हवाईदलातील कार्यकाळात रेल्वेप्रवासातील घडलेले मजेशीर किस्से
सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात. त्यातल्या काही माझ्या वाट्याला आल्या. त्यांची कथा...
माझा स्वभाव जरा जादा हिशोबी. वेळेबाबत तर फारच. प्रवासाला निघताना कमीतकमी तासभर स्टेशनवर पोहोचणाऱ्यांचा मला तिटकारा आहे. वेळे आधी १० मिनिटे पोचणे मला योग्य वाटते. त्या हिशोबाने मी कार्यक्रम आखतो. त्या आधीच्या मधल्याकाळाची आखणी करणे शक्य नसते. कधी ऐन वेळी वाटेतले रेल्वे फाटक बंद असते, कधी ‘बंद’ची दगडफेक तर कधी नदीला आलेले पूर तर कधी वरिष्ठांचे निरोप! आता त्यावर मात करणारा खरा लीडर. आता वर हवाईदलाची ‘अकड’ ती वेगळीच. त्या सर्वांचा परिपाक म्हणजे दस्तूर खुद्द विंग कमांडर! त्यामुळे प्रवासात विलक्षण थरार निर्माण होतोच.
गाडीचे इंजिनच गायब !
तो दिवस होता २ जानेवारी १९८५. पहाटे ३ -३।। ची वेळ. पूर्वीच्या फर्स्ट क्लासच्या कूपेत खालच्या बर्थवर मी आरामात घोरत होतो. वरच्या बर्थवर एक चटपटीत सार्जंट (आता नाव आठवत नाही) झोपला होता. ऐन वेळी एका मेजरने इमर्जन्सी कामाला निघाल्याचे सांगून आपला होल्ड-ऑल खाली पसरला होता. गाडी अचानक प्रचंड हादरायला लागली. खालून प्रचंड धाड धाड आवाज येऊ लागले. करकचून ब्रेक लागल्यासारखी गाडी थांबली. सार्जंटचे पार्सल धप्पकन मेजरच्या अंगावर कोसळले. ‘तेरे की तो’ म्हणत तो ओरडला. ‘कौन है’ म्हणत उठून उभा राहिला. लाईट गेलेले. मिट्ट काळोख. ‘सर, गाडीला काही तर झालय’! खाली पडलेल्या सार्जंटचा कातरलेला आवाज होता. ‘येस, गेट रेडी’ चपळाईने सार्जंट फर्स्ट कूपेतून बाहेर गेला तितक्याच त्वरेने परतला. ‘सर, गाडीला इंजिनच नाही ये’ लोकांचे मोठमोठ्याने बोलल्याचे आवाज तोवर ऐकू यायला लागले.
‘हॅलो, हॅलो, मी गार्ड बोलतोय’ असा आवाज आला. तो इलेक्ट्रिक पोलवरच्या सेटला आपली यंत्रणा जोडून जवळच्या स्टेशनशी संपर्क करत असावा. ‘आमच्या झेलम एक्सप्रेसला अपघात झाला आहे. अंधार आहे. साईडच्या ट्रॅकला धक्का पोचला असावा. गाड्या पाठवू नका. रिकव्हरी व्हॅनची व्यवस्था करा. जळगाव-भुसावळ सेक्शनमधे ४३८ नंबर किमीच्या खांबांपाशी आम्ही आहोत. ओव्हर अँड आऊट.’
आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी उतरलो. सार्जंट कूपेत थांबला. गाडीचे इंजिन गायब होते! नक्की कोणत्या दिशेना प्रवास होत होता याचा अंदाज येईना. कारण पुण्याहून निघताना आमचा फर्स्टचा डबा इंजिनपासून तिसरा होता. दौंडला ट्रॅक बदलून इंजिन मागे जाते म्हणून आमचा डबा आता मागून तिसरा होता. त्या अंदाजाने मी खडी तुडवत निघालो. पार्सल व्हॅनपाशी आलो. डबे एकमेकाला जोडतात त्या ठिकाणी अंदाजाने हात फिरवून पाहिला तर चटकाच बसला. त्या ठिकाणचा पत्रा फाटून मोठ्ठे खिंडार पडले होते! मी धीराने आणखी आत हात घातला. आतला पत्रा तरी शाबूत होता! हायसे वाटले, कारण आमचा माल त्या ठिकाणी होता !
