स्पर्धा
[शशक' १९] - ग्लास
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.
"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली.
[शशक' १९] - गॅस चेंबर
"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता.
"पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते.
"जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला.
[शशक' १९] - गळ
सकाळपासून तो गळ टाकून बसलेला. दुपार होत आली तरी एकही मासा मिळाला नव्हता. उन्हासोबत वाढणाऱ्या भुकेने तो चिडचिडलेला…
कंटाळून उठला, तर बाजूला काहीतरी चमकलं! बघितलं तर एका डब्यात सॅन्डविच होतं. "एखाद्या मासेमाऱ्याचं असेल..." पोटात आग पडलेली! इकडंतिकडं बघत त्यानं हळूच ते सॅन्डविच उचललं आणि घाईघाईत एक मोठा घास घेतला.
[शशक' २०२०] - प्रसाद
प्रसाद
आत मूर्तीचं मनासारखं दर्शन आणि बाहेर आपल्या शाबूत चपला, यापेक्षा सच्च्या भक्तांना देवळांत काय हवं असतं? दोन्ही मिळालं होतं. आता भूक आणि ऊन यांच्या निराकरणासाठी समाधानी भक्तगणांचे पाय सरसावले होते.
शशक'२०२२ - बाप
शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?
[शशक' २०२०] - हेवा
हेवा
उर्वशीचं रात्री उशिरा येणं, उशिरा उठणं, नवऱ्याने तिची सरबराई करणं राधा खिडकीतून बघायची आणि तिच्या सुखाचा हेवा करायची. ते सुख मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करायची.
[शशक' १९] - तिकीट
"हॅलो..प्रदेशाध्यक्ष साहेब..तात्याराव बोलतो"
"हा बोला.."
"आमच्या तिकीटाचं सांगणार व्हते तुमी?"
"तिकीट कन्फर्म आहे तुमचं ह्यावेळी..खोके पाठवा आन तयारीला लागा निवडणुकीच्या"
"बरं...करतो व्यवस्था.."
काही दिवसांनी..
"प्रदेशाध्यक्ष..गेम खेळू नका आमच्यासोबत..आप्पासाहेबाकडून पन खोके मागवल्याची खबर लागली आम्हाला"
[शशक' १९] - क्रॉस कनेक्शन
तो : आज नक्कि ना ?
मी : हो .
तो : कसं ओळखायचं ?
मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन .
तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स ,काळी पँट.
मी : ९ वाजता . भारत कॅफे .
तो : डन .
.पहिल्यांदाच भेटणार होतो . सोशल मिडियावरची ओळख . एक्साइटेड.
सकाळची कामं आवरली . इशाचा टिफिन , शाळेची घाई आवरुन मिलिंदचा ब्रेकफास्ट .
मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२
मे महिना सुरु झाला आहे, ग्रीष्मातला सूर्य आग ओकतोय, बाहेर पाहिलं तर फक्त रखरखीत वातावरण, टळटळीत ऊन, असह्य उकाडा, जीवाची काहिली होतेय. अशा वातावरणात एक थंड हवेची झुळूक यावी, पावसाचा शिडकावा होऊन आसमंत मातीच्या सुगंधाने दरवळू लागावा, असं वाटत राहतं. अशीच उन्हाळ्यातून थोडी सुटका करून घेण्यासाठी मिपा आयोजित करत आहे - मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२
[शशक' १९] - गारेगार
आठवणी उलगडून बसतो,
तुझे फोटो पाहताना
अन हात थरथरतात,
जुने मेसेजेस वाचताना
फोटोज डिलीट करताना,
उसवलेल्या जाणिवांना जपताना,
तुझा नंबर ब्लॉक करतो,
नंबर पाठ असताना
तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा
वटवृक्ष झालेला असतो
मी त्या वटवृक्षाखाली
का बरं फुलं शोधत बसतो?
शशक'२०२२ - संपत्ती
एका बरोबर एक आला. त्यातून झाले पाच. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले सात. संपत्ती तरी अजून कशाला म्हणतात हो ?
पाचांच्या बरोबर पाच आले. त्यातून झाले दहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले वीस. संपत्ती तरी अजून चांगलीच जमत होती.
दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती.
[शशक' १९] - दखल
तो जितक्या वेळा समोरून जाईल तितक्या वेळा अपेक्षेने त्याच्याकडे बघणारी ती. ओळख वाढवण्यासाठी कळेल ना कळेल असा प्रयत्न करणारी.
जगातल्या घडामोडींची काडीचीही फिकीर न करता कायम स्वतःमध्ये रमलेला तो.
तरीही प्रत्येक वेळी आज काहीतरी प्रगती होईल अशी आशा करत राहणारी ती.
[शशक' २०२०] - चानस
चानस
मुंबईतल्या एका गजबजलेल्या स्टेशनवर दुरवरुन आलेली ट्रेन थांबली . डब्यामधुन ती उतरली . लांबच्या प्रवासामुळे तिचे कपडे चुरगाळले होते .
अंग शिणवटुन गेले होते . चेहराही काळवंडला होता .
[शशक' २०२०] - वनवास
वनवास
टीव्हीवर रामायण बघताना प्रश्न विचारून बाबाला भंडावून सोडलं तिने. नीट जेवूही नाही दिलं.
जमतील तेवढी उत्तरं बाबाने दिली. तिला जवळ घेत, "तू माझा लक्ष्मण आहेस." असं लाडाने म्हटलं.
[शशक' १९] - सत्य कटू ते जहर वाटते
"मी आई होणार हे समजल्यावर तुला आनंद नाही झाला? मख्खासारखा जेवणावरुन उठून गेलास? किती विचित्र वाटले? आई बघ किती आनंदात आहेत, त्यांचे प्लॅनही सुरु झाले"
[शशक' १९] - भूक
जंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते.
एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला.
फिरून फिरून तो दमला.
त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक !
ते कसे मिळवावे? तो विचारात पडला.
[शशक' १९] - स्ट्रेट ?
चालत्या ट्रेनच्या प्रथम श्रेणीमध्ये बाकावर बसून तो जीनीच्या साडी नेसण्याच्या धडपडीकडे बघत तिला न्याहाळत होता...
"जीनी... आपण पुन्हा भेटणार ना?"
"नाही...."
"काल पहिल्यांदयाच भेटलेल्या मला... तू तुझं सर्वस्व दिलंस मग आता का लाजतेस?"
तिने फक्त जालीम कटाक्ष टाकला आणि आपली बॅग आवरायला लागली
[शशक' १९] - वस्तरा
रणरणत्या दुपारी, उन्हाच्या झळा बसत होत्या. फुफाटा आसमंतात उडाला होता.
"सुन्या अरे ये सुन्या चल लवकर, शाली वरल्या माळाकड चाललीये. आज नक्की गठल बघ"
ब्रश खाली ठेऊन सुनील वस्तराच हातात घेणार होता इतक्यात दिपकच्या हाळीने तो चमकला
"आँ "
"अरे आँ काय करतोय चल लवकर, काय फटाकडी दिसून ऱ्हायली आज शाली, कहरच "
"अरे संपत" सुनील चाचरत बोलला.
शशक'२०२२ - टेलिपॅथी
“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.
दिवाळीचा पाडवा,ती हरखली, किंचीत लाजली सुद्धा.काय हो अचानक कसे काय?आणी ते सुद्धा रात्रीच्या साडेअकरा वाजता.तो नुसताच गालात हसला.झोपलेल्या मुलांकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला.
आई बाबा तुम्ही येणार नाही म्हणून तुमच्या बहिणीकडे गेलेत.
- 1 of 7
- next ›