माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.
हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील.
आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो. पशुपालनात जास्तीतजास्त दूध देणार्या गाईम्हशी, कुक्कुटपालनासाठी जास्तीत जास्त अंडी देणार्या कोंबड्या मिळाव्यात यासाठी सर्व जनुकीय तंत्रज्ञान पणाला लावतो. नुकतेच एका प्रसिद्ध दुग्ध उत्पादकाच्या जाहिर मुलाखतीत असे कळले की म्हशीला हमखास म्हैसच होईल असे (म्हणजे लिंगनिश्चितीचे) तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. या सगळ्या उपद्व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.)
मला जे गैरसोईचे सत्य सांगायचे आहे, ते समजण्यासाठी प्राथमिक जीवशास्त्राची उजळणी आवश्यक आहे. सर्व लैंगिक प्रजोत्पादन करणार्या जीवांमध्ये जेव्हा मादी गर्भ धारण करते तेव्हा अर्धी गुणसुत्रे (केंद्रकाम्ले) नराकडून शुक्रजंतुच्या मार्फत आणि अर्धी गुणसूत्रे स्त्रीकडून बीजांडाच्यामार्फत येतात आणि गर्भधारणेच्या वेळेला संयोग पावून गर्भ वाढायला सुरुवात होते. यात महत्त्वाचा आणि धक्कादायक पुढे आहे. सध्याच्या काळात शिकून नोकरी करणार्या स्त्रिचे लग्नाच्या वेळी सरासरी वय २८-३० असते. म्हणजे आज जन्माला आलेल्या मुलाचे बीजांड त्याच्या आईचा गर्भ तयार होत असताना (तिच्या आजीच्या गर्भधारणेच्या वेळी) तयार झालेले असते. म्हणजे आईकडून मिळणारा जनुकीय वारसा सुमारे ३०वर्षे या जगात अस्तित्वात असतो. त्यात मुंबई, कलकत्ता सारख्या बकाल शहरांमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या आईच्या पोटातील बीजांडांवर तेथील प्रदूषण आणि जगण्याचा संघर्ष यामुळे केंद्रकाम्लावर घातक परिणाम होण्यास सुरुवात होते आणि अत्यंत संथपणे बीजांडे किडायला सुरुवात होते आणि सदोष संततीसाठी कारणीभूत ठरते. गर्भधारणेपूर्वी आईला धूम्रपान आणि मद्यपान यांचे व्यसन असल्यास याची गंभीरता अधिक वाढते. यातील काही सदोष संतती नैसर्गिक गर्भपाताच्या रुपाने बाहेर टाकली जाते. पण ते जन्माला येणार्या सर्वच जीवांच्या बाबतीत होत नाही आणि काही व्याधी किंवा दोष जन्मत:च घेऊन बाळ जन्माला येते किंवा काही दोष पुढे उत्तर आयुष्यात व्याधींना जन्म देतात. जन्माला येणार्या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. शुक्रजंतूवर पण ताण आणि प्रदूषणाचे परिणाम होतच असतात आणि प्रजननाची समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे अधुनमधुन वाचायला मिळणार्या बातम्यांमुळे कळते. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...
सजीवांच्या पेशीतील केंद्रकाम्लाचा शोध १९५३ मध्ये लागला, त्यानंतर पेशीविज्ञानात अधिकाधिक प्रगतीच होत राहीली. संपूर्ण मानवी जनुकसंचाचे तसे़च पेशीकेंद्रकाच्या अंतर्रचनेचे रहस्य शास्त्रज्ञानी आता उलगडले आहे. पेशीच्या केंद्रकामध्ये केंद्रकाम्लाच्या लडी तयार झालेल्या असतात. हिस्टोन या प्रथिनांभोवती एखाद्या रिळाप्रमाणे केंद्रकाम्लाचे वेढे बसलेले असतात. हे वेढे बसण्याची कारणे गमतीदार आहेत - पेशीतील केंद्रकाम्लाची जर नुसती साखळी उलगडली (जिला इंग्लिश्मध्ये क्रोमॅटिन म्हणतात) आणि तिची लांबी मोजली तर ती सुमारे २ मीटर इतकी भरते. आता इतकी मोठी साखळी एका पेशीच्या सूक्ष्म केंद्रकामध्ये बसवण्याचे काम निसर्ग मोठ्या हुशारीने करतो. हिस्टोन हे धनभारित अल्कली गुणधर्माचे प्रथिन असते तर केंद्र्काम्ल ऋणभारित असते. हीस्टोन प्रथिनांना शेपट्या असतात. केंद्रकाम्लातील जनुक, हिस्टोनच्या शेपट्याना कोणते रेणू चिकटतात यावर ते सक्रिय होणे अथवा निष्क्रीय होणे अवलंबून असते. हिस्टोनच्या शेपट्याना सहसा मेथिल, ऍसिटील आणि फोस्फोरिल रेणू चिकटतात. या प्रथिनांभोवती गुंडाळले गेल्यामुळे केंद्रकाम्लाची लांबी आपोआप बरीच कमी होते आणि ते पेशीच्या केंद्रकात व्यवस्थित बसते.
हीस्टोन प्रथिनांचे चार मुख्य प्रकार आहेत. ते h1, h2 h3 आणि h4 या सांकेतिक नावांनी ओळखले जातात. हिस्टोनच्या शेपट्याना कार्बन आणि नायट्रोजन यातील एका बाजुला कार्बनचा अणु आणि दूसर्या बाजुला नायट्रोजनचा अणु असतो. नायट्रोजनचा अणु असलेली शेपटी जरा लांब असल्याने ती केंद्रकाम्लाच्या हिस्टोनभोवती तयार झालेल्या गुंडाळीतून बाहेर डोकावते. ही हिस्टोन प्रथिने एखाद्या कळीप्रमाणे (स्वीच) जनुकांना सक्रिय, निष्क्रिय करण्याचे काम करतात. गर्भधारणेच्यावेळी आद्य पेशीमध्ये जेव्हा मातेचे आणि पित्याचे केंद्रकाम्ल संयोग पावते तेव्हा या लडीं हिस्टोनसह नवीन जिवामध्ये संक्रमित झालेल्या असतात. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पित्याकडुन फक्त केंद्रकाम्लाची अर्धी साखळी शुक्रजंतू वाहून आणतात. हिस्टोनची देणगी मात्र आईकडूनच मिळते. पित्याकडून जेमेतेम १०% हिस्टोन मिळतात.
आपले पर्यावरण, अन्न आणि जगण्याचा संघर्ष जनुकीय पातळीवर दूरगामी बदल घडवून आणतात, हे सांगणार्या अधिजनुकशास्त्राची मुहूर्तमेढ कोनरॅड वॅडींग्टनच्या संशोधनातून 1942 मध्ये रोवली गेली. तेव्हापासून या शाखेची वाढ वेगाने होत असून दरवर्षी प्रसिद्ध होणार्या संशोधन निबंधांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे.
आईवडिलांच्या आणि आईच्या आईच्या जीवनशैलीचे संततीवर जनुकांमार्फत कायमस्वरूपाचे दूरगामी परिणाम होतात, हा अधिजनुकशास्त्राचा महत्त्वाचा संदेश आहे. त्याच बरोबर आपले पर्यावरण, जीवनशैली आपल्या जनुकांना अधिजनुकीय बदलांद्वारे नियंत्रित करते. शारीरिक व्यंगापासून कर्करोगासारख्या गंभीर व्याधीपर्यंत अधिजनुकीय बदलांचा प्रभाव कारणीभूत ठरतो. नुकतेच दिवंगत झालेले विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग आणि अनेक विद्वान मानवजातीच्या भवितव्यबद्दल धोक्याचे इशारे देत आहे आणि अधिजनुकशास्त्रातील संशोधन या इशार्यांना पुष्टी देत आहे. विज्ञानप्रसाराला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती आणि संघटना याबाबत मूग गिळून गप्प आहेत.
आपले जनुक आपल्या कर्तृत्वाचे कारण आपण आजवर मानत आलो आहोत. पण हे जनुक कार्यान्वित होणे अथवा निष्क्रिय होणे हे आपली जीवनशैली आणि पर्यावरण यावर अवलंबून असेल. त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते.
प्रतिक्रिया
19 Mar 2018 - 4:35 pm | आनन्दा
बऱ्याच दिवसांनी..
लेख आवडला हेवेसनाल
19 Mar 2018 - 4:46 pm | जेम्स वांड
पण उत्तम संतती होण्याकरता तुम्ही उपाय सुचवले नाहीत, ते सुचवाल तर बरे, कारण मुंबई कलकत्ता सारख्या 'बकाल' शहरांत राहणेही आपण थांबवू शकणार नाही ना!
19 Mar 2018 - 5:19 pm | कपिलमुनी
बर्याच दिवसांनी बोर्डवर आलात .
लेख उत्तम ! पण अपरिहार्यता आहे.
19 Mar 2018 - 6:43 pm | युयुत्सु
"पण उत्तम संतती होण्याकरता तुम्ही उपाय सुचवले नाहीत"
त्याविषयीचे संशोधन अजुन तरी माझ्या वाचनात नाही. काही उपाय सूचतात पण ते वादग्रस्त ठरू शकतात.
- मुंबईसारख्या महानगरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलींशी लग्न न करणे
- गॅस सबसिडी सोडून देण्याचे जसे आवाहन करण्यात आले होते तसे प्रजननाचा हक्क सोडून द्यायचे आवाहन करायचे आणि अशा व्यक्तींचे भरपूर उदात्तीकरण करायचे. त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात जाईल याला प्राथमिकता द्यायची
- मुळात ही समस्या स्त्रियांशी संबंधित असल्याने त्यांना काय वाटते आणि त्यांच्या कल्पना जाणून घेणे आवश्यक ठरेल.