लांबवर सायरनचा आवाज घोंघावत होता. लालबत्तीची उघडझाप होत होती. त्या वरून ते इंजिन १-२ किमी लांब जाऊन थांबले होते. वाटेतील लोकांच्या बोलण्यावरून कळत होते की गाडी रुळावरून घसरली आहे. पार्सल व्हॅनच्या खालची चाकांची जोडी शेजारचा ट्रॅक ओलांडून शेतात फेकली गेली होती. त्या आधी निखळलेल्या चाकांच्या दाबाने स्लीपर्स कापत गेले होते. त्याचा प्रचंड आवाज झाला व करकचून थांबण्याने बरेच जण धडपडले. दुसऱ्या ट्रॅंकवरील इलेक्ट्रिक तारांची नासधूस झाल्याने तो ही निकामी झाला होता. गाडीचे ४-५ डबे रुळावरून उतरले होते. पण उलटले नव्हते. ना आग लागली होती. तास-दोनतास असेच गेले. उजाडायला लागले. आसपासचे लोक, डॉक्टर मदतीला आले. मात्र कोणालाही गंभीर इजा न झाल्याचे लक्षात आले. जरा पुढे तापी नदीवर मोठा पूल आहे तिथे हा अपघात घडला असता तर मोठीच हानी झाली असती. ती टळली. हळू हळू रेल्वेची कुमक आली. दुसऱ्या ट्रॅकवर जेथवर तो ट्रॅक ठीक होता तेथ पर्यंत दुसरी मोकळी गाडी येऊन उभी राहिली. कर्ण्यातून पुकारा झाला की लोकांनी त्या गाडीत चढावे. ती गाडी भुसावळला जाईल. तेथे दिल्लीहून आलेली झेलम एक्सप्रेस उभी आहे. त्यामधे बसून पुढील प्रवास चालू होईल. प्रवासी धावले. त्यांची ती गडबड. इकडे आम्ही माल घ्यायला पार्सल व्हॅनपाशी. त्याचे आम्ही रक्षकवाहक होतो. ती सील केली होती. ते उघडायला गार्ड तयार होईना. खूप हुज्जत झाली. मी युनिफॉर्म चढवला होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटी तोड काढली व आमचे कामाचे ९ बॉक्स आम्हाला द्यायचे ठरले!
सील तोडले गेले. आत खच्चून माल भरला होता. कसेबसे ते अवजड खोके बाहेर आले. तिकडे एक लॅडीस तयार होती. रेल्वे ट्रॅक तपासणी करण्याकरता वापरली जाणारी ढकलगाडी सर्वांनी पाहिली असेल. तिलाच ‘लॅडीस’ म्हणतात. त्यावर सर्व खोके लादले गेले. त्या उंच रचलेल्या पेट्यांवर मी आरुढ झालेलो. लॅडीस ढकलणारे दोन पोर्टर व त्यांच्या मागे पळत येणारा सार्जंट! निघाली आमची वरात! साधारण एक कि.मी. पळत गेल्यावर उभ्या गाडीत आम्ही ते खोके कसेबसे लादलेले पाहिले अन् ड्रायव्हरने ती गाडी सोडली!
