कोल्हापूरचे छत्रपति राजाराम ह्यांचे फ्लॉरेन्स, इटली येथील स्मारक.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
11 Mar 2018 - 5:42 am

कोल्हापूरचे छत्रपति राजाराम

अनेक वर्षांपूर्वी असे माझ्या वाचनात आले होते की कोल्हापूरचे छत्रपति राजाराम (राज्याचा काल १८६६-१८७०) हे इंग्लंडच्या दौर्‍यावरून हिंदुस्तानाकडे परतत असतांना वाटेमध्ये इटलीमधील फ्लॉरेन्स शहरात वयाच्या २०व्या वर्षी अचानक दिवंगत झाले. २०१४ साली मी स्वत: फ्लॉरेन्सला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर ही आठवण पुन: जागी झाली आणि असे का आणि कसे घडले ह्याचा शोध मी जालावर घेतला. त्यातून असे निष्पन्न झाले की राजाराम ह्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे एक स्मारक त्यांच्या दहनस्थली उभारण्यात आले आणि अजूनहि ते तेथे उभे आहे. हे कळताच फ्लॉरेन्सच्या मुक्कामात वेळ काढून त्या स्मारकाला भेट द्यायचे मी ठरविले. त्या भेटीविषयी आणि त्या संदर्भात जे माझ्या वाचनात आले त्यातून हे लिखाण करीत आहे.

छत्रपति शहाजी (तिसरे) (बुवा साहेब) ह्यांचा १८३८ मध्ये मृत्यु झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजी (तिसरे) हे गादीवर आले. १८६६ मध्ये आपल्या मृत्युसमयी त्यांना मुलगा नव्हता म्हणून त्यांनी आपला भाचा - बहीण आऊबाई पाटणकर ह्यांचा मुलगा - नागोजीराव पाटणकर (जन्म एप्रिल १३, १८५०) ह्यांना ऑगस्ट १, १८६६ ह्यांना दत्तक घेतले. दत्तक वडिलांच्या ऑगस्ट ४. १८६६ ह्या दिवशी मृत्यूनंतर ते छत्रपति राजाराम ह्या नावाने गादीवर बसले.

छत्रपति राजाराम अल्पवयीन असल्याने कोल्हापुरातील तकालीन ब्रिटिश रेसिडेंट कर्नल जी. एस. ए. ऍंडरसन ह्यांच्या सूचनेवरून कॅ. एडवर्ड वेस्ट ह्यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक होऊन छत्रपतींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. ह्याच कामासाठी मुंबईहून जमशेटजी नौरोजी उनवाला ह्या पदवीधर पारसी गृहस्थांनाहि नेमण्यात आले.

गादीवर येण्यापूर्वीच छत्रपतींचे इंग्रजी भाषेचे काही शिक्षण झालेले होते. नवीन ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे दोन मार्गदर्शकांच्या साहाय्याने त्यांनी चांगली प्रगति केली. वाचनाच्या आवडीबरोबरच बिलिअर्डज्, क्रिकेट, शिकार अशा खेळांमध्ये त्यांना रस होता. आपली इंग्रजीमध्ये दैनंदिनी लिहिण्याची रीत त्यांनी सुरू केली होती. त्यांच्या राज्यकालामध्ये १८६९ सालात कोल्हापुरात हायस्कूलची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा पुढाकार होता आणि १८७० मध्ये त्यांचा मृत्यु झाल्यानंतर त्या हायस्कूलला त्यांचे नाव देण्यात आले. ह्या हायस्कूलचेच १८८० मध्ये प्रसिद्ध राजाराम कॉलेजमध्ये रूपान्तर झाले. (ह्याचे पहिले प्रिन्सिपॉल चार्ल्स हॅरिसन कॅंडी, १८५१ - १९२५, हे मेजर ई.टी.कॅंडी, मोल्सवर्थ ह्यांचे कोशनिर्मितीमधील सहकारी आणि पूना कॉलेजचे प्रमुख, ह्यांचे तिसरे चिरंजीव.)

