रणरणत्या दुपारी, उन्हाच्या झळा बसत होत्या. फुफाटा आसमंतात उडाला होता.
"सुन्या अरे ये सुन्या चल लवकर, शाली वरल्या माळाकड चाललीये. आज नक्की गठल बघ"
ब्रश खाली ठेऊन सुनील वस्तराच हातात घेणार होता इतक्यात दिपकच्या हाळीने तो चमकला
"आँ "
"अरे आँ काय करतोय चल लवकर, काय फटाकडी दिसून ऱ्हायली आज शाली, कहरच "
"अरे संपत" सुनील चाचरत बोलला.
" कोण संप्या, त्यो शालीचा भाऊ? त्याला काय घाबरतोय? मी बघून घेईन त्याला. तू आटप "
इतक्यात छातीवर अंथरलेल्या कळकट्या रुमालाने गिऱ्हाईकाने दाढीचा फेस पुसला. अन बाकड्यावरचा वस्तरा उचलला.
तसा पहिला वार सुनीलवर केला, आणि दिपककडे मोर्चा वळवला.
हादरलेला दिपक चाचरत एवढंच बोलू शकला,
"संपतराव तुम्ही?"
प्रतिक्रिया
7 Feb 2019 - 6:49 pm | प्रचेतस
क्या बात है...जबरा.
+१
7 Feb 2019 - 7:10 pm | ऋतुराज चित्रे
+१
7 Feb 2019 - 7:16 pm | सुधीर कांदळकर
असे प्रत्यक्षात होत्नाही हेच वाईट आहे.
7 Feb 2019 - 7:37 pm | किसन शिंदे
+१
7 Feb 2019 - 7:51 pm | प्रमोद देर्देकर
याला म्हणतात शशक. जबरा ट्विस्ट
+१
13 Feb 2019 - 8:11 am | प्रमोद देर्देकर
पुन्हा वाचली असता असं वाटलं की मी चुकीचा +१ नाही ना दिला. कारण गोष्ट फसलीय.
सुन्या जो न्हावी आहे त्यानेच संपतला दाढीचा साबण लावलाय आणि तो दिपकला पहिल्या वाक्यातच अडवेल व सावधही करेल की हा खुर्चीवर जो बसलाया तोच संपतराव आहे. तेव्हा पुढे काही बोलु नकोस म्हणुन.
21 Feb 2019 - 4:49 am | रुपी
"अरे संपत" सुनील चाचरत बोलला.
>> त्याने प्रयत्न केलाय, पण दिपकने त्याला फारसं बोलायला संधीच दिली नाही असं वाटतं..
7 Feb 2019 - 8:15 pm | मराठी कथालेखक
+१
7 Feb 2019 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
7 Feb 2019 - 11:07 pm | मोहन
+१
8 Feb 2019 - 6:57 am | अंतु बर्वा
+1
8 Feb 2019 - 9:39 am | विनिता००२
भारी :)
+१
8 Feb 2019 - 10:19 am | संजय पाटिल
+१
8 Feb 2019 - 10:48 am | राजाभाउ
+१
8 Feb 2019 - 11:19 am | सिद्धार्थ ४
+१
8 Feb 2019 - 11:22 am | यशोधरा
+१
8 Feb 2019 - 11:49 am | ज्ञानोबाचे पैजार
जबरा
पैजारबुवा,
8 Feb 2019 - 12:03 pm | चिनार
+१
जबरा
8 Feb 2019 - 4:12 pm | प्रशांत
+१
8 Feb 2019 - 6:43 pm | पलाश
+१.
8 Feb 2019 - 8:08 pm | हरवलेला
+1
8 Feb 2019 - 8:12 pm | नावातकायआहे
+१
8 Feb 2019 - 8:34 pm | टर्मीनेटर
मस्त...
लेखनाची स्टाईल जव्हेरगंज यांची वाटत आहे. कथा त्यांची नसल्यास आगाऊ अंदाजाबद्दल क्षमस्व!
8 Feb 2019 - 10:38 pm | आनंद
मस्त!
9 Feb 2019 - 2:46 am | गामा पैलवान
+१
-गा.पै.
9 Feb 2019 - 9:36 am | पिलीयन रायडर
+1
9 Feb 2019 - 2:37 pm | पद्मावति
+१
9 Feb 2019 - 6:03 pm | चांदणे संदीप
+१
Sandy
9 Feb 2019 - 10:48 pm | ज्योति अळवणी
जबरदस्त
9 Feb 2019 - 11:20 pm | दादा कोंडके
कोणीका असेना पण गिर्हाईकासमोर असं बोलणारा दिपक &%$# असल्या पाहिजे.
9 Feb 2019 - 11:46 pm | धनावडे
+1
13 Feb 2019 - 1:45 pm | स्वधर्म
दिपक एवढं उघड अशी गोष्ट बोलेल असं वाटत नाही. ट्विस्टसाठी म्हणून काहीही?
16 Feb 2019 - 9:58 pm | भीमराव
वस्ताऱ्याने आजकाल वार होत नाहीत. पुर्वी च्या काळी ब्लेड चा शोध नवता तेव्हा धार लावायचे वस्तारे होते. ते धारेच्या दगडावर घासून घासून नंतर दाढी करत. हेच प्रसंगी शस्त्रासारखे वापरता येत. नंतर HIV घ्या भितीने ते बंद झाले.
21 Feb 2019 - 4:49 am | रुपी
+१
22 Feb 2019 - 2:07 am | राघवेंद्र
+१
22 Feb 2019 - 12:40 pm | एकविरा
जबरदस्त
22 Feb 2019 - 3:36 pm | दीपकजी
+१