भुसावळला प्रसंगावधान राखून चटपटीत सार्जंटने केळ्याचा मोकळा ठेला पाहिला व त्यावर ते खोके लादले. ते ढकलत आम्ही दिल्लीहून आलेल्या झेलम एक्सप्रेसपाशी पोचलो. जरा आरडाओरड करून आम्ही एका लेडीज कंपार्टमेंटमधे ते सामान चढवले. आता फर्स्टक्लासची चैन नव्हती. उरलेल्या जागेत कसेबसे बसलो तेंव्हा हायसे वाटले. पहाटे पासून जागे. भूखे-प्यासे. पुरी भाजी पॅक करून आम्ही घेतली. समोर केळी दिसत होती. मी सार्जंटला फरमाईश केली, 'ती आणलीस तर पुढे खायला मिळाले नाही तरी चालेल'. ‘आत्ता आणतो’ म्हणून तो गेला अन् इकडे गाडी सुरु व्हायला एकच गाठ पडली. आता येईल मग येईल करत एकदम खांडव्याला गाडी थांबली. तरी याचा पत्ता नाही! तेवढ्यात ‘स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक कौन है?’ असे विचारत एक जण आला. मी हो म्हणताच, ‘आपके लिए टेलिग्राम है’ म्हणून गुलाबी कागद हातात देऊन गेला. त्यावर लिहिलेले होते, ‘सर केळी घेण्याच्या नादात माझी ट्रेन चुकली आहे. माझी काळजी नको!’
अशी ती ‘लॅडीस’ वरची सफर कायमची लक्षात राहिली! पुढे तो सार्जंट भेटला म्हणाला, ‘सर केळी भलतीच महागात पडली. पण आपला डबा शेवटचा होता. त्यात आपण लेडीज कंपार्टमेंटमधे होतो म्हणून मला टेलिग्राम आपणाला मिळेल याची खात्री होती’. माझी सासुरवाडी जळगावची. नंतर एकदा तेथील दै.गावकरीचे जुने अंक पाहिले त्यात त्या अपघाताचा फोटोसह उल्लेख होता. एका वरिष्ठ मिलिटरीतील अधिकाऱ्याने अमुक अमुक केले असा अस्मादिकांचा उल्लेख लक्षणिय होता. असो.
‘टॅक्सीने केला गाडीचा पाठलाग!’
माझा मित्र विंग कमांडर (नि) सी एम उर्फ चंदर मोहन गांधी एक महान वल्ली होता. त्याच्या परिवाराची आमची श्रीनगर पासूनची मैत्री. गांधी प्रचंड तऱ्हेवाईक व लहरी प्राणी! मूठवळून सिगरेट करंगळी जवळ ठेवून स्वारी प्रदीर्घ झुरके घेत धुम्रपान करीत असे. बिहारीवळणाच्या त्याच्या सवयी! जर्दावाल्या पानाचा तोबरा आसपासची भिंत लाल करायचा सदैव तयार! तीन पत्ती, पपलू, टिटलू वगैरे पैसे लाऊन पत्त्याचा जुगार खेळण्याचा भरपूर शौक! तंद्री लागली तर काय करेल सांगता येणार नाही. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पुस्तक वाचनात रंगली स्वारी गाडी येऊन केंव्हा गेली त्याचा पत्ताच नाही याला! ‘ट्रेन छूट गई यार’ असे म्हणून खळखळून हसणारा हा प्राणी एक महान वल्ली होता. एकदा पैजेत हरल्याने कार विकून अपरात्री आलेला पाहून त्याची पत्नी निशा म्हणे, ‘हा नवरा काय कधी करेल नेम नाही’! असे हे कुटुंब पुण्यात लोहगावच्या क्वार्टरमधे पाहुणे म्हणून आले होते! पाहुणचार संपवून पंत गांधी बंगलोरला आधी रवाना झाले. निशा व तिच्या मुलीचे नवी दिल्लीपर्यंत झेलम एक्सप्रेसचे एसीचे तिकिट होते. तिला सोडायला मी पुणे स्टेशनवर गेलो होतो. वाटेत तिकिटे घेतल्याची खात्री म्हणून मी तिची तिकिटे पाहिली. रिझर्वेशनचा चार्ट पहायला सोईचे म्हणून निशाने तिकिटे माझ्याजवळच ठेवली.