- बिजांडे लहान वयात गोठवून ठेवायचे तंत्रज्ञान विकसित करायचे.
- डीएनए मॅचिंगची नुकतीच मी जाहिरात बघितली. पण त्याच्या यशस्वीते विषयी ठाऊक नाही.
22 Mar 2018 - 2:41 am | इष्टुर फाकडा
मुळात प्रजनन हा हक्क नसून जबाबदारी आहे हे लक्षात यायला पाहिजे लोकांच्या. उगाच होतंय म्हणून काढणारेच खूप आहेत आपल्याकडे. मुलं जन्माला न घालणे हा एक चांगला निर्णय आहे आणि तो घेणाऱ्यांचे कौतुक होणे भारतमध्ये खूप गरजेचे आहे.
22 Mar 2018 - 7:30 am | manguu@mail.com
मुलं जन्माला न घालणे हा एक चांगला निर्णय आहे आणि तो घेणाऱ्यांचे कौतुक होणे भारतमध्ये खूप गरजेचे आहे.
कुणी करायचे कौतुक ? लग्न होउन पोरे काढणार्यानी ? समाजाने ? सरकारने ? कशाबद्दल ?
पोरं न होउ देणार्यानी एक स्वतंत्र क्लब काढावा आणि एकमेकांचं कौतुक करत बसावं .
5 Apr 2018 - 1:08 am | इष्टुर फाकडा
कुणी करायचे कौतुक ? लग्न होउन पोरे काढणार्यानी ? समाजाने ? सरकारने ?
--चांगला प्रश्न आहे.
कशाबद्दल ?
--जन्म न द्यायचा निर्णय विचारपूर्वक घेतल्याबद्दल.
पोरं न होउ देणार्यानी एक स्वतंत्र क्लब काढावा आणि एकमेकांचं कौतुक करत बसावं .
-- कल्पना वाईट नाही :)
22 Mar 2018 - 12:36 pm | पगला गजोधर
चूक, " प्रजनन " हा "BASIC INSTINCT " आहे (रेफः सर्व्हावल ऑफ फिटेस्ट ... )
5 Apr 2018 - 1:11 am | इष्टुर फाकडा
चूक, " प्रजनन " हा "BASIC INSTINCT " आहे (रेफः सर्व्हावल ऑफ फिटेस्ट ... )
-- असुद्याहो, ती किमान १८ वर्षणाची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन प्रजनन होऊ द्यावं इतकच म्हणायचं होतं.
19 Mar 2018 - 7:04 pm | माहितगार
माझा या विषयाचा अभ्यास नाही. आपण या वाक्यात काय सांगताय ते समजले नाही . जरा उलगडून सांगता आल्यास पहावे ही विनंती.
(आपल्याला काय माहित नाही हे कधी कधी कळणारा माहितगार)
19 Mar 2018 - 7:46 pm | युयुत्सु
समजा आज क्ष हे एक मूल जन्माला आले
त्याच्या आईचे वय आज २८ आहे.
म्हणजे क्ष ज्या बिजांडापासून जन्माला आले ते बीजांड क्षच्या आईचा (क्षच्या आजीच्या पोटात) गर्भ तयार झाला तेव्हापासून या जगात अस्तित्वात आहे.
19 Mar 2018 - 7:57 pm | माहितगार
माझे सामान्य ज्ञान पुन्हा एकदा कमी पडत आहे का ? गर्भ आणि बीजांड शब्दांची गल्लत होत नाहीए ना ? आपणास मुलीच्या पोटातील गर्भ ती तीच्या आईच्या पोटात असताना तयार होतो असे म्हणावयाचे असल्यास ते समजते (अर्थात इतर डॉक्टर मंडळींनी यास दुजोरा द्यावा) दुसरे बिजांड दर महिन्यास तयार होतात या गैरसमजात मी होतो तो माझा समज चुकीचा आहे का ? माझ्या सामान्यज्ञानात काय गडबड होते आहे ते उकलावे जमल्यास इतर डॉक्टरमंडळींनी तथ्य नीट मांडण्यात मदत करावी.
19 Mar 2018 - 8:17 pm | युयुत्सु
बिजांड आणि शुक्रजंतुच्या संयोगातून गर्भ तयार होतो व वाढायला लागतो.
हो
21 Mar 2018 - 5:39 pm | पिलीयन रायडर
ओके. मग तसं होत नाही तर नक्की काय होतं?
आणि अजून एक प्रश्न. समजा आईच्या बीजांडा मधील दोष मुलीकडे जात असतील, तर फक्त आईच का, पिढ्यानूपिढ्या हे दोष संक्रमित होत असतीलच ना?
शिवाय कोणतेही अपंगत्व असलेले बाळ जन्माला येते तेव्हा केवळ बीजांडात दोष असेल असे थोडीच आहे? पुरुषाकडून आलेली जनुके, त्यातले पूर्व पिढ्यांचे दोष, आजूबाजूच्या वातावरणातील दोष, खाण्या पिण्यातील प्रदूषण असे अनेक मुद्दे कारणीभूत असू शकतातच ना?
मग निव्वळ शहरी मुलींशी लग्न न करून किंवा त्यांनी मूल जन्माला न घालून काय साध्य होणार आहे?
पूर्वीच्या काळी खेडो पाड्यातल्या लोकांना अशी बाळं होत नव्हती की काय?
21 Mar 2018 - 6:58 pm | युयुत्सु
आईकडून मिळणारा जनुकीय वारसा वडिलांच्यापेक्षा जास्त असतो. आईकडून मुलाकडे आणि मुलीकडे दोघांकडेही दोष जाऊ शकतात.होय. पिढ्यांपिढ्या हे दोष संक्रमित होतात.
21 Mar 2018 - 7:45 pm | टवाळ कार्टा
आईकडून मिळणारा जनुकीय वारसा वडिलांच्यापेक्षा जास्त असतो.
याबद्दल कुठे वाचायला मिळेल सांगता का?....उत्सुकता चाळवल्या गेली आहे
22 Mar 2018 - 4:57 pm | टवाळ कार्टा
उत्तराच्या (मराठीत answer च्या) प्रतिक्षेत
23 Mar 2018 - 2:45 pm | पगला गजोधर
जर
उत्तराच्या = (मराठीत answer च्या)
म्हनजेच
उत्तरा = मराठीत answer
तर मग
प्रतिक्षेत = ?
19 Mar 2018 - 7:08 pm | माहितगार
आपल्या लेखन शैलीवरुन आपले या विषयावर माझ्यासारख्या सामान्यापेक्षा अधिक ज्ञान आहे हे जाणवतेच तरीही उपरोक्त विधानासाठी आपले जे काही संदर्भ आहेत ते आपल्या प्रमाणेच जे इतर जाणकार मिपावर आहेत त्यांना परिक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध व्हावेत असे वाटते.
19 Mar 2018 - 7:42 pm | युयुत्सु
१. Zhao ZH, Schatten H, Sun QY. Environmentally induced paternal epigenetic inheritance and its effects on offspring health. Reprod Dev Med [serial online] 2017 [cited 2018 Mar 19];1:89-99. Available from: http://www.repdevmed.org/text.asp?2017/1/2/89/216862
२. Sheng Ren et al. Periconception Exposure to Air Pollution and Risk of Congenital Malformations, The Journal of Pediatrics (2017)
३. https://www.amazon.in/Epigenetics-Revolution-Rewriting-Understanding-Inh...
४. https://www.youtube.com/results?search_query=epigenetics+
सुरुवात करण्यासाठी हे पुरेसे आहे असे वाटते
19 Mar 2018 - 7:16 pm | माहितगार
महानगरीय प्रदुषणाचा (मुख्यत्वे स्त्री) जनुकांवर घातक परिणामांची शक्यता असा काही आपल्या लेखाचा रोख दिसतो. महानगरीय प्रदुषण अथवा मानवांच्या चुकीच्या सवयीने अधिजनुकशास्त्र हे विज्ञान गैरसोईचे कसे ठरते ते नेमके लक्षात आले नाही.
माझे वाचनातून काही सुटले का ? मुद्दा जरा उलगडून सांगितल्यास आभारी असेन.
(तसा व्यक्तीगत स्तरावर या सर्व चर्चेचा आता मला व्यक्तीगत काहीच लाभ नाही पण विज्ञान विषयक चर्चा अधिक चांगली व्हावी एवाढीच इच्छा)
19 Mar 2018 - 7:49 pm | युयुत्सु
या प्रश्नाने तुम्ही मधमाशांच्या मोहोळाला दगड मारला आहे. तेव्हा हा प्रश्न एकदम आत्ता न घेता थोडा सवडीने घेतो.
19 Mar 2018 - 9:46 pm | माहितगार
सवड अवश्य घ्या टाळले नाही म्हणजे झाले .
आपला लेख म्हणजे मोहोळ, प्रश्न विचारणारे माझे डोक्यात भरलय ते म्हणजे दगड आणि तुम्हाला अपेक्षीत बाकीची टिकाकार मंडळी म्हणजे मधमाशा असे काही उपमा अलंकार आहे का ?
आपण मोहोळ आणल नसते तर आम्ही आमच्या डोक्यात भरलेले प्रश्नांचे दगड कशाला काढले असते ? आणि पण मधमाशा मोहोळात आधीपासूनच असतात असा आमचा गैरसमज आहे :) ह. घ्या.
19 Mar 2018 - 9:47 pm | माहितगार
प्रश्नाचा दगड मारण्यासाठी क्षमस्व
19 Mar 2018 - 9:13 pm | अत्रुप्त आत्मा
@
-~-~- बरं बरं! असं होय!? ;)
19 Mar 2018 - 10:50 pm | दीपक११७७
आपण एक गडबड करत आहात. अश्या परिस्थितीतुन जे succesfully जन्माला येतील (all means) ते पुढील मानव पिढीचे भविष्य असणार आहेत.