१८७० मध्ये छत्रपतींनी इंग्लंडचा दौरा करण्याचे ठरविले. त्याला गवर्नरकडून संमति मिळाल्यावर छत्रपति स्वत:, कॅ. वेस्ट, पारसी शिक्षक आणि अन्य ११ जण असे इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले. १४ जूनला ते लंडनला पोहोचले आणि १ नोवेंबरला इंग्लंड सोडेपर्यंत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडमधील अनेक गावे आणि प्रेक्षणीय स्थळांना तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, क्यू गार्डन्स, वूलिच ऍकॅडमी, क्रिस्टल पॅलेस अशा शैक्षणिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. दोनतीन वेळा पार्लमेंटमध्ये कामकाज पाहिले. स्वत: विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅडस्टन, डिजरेली अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला. त्याचबरोबर हिंदुस्तानशी संबंध असलेल्या बार्टल फ्रियरसारख्या अनेक व्यक्ति त्यांना भेटल्या. दादाभाई नौरोजी, डॉ. मॅक्स मुल्लर आणि डॉ. बुल्हर हे संस्कृततज्ज्ञ, डी लेसेप्स, महाराजा दुलीप सिंग ह्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाखती झाल्या. अशा सर्व व्यक्तींची मैत्रीपूर्ण वागणूक आणि वागण्याबोलण्यातला साधेपणा, तसेच पौर्वात्य पद्धतीच्या डामडौलाचा अभाव ह्यामुळे छत्रपति बरेच प्रभावित झालेले दिसतात. राजघराण्यातील स्त्रियांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक करण्याची सोयहि आपल्या मुक्कामात त्यांनी केली असे कॅ.वेस्ट नोंदवतात. छत्रपतींनी स्वत: बॉलरूम डान्सिंगचे धडे घेतल्याचा उल्लेख मिळतो. स्टुडिओमध्ये जाऊन छायाचित्र काढून घेतल्याचाहि उल्लेख मिळतो. हिंदुस्थानातील राजेरजवाडयांनी इंग्लंड-युरोपचे दौरे करण्याची प्रथा नंतर चांगलीच रूढ झाली पण गादीवर असतांना असा दौरा करणारे पहिले सत्ताधीश म्हणजे छत्रपति राजाराम असा उल्लेख कॅ.वेस्ट ह्यांनी केला आहे. छत्रपतींची दैनंदिनी वाचून असे जाणवते पुष्कळ काही करण्याची क्षमता आणि इच्छा असलेला हा राजा दुर्दैवाने अल्पायुषी ठरला आणि त्यातून कोल्हापूरच्या जनतेचे मोठे नुकसान झाले.

असा हा शैक्षणिक आणि स्थलदर्शनाचा प्रवास संपवून १ नोवेंबरला सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. पुढचा मुक्कम ब्रुसेल्स-वॉटर्लू असा झाला. वॉटर्लू पाहून आपल्याला अतिशय आनंद झाला असे छत्रपति नोंदवतात. बेल्जियमच्या राजेसाहेबांशीहि भेट झाली. तेथून कलोन-फ्रॅंकफुर्ट-म्यूनिक असे मुक्काम घेत घेत प्रवासी १३ नोवेंबरला इन्सब्रुकला पोहोचले आणि येथून छत्रपतींच्या तब्येतीस काहीतरी झाले आणि त्यांना उभे राहता वा चालता येईनासे झाले.

आजाराचे निश्चित निदान अखेरपर्यंत झाले नाही. र्‍हुमॅटिझमचा हा त्रास आहे अशी समजूत होती आणि छत्रपतींनी बरोबर नेलेला मुस्लिम हकीम त्यांच्यवर काही उपाय करीत होता आणि त्याला काही यश येत आहे असे वाटत होते. स्थानिक युरोपीय डॉक्टरांना दाखविण्यास छत्रपति तयार नव्हते.

अशाच परिस्थितीत प्रवासी वेनिसला पोहोचले आणि छत्रपतींनी सेडान खुर्चीतूनच तेथे डोजचा राजवाडा, सान मार्कोचा चौक अशा प्रेक्षणीय जागा पाहिल्या. पुढचा मुक्काम फ्लॉरेन्स येथे झाला. इटलीच्या एकत्रीकरणाच्या प्रारम्भाच्या दिवसात १८६५-७१ ह्या काळात येथेच नवीन इटली देशाची राजधानी होती.

डॉ.फ्रेजर नावाच्या एका इंग्लिश डॉक्टरकडून आणि त्याच्या दोन इटालियन सहकार्‍य़ांकडून छत्रपतींची येथे तपासणी झाली आणि त्यांच्या औषधांचा सुपरिणाम दिसत आहे असे वाटत असतांनाच ३० नोवेंबर १८७० ह्या दिवशी सकाळी छत्रपतींचे अचानक निधन झाले. ’Congestion of the abdominal viscera, togethe with collapse of nervous power' असे मृत्यूचे कारण नोंदविण्यात आले.

