पेपिनचे पाचकपात्र

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
10 Mar 2009 - 2:53 pm

ही माझी कविता रेशीमनिळाई या काव्यसंग्रहात प्रसिद्ध होणार होती.... मग ती पुढे एका दिवाळी अंकात छापून आली...

जागतिक महिला दिनी , तो बायकोला सरप्राईज देण्यासाठी निदान आमटीभात तरी करून खायला घालू, या विचाराने स्वयंपाकघरात शिरला आणि व्हायचे तेच झाले.

ती : आमटीभात खाताना ,खडा आला घासात
सखया रे खाऊ कसा, तुझा मी हा आमटीभात

ती : शिजलेल्या भातातून आला तो एकटाच
दूर शिते शिजलेली , उरली पानी कितीक
ही असली पाककला तुझी सारे जाणतात

तो
: सांग कशी तुजविनाच, निवडू मी डाळतूर
तांदूळ हे छळवादी , अन् हा कूकर फितूर
भात माझा करपला , आमटीचीही लागली वाट

साहित्यिकविचारसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Mar 2009 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

म्याडम, आता तुम्ही पण विडंबनं करायला लागलात ना... मग आता आमच्याबद्दल तक्रार करायची नाही हां... ;)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

10 Mar 2009 - 3:01 pm | अवलिया

बापरे ... मी आता गमन (पक्षी- लॉग आउट*) करतो.. :)

* हल्ली बरेच नवविडंबक शब्दकोशात अर्थ पाहुन लगेच विचारणा करतात, म्हणुन खुलासा. काय बिपीनदा ठिक ना?

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Mar 2009 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

णाना... तो अर्थ आम्हाला शब्दकोशात पाहून सांगावा नाही लागला... ;)

बिपिन कार्यकर्ते

विसुनाना's picture

10 Mar 2009 - 3:39 pm | विसुनाना

'चांदण्यात फिरताना'चे उत्कृष्ट विडंबन.
अगदी चालीवर गाऊन पाहिले.
स्वगतः
तिरपी अक्षरे तिरपी का असावीत बरे?

क्रान्ति's picture

10 Mar 2009 - 5:26 pm | क्रान्ति

सखया रे आवर हा सावर हा आमटीभात!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

धनंजय's picture

10 Mar 2009 - 7:37 pm | धनंजय

याचा कुकर पुरुषांसाठी सुकर म्हणून प्रसिद्ध असतो का?