I am not happy with current pollution blast
But still we can not forgot
१."ज्या वेळी मानवाने पहिल्या वेळेस अाग निर्माण केली तेव्हांच पर्यावरण चक्रात लुडबुड सुरु झाली होती. "
२. अत्ता पेक्षाही भयंकर वातावरणात मानव प्रजनन करत आला आहे व त्याच आऊट पुट आपण आहोत.
20 Mar 2018 - 11:15 am | युयुत्सु
तेव्हाच्या किडक्या लोकसंख्येचा ताण आणि आताच्या किडक्या लोकसंख्येच्या ताण आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या यात मोठा फरक आहे. तो दूर्लक्ष करून चालणार नाही.
20 Mar 2018 - 11:15 am | युयुत्सु
तेव्हाच्या किडक्या लोकसंख्येचा ताण आणि आताच्या किडक्या लोकसंख्येच्या ताण आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या यात मोठा फरक आहे. तो दूर्लक्ष करून चालणार नाही.
20 Mar 2018 - 11:20 am | युयुत्सु
या युक्तीवादातील चूक अशी की succesfully जन्माला येतात ते सुदृढ आणि निरोगी निपजतील असे यात गृहित धरले आहे. अडाप्टेशनला मर्यादा असतात हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही अधिजनुकीय बदल कसे घडतात, हे आपण समजाऊन घ्यायचा प्रयत्न करावा. मराठीत सर्व सांगण्यास मला मर्यादा आहेत
20 Mar 2018 - 2:41 pm | दीपक११७७
अडाप्टेशनला मर्यादा नाहीत. But it require sufficient time.
साध्या उदाहरणावरुन लक्षात येईल
१. Drug resistance जिवाणू
२. अगदी विपरीत वातावरणात राहणारे जिव
जुनुकिय बदल कसे होतात हे समजुन घेण्याची जास्त गरज आपणास आहे.
20 Mar 2018 - 4:20 pm | जेम्स वांड
असेच काहीसे मनात होते पण नेमके शब्द सुचत नव्हते
20 Mar 2018 - 4:42 pm | युयुत्सु
हास्यास्पद युक्तीवाद!
गुंतागुंतीचे जीव अडाप्ट होण्याला मर्यादा असतात. मी तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकून कितीही वाट बघितली तरी तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत.
20 Mar 2018 - 7:53 pm | सुबोध खरे
तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत.
युयुत्सु साहेब
हा युक्तिवाद आपल्याला वाटतो तितका हास्यास्पद नाही.
उकळत्या पाण्यात नियमितपणे जगणारे जिवाणू आहेत आणि त्यासाठी बदलाभिमुखता (ADAPTABILITY) त्यांनी आत्मसात केली आहे.
A few years ago it was held by Pyrolobus fumarii, a species of archaea found in a black smoker hydrothermal vent on the ocean floor in the middle of the Atlantic. P. fumarii can live perfectly happily in 113C waters.
Since then, another group of scientists has found a microbe from deep-sea vents that is able to survive at 122C. And there are hints that even this is not the ultimate limit for life.
A new microbe, for now called “Strain 121”, has since been discovered in a thermal vent deep in the Pacific Ocean. The microbe thrives at 121C and there are claims that it can even survive for two hours at 130C. However the finding is still contentious, as the strain has not been made publicly available to study.
The bacteria and archaea found in Kamchatka – and in other hot springs around the world – have unique adaptations that allow them to thrive at high temperatures.
The world record for surviving hot temperatures has been raised several times now
Normally the lipid membranes which encase living cells fall apart above 50C, as the ester bonds between the fats break down. Some hot spring microbes get around the problem by using special ether bonds instead of esters, which are sturdier and more robust.
That is just the start, though. Proteins and enzymes that power all the chemical reactions inside cells denature and unravel at high temperatures, as does DNA.
The microbes have found ways to deal with the problem. Special sequences of amino acids appear to reinforce the proteins and protect them, whilst charged particles called ions buried inside the proteins may also make them more stable.
Another weapon in the thermophilic bacteria’s arsenal is a special category of molecules called heat shock proteins. These act as molecular chaperones and prevent proteins that have unravelled from sticking together. They also actively refold proteins that have collapsed from the heat, allowing the proteins to start functioning again.
http://www.bbc.com/earth/story/20160209-this-is-how-to-survive-if-you-sp...
20 Mar 2018 - 11:50 pm | दीपक११७७
सहमतं
#१
20 Mar 2018 - 4:42 pm | युयुत्सु
हास्यास्पद युक्तीवाद!
गुंतागुंतीचे जीव अडाप्ट होण्याला मर्यादा असतात. मी तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकून कितीही वाट बघितली तरी तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत.
20 Mar 2018 - 7:19 pm | चौकटराजा
मी अन्यत्र एका पुस्तकाचा उललेख केला आहे .( बॉडी अॅट वॉर ). त्यात व्हायरस विषयी माहिती देताना लेखक म्हणतात जीवाची रचना जितकी सोपी तितकी प्रभावशाली त्याची प्रयोगशाळा असते. काही प्रकारचे वायरस हे २९ दिवसाच्या संशोधनात स्वतः त बदल करू शकतात . त्यामुळे गुन्तागुन्तीचे जीव त्या बाबतीत दुर्दैवी म्हटले पाहिजेत.हवेतील प्राणवायु संपला की माणूस नत्रवायुचा वापर करून जगेल हे तात्विक रित्या ठीक पण प्रत्यक्ष अशक्य वाटते.
20 Mar 2018 - 11:44 pm | दीपक११७७
Sufficient time मिळाला तर शक्य आहे.
Process खुप स्लो हवी.
एकदम सगळ्यांना उकळत्या पाण्यात टाकुन, बघुयात कस अडाॅप्शन होतं तर मग शक्य नाही.
जगात अशक्य असलेल्या गोष्टी शक्य केल्याचे बरेच रोचक उदाहरणे आहेत.
१. उकळत्या तेलातुन सरळ हात टाकुन जलेबी -ईमरती काढणारा हलवाई.
२. केवळ चहा पिऊन जगणारी गुजरात मधली एक बाई.
३. विजेचा प्रवाह शरीरातुन सहज वाहु देणारा ईसम
४. ईबोका व्हायरस रेजिस्टन्स असलेले लोक
या पेक्षाही अजुन बरीच उदाहरणे आहेत
सगळ्या लोकांन मध्ये नसली तरी काही लोकांन मध्ये प्रतिकुलतेवर मात करण्याची शक्ती असते आणि असेच लोक मानवं वंश पुढे नेतात. नाहीतर सगळे प्लेग,मलेरिया ई ने मेले असते.
सहज अाठवलं म्हणुन सांगतो
मानव वंश शास्त्रज्ञ सांगतात
हजारो वर्षा पूर्वी इंडोनेशिया च्या आसपास प्रचंड ज्वालामुखी विस्पोट झाला होता, कित्येक वर्ष हवेत धुर होता म्हणुन तिकडच्या एरिया मधिल लोकांचे डोळे बारिक झालेत.
जेनेटिक चेंज.
21 Mar 2018 - 10:00 am | चौकटराजा
एबोला व्हायरस काय सर्वच व्हायरसला रेझिस्ट करणारे मनुष्य प्राणी असू शकतात. त्याला एक प्रकारची बायलोजिकल गिफ्टच म्हणा ना ! त्या साठी पेशीच्या टरफलाची रचना विशिष्ट असेल तर विशीष्ट व्हायरसला फक्त रक्तात फिरत बसावे लागते .होस्ट म्हणून योग्य त्या पेशीचा लाभ होत नाही असे वाचल्याचे आठवत आहे. अर्थात नेहमी यावर खरे साहेबाना काय सापडते त्याची वाट पहात आहे !
20 Mar 2018 - 10:52 am | युयुत्सु
आत्ताच एका ताज्या संशोधानाचा वृत्तांत वाचला (https://www.rt.com/news/421626-sperm-count-health-risks/). पुरुषांच्या वीर्यात शुक्राणुंची संख्या कमी असणे हे अल्पायुषी असण्याचे निदर्शक असू शकते. टेस्टोस्टेरॉन हा स्राव स्नायुंचे प्रमाण आणि अस्थिंच्या घनतेशी संबंधित असतो. सदर संशोधकांनी पुढे म्हटल्याप्रमाणे
"The results also suggest those with low sperm counts should undergo further testing as they are more susceptible to developing various health problems such as diabetes, heart disease and stroke, according to the study’s authors."
मुंबईसारख्या शहरांमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणुंचे प्रमाण मोठ्याप्रमाणात घटत असल्याचे वृत्त नुकतेच (बहुधा मटा) मध्ये वाचले होते. याला ओळखीतल्या एका डॉक्टरांनी पुष्टी दिली होती.
20 Mar 2018 - 2:59 pm | दीपक११७७
असे संशोधन ढिगानी पडलेले आहेत.
शुक्राणुं ची संख्या शुन्य असलेले लोक लवकर वारले असे आजपर्यंत पाहण्यात नाही
20 Mar 2018 - 2:37 pm | manguu@mail.com
१. एकटे रहाण्याचे ग्लोरिफिकेशन - पटले नाही. सगळेच लोक भीष्माचार्य किंवा आपले ते हे होऊ शकत नाहीत.
२. एकटे रहाणे हा जीवनाचा उद्देश नव्हे. बाहेर धंदा नोकरी करुन्न जे मिळवले त्यातून फॅमिली सिस्टिम developed करायची आहे. त्यामुळे सुख सुरक्षितता सोडून देवून नुसतेच नोकरी धंदा करत बसणे म्हणजे सोन्याचांदीचे ताट आणून ते जेवणासाठी न वापरणे आहे. मग त्याचा उपयोग काय ?