ह्या निधनामुळे मागे उरलेल्या सहप्रवाशांपुढे नवेच संकट उभे राहिले. ते म्हणजे मृतदेहाचे हिंदु पद्धतीने दहन कसे करायचे. कर्मठ ख्रिश्चन देशाच्या अधिकार्‍यांना हिंदूंची अग्नि देण्याची पद्धति रानटी वाटत होती आणि तसे करायला संमति द्यायला ते तयार नव्हते. फ्लॉरेन्समधील इंग्रज वकिलाच्या दिवसभराच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय होऊन गावापासून ७-८ किलोमीटर दूर असलेल्या कश्शीना(Cascine, तबेला अथवा फार्महाउस, फ्लोरेन्समधील प्रख्यात मध्ययुगीन मेदिची घराण्याचे गुरांचे गोठे येथे होते) ह्या मैदानात, आर्नो नदीच्या काठी, जेथे तिला मुन्योने नावाची छोटी नदी येऊन मिळते, दहन करण्याची परवानगी मिळाली आणि १ डिसेंबरला पहाटे असे दहन झाले. नंतर अस्थि गोळा करून कलशात घालून त्या हिंदुस्तानात आणल्या गेल्या आणि गंगा नदीत त्यांचे विधिवत् विसर्जन करण्यात आले.

ह्या अकाली निधनानंतर छत्रपतींचे फ्लॉरेन्समध्ये स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूरच्या प्रजाजनांकडून एक कोश निर्माण करण्यात आला आणि त्यामध्ये जमलेल्या पैशातून दहनाच्या जागी स्मारक उभारण्यात आले. त्याचा आराखडा मे. चार्ल्स मॅंट ह्या आर्किटेक्टने तयार केला. (कोल्हापुरातील राजाराम कॉलेज, बडोद्यातील लक्ष्मीविलास राजवाडा, अजमेरचे मेयो कॉलेज ह्या त्यांच्या अन्य प्रसिद्ध कृति.) इंडो-सारासीनिक शैलीच्या छत्रीखाली अर्धपुतळा असे हे स्मारक आहे. अर्धपुतळा चार्ल्स फ्रान्सिस फुलर ह्या फ्लॉरेन्सवासी ब्रिटिश शिल्पकाराने बनविला आहे. तो छत्रपतींच्या इंग्लंडात काढलेल्या छायाचित्रावरूनच बनविलेला दिसतो.

प्क्लॉरेन्सच्या भेटीसाठी माझ्यापाशी दोनच दिवस होते. पैकी पहिला दिवस पहिल्या दिवशी गावातील उफ्फिजी गॅलरी (Botticelli च्या Birth of Venus ह्या चित्रासाठी प्रख्यात), पलाझ्झो वेक्किओ आणि अकादमी - येथेच मिकेलऍंजेलोचा प्रख्यात ’डेविड’ उभा आहे - ह्यांना भेटी देऊन दुसर्‍या दिवशी पिसा गावाचा कार्यक्रम ठरला होता. तरीहि वेळात वेळ काढून दुसर्‍या दिवशी सकाळी मी एक कॅब ठरवून स्मारकाकडे गेलो. चालकाबरोबर इटालियनमध्ये बोलण्याची अडचण असल्याने हॉटेलच्या कॉन्सिअर्जमार्फत आधीच चालकाला कोठे जायचे आहे त्याची चांगली कल्पना दिली होती आणि काही कळीची वाक्ये गूगलच्या मदतीने भाषान्तरित करून इटालियनमध्ये लिहूनहि बरोबर ठेवली होती. राजाराम छत्रपतींची इटालियनांना महिती नसली तरी सुदैवाने स्मारकाची जागा त्यांना चांगली ठाऊक आहे कारण स्मारकामागचाच आर्नो नदीवरील पूल Ponte dell'indiano (इंडियन ब्रिज) ह्या नावानेच ओळखला जातो. (पुलाचेहि स्वत:चे असे वैशिष्टय आहे. पुलाची अधिक माहिती येथे पहा.) गाडीचा चालकहि भला माणूस होता आणि कामापुरते इंग्रजीहि त्याला बोलता येत होते.. कसलीहि अडचण न येता त्याने आम्हाला १५-२० मिनिटात स्मारकासमोर पोहोचविले अणि अर्धा तास तेथे काढून त्याच गाडीने आम्ही आमच्या हॉटेलकडे परतलो.

सुमारे ५-६ फूट उंचीचा चौथरा आणि त्यावर ब्रॉंझची छत्री, छत्रीखाली संगमरवरी अर्धपुतळा, चौथर्‍याच्या सभोवती बिडाचे कुंपण असे स्मारकाचे स्वरूप आहे. स्मारक उत्तम स्थितीत आहे. अर्धपुतळ्याखाली चार बाजूंना इटालियन, इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये चार लेख आहेत. पैकी इंग्रजी लेखच दूरच्या अंतरावरून मला वाचता आला आणि तो असा आहे:
Erected to the memory of His Highness Rajaram Chuttraputti Maharajah of Kolhapur who died at Florence on the 30th November 1870 in his 21st year while returning to India from England.

(येथील Chuttraputti ह्या स्पेलिंगचा परिणाम असा झाला आहे की जालावर जेथे जेथे ह्या अर्धपुतळ्याविषयी काही वाचावयास मिळते तेथे व्यक्तीचे नाव Rajaram Chuttraputti असेच दर्शविले आहे!)