रीतसर ‘टाटा बाय बाय’ केल्यावर परतताना हवाईदलातील एकजण गाठ पडले त्यांच्या मागे स्कूटर वरून जाता जाता सहज खिशात हात गेला तर त्यांची तिकिटे हातात आली! गाडीतर केंव्हाच निघून गेलेली. परत आम्ही स्टेशनवर गेलो मास्टरांना सर्व सांगितले. त्यांनी टीसीला तिकिटे नगरला मिळतील असा निरोप द्यायची व्यवस्था केली. मी टॅक्सीने अहमदनगरच्या दिशेने निघालो. रेंगाळत चालवणाऱ्या चालकाचा अवतार पाहून त्याला मी परत स्टेशनवर सोडायला सांगितले. त्यात आणखी वेळ जात होता. शेवटी एक पैजेवर गाडी पकडून देतो म्हणून तयार झाला. इमर्जन्सी केस घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सच्या थाटात टॅक्सी निघाली. सिनेमात दाखवतात तशी कधी करकचून ब्रेक मारत तर ट्रकवाल्यांना शिव्यांचा वर्षाव करत मागे टाकत फियाट अशी भिन्नाट जात होती की पूछो मत. शेवटी नगर स्टेशनच्या जवळच्या ओव्हरब्रिज वरून झेलमसाठी मिळालेला हिरवा सिग्नल पाहिला, तेंव्हा हायसे वाटले. मी पोहोचेपर्यंत गाडी धडाडत थांबली. निशा दारातच उभी होती. तिच्या हाती तिकिटे दिली. नवऱ्याची आठवण काढून ती म्हणाली, ‘भाईसाब आप भी कोई कम नही!’ दोघांनीही गलती बद्दल कान कान पकडले... तिला ट्रेनमधे निरोप मिळाला होता म्हणून टीसीने सतावले नव्हते. तेंव्हा मला हायसे झाले. परतीला टॅक्सीवाल्याने खाऊन-पिऊन मला खूप कापला. पण तो टॅक्सीतून केलेला पाठलाग अद्याप विसरलेला नाही.
असे अनेक प्रसंग आठवून मजा वाटते. हे सर्व घडायला माझी हवाईदलातील कारकीर्द कारणीभूत होती. त्याशिवाय असे थ्रिल कसे अनुभवायला मिळाले असते?
भाग १ समाप्त... पुढे चालू
प्रतिक्रिया
18 Nov 2009 - 12:14 am | मी-सौरभ
सौरभ
18 Nov 2009 - 12:17 am | बिपिन कार्यकर्ते
ओकसाहेब, औरभी आनेदो.
बिपिन कार्यकर्ते
18 Nov 2009 - 12:19 am | टारझन
है.... लै झकास ... शशीकांत साहेब ... अंमळ जबरा लेख :)
- टारझन
18 Nov 2009 - 12:27 am | प्रभो
येऊद्या...वाचतोय
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
18 Nov 2009 - 12:35 am | चतुरंग
टॅक्सीतून पाठलाग तर मस्तच.
शशिकांत साहेब अजून येऊदेत अनुभव!
(उत्सुक)चतुरंग
19 Nov 2009 - 12:14 am | अनिल हटेला
जब वी मेट चा सीन डोळ्यासमोर आला.....;-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
18 Nov 2009 - 12:40 am | टुकुल
ज ब र द स्त !!
वाचुन मजा आली, अजुन येवुद्यात
--टुकुल
18 Nov 2009 - 12:41 am | रेवती
पहिला किस्सा ग्रेट! आपले अभिनंदन! सासूरवाडीला सगळ्यांची काय प्रतिक्रिया होती? अपघात म्हटल्यावर तो किती मोठा आहे? हा विचार मनात येत नाही आधी भिती वाटते. आणि लेडीज कंपार्ट्मेंटाचा अश्याप्रकारचाही फायदा झाला म्हणायचा!;)
दुसरा किस्साही आवडला. ट्रेन पकडण्यासाठी टॅक्सीने पाठलाग हा प्रकार कुठल्यातरी शिनुमात पाहिल्यासारखा वाटतो. कधीकधी तसेच प्रसंग घडताना दिसतात त्याची मजा वाटते.