३. कुटुंब नाही , वारस नाही , ह्यांच्या मिळकतीचे करायचे काय ?
४. वातावरणीय परिणामामुळे किडकी मुले होणार आणि उपाय काय ? ब्रह्मचर्य ! सगळे लोक एकाच environment मधले आहेत तर चार दोन लोकानी बिनमुलांचे राहून प्रश्न कसा सुटणार ? अख्ख्या मुंबईने / दिल्लीनेच ब्रह्मचर्य पाळायला नको का ?
20 Mar 2018 - 4:21 pm | जेम्स वांड
पटण्यासारखे मुद्दे आहेत!
20 Mar 2018 - 7:19 pm | सुबोध खरे
काहीसा एकांगी दृष्टिकोन आणि बराचसा पूर्वग्रहदूषित लेख आहे.
यातील काही सदोष संतती नैसर्गिक गर्भपाताच्या रुपाने बाहेर टाकली जाते. पण ते जन्माला येणार्या सर्वच जीवांच्या बाबतीत होत नाही आणि काही व्याधी किंवा दोष जन्मत:च घेऊन बाळ जन्माला येते किंवा काही दोष पुढे उत्तर आयुष्यात व्याधींना जन्म देतात.
फलित असलेले ७५ % गर्भ हे गर्भपात होऊन जातात. याचे कारण गर्भात मोठ्याप्रमाणात असलेले जनुकीय दोष.
https://www.verywellfamily.com/chemical-pregnancy-a-very-early-miscarria...
उरलेल्या २५ टक्क्यात जेवढे गर्भ सदोष (साधारण १५ %) म्हणजे मूळ गर्भाच्या ३. ७५ % असतात त्यापैकी ९९ % गर्भ पुढच्या १५ आठवड्यात गर्भपात पावतात. https://www.healthline.com/health/pregnancy/miscarriage-rates-by-week#4
म्हणजेच फलन झालेलय १०० गर्भांपैकी ७८. ५ % गर्भाचे २० आठवड्यापर्यंत पतन होते. उरलेल्या २१. ५ % पैकी ०. २ % पेक्षा कमी गर्भात मोठ्याप्रमाणावर व्यंग असते म्हणजेच.
साध्या शब्दात
१००० फलित बीजांडे घेतली तर त्यापैकी
७५० बीजांडे आपल्याला दृश्य होण्याअगोदरच( ५ आठवड्यापर्यंत) नष्ट होतात.
उरलेल्या २५० गर्भांपैकी ३८ गर्भाचा ऱ्हास (गर्भपात) २० आठवड्यापर्यंत होतो.
बाकी राहिलेल्या २१२ गर्भांपैकी साधारण २ गर्भांमध्ये जन्मजात व्यंग असते. आणि २१० बाळे सुदृढ असतात.
या सांख्यिकीय थोडा फार फरक स्थळ काळा प्रमाणे होईल.
परंतु नैसर्गिक निवडीच्या तत्वाप्रमाणे जे गर्भ सुदृढ असतात ते पुढे वाढतात.
किडके गर्भ असतात त्यापैकी ९९ % गर्भपात पावतात आणि
आपल्याला दिसणारी सव्यंग बालके म्हणजे असे १ % सव्यंग गर्भ आहेत ज्यांचे व्यंग त्यांचा गर्भपात होइल इतके भयंकर नसते परंतु नैसर्गिक वाढ आणि विकासात अडथळा आणू शकतील इतके असू शकते.
अशा बहुतांश सव्यंग बालकातील जनुकीय दोष जर त्यांनी पुनरुत्पादन केले तरच पुढच्या पिढीत संक्रमित होतील.
असे गर्भ साधारण हजारात एक ते दोन असतात. अशा तर्हेने निसर्ग आपली पुढची पिढी निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न करतो( नैसर्गिक निवडीच्या तत्वाप्रमाणे आपोआप होत असते).
हि स्थिती स्त्रीबीजाची आहे. पुरुष बीजाची स्थिती याहूनही वेगळी आहे.
एका संबंधातून साधारण १० कोटी शुक्राणू स्त्रीच्या शरीरात सोडले जातात यापैकी केवळ एक आणि एकच आणि सर्वात सशक्त शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचतो आणि फलन करतो. त्यामुळे नैसर्गिक निवडीच्या तत्वाप्रमाणे पुरुषबीजाच्या अशक्त पणातुन सदोष संतती निर्माण होण्याची शक्यता अजूनच कमी असते.
नैसर्गिक निवडीच्या तत्वामध्ये एवढ्या सगळ्या प्रक्रियेत केवळ आजची शहरे बकाल आहेत आणि पूर्वी सगळे चांगले होते हे म्हणणे संपूर्णपणे पूर्वग्रहदूषित आहे. ज्या परंपरागत खेड्यातील आयुष्याची तेथील चुलीची आणि त्यावरील स्वयंपाकाची आपल्यासारखे लोक तारीफ करतात त्याची स्थिती काय आहे हे पण एकदा पाहून घ्या. https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollut...
पूर्वी प्रदूषण नव्हते इ इ म्हणणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटते. पटकी विषमज्वर देवी प्लेग सारखे रोग ज्याने हजारो काय लाखोंच्या संख्येने लोक मरत काय निरोगी जीवनशैलीचीच प्रतीके होती का?
आजकाल आधुनिक जीवनशैलीला शिव्या देण्याची फॅशन आली आहे पण आपल्या पायाखाली काय जळतं आहे ते हि पाहून घ्या.
१९४७ साली भारतात आयुर्मर्यादा ३२ वर्षे होती. आणि ती आता ६९ वर्षे झाली आहे. हि सर्व देणगी आधुनिक विज्ञानाचीच आहे.
जनुकीय आणि अधिजनूकीय दोष दृश्य होण्यासाठी माणसे तेंव्हा इतकी जगतच नसत.
20 Mar 2018 - 10:25 pm | manguu@mail.com
सहमत
20 Mar 2018 - 8:00 pm | जेम्स वांड
इगोचे किंवा मराठीत बोलता अहंगंडाचे आगमन झाल्यामुळे धाग्यावरून निवृत्ती..
21 Mar 2018 - 1:36 am | manguu@mail.com
उद्या लहान पोरांचा हार्ट सर्जरीचा कॅंप आहे. आता अचानक ९ जण ॲडमिट .
.....
कुणी सांगावे यातली उद्या एखादी मधुबाला होईल.
.......
किडक्या पोरांच्या व्याख्येत फक्त शारीरीक अवगुणच धरु शकाल. झाडा प्राण्यांच्या बाबतीत शारीरीक गुण हेच सर्वस्व असते. त्यांची मानवास उपयोगिता त्यावरच ठरते.
पण मानव , शारीरीक , बरोबरच मानसिक , भावनिक , अध्यात्मिक , कला अशा इतर पैलूंचाही असतो. हे पैलू कुठल्या मशिनमध्ये दिसत नाहीत.
हे पैलू शारीरीक व्यंग असलेल्या मुलातही असतीलच की. ते परवा कुणीतरी ब्रह्मांडातला कसलासा शोध लावलेले. तेही अपंग म्हणजे किडकेच होते ना ?
याउलट शारीरीक संपदा असलेला मॅचो मॅन बॅंक लुटणारा , खुनी असाही असेल आणि १६ लावण्यानी युक्त पद्मिनी स्त्री कुटिल कारस्थानीही निघेल !
21 Mar 2018 - 2:08 pm | पुंबा
प्रतिसाद खुप आवडला.
शारिरिकदृष्ट्या अपंग मुलांना किडकी वगैरे म्हणणे शुद्ध विकृती आहे. पण असो.
23 Mar 2018 - 3:35 pm | युयुत्सु
विंग्रजी "डिफेक्टीव्ह"साठी मराठीत किडका/की/के हेच जालीम आणि प्रभावी पर्याय आहेत. इतर वापरून गुळगुळीत झाले आहेत.
21 Mar 2018 - 3:19 pm | माहितगार
मलाही खटकल तुमच्या प्रमाणे नेटक्या शब्दात मांडता नाही आल. प्रतिसाद आवडलाच
21 Mar 2018 - 3:56 pm | युयुत्सु
दोघाना मिळू न एकत्र प्रतिसाद देत आहे त्याला हरकत नसावी.
श्री. खरे म्हणतात, "काहीसा एकांगी दृष्टिकोन आणि बराचसा पूर्वग्रहदूषित लेख आहे."
यात पूर्वग्रह आणि एकांगी दृष्टिकोन काय आहे याचा पुरेसा खुलासा करावा, अन्यथा सामान्य वाचकाची दिशाभूल करून या विषयाचे महत्त्व कमी करायचा एक क्षीण प्रयत्न श्री खरे यांनी केला, असे मला म्हणावे लागेल. म्हातारीने कोंबडे झाकले म्हणून उजाडायचे थांबत नाही, ही म्हण आपल्याला ठाऊक असेलच.
"फलित असलेले ७५ % गर्भ हे गर्भपात होऊन जातात." - श्री. खरे
७५% फेल्युअर रेट हा आकडा आपल्याला नॉर्मल वाटतो का आणि असे का? हा प्रश्न निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. याशिवाय आकडा कोणत्या सॅम्पल मधून आला. मुंबईसारख्या बकाल शहरात हा दर काय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला नसला तरी मला पडतो. माझ्या अंदाजानूसार मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी हा दर जास्त असायला हवा. भूछत्रांप्रमाणे उगवत असलेल्या प्रजनन/वंध्यत्व प्रयोगशाळा याचे पुरेसे निदर्शक आहेत.
श्री. खरे म्हणतात, "परंतु नैसर्गिक निवडीच्या तत्वाप्रमाणे जे गर्भ सुदृढ असतात ते पुढे वाढतात. किडके गर्भ असतात त्यापैकी ९९ % गर्भपात पावतात आणि आपल्याला दिसणारी सव्यंग बालके म्हणजे असे १ % सव्यंग गर्भ आहेत ज्यांचे व्यंग त्यांचा गर्भपात होइल इतके भयंकर नसते परंतु नैसर्गिक वाढ आणि विकासात अडथळा आणू शकतील इतके असू शकते. अशा बहुतांश सव्यंग बालकातील जनुकीय दोष जर त्यांनी पुनरुत्पादन केले तरच पुढच्या पिढीत संक्रमित होतील."
एखादा गर्भ जन्माला आला म्हणजे ते बाळ सुदृढ असे काहीसे तुम्हाला म्हणायचे आहे असे वाटते. स्थूलपणा, मधुमेह, बालदमा इ० असंख्य विकार हे किडकेपणाचे निदर्शक नाहीत का? किंवा निसर्गात हे दोष फिल्टर न होता बाळ जन्म घेते म्हणून त्यांना दोष म्हणता येणार नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? कृपया आपली भूमिका स्पष्ट करून माझा गोंधळ दूर करावा.
आता ॲडाप्टेशनच्या मुद्यांविषयी -
प्रथम माझ्या मूळ मुद्याला बगल देऊन तपशीलात दूरुस्ती केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. आपणच दूवा दिलेल्या लेखातील पुढील वाक्ये आपल्या नजरेतून निसटली की काय?
"Conditions are so challenging that no complex organisms can survive them."
"Most living creatures that thrive in extremely hot environments are single-celled bacteria or archaea."
इथे मला असे म्हणायचे असे आहे की, कोणत्याही जीवासाठी एक ठराविक तापमान असते की त्या तापमानानंतर त्या जीवाचे अस्तित्व टिकणे कठीण होते. इथे श्री गोदे यांनी उकळत्या तेलात हात घालुन जिलब्या तळणार्या माणसाचे उदाहरण दिले आहे. इथे ही त्यांचा गोंधळ उडाला आहे. तो असा -
मी या प्रकाराचा नेटवर शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा (https://www.youtube.com/watch?v=t3-6XLdCyAM) हा व्हिडीओ बघायला मिळाला. इथे एक मनुष्य जिलब्यां ऐवजी कबाब तळत आहे. माझ्या मते एका जीवाचे ॲडाप्टेशन आणि समस्त प्रजातीचे ॲडाप्टेशन यात गुणात्मक फरक आहे. कबाब तळणार्या व्यक्तीचे व्यवस्थित निरीक्षण केले तर असे दिसते की त्या व्यक्तीचा हात गरम तेलात फार थोडा वेळ असतो. हा प्रकार माझ्या मते निखार्यावरून चालण्याच्या चमत्कारासारखा आहे. मी आणि अनेक जण गरम दुधाचे पातेले अनेकवेळा पकड न वापरता सहज उचलतात हा पण असाच एक प्रकार. माझे सामान्यज्ञान असे सांगते की कदाचित या माणसाच्या हाताची कातडी जाड असेल किंवा हाताच्या चेतापेशी नष्ट पावल्या असतील किंवा जन्मत: अपघाताने कमी असतील. या व्यक्तीला ठराविक वेळ गरम तेलात हात बुडवून ठेव असे सांगितले तर तसे ती करू शकेल का? मला शंका आहे.
दूसरा मुद्दा असा की गरम तेलात हात बुडवायची क्षमता या व्यक्तीला आनुवंशिकतेने मिळाली की सवयीने? याच्या मुलांमध्ये पण हा गुण आला आहे का (याला मुले झाली तेव्हा पण हा असेच तळत होता का?) हे प्रश्न उरतातच.
अपवादाने नियम सिद्ध करता येत नाही हे आपल्याला ठाऊक असेल असे वाटते.
"जनुकीय आणि अधिजनूकीय दोष दृश्य होण्यासाठी माणसे तेंव्हा इतकी जगतच नसत." - श्री. खरे
अधिजनुकीय बदल काही क्षणांपासून ते काही पिढ्यापर्यंत दृग्गोचर होतात असे डॉ. दीक्षितानी मला सांगितल्याचे स्मरते. उदा. व्यायामाने होणारे अधिकनुकीय बदल व्यायाम थांबवल्यावर नाहीसे होतात. तर काही आघातांचे (ट्रॉमा) परिणाम पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात. ज्यांच्यामुळे माझी अधिजनुकशास्त्राशी ओळख झाली त्या डॉ. जगन्नाथ दीक्षितांच्या म्हणण्या प्रमाणे डॉ०ना जिथे जिनेटीक्स आणि एपिजिनेटिक्स कळत नाही तिथे इतरांना ते काय कळणार? असो.
जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी - https://www.whatisepigenetics.com/ या कोशस्थळाला भेट द्यावी.
21 Mar 2018 - 7:57 pm | सुबोध खरे
@युयुत्सु
पूर्वग्रह --या सगळ्या उपद्व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.)
स्त्री भ्रूण हत्येसाठी एवढा कायदा करावा लागला आहे. मुलगाच हवा म्हणून गर्भ लिंग तपासणी साठी हवे असलेले अनेक उपाय योजल्यामुळे भारतात १००० मुलांच्या मागे ८५० मुली आहेत.
एकांगी दृष्टिकोन --- मलाच हा विषय समजला आहे. बाकी कुणाला समजला नाही आणि जे प्रतिवाद करतील त्यांना हा विषय मुळातच समजलेला नाही
उदा . मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.
जन्माला येणार्या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग.
हा फक्त इतकाच भाग आपण लिहिला आहे याची दुसरी बाजू पण पाहून घ्या. Children inherit new mutations when they build up in the father’s sperm and the mother’s eggs. Men pass on more mutations than women because they make sperm throughout their lives, using a process that is not perfect at copying DNA. And so, as the man ages, his sperm accumulate more and more mutations. Women pass on fewer mutations because they tend to be born with their full complement of eggs.
Researchers studied 14,000 Icelanders and found that men passed on one new mutation for every eight months of age, compared with women who passed on a new mutation for every three years of age.
The figures mean that a child born to 30-year-old parents would, on average, inherit 11 new mutations from the mother, but 45 from the father.
https://www.theguardian.com/science/2017/sep/20/fathers-pass-on-four-tim...
23 Mar 2018 - 3:36 pm | युयुत्सु
असं मी कधी केव्हा आणि कुठे म्हटले?
21 Mar 2018 - 8:19 pm | सुबोध खरे
प्रथम माझ्या मूळ मुद्याला बगल देऊन तपशीलात दूरुस्ती केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
तुम्ही काय कुणीच अडाप्ट होऊ शकणार नाहीत.
हे आपलेच वाक्य आहे ना?
युयुत्सु साहेब
हा युक्तिवाद आपल्याला वाटतो तितका हास्यास्पद नाही.
उकळत्या पाण्यात नियमितपणे जगणारे जिवाणू आहेत आणि त्यासाठी बदलाभिमुखता (ADAPTABILITY) त्यांनी आत्मसात केली आहे.
हे मी लिहिलं आहे.
21 Mar 2018 - 8:23 pm | सुबोध खरे
काही आघातांचे (ट्रॉमा) परिणाम पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात.
याला काही आधार? का आपलं असंच?
बाकी ४८ पिढ्या(३० वर्षाची एक पिढी) सुंता करूनही मुसलमानांची पुढची त्वचा अजूनही येतेच आहे.
22 Mar 2018 - 8:57 am | युयुत्सु
याला काही आधार? का आपलं असंच?
"Results suggest that traumatic stress is associated with advanced epigenetic age and raise the possibility that cells integral to immune system maintenance and responsivity play a role in this. This study highlights the need for additional research into the biological mechanisms linking traumatic stress to accelerated DNA methylation age and the importance of furthering our understanding of the neurobiological and health consequences of PTSD."
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/29452766
22 Mar 2018 - 9:22 am | सुबोध खरे
काय पण डोंगर पोखरून उंदीर काढलाय?
PTSD म्हणजे posttraumatic stress disorder मुळे पेशींचे वार्धक्य जवळ येते यावरील हे अतिशय प्राथमिक असे संशोधन आहे. त्यातून PTSD म्हणजे posttraumatic stress disorder असणारे लोक सामान्य नव्हेत तर युद्ध, यादवी, नैसर्गिक आपत्ती यातून गेलेल्या लोकांना होणाऱ्या अति मानसिक तणावातून निर्माण झालेली परिस्थिती. अशी परिस्थिती काही मुंबई आणि कलकत्ता या शहरात नाही. ( तशी ती आहेच असा तुमचा आग्रह असेल तर गोष्टच वेगळी आहे)
PTSD म्हणजे posttraumatic stress disorder याचा गुणसूत्रांवरील प्रभाव आणि ते पुढच्या पिढीत संक्रमित होण्याबद्दल एक अवाक्षरहि नाही त्यातून एकदा त्या माणसाने पुनरुत्पादन केले (त्याला/ तिला मुले झाली असली) कि डी एन ए वर होणारा प्रभाव हा भावी पिढीसाठी नगण्य/शून्य असतो.
शोधायचा म्हटलं तरी संबंध सापडत नाहीये
22 Mar 2018 - 12:03 am | दीपक११७७
@युयुत्सु यावर सविस्तर उत्तर उद्या देतो
वेट
21 Mar 2018 - 5:26 pm | पिलीयन रायडर
एक मिन.. लेखात पहिल्याच मुद्द्यावर ठेचकाळले.. उत्तर कुणाही डॉकटर ने द्यावं अशी इच्छा आहे.