मी तेथे काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवीत आहे. गूगल अर्थमध्ये ४३अं. ४७.२मि. ४१से. (उ), ११अं. ११.५२मि. ३३से. (पू) येथे पुरेसा क्लोजअप घेतल्यास स्मारक दिसते आणि काही अन्य छायाचित्रेहि दिसतात.

स्मारक

एका बाजूवरील इंग्रजी लेख

लेख जवळून

आर्नो-मुन्योने संगम. मागे Ponte dell'indiano

परतीच्या वाटेवर ’मला ह्या पुतळ्यात इतके स्वारस्य का आहे’ अशी चौकशी आमच्या चालकाने केली. ’पुतळ्यातली व्यक्ति माझ्या पूर्वजांपैकी आहे’ असे उत्तर मी देताच 'Yes, he does look like you' अशी उलटपावतीहि त्याने दिली.

छत्रपतींचे मार्गदर्शक कॅ.वेस्ट ह्यांनी छत्रपतींची दैनंदिनी काही अन्य माहितीसह संपादित करून लंडनमध्ये छापली. गूगलकृपेने ती येथे उपलब्ध आहे. तिच्यावर हा लेख पुष्कळसा आधारित आहे.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

11 Mar 2018 - 9:43 am | आनन्दा

तुम्ही 1914 साली फ्लोरेन्स मध्ये गेलेलात?
तुमचं वय तरी किती?

ह. घ्या. :)

अरविंद कोल्हटकर's picture

11 Mar 2018 - 10:16 am | अरविंद कोल्हटकर

२०१४ च्या जागी मी १९१४ लिहिले ही माझी चूक झाली हे मान्य.

पण ह्या लेखामध्ये तुम्हाला इतकेच लक्षणीय वाटले हा छिद्रान्वेषीपणा आहे असे माझे मत नोंदवतो. 'मक्षिका व्रणमिच्छन्ति' हे ऐकले आहे का तुम्ही?

गवि's picture

11 Mar 2018 - 10:53 am | गवि

बदल केला आहे.

आनन्दा's picture

11 Mar 2018 - 12:01 pm | आनन्दा

खरं आहे, लेख आवडलाच हो. तुम्ही, शरद सर आणि माहीतगार यांचा मी पंखाच आहे.
प्रतिक्रिया दिली नाही ही चूक झाली. क्षमस्व.

गवि's picture

11 Mar 2018 - 10:51 am | गवि

अतिशय रोचक लेख.

त्यांना अचानक झालेला आजार गियाँ बारे सिंड्रोम वाटतो.

या ठिकाणाची माहितीच नव्हती अन्यथा तिथे गेल्यावर डेव्हिडच्या हिरव्या पुतळ्या (तोही डुप्लिकेट पुतळा) ऐवजी या स्मारकाकडे गेलो असतो.

टवाळ कार्टा's picture

12 Mar 2018 - 8:38 pm | टवाळ कार्टा

+1111111111111111111111111111111

manguu@mail.com's picture

11 Mar 2018 - 10:54 am | manguu@mail.com

लोकवर्गणीतून स्मारक हे बुद्धीला पटले नाही. जन्मभर विलास जनतेच्याच पैशावर अन पुन्हा स्मारक .

राजेशाही गेली , फार बरे झाले.

ही खोडसाळ प्रतिक्रिया उडवून संबंधित आयडीला समज देण्यात यावी अशी मी संम ला विनंती करत आहे.

राजेशाही आणि घराणेशाहीचे कुणी समर्थक नसेल तर काही वावगे किंवा खोडसाळपणाचेच असे काही नसावे. किंवा राजेशाही आणि घराणेशाहीचे विरोधक कम्यूनीस्ट असतात असा सरक्सकट निष्कर्ष काढणे तार्कीक उणीवेचे असावे. भांडवलशाही असलेले पण लोकशाही असतानाही राजेशाही अस्तंगत झालेले आमेरीकेसारखे देशही कम्युनीस्ट म्हणावे लागतील.

मी वेगळ्या कारणाने स्मारके / पुतळे आणि मुर्ती पुजेचा समर्थक आहे (आणि तरीपण व्यक्ती आणि घराणेपुजेचा समर्थक नाही) त्याच्या मर्यादांही पटतात त्या बद्दल सविस्तर चर्चा पुतळा म्हणजे.... कवितेच्या धागा पानावर हल्लीच झाली त्याची पुर्नौक्ती टाळतो.