हे प्रकार वाचून मलाही एक किस्सा आठवला. त्यावेळी माझी पुतणी नुकतीच मराठी वाचायला शिकली होती. दोन्ही मावस दिर व जावा दिवाळीच्या सुट्टीत प्रवासाला निघाले होते. शनिवार रात्री उशीराची ट्रेन! सकाळ होताहोता डेस्टिनेशन येणार होते. आपापली हापिसे संपवून दमलेले सगळेजण मुलांना घेउन झोपून गेले. सकाळी उठल्यावर पुतणीने स्टेशनवरचे बोर्डस वाचायला सुरुवात केली. "श-र्मि-ली सा-डी सें-ट-र" तिने एकेक अक्षर वाचताना जाऊबाई म्हणाल्या की पुण्यातली जाहिरात येथे कोठे आली? नंतर लक्षात आले की ह्यांची ट्रेन रात्रभर तिथेच होती. पुढे झालेल्या अपघाताने गाड्या खोळंबल्या होत्या. सगळ्यांची झोप मात्र छान झाली.
रेवती
18 Nov 2009 - 12:54 am | मी-सौरभ
:)
सौरभ
18 Nov 2009 - 12:57 am | टुकुल
हे हे हे हे..
--टुकुल.
18 Nov 2009 - 9:01 am | बाकरवडी
वा काय झोप ओ .........;)
=))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
18 Nov 2009 - 7:10 pm | शशिकांत ओक
रेवतीजी,
मी त्या दिवशी प्रवास करत आहे हे कळवले नव्हते त्यामुळे त्यांना नंतर कळले की पेपर मधे ज्या सैनिक अधिकाऱ्याची रेल्वे अधिकाऱ्यांशी हमरी तुमरी झाली असे छापुन आले होतो तो मीच होतो. असो.
कदाचित पुढील भागात वाचाल माझ्या ऐन वेळेवर पोचण्याचा हिसका सासुबाईंना कसा बसला ते.
आपल्या किश्यावरून चिविजोशांच्या बनेश्र्वरच्या सहलीची आठवण झाली. त्यांची गुंड्या- चिमण व चिऊ- काऊची बैल गाडी पुन्हा परतून घरी आल्याचे आठवले.
शशिकांत
18 Nov 2009 - 1:13 am | पक्या
शशिकांतजी मस्त लेख. खरोखरच एकसे एक अनुभव आहेत. मजा आली वाचताना. अजुन आवडेल वाचायला .
जय महाराष्ट्र , जय मराठी !
18 Nov 2009 - 1:38 am | योगी९००
जबरे किस्से..अजून येऊ द्दा..
पण पहिला किस्सा मजेशीर वाटला नाही..सिरीयस वाटला..
खादाडमाऊ
18 Nov 2009 - 7:20 pm | शशिकांत ओक
खादाडमाऊ
भाऊ,
किस्सा सीरियसच होता! कोर्टमार्शलची वेळ आली असती, सामानाला काही मोडतोड झाली असती तर!
सोनीवरील 'मन में है विश्वास' चा २६ जानेवारी२००७ चा गणतंत्र दिवसाच्या परेडचा एपिसोड पाहिलात का? मग कळल असत हवाईदलाचा हिसका काय असतो ते.
शशिकांत ओक
18 Nov 2009 - 2:18 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री ओक, मजेदार किस्से आवडले.
_____________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
18 Nov 2009 - 11:38 pm | शाहरुख
श्री पुर्णपात्रे यांच्याशी सहमत..
श्री ओक, मजेदार किस्से आवडले.
-श्री शाहरुख
18 Nov 2009 - 4:11 am | गणपा
ओक साहेब मस्त किस्से आहेत. रंगवलेतही छान.
येउद्या अजुन पोतडीतले बाकीचे किस्से.. :)
18 Nov 2009 - 7:09 am | पर्नल नेने मराठे
सुरेख्!!!
चुचु
18 Nov 2009 - 9:29 am | निखिल देशपांडे
मस्त किस्से येवु द्या अजुन
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
18 Nov 2009 - 10:14 am | हर्षद आनंदी
छान लेख...
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
18 Nov 2009 - 10:19 am | उमराणी सरकार
मस्त रंगवलेत किस्से ओकसाहेब. मध्यंतरी मिरज स्थानकावरून कुर्डुवाडीला जाणारी नॅरो गेज ची रेल्वे चालकाविनाच सुटली. चालकाने एम-८० वर पाठलाग करून गाडीचा ताबा घेतला. त्याची आठवण झाली.
उमराणी सरकार
18 Nov 2009 - 10:20 am | सुनील
झक्कास, असेच किस्से येऊद्यात अजून.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Nov 2009 - 11:02 am | अवलिया
मस्त !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
18 Nov 2009 - 11:45 am | llपुण्याचे पेशवेll
छान मस्तच होते सगळे किस्से.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
18 Nov 2009 - 11:50 am | llपुण्याचे पेशवेll
छान मस्तच होते सगळे किस्से.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
18 Nov 2009 - 2:22 pm | प्रकाश घाटपांडे
दुसरी कायतरी भारी आयडिया नाई का? म्हजी आस कि वरिजनल तिकिट पुन्याच्या मास्तरकं जमा करायच आन त्यांनी नगर वाल्याला पेशल निरोप द्यायचा कि तु तिकडुन डुप्लिकेट तिकिट दे नाय तर सर्टिफिकिट दे यान तिकट काल्ढ्याल हाय म्हनुन.
(अप्रवासी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Nov 2009 - 2:45 pm | jaypal
नाड्या , इलस्टीक सोडुन वेगळ्याच विषयात हात घातल्या बद्द्ल आपले अभिनंदन![](http://misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/clap.gif)
![](http://misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/clap.gif)
![](http://misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/clap.gif)
वरील प्रतीसादांवरुन वाचकांची नाडी आपण ओळखली असणारच. अजिन येउद्या
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Nov 2009 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
ओक साहेब खुमासदार लेखन खुप खुप आवडले. अजुनही असेच किस्से वाचायला आवडतील.
लेखनात आवश्यक तिथे स्पेसींग, पॅराग्राफ बदलणे ह्याचा वापर केलात, तर लेखन अजुन सुटसुटीत होउन वाचताना मजा येईल असे वाटते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Nov 2009 - 6:49 pm | शशिकांत ओक
राजकुमार,
शशिकांत
18 Nov 2009 - 6:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
Input format वर क्लिक करा, Full HTML च्या बटनावर क्लिक करा, रंग दिसायला हवेत.
बाकी लेख तुमच्या इतर ललित लेखनाप्रमाणेच .... खुमासदार!
अदिती
18 Nov 2009 - 7:46 pm | शशिकांत ओक
विक्षिप्त अदितीताई, :O
आपण सांगितलेल्या आज्ञा पाळल्या अन पहातो तो काय जमले की हो. :H
धन्यवाद
आज्ञापालक शशिकांत
18 Nov 2009 - 6:42 pm | भोचक
थरारक किस्से. मजा आली.
(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव
18 Nov 2009 - 6:53 pm | शशिकांत ओक
भोचक यार,
pan style="color: #000099;">शशिकांत
18 Nov 2009 - 6:57 pm | धमाल मुलगा
मस्त किस्से ओकसाहेब.
आवडला हा लेख :)
आणखी येऊ द्या..
18 Nov 2009 - 7:15 pm | सूहास (not verified)
छान लेख
सू हा स...
18 Nov 2009 - 7:53 pm | हैयो हैयैयो
उत्तम लेख!
येथे मान्यवर सदस्यांनी पूर्वी कथन केलेप्रमाणेच माझेही मत असून त्याकारणे मीही हा लेख उत्तम आहे असाच प्रतिसाद नोंदवू इच्छितो.
वाचकांच्या मागणीप्रमाणे लेखन अवश्य येवू द्यावे. तसेही नाडीग्रंथविरोधक सारे ते संभ्रमयुक्त स्वप्नावस्थेमध्ये उद्भ्रमित पावले आहेत!
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
18 Nov 2009 - 11:42 pm | शशिकांत ओक
श्री. हैयो आणि अन्य मित्र हो,
आपल्या प्रतिसादाचे विशेषतः हैयोंनी उत्तम लेख असे रसग्रहण केल्याबद्दल धन्यवाद.
हा लेख माझ्या हवाईदलातील आठवणींच्या प्रकरणातील एक प्रकरणाचा भाग आहे. वाचकांची आवड सांभाळून त्यातील काही भाग हळूहळू वाचकांना सादर करत राहीन.
शिवाय नाडी ग्रंथांवरील माहितीपूर्ण लेख व माझे त्यामधील किस्सेही सुनवता येतील.
हैयोंच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली नाडी ग्रंथांच्या तमिळ भाषा व काव्यरचनेवर प्रकाश टाकणारी लेखमाला त्यांनी सादर करावी. त्यामधून नाडीमहर्षींच्या उत्तुंग प्रतिभेची व त्यांनी उच्च पातळीवरून मिळवलेल्या ज्ञानाची वाचकांना ओळख होऊन नाडी ग्रंथांची सामान्य लोकांना आपापल्या जीवनातील समस्या सोडवायला कशी मदत होते याचे चित्र निर्माण होईल.
यासाठी मी त्यांना प्रत्यक्ष भेटून नाडीग्रंथांच्या लेखन असलेल्या वह्या व अन्य साहित्य पारखून त्यातील महत्वाच्या भागांवर प्रकाश पाडायला विनंती करीन. आपल्यापैकी कोणी आपल्याकडील नाडी पट्टीतील मजकूर वहीत नोंदलेल्या वह्यांचे झेरॉक्स मला देऊ इच्छित असेल तर मी ते हैयोंच्याकडे तत्परतेने सुपूर्त करेन व त्याबद्दलचे पुढील मार्गदर्शन प्रसिद्ध करीन. हे सर्व करत असताना व्यक्तिगत बाबींना गोपनीय ठेवण्याची खबरदारी घेतली जाईल.
या कार्यात मिपावरील तत्पर वाचक मदतीच्या हाकेला ओ देतील अशी आशा व्यक्त करतो.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत ओक
19 Nov 2009 - 1:44 am | रामपुरी
नाड्या इलॅस्टिकपेक्षा काहितरी वेगळं वाचायला मिळाल्याचा आनंद होतोय न होतोय तोच हा प्रतिसाद... दुधात मिठाचा खडा... बाकी एक प्रश्न मला नेहेमी पडतो, ख्रिश्चन मुसलमान वगैरे लोकांच्यापण नाड्या असतात का हो? मागे एकदा पुण्यात एका ख्रिश्चन मित्राला मुद्दाम घेउन गेलो होतो तेव्हां नाडीवाल्यांची तंतरली होती म्हणून विचारलं.
(अवांतर प्रतिसादाला अवांतर प्रतिप्रतिसाद :))
19 Nov 2009 - 12:21 pm | सुनील
ख्रिश्चन मुसलमान वगैरे लोकांच्यापण नाड्या असतात का हो?
नाही. मुसलमान लोक लुंग्या नेसतात तर ख्रिश्चन मंडळी बटणवाल्या प्यांटी! सबब त्या नाडीवाल्याची तंतरली यात आम्हाला आश्चर्य वाटत नाही!!
बाकी दुधात मिठाचा खडा याच्याशी सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Nov 2009 - 11:27 am | श्रीयुत संतोष जोशी
एकदम मस्त ओक साहेब.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
19 Nov 2009 - 3:58 pm | सुमीत
भन्नाट आहेत तुमचे अनुभव, अजून वाचायला आतूर.
20 Oct 2023 - 11:13 pm | Trump
मस्तच आहे. काही तरी वेगळे वाचण्याचा आनंद मिळाला.
पुढच्या भागचा दुवा कोठे आहे?
8 Nov 2023 - 2:35 pm | शशिकांत ओक
कृपया वरील धाग्यातील अनुक्रमणिका पहा. तिथे उरलेले भाग दिले आहेत.
8 Nov 2023 - 6:16 pm | Trump
धन्यवाद. :)