जसं आम्हाला शिकवलं आहे (आणि मी विकिपीडियावर पण एकदा वाचलं परत) , दर महिन्यात नवे बीजांड तयार होते आणि गर्भाशयात येते, ह्यास ओव्ह्यूलेशन म्हणतात. पुढे ते फर्टिलाईज न झाल्यास ते नष्ट होऊन पाळी येते. ह्या प्रत्येक फेजला नावे आहेत आणि विशिष्ट हार्मोन्स मुळे हे घडते.
जर हे योग्य असेल तर आजीचे बीजांड कुठून आले आता?
आणि जर हे योग्य नसेल तर योग्य त्या संदर्भा सहित लेखकाने नक्की काय होते हे समजावून सांगावे.
21 Mar 2018 - 5:54 pm | राही
स्त्रीगर्भ जन्माला येतानाच काही हजार (किंवा लाख) बीजांडे ओवरीजमध्ये घेऊन येतो. ती सर्व अपरिपक्व असतात. मुलगी 'मोठी' झाल्यावर दर महिन्याला एक बीजांड परिपक्व होऊन फॅलोपिअन ट्यूबच्या मुखापाशी येते. जर योग्य कालावधीत त्याचा शुक्राणूंशी सयोग झाला तर ते फलित होऊन गर्भाशयाच्या भिंतीवर रुजते आणि पुढे काही अडथळा न आल्यास वाढून मूल जन्माला येते. म्हणजे बीजांडे ही स्त्रीगर्भात आधीच तयार असतात.
21 Mar 2018 - 6:07 pm | राही
ही बीजांडे फॉलिकल्समध्ये असतात. योग्य वेळी मेंदूतून काही रासायनिक क्रियांद्वारे मिळालेल्या संदेशांनुसार त्या क्रियांमुळे एक बीजांड (फॉलिकल रप्चर होऊन) पेरिटोनिअल कॅविटीमध्ये निसटते. फॅलोपिअन ट्यूबमध्ये शिरून युटेरसमध्ये पोचते आणि फलित झाल्यास रुजते.
21 Mar 2018 - 6:13 pm | पिलीयन रायडर
अच्छा! हे खरं तर फार पूर्वी वाचलं होतं कुठे तरी असं वाटतंय!
पण मी बीजंडा मधून जनुकीय दोष येतात तसे शुक्राणू मधून येऊ शकत नाहीत का? भले त्यातल्या त्यात सर्वोत्तम शुक्राणू पुढे जात असला तरी तो दोषी जनुके पुढे नेऊ शकतोच ना? (म्हणजे सगळ्याच शुक्राणू मध्ये दोष असेलच असे)
तसेही आपण मागच्या सात पिढ्यांमधले गुण दोष मुलात येतात असे म्हणतोच ना. ते दोन्ही बाजूने अपेक्षित असेल असे मला वाटते.
बाकी सदृढ पिढी जन्माला यावी ही इच्छा योग्य असली तरी "किडकी" प्रजा वगैरे शब्द आवडले नाहीत.
21 Mar 2018 - 7:00 pm | गामा पैलवान
पिरा,
माबोवर डॉक्टर सातींच्या लेखात असेल : https://www.maayboli.com/node/34504
आ.न.,
-गा.पै.
21 Mar 2018 - 9:55 pm | राही
ही माहिती अगदी बेसिक आहे. ' सजीवांमधील पुनरुत्पादन' शिकवताना मानवी पुनरुत्पादनसुद्धा माध्यमिक शाळांत वरच्या इयत्तांत शिकवले जाते. विज्ञानशाखेच्या पहिल्या वर्षात तर नक्कीच असते.
अर्थात सातीआक्कांनी वैद्यकसंबंधी अनेक विषयांवर उत्तम असे माहितीपूर्ण लिखाण केले आहे.
21 Mar 2018 - 6:21 pm | युयुत्सु
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/infertility/art...
21 Mar 2018 - 8:15 pm | सुबोध खरे
‘आधी करिअर मग मूल’
याचा संबंध केवळ स्त्री पुरुषांच्या वयाशी आहे. पूर्वी (१०० वर्षपूर्वी) स्त्रीला किंमत नव्हतीच केवळ संतती जन्मास घालणे आणि तिला वाढवणे यातच तिची इतिकर्तव्यता होत असे. शेती आणि जोड धंदे हाच मूळ ( किंवा एकमेव व्यवसाय) असल्याने स्त्रीला अर्थार्जनाची सोय नव्हतीच. म्हणून मग ८ वर्षाच्या मुलीचे सुद्धा लग्न करून टाका ("अष्टवर्षात भवेतकन्या"). खायचे एक तोंड कमी होईल हि मनोवृत्ती होती.
आजच्या आधुनिक काळामुळे स्त्रीला स्वत्वाची जाणीव होत आहे म्हणून प्रजनन हे थोडे लांबणीवर पडत आहे
याचा तुमच्या जनुकशास्त्राशी आणि अधिजनुकशास्त्राशी थेट आणि स्पष्ट असा कुठे संबंध आला.
आता वातावरणामुळे बीजांडावर परिणाम होतो त्यामुळे अमुक तमुक होतं असा लांबचा संबंध सांगता येतो. पण त्याचे जनुकशास्त्राशी आणि अधिजनुकशास्त्राशी संबंध लावणे जरा जास्तच होतंय.
भारतात अजूनही पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळेस आई चे सरासरी वय २० वर्षेच आहे.
In 1972, 22% of women in their early thirties delivered a child. In 2006, this proportion was less than 8%.
With more educated women now having fewer children, women are having all their children much earlier.
As a result, the trend has been for women to have their children and get sterilised, rather than postpone the birth of their first child and space their subsequent children, says Dr Ram.
https://timesofindia.indiatimes.com/india/Fewer-women-having-kids-in-30s...
हा दुवा पण काळजीपूर्वक वाचून पाहावा. म्हणजे लक्षात येईल कि भारतात सुशिक्षित स्त्रियांचे मूल होण्याचे सरासरी वय वाढण्याऐवजी कमीच झालेले आहे.
यासाठीच मी लिहिले आहे कि आपला लेख हा एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे
23 Mar 2018 - 3:51 pm | युयुत्सु
"We are presenting a paper (http://www.fertstert.org/article/S0015-0282(17)30588-5/fulltext) at the American Society of Reproductive Medicine that suggests that epigenetics can also explain semen quality. We examined the DNA methylation profiles of 480,000 CpG sites in semen in over 200 infertile men. When comparing semen samples with normal and low sperm counts, normal and low motilities and normal and abnormal shapes (morphology), we found large differences in epigenetic marks on sperm DNA in literally hundreds of genes. Furthermore, when we drilled down on the affected genes, many were found to have roles in infertile animal models, lending credence to the analysis.
This is exciting because it means that epigenetics could explain a large chunk of male infertility that is currently unexplained. From a Lamarckian viewpoint, and even more thrilling to me, is that knowing the epigenetics of infertility may allow us to pinpoint exactly what environmental issues are influencing things. And that, my friends, could be a very good thing for a species that is threatened with falling sperm counts."
21 Mar 2018 - 7:44 pm | टवाळ कार्टा
या धाग्यावर झाडू फिरला????
21 Mar 2018 - 8:43 pm | सुबोध खरे
"फलित असलेले ७५ % गर्भ हे गर्भपात होऊन जातात." - श्री. खरे
७५% फेल्युअर रेट हा आकडा आपल्याला नॉर्मल वाटतो का आणि असे का? हा प्रश्न निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. याशिवाय आकडा कोणत्या सॅम्पल मधून आला. मुंबईसारख्या बकाल शहरात हा दर काय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला नसला तरी मला पडतो. माझ्या अंदाजानूसार मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी हा दर जास्त असायला हवा. भूछत्रांप्रमाणे उगवत असलेल्या प्रजनन/वंध्यत्व प्रयोगशाळा याचे पुरेसे निदर्शक आहेत.
आंब्याच्या झाडाच्या बारीक बारीक कैऱ्या पडून जातात किंवा नारळाच्या झाडाचे बारीक बारीक नारळ पडून जातात तसेच मानवी फलित गर्भाच्या पैकी ७५ % गर्भ हे नष्ट होतात याला मी तुमच्या सोयीसाठी दुवा दिलेले आहे तो आपण वाचण्याची तसदी घ्यावी.
बाकी हे सुबोध खरेंचे संशोधन नसून सर्वच्या सर्व वंध्यत्वाच्या पाठयपुस्तकात लिहिलेली मूलभूत माहिती आहे.
मुंबईला बकाल म्हणणे हा तुमचा वैयक्तिक मुद्दा असू शकतो पण जगभर ७५ % फलित गर्भ नष्ट होतात याचा जनुक शास्त्र किंवा अधि जनुकशास्त्र यांच्याशी काहीही संबंध नाही. डी एन ए चे द्विभाजन होते ती प्रक्रिया निर्दोष नाही त्यात असलेल्या लक्षावधी डी एन ए पैकी काही महत्त्वाचे डी एन ए ची कॉपी जर सदोढ असेल तर तो गर्भ जन्माची कठीणप्रक्रिया पार पाडू शकत नाही
संगणकाच्या भाषेत सांगायचं तर आपण सीडी कॉपी करतो तेंव्हा एखादी DLL फाईल नीट कॉपी झाली नाही तर ती सीडी नंतर चालत नाही तसाच हा प्रकार आहे.
भूछत्रांप्रमाणे उगवत असलेल्या प्रजनन/वंध्यत्व प्रयोगशाळा याचे पुरेसे निदर्शक आहेत.