मुख्य म्हणजे रयतेला केंद्रस्थानी ठेवणारे छत्रपती महाराज समजता येतात पण सोबतीला जनतेच्या सन्मानाशी त्यांनी तडजोड केली नाही. छ. शिवाजी महाराजांच्या सूनबाई ताराराणी हातात फारसा प्रदेश नसता औरंगजेबा सारख्या बादशहाशी स्वाभीमानीपणे लढल्या , त्यांच्या दिराने स्वाभीमानासाठी बलिदान केले. ब्रिटीशांशी तडजोड अनेकांप्रमाणे सातारा गादीवरही आली पण स्वाभीमाना साठी काहीतरी केले असेल की गादी ब्रिटीशांना खालसा करावी लागली. पण कोल्हापूरकरांच्या बाजूबद्दल ( त्यांच्या सामाजिक कामाबद्दल गौरवोद्गारच आहेत) ब्रिटीशांशी जुळवून घेणार्‍या इतर सरंजामदारांप्रमाणे पहावे लागत नाही ना . येथे चर्चा चालु असलेल्या छ राजाराम दुसरे यांचे (त्याम्चे शैक्षणिकार्य उल्लेखनीय आणि तेव्ढेही न करते तर जनतेनेही वर्गणी गोळाक्रून तेही परदेशात स्मारक केले नसते) इंग्रजी चांगले होते, पण पंजाबच्या युवाराजपूत्र ते इतर सरंजामदारांप्रमाणे छ राजाराम दुसरे आपल्या छत्रछायेच्या प्रभावात राहतील जेणे करुन ते आणि त्यांच्या नेतृत्वात जनता उठाव करणार नाही याची इंग्रजांनी यशस्वी आणि पुरे पुर काळजी घेतलेली होती. छ राजाराम दुसरे यांचे इंग्रजी अस्खलीत होते त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती ती डायरी इतर संबंधीत कागदापत्रांसोबत इंग्रजांनी आनंदाने मृत्योत्तर प्रकाशित केली. आता ती अर्काईव्हज डॉट ऑर्गवर या दुव्यावर उपलब्ध असते

माहितगार's picture

13 Mar 2018 - 7:06 pm | माहितगार

....छ राजाराम दुसरे यांचे इंग्रजी अस्खलीत होते त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती ती डायरी इतर संबंधीत कागदापत्रांसोबत इंग्रजांनी आनंदाने मृत्योत्तर प्रकाशित केली. आता ती अर्काईव्हज डॉट ऑर्गवर या दुव्यावर textsDiary of the late Rajah of Kolhapoor, during his visit to Europe in 1870 नावाने उपलब्ध असते

या पुस्तकानुसार, शुक्रवार , ९ ऑक्टो १८६८ ला तत्कालीन गव्हर्नर जनरलाने पुण्यात स्वतःचा दरबार सरंजामदारांना बोलवून बोलावला. त्यात इंग्रजी अस्खलीत असल्यामुळे छ राजाराम दुसरे यांचे गव्हर्नर जनरल्च्या गौरवार्थ भाषण झालेले दिसते. भाषणाची सुरवात We, the Chiefs and Sirdars of the Deccan and of Guzerat, अशी झालेली दिसते (पृष्ठ १०८) बाकी गौरव ठिक त्या भाषणाचा शेवट We remain, Your Excellency's faithful and devoted servants ( पृष्ठ १०९ ) असा आहे. ( अर्काईव्हज डॉट ऑर्गवरील पुस्तक दुवा हा प्रतिसाद लिहिण्याच्या वेळी जसा दिसला) महाराणी ताराबाईच्या वंशातील व्यक्तीकडून इंग्रजांना भारतीय राजांच्या वतीने devoted servants म्हणवून घेण्याची संधी मिळणे नाही म्हटले तरी मराठी मनाला जरासे तरी खुपणारे असू शकते. छ. राजाराम महाराज दुसरे वापस आल्या नंतर कदाचित एखादे बंड करण्याची त्यांना इच्छा झाली नसती असा दावाही करणे शक्य नाही पण त्या जरतरच्या गोष्टी झाल्या . (सौदी आरेबीयासारख्या देशाचे उदाहरण घ्यायचे झालेतर घराणेशाही टिकवण्यासाठी युरोमेरीकेशी होणार्‍या तडजोडी अ़उन काय सांगतात अर्थात आता तेथे ही मर्यादीत लोकशाहीकरण आणि आधुनिकीकरणाचे प्रयास चालू असावेत असे दिसते ) तर एकुण कुठल्याही राजेशाहीची घराणेशाहीची त्यांचे योग्य ते गौरव करताना मर्यादा लक्षात घ्यावी असे वाटते. असो.

(पुस्तक संपादन करणार्‍या इंग्रज संपादकाने मूळ मजकुरात खोडसाळपणा केला असल्यास कल्पना नाही म्हणून उत्तरदायीत्वास नकार चुभुदेघे)

माहीतगारजी प्रतिसाद फार आवडला.
व्यक्तीपुजा ही भारतीयांच्या रक्तातच आहे. राजेशाहीचे राजपुत्रांचे फॅनाटीक आकर्षणाच्या प्रभावात त्यांच्या कर्तुत्वाचे विश्लेषण करु शकणे अवघड होऊन जाते.
हेच मत मागेही एक महाराणी गायत्रीदेवी वर आलेल्या लेखावरही व्यक्त केले होते.
म्हणजे कोल्हटकरांच्या कौतुकाचे कौतुक आहे पण आसाराम चे ही अनेक भक्त अत्यंत धडपडीने निकराने आजही त्याच्या गौरवगाथा गातांना थकत नाहीत
तेव्हा कुठेतरी चुकतयं असं वाटत,
तुम्ही दिलेला दुवा बघतांना हा आणखी एक रोचक तुकडा आढळला यात साहेबाने राजपुत्राला दिलेल्या प्रेमळ वार्निंग्ज मुळातुन वाचण्यासारख्या आहेत.

After the reception had taken place his Excellency Sir Bartle Frere
addressed his Highness the Rajah of Kolhapoor, in English, as follows : —

As the head of an ancient house so famous in Mahratta history, as the ruler of many fair provinces and of hundreds of thousands of subjects whose happiness will depend so greatly on the manner in which you rule them, you have heavy रesponsibilities early laid upon you, and I heartily pray that God may give you strength and wisdom to sustain them. You have, to assist you, the good example of his late Highness, and the excellent system of government already established, the aid of tried and faithful servants like Ram Row and your other ministers, and above all the constant assistance and advice of an experienced resident. Colonel George Sligo Anderson, who is already well known to you by his able services in other parts of the Southern Mahratta country, and who will, I am sure, speedily secure your entire confidence, as lie has earned that of the British Government. I would earnestly exhoii you to regard him as your best friend, and to refer to him all your doubts and difficulties, whatever they may be, remembering what you have heard the State of Kolhapoor owed to Colonel Douglas Graham when your predecessor was a minor, and still later, what you have your- self seen of the confidence which existed between his late Highness and Mr. Havelock. I trust at no distant period to hear from Colonel Anderson that he considers you capable of conducting the whole administration without the intervention of a regency. But I would beg your Highness to remember that this period will be hastened or retarded according as you apply yourself
to cany out the course of study so wisely laid down for you by his late Highness. It was a great source of gratification to me to learn that since I had the pleasure of seeing you at Kolhapoor, less than a year ago, you had made such progress in your studies that you wished me to address you in English, and that you were prepared to reply in the same language. I am glad to infer from this circumstance that you are fully alive to the fact that the office of ruler of Kolhapoor is no empty honour, no mere agreeable pageant, and it is certain that the British Government will not entrust the active powers of administration to any one, till they have all the security for a wise use of these powers which good education and proved disposition can aftbrd. I would in the meantime have you constantly bear in mind that no former Rajah of Kolhapoor ever succeeded to dignities and responsibilities equal to yours. However absolute their power, it was circumscribed within
a very short radius from their capital. None of them could have ventured as far as you have come from your capital without fear of domestic treachery or foreign violence. There are old men now alive who can tell you what were the dangers in their early days of a visit from Kolhapoor to your ancestor's capital at Sattara, or to his minister's capital at Poona. But wherever your Highness now goes you move under the aegis of the British power,

आणी हा सर्वात रोचक पॅराग्राफ ज्यात साहेब राजपुत्राला बजावुन अटी घालत आहे ज्या अटींचा अर्थातच सहर्ष स्वीकार केला गेलेला दिसतोय.

There was a time when your predecessors could exercise any amount of oppression over their subjects, and no power in India could call them to account. Such licence of oppression exists no longer. But there is nothing which a good Rajah of Kolhapoor could ever have done which you may not do now ; and if the Rajah's power to do evil has been limited, his power to do good and his responsibility for the exercise of that power have been immensely increased. I know but of two conditions to the enjoyment of this power. They are fidelity to the British Crown, and the obligation to govern your subjects well. I am convinced that no exhortation of mine is needed to impress on your Highness or your advisers your responsibilities in both respects ; and I draw from the example of your lamented predecessor the assurance that you will be no less anxious to deserve the character of a faithful ally to her Majesty the Sovereign of the British Empire,

राजपुत्राने दिलेले उत्तर व शब्द बघण्यासारखे आहेत.
Your Excellency, —

I THANK you most heartily for the kind welcome you have given me and the great honour which I have received at your Excellency's hands on this auspicious day. I beg that your Excellency will convey to her Most Gracious Majesty the assurance of my loyal devotion to her crown, and my desire to fill worthily the high position to which, by Divine Providence, I have succeeded, under the sovereign of this great Empire. I feel deeply sensible of the responsibilities which have fallen on me, and how much will be needed on my part to fulfil them in a way which will do honour to the memory of the illustrious Prince whose early loss we all deplore. The words of advice spoken by your Excellency to-day can never be effaced from my memory, and will guide and cheer me in the arduous path before me, as the words of a revered parent who has earnestly at heart the honour and happiness of the ancient house of Sivajee, and the welfare of the nobles and people attached to it. Knowing how much the principality of Kolhapoor owes to the care and protection of the British Government, it will always be my duty to look to the Political Agent at my com-t for counsel and encouragement. I esteem myself especially fortunate in having so kind and experienced a gentleman as Colonel Anderson to advise and befriend me on entering on the daties of my high station, and I trust by God's blessing and the continued friendship and protection of the British Government, to hand down unimpaired the great inheritance to which I have this day succeeded.

अगदी ब्रिटीशांनी राजेरजवाड्यांच्या कनपटीला बसवलेल्या अधिकार्‍यांचे आणि त्यांच्या नितीचे त्यांच्या पदरी पडलेले यश . चीन सारखा देश अत्यल्पकाळाकरता किंवा अत्यल्प भागा करत वसाहतवादाला समोर गेला नाही किती तरी आकांड तांडव करतात. अफगाणिस्तान मोठी किंमत मोजायला लावते, नेपाळ भूतान यशस्वीपणे ब्रिटीशांना दूर ठेवतात, इथियोपीया वसाहतवाद्यांना फिरकू देत नाही, ठरवल्या नंतर अंदमानातले एक बेट वरचे अदिवासी अजूनही प्रगत माणसाला आजूबाजूस फटकू देत नाहीत .

भारतीयांच्या स्वभावतः काही मर्यादा असल्या पाहीजेत असे राहून राहून वाटत रहाते

ठरवल्या नंतर अंदमानातले एक बेट वरचे अदिवासी अजूनही प्रगत माणसाला आजूबाजूस फटकू देत नाहीत .

या बाबतीत प्रगत माणसे हेतुपुरस्सर तिथे अतिक्रमण करणं टाळताहेत असं आहे.

माहितगार's picture

14 Mar 2018 - 11:13 am | माहितगार

ईतर कुणी नको आहे हे निक्षून दाखवून देण्यातली त्यांची जिद्द महत्वाची नाही का ? भारतीय लोक जिद्दी पणाच्या गुणात कुठेतरी कमी पडत असावेत असे वाटते.

गामा पैलवान's picture

11 Mar 2018 - 3:44 pm | गामा पैलवान

manguu@mail.com,

जन्मभर विलास केला म्हणता तर होता कितीसा जन्म छत्रपतींचा? अवघी चार वर्षं. त्यातही त्यांनी शाळा स्थापन केली आणि युरोपचा अभ्यासदौरा करून आदर्श पायंडा पाडला. स्त्रियांना आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून खास शिक्षिकाही नेमली. अशा प्रागतिक विचारांच्या राजाला तुम्ही जनतेच्या पैशांवर मजा मारणारा विलासी म्हणता! तुम्ही कम्युनिस्ट म्हणजे राजद्वेषी आहात.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

14 Mar 2018 - 1:32 pm | manguu@mail.com

राजाची बायको हरवली , राजाला समुद्रावर पूल बांधून द्या.
राजा गेला , त्याचे स्मारक बांधून द्या.

प्रजेने यान्ना काय काय बांधून द्यायचे ?

राजामहाराजांच्या वारसानी १९४७ साली धडधाकट वास्तू स्वत:साठी ठेऊन पडक्या झडक्या इमारती , खिंडी आणि कडे लोकांच्या गळ्यात इतिहासाच्या नावाने बांधलेल्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
पोरांच्या सहली काढतात इतिहासाच्या नावाने - त्याही खिंडी कपारीत . पोरांच्या सहली शालिनी पॅलेस किंवा उदयपूर पॅलेसमध्ये काढून तिथले वैभव पोराना चार आठ दिवस का दाखवले जात नाही ?

राजा महाराजांच्या नादाने आम जनता विष्णुपंत पागनीस झाली आहे . संत तुकाराम रिलीज झाला , हिट झाला , थेट्रातून गेला तरी विष्णुपतं पागनीस तुकारामाच्याच वेषात राहिले म्हणे. तसे १९४७ ला राजे महाराजे गेले तरी लोक भालदार , चोपदार अन भोयाची भूमिका विसरायला तयार नाहीत.

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2018 - 9:36 pm | चौथा कोनाडा

राजेशाही गेली ? कोण म्हणतंय ?
भुजबळ पॅलेस वै नांव ऐकली नाहीत की काय ?

अनुप ढेरे's picture

11 Mar 2018 - 11:29 am | अनुप ढेरे

मस्तं लेख!

दीपक११७७'s picture

11 Mar 2018 - 11:55 am | दीपक११७७

एकदम नविन माहिती आणि जबरदस्त लेख

सतिश गावडे's picture

11 Mar 2018 - 12:17 pm | सतिश गावडे

लेख आवडला. अतिशय रोचक माहिती आहे.

रोचक माहिती. त्यातूनही अशा एखाद्या स्मारकाची माहिती मिळवून तेथे प्रयत्नपूर्वक भेट देणे यासाठी एक सलाम!

सुखीमाणूस's picture

11 Mar 2018 - 3:08 pm | सुखीमाणूस

उत्तम माहीती

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2018 - 5:03 pm | चौथा कोनाडा

सुरेख रंजक माहिती.
फोटो देखील समर्पक.
मराठीतील लेखपाटीचा फोटो काढता आला नाही का ?
दुमजली पुलाची माहिती रोचक आहे. पादचार्‍यांची एव्हढी काळजी घेतात हे पाहोन आमच्या पुण्यनगरीच्या पालिकेची अन त्यातल्या पुलांची आठवण झाली.
ब्रिटीश राज्यकर्ते किती उदार व रसिक होते याचे हे आणखी एक उदाहरण आहे.
स्मारकाला भेट देण्याची आपली धडपड कौतुक करण्यासारखी आहे.

एकंदरीत अतिशय रोचक माहिती. धन्यवाद !

जेम्स वांड's picture

13 Mar 2018 - 11:57 am | जेम्स वांड

ब्रिटीश राज्यकर्ते किती उदार व रसिक होते याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

हे वाचून कसंतरीच झालं. असो!

चौथा कोनाडा's picture

13 Mar 2018 - 9:43 pm | चौथा कोनाडा

छत्रपतींचे अंतीम संस्कार, समाधी स्मृतीस्थळाची उभारणी व देखभाल या इतिहासाकडं थोड्या सकारात्मतेने पाहिलं म्हणुन मला असं वाटलं.
तुमच्या वेगळ्या मताचा आदर आहे.

Jayant Naik's picture

12 Mar 2018 - 4:12 pm | Jayant Naik

फारच सुरेख लेख.

राघवेंद्र's picture

12 Mar 2018 - 7:16 pm | राघवेंद्र

लेख आवडला. नवीनच माहिती मिळाली.

निशाचर's picture

13 Mar 2018 - 7:16 am | निशाचर

रोचक लेख

पद्मावति's picture

13 Mar 2018 - 2:59 pm | पद्मावति

रोचक माहीती. लेख आवडला.

छत्रपतींचे मार्गदर्शक कॅ.वेस्ट ह्यांनी छत्रपतींची दैनंदिनी काही अन्य माहितीसह संपादित करून लंडनमध्ये छापली. गूगलकृपेने ती येथे उपलब्ध आहे.

कोल्हटकरजी लेखातील तुमचा गूगलबुक्सवरील दुवा उघडत नाही असे दिसते.

लेखातील दुव्यात सुरुवातीचा h गाळला गेला आहे. दैनंदिनीचा हा सुधारित दुवा.
लेखातही सुधारणा करता आल्यास उत्तम.

खूप सुंदर लेख, मनापासून आवडला. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या वारसा मध्ये तीच तीच नावे सातत्याने येत असल्या मुळे , इतिहास सांगताना थोडा गोंधळ होतो. छत्रपती शिवाजीराजे या नावाने दोन भिन्न छत्रपतींचे पुतळे कोल्हापुरात स्थित्य आहेत. त्यातील एक पुतळा कलेक्टर ऑफिस जवळ आहे. तसेच शाहूमहाराज (घाडगे कागलकर सरकार) यांच्या पुत्रा चे नाव देखील राजाराम महाराज असेच होते व त्यांच्या नावावरून राजाराम कॉलज असे नाव देण्यात आले असावे. प्रिन्स राजाराम व नागोजीराव पाटणकर ह्या शाळांचे अस्थीत्व अजूनही कोल्हापुरात आहे.

माहितगार's picture

13 Mar 2018 - 9:12 pm | माहितगार

...कोल्हापूरच्या छत्रपतींच्या वारसा मध्ये तीच तीच नावे सातत्याने येत असल्या मुळे , इतिहास सांगताना थोडा गोंधळ होतो....

तीच तीच नावे सातत्याने येत असल्या मुळे , इतिहास सांगताना थोडा गोंधळ होतो. हे खरे - भोसले घराण्यात वस्तुतः मागील पिढीतील कुणाच्यातरी स्मरणार्थ पुढच्या पिढीत नाव ठेवण्याची परंपरा तशी जुनी असावी. