||
येतिस का शेतात
आधी लोळूया मातीत
चढूया मग झाडावर
आपल्या या आंब्याच्या बनात || १ ||
तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||
पळू पळू गोल पळू
धराधरी चल ग खेळू
मळलेलं अंग मग धुव्वूया
चल जवूया विहीरीच्या पाण्यात || २ ||
मग सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||
मऊमऊ तुझ्या हातांनी
का दाबतीया माझ्या हातांना
गिरकी घेवून मग अंगात
का वीज नाचवती पायात || ३ ||
तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||
खुसूखुसू का लावतीया
गाल तुझे हे माझ्या गालांना
फुलांचा गजरा डोक्यात
त्यानं श्वास कोंडला श्वासात || ४ ||
तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||
(आता हिरवीन म्हनतीया)
कायबी काय बोलतो रं
चोरून काय बघतो रं
आजुबाजू नाय कोनी बांधावर
का म्हनून सच्या असा येशी तु अंगावर || ५ ||
जवा म्या धरला र हातात
हात तुझा रं माझ्या हातात ||
- पाषाणभेद (आपला दगडफोड्या वो)
प्रतिक्रिया
1 Jan 2010 - 10:24 am | jaypal
हीथ टाकल्याशिवाय अन ती वाचल्याशिवाय सेन्सॉर सारकं व्हत की नाय कस ठरायच?
तवा बिगीबिगी टाका बर तुमी.
म्होरचा ईचार कराया लै भारी भारी टक्कुरी हायती ईथ.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
5 Jan 2010 - 9:30 am | jaypal
पाषण भेदा, दादांचा वारसा पुढे चालवणार तर तु
दादांच संमद येगळच व्ह्त बघा म्हंजी..... वागन वो वागन.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
31 Jan 2010 - 9:07 am | शुचि
>>आधी लोळूया मातीत
चढूया मग झाडावर>> =)) =)) =)) =))
वाचून हसून हसून पुरेवाट झाली.
पण दारूण अपेक्षाभंग झालाय- द्वयर्थी काही सापड्त का नाहीये? :B :B :B
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
31 Jan 2010 - 5:58 pm | बिपिन कार्यकर्ते
पण दारूण अपेक्षाभंग झालाय- द्वयर्थी काही सापड्त का नाहीये?
काय सांगता? कमाले... आहे तर खरं.
बिपिन कार्यकर्ते
1 Feb 2010 - 11:59 am | पाषाणभेद
बघा बघा, लोकं आमच्या गाण्याला कसे नावे ठिवून र्हायलेत त्ये. आता म्या 'म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय' आसं म्हनलो तर लोकं लगीच त्यामधी दोन अर्थ शोधाया लागले. म्या तर खेडेगावातला तरून आन तरनी त्यांच्यावाल्या शेतात, निसर्गात खेळ खेळत्यात, पळापळी खेळत्यात, झाडाव चढत्यात, हिरीत आंगूळ करत्यात आसं दावलेल्य हाय. ह्ये करत आसतांना त्ये एकमेकांचा हात हातामधी धरतात.
माला सांगा, तुमच्या शेहरात बागमंदी सोडा, भर रस्त्यात पोरं पोरी रस्त्यात हातात हात घ्येत्यात का नाय? फटफटीव चिकटून बसत्यात का नाय? मंग आमच्या गाववाल्या पोरांनी जरा मजा मारली की तुमाला काय होतं रं, च्यामायला?
मंडली, म्या काय चुकीचे लिवेल हाय का? आन दादांनी बी काय कधी चुकीचे लिवेल व्हते काय? उगा आपलं कायतरी.
आमच्या वाल्या गान्याला तुमच्या त्या शेणसार बोर्डासारकं नियम लावू नका.
अवांतर: बिपिन आम्दार, मजा म्हनून घ्या बरकां.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)