जगभरात ५-६ % टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्व असते. याचा उपचार करण्यासाठी जर वंध्यत्व उपचार केंद्रे निघाली तर त्यात विशेष काय?
भारताच्या १३० कोटी लोकसंख्येत २० कोटी जोडपी धरली तरी हा आकडा १ कोटी होतो. आता ढेंगळी पिंपळगाव मध्ये वंध्यत्व प्रयोगशाळा काढली तर डॉक्टरच्या आयुष्यभरात मुद्दल सोडाच पहिल्या महिन्यापासून व्याज तरी वसूल होईल का?
१२५ वर्षपूर्वी "एक्स रे" क्लिनिक नव्हतीच आता ती गल्लोगल्ली झाली आहेत. हे किडलेल्या आरोग्याचे लक्षण आहे असे आपण मनात असाल तर धन्य आहे.
बाकी डॉ. जगन्नाथ दीक्षितांच्या म्हणण्याचा इतका विपरीत अर्थ तुम्ही काढू शकलात याचे आश्चर्य आणि गम्मत वाटते आहे.
21 Mar 2018 - 11:54 pm | दीपक११७७
हा लेखच मुळात एकांगी विचार करुन खिन्नमनाने लिहिलेला आहे असे वाटते. अपवादालाच प्रमाण मानुन सर्वाना लागु केले आहे.
22 Mar 2018 - 12:19 am | राही
पूर्वी मुलींची लग्ने खूपच कमी वयात होत. ऋतुप्राप्तीनंतर लगेच शरीरसंबंध प्रस्थस्पित होत. कोवळ्या वयातल्या आणि पाठोपाठच्या बाळंतपणातून निपजलेली मुले सुदृढ असण्याची शक्यता फारच कमी असे. पंधरासोळा अपत्यांपैकी सातआठ जेमतेम पन्नाशी गाठत . उरलेली जन्मत:च किंवा अध्येमध्ये गळून पडत. एकूणच जीवनसंघर्ष खडतर होता. त्यात स्त्रियांचे जगणे अधिकच कठिण. सदैव कोंदट अंधाऱ्या जागेत आणि कुपोषणातच आयुष्य संपे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानी स्त्रियांची लाइफ एक्स्पेक्टंसी अवघी तेवीस आणि पुरुषांची बेचाळीस होती असे कुठेसे वाचले आहे. कुठली सुदृढ प्रजा नि काय. यातून जगूनवाचून ज्यांनी सत्तरी ओलांडली त्यांचे आयुष्य जगाला दिसले आणि ' पूर्वीची पिढी कशी भक्कम, अस्सल दुधातुपावर पोसलेली' असे त्यांचे कौतुक झाले.
जननदर अधिक होता तसा मृत्यूदरही अधिक होता. म्हणून लोकसंख्येचा स्फोट झाला नाही. भारतात (आणि तत्कालीन जगातही) दुष्काळ, अवर्षणे, अतिवर्षा, सततच्या युद्धांमध्ये जीवितहानी, कत्तली, पळवापळवी, जुलमी राजवटी यामुळे ज्ञात कालावधीपैकी बराचसा काळ सामान्य लोकांसाठी आणि मुख्यत: स्त्रियांसाठी तणावग्रस्ततेचाच राहिला आहे. खेडीसुद्धा बकालच होती. फक्त त्या बकालपणाची जाणीवच नव्हती इतकेच. रोगराई, पाण्याचे साठे दूषित होणे आणि त्यामुळे गावेच्या गावे उठून जाणे हेही नित्याचेच असे.
तर किडक्या प्रजेची कारणे अगदी अल्पसंख्य शहरी महिलांच्या कपाळी मारणे काही पटले नाही. मुळात हल्ली किडकी प्रजा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे हेच पटले नाही.
4 Apr 2018 - 12:58 pm | arunjoshi123
आणि
च्यायला, सॉलिड पर्फॉमन्स आहे कि.
22 Mar 2018 - 9:35 am | सुबोध खरे
@युयुत्सु
स्थूलपणा, मधुमेह, बालदमा इ० असंख्य विकार हे किडकेपणाचे निदर्शक नाहीत का?
मग हे किडके बीज काढून टाकायला काय करायला पाहिजे?
आणि आयुर्वेदात मधुमेह तर इसवीसनापूर्वी पासून( चरक संहितेत) सांगितलेला आहे. म्हणजे हे किडकं बीज तेंव्हा पासूनच आहे तर?
मुंबई कलकत्ता हि शहरे तर तेंव्हा नव्हतीच.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकोबाराय लिहून गेले.
तसे करायला हे किडकं बीज मुळातूनच नष्ट करून शुद्ध बीज निर्माण करायला पाहिजे म्हटले तर वंशविच्छेदच करायला लागेल.
भारतात साधारण २० कोटी लोकांना मधुमेह आहे. त्यात साधारण एक कोटी दम्याचे रुग्ण आहेत.
India Has Second Highest Number Of Obese Children In The World, Says New Study
China with 15.3 million and India with 14.4 million had the highest numbers of obese children;
https://www.huffingtonpost.in/2017/06/14/india-has-second-highest-number...
अशा २२ कोटी लोकांना नष्टच करून टाकायला पाहिजे, नाही का?
22 Mar 2018 - 10:03 am | युयुत्सु
श्री सुबोध खरे
तुम्हाला ताजे प्रतिसाद पहाता अधिजनुकीय संक्रमण आणि जनुकीय संक्रमण यातला फरक तुम्हाला कळलेला नाही किंवा तो मान्य करायचा नाही असे दिसते, त्यामुळे मला आता तुमच्याशी युक्तीवाद करण्यात रस संपत आला आहे. तरीही तुमच्या खालील युक्तीवादातील फोलपणा दाखवून दिल्या शिवाय राहवणार नाही.
"Children inherit new mutations when they build up in the father’s sperm and the mother’s eggs. Men pass on more mutations than women because they make sperm throughout their lives, using a process that is not perfect at copying DNA. And so, as the man ages, his sperm accumulate more and more mutations. Women pass on fewer mutations because they tend to be born with their full complement of eggs."
आपण क्षणभर असे मानुया की म्युटेशन्स फक्त पुरुषांमध्येच होतात आणि बीजांडात ती होत नाहीत. तरीही स्त्रीकडून बीजांडाद्वारे पुढे जाणारे केंद्रकाम्ल (डिएनए) हे अगोदरच्या पिढीतील पुरुषांकडून आले असल्याने त्यात म्युटेशन्स असू शकतात.
अधिजनुकीय वारसा जास्तकरून स्त्रीकडुन येतो. हा जनुकीय वारशापेक्षा वेगळा असतो याकडे तुम्ही जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात.
याशिवाय गर्भधारणा झाल्यावर म्युटेशन्स होत नाहीत किंवा गर्भ किडत नाही असे आपल्याला म्हणायचे का याचा खुलासा करावा व मी सर्वप्रथम दिलेला हा ताजा संदर्भ पहावा.
Sheng Ren et al. Periconception Exposure to Air Pollution and Risk of Congenital Malformations, The Journal of Pediatrics (2017)
http://www.jpeds.com/article/S0022-3476(17)31330-6/fulltext
मला आता तुमच्या बरोबर युक्तीवादात रस उरलेला नाही!
22 Mar 2018 - 11:43 am | सुबोध खरे
मला आता तुमच्या बरोबर युक्तीवादात रस उरलेला नाही!
हांगाश्शी
आता कसं लायनीवर आलात.
अगोदर पांढरी पाच मध्ये गायचं आणि मग सूर तालाचा मेळ बसत नाही समजल्यावर या मैफिलीत श्रोत्यांना गायनाचे अंगच नाही म्हणून शेपूट घालायची.
जाता जाता --गायकाचा "सूर चुकला" हे समजण्यासाठी स्वतः कसलेला गायक असावं लागत नाही.
तुमच्या हाताला एक सुंदर मोती लागला तर तोच जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे म्हणून डांगोरा कशाला पिटायचा. जगात इतर अनेक उत्तमोत्तम रत्ने आहेत आणि अनेक रत्नपारखीही आहेत. मीच हुशार म्हणण्याचा काय फायदा?
खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते.
उगाच काहींच्या काही
याऐवजी
जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र पेक्षा पर्यावरण आणि त्याचे संवर्धन याचे शास्त्र जर लोकप्रिय झाले तर पर्यावरणाच्या हानीमुळे होणारे जनुकीय परिणाम थांबवून समाजाचा जास्त फायदा होईल असे मी म्हणेन.
उगाच "जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र" सारखे अतिशय किचकट विषय सर्वसामान्य माणसांमध्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करून तुम्ही काय उखाडणार आहात.
22 Mar 2018 - 11:54 am | दीपक११७७
+११११११११
22 Mar 2018 - 11:53 am | सुबोध खरे
हायला
http://www.jpeds.com/article/S0022-3476(17)31330-6/fulltext
Increased exposure to PM2.5 in the periconception period is associated with some modest risk increases for congenital malformations. The most susceptible time of exposure appears to be the 1 month before and after conception. Although the increased risk with PM2.5 exposure is modest, the potential impact on a population basis is noteworthy because all pregnant women have some degree of exposure.
हा दुवा तुम्ही स्वतः तरी नीट वाचला आहे का?
मग मी दिलेला चुलीच्या धुरामुळे होणारे ग्रामीणस्त्रियांवरील दुवा Chulhas linked to 25% of pollution-related deaths in India
https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollut...
वाचला का? नीट वाचा. The study found that the burning of biomass or solid fuel was the biggest source of PM 2.5 in both cities and villages.The situation could be worse as the study did not measure its indoor impact.
त्यातून त्या अभ्यासाचं श्रेय मुंबई आय आय टी च्या संशोधकांकडे च जाते( आपलेच अल्मा मातेरं)
उलट तुमच्या दुव्याचा आणि माझ्या दुव्याचा साकल्याने विचार केला तर २५ % ग्रामीण जनता किडलेली आहे असाच अर्थ निघतोय.
याइतका सेल्फ गोल मिपाच्या इतिहासात झाला नसेल.
आपली तारीफ करावी तितकी थोडीच.
22 Mar 2018 - 12:19 pm | युयुत्सु
उलट तुमच्या दुव्याचा आणि माझ्या दुव्याचा साकल्याने विचार केला तर २५ % ग्रामीण जनता किडलेली आहे असाच अर्थ निघतोय.
मी हसून-हसून पुरता बेजार झालो आहे.
22 Mar 2018 - 5:05 pm | सुबोध खरे
काय सांगताय?
स्वतः लाच हसण्याची आपली खिलाडू वृत्ती आवडली,
22 Mar 2018 - 11:51 am | दीपक११७७
मुळात उदाहरण कश्यासाठी दिले आहे हे समजुन घ्या. उगाच गोंधळ उडवुन घेवु नका स्वता: चा
अडॉप्शन कसं सुरु होतं हे समुजुन घेण्यासाठीची ती उदाहरणं आहेत. तुम्हाला समजावे म्हणुन उचकटून सांगतो.
Goat
यातील बक-या बघा त्यांचे खुर हे विशिष्ट पध्द्तीचे आहेत सोबतच शरीर रचना ही खुल्या मैदानात सापडणा-या बकरी पेक्षा वेगळी आहे.
आता विचार करा, ही बकरी ह्या पहाडी -खडकाळ भागात खुल्या मैदानातुन पहील्या वेळेस गेली असेल तेंव्हा निश्चितच तिचे खुर त्या भागात रहाण्यासाठी पुरक नसणार
पण सतत पिढ्यान पिढ्या तेथे राहील्या मुळे पुरक जेनेटीक बदल झाले आहे.
विषय निट समजुन घ्या प्रतिक्रीया द्यायची घाई करु नका,
आणि
एकदम सगळ्यांना उकळत्या पाण्यात टाकुन कस होतं अडॉप्शन हे पाहण्याच्या मानसिकतेतुन बाहेर या.
लहानपणी किडुक-मिडुक तब्बेत असलेल्या लोकांनी मोठ्यापणी दमदार कार्य केले, अशी भरपुर उदाहरणे आहेत.
22 Mar 2018 - 12:51 pm | पिलीयन रायडर
ते आई कडून जास्त वारसा जातो वालं वाक्य सोप्या शब्दात सांगा की उलगडून. फारच इंटरेस्टिंग वाक्य आहे.
आई आणि बाबा दोघे समान क्रोमोझोम्स देतात (काही तरी X आणि Y वाला फंडा होता, त्यात मुलींकडे Y नसतोच, त्यामुळे उलट काही दोष येत नाहीत असे काही तरी खूप बेसिक पाठयपुस्तकात वगैरे वाचल्या सारखं वाटतंय.) तरीही आई कडून जास्त वारसा का आणि कसा येतो? तो केवळ दोषच पुढे देतो की इतर काही चांगल्या गोष्टी सुद्धा?
22 Mar 2018 - 5:18 pm | अभ्या..
अरे ह्या धाग्यावरच्या कुणीतरि अधिकारी, ज्ञानी, विचारवंतानी ह्यांना अपेक्षित असे उत्तर देउन टाका ना प्लीज.
22 Mar 2018 - 6:02 pm | पिलीयन रायडर
किडकी प्रजाचा कधी कधी एकदम अर्थ लागूनच जातो..
असो.. आयुष्यात थोडीशी बायोलॉजी शिकल्याने इंटरेस्ट आहे. लेकरं बाळं आहेत त्यामुळे आईकडून मुलांना खरंच काही दोष अधिक प्रमाणात जातात का हे जाणून घेण्याची इच्छा आहे.(असतात लोकांचे काही ज्येनुईन प्रश्न). ज्यांचे मेंदू ही इवलीशी गोष्ट समजू शकत नसतील त्यांनी ते किमान माझ्या प्रतिक्रियेवर लावू नयेत. मंडळ ऋणात राहील.
22 Mar 2018 - 6:18 pm | राही
श्री.अभ्या.., मी काही ज्ञानी,विचारवंत वगैरे नाही. तरीसुद्धा लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. ज्ञानी मोड ऑन :
युयुत्सूंचे म्हणणे असे दिसते की (कां तर,)बीजांडे प्रत्यक्ष फलनापूर्वी प्रदीर्घकाळ (अगदी गर्भावस्थेपासून) स्त्रीशरीरात अस्तित्वात असतात आणि त्या मानाने शुक्रजंतू हे ताजे असतात; पर्यावरण, बदललेल्या जीवनपद्धतीचे ताणतणाव, खाणेपिणे वगैरेंचा परिणाम बाह्य शरीरावर आणि शरीरांतर्गतसुद्धा होत असतो; अशा स्थितीत बीजांडे प्रदीर्घकाळ शरीरात राहात असल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम शुक्रजंतूंपेक्षा अधिक प्रमाणात होत असतो. त्यातून अलीकडे (करीयर, नोकरी इ.मुळे- इति युयुत्सु) मुलींच्या लग्नाचे आणि प्रजोत्पत्तीचे वय वाढल्यामुळे बीजांडांना पूर्वीपेक्षा अधिक काळ अफलित राहावे लागते आणि तितका अधिक काळ अनिष्ट/प्रतिकूल बाबींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे फलनाच्या वेळी ती पूर्वीच्या काळापेक्षा अधिक प्रमाणात किडलेली असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा सध्या अधिक प्रमाणात किडकी प्रजा निपजते. माझे ज्ञान संपले. ज्ञानी मोड ऑफ.
22 Mar 2018 - 7:52 pm | अभ्या..
धन्यवाद राहीताई,
समजले.
22 Mar 2018 - 8:04 pm | पिलीयन रायडर
हा मुद्दा कळलाय मला. पण हे तेव्हा खरं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दोषाबाबत बोलत आहात. म्हणजे वारसा सारखाच जातोय (quantitatively) , हां आता वरच्या थिअरी नुसार क्वालिटीवाईज आईकडून दोष पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे.
पण दोन सुदृढ निरोगी माता पित्यांकडून सारख्या प्रमाणात जनुकीय वारसा जात आहे. तो वारसा दोषी आहे किंवा कसे हा वेगळा प्रश्न झाला.
शिवाय खरे काकांनी काही तरी एक दुवा दिलेला दिसतोय ज्यात स्पर्म्स मधून असे दोष जाण्याची शक्यता आहे असे काहीसे लिहिलेले दिसते. ते एक वाचून बघतेय.
23 Mar 2018 - 1:08 pm | सुबोध खरे
पि रा ताई
आई कडून जास्त वारसा का आणि कसा येतो
कोणत्याही पेशींमध्ये डी एन ए हे प्रामुख्याने केंद्रात असतात याशिवाय मायटोकाँड्रिया या पेशीद्रव्यात(cytoplasm) असलेल्या अंगात पण काही डी एन ए असतात. जेंव्हा स्त्री बीजाचे आणि शुक्राणूंचे मिलन होते तेंव्हा शुक्राणूंच्या केंद्रकातील गुणसूत्रे हि स्त्रीबीजाच्या गुणसूत्रांशी एकत्र होतात. परंतु शुक्राणूंच्या पेशीद्रव्यात असलेल्या मायटोकाँड्रियाचाआपोआप ऱ्हास होतो. त्यामुळे गर्भ तयार होतो तेंव्हा शुक्राणू आणि स्त्रीबीज याच्या केंद्रकातील डी एन ए यांचे प्रमाण सारखे असते पण स्त्रीबीजातील मायटोकाँड्रिया मधील डी एन ए गर्भात उतरतात. यामुळे गर्भाच्या डी एन ए मध्ये आईच्या डी एन ए चे प्रमाण अंशतः जास्त असते.
कालच हा प्रतिसाद जास्त सविस्तर दिला होता पण तो का गंडला कारण माहिती नाही.
23 Mar 2018 - 2:14 pm | पिलीयन रायडर
अच्छा! आता समजले.
अंशतः जास्त वारसा नक्की किती फरक पाडू शकतो? कारण युयुत्सु ज्या प्रकारे लिहीत आहेत, त्यावरून माझा असा समज झाला की आई बऱ्याच प्रमाणात गोष्टी कंट्रोल करते.
मी तुम्हाला हे उत्सुकता म्हणून विचारते आहे. धाग्याकर्त्याचा उद्देश तर आता लक्षात आलाच आहे =))
23 Mar 2018 - 3:56 pm | युयुत्सु
https://www.youtube.com/watch?v=7YXm5j8qZaA
23 Mar 2018 - 2:33 pm | टवाळ कार्टा
आयला असे पण असते...बाकी हि माहिती धागाकर्त्यांच्या पुस्तकातही असो अशी इच्छा ;)
22 Mar 2018 - 7:00 pm | युयुत्सु
आपली जीवनशैली, अधिजनुकशास्त्र आणि आरोग्य या विषयाशी संबंधित डॉ० जगन्नाथ दीक्षित (एम०डी०, अमेरिका) आणि मी लिहीलेले पुस्तक लवकरच प्रसिध्द करायचा आमचा प्रयत्न चालु आहे. या पुस्तकातील काही भाग अमेरीकतील ’एकता’ या नियतकालिकात अगोदरच प्रसिध्द झाला आहे.
तेव्हा मिसळपाववर हा विषय हाणून पाडायचा जरी कितीही प्रयत्न झाला तरी ते चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल याची मला खात्री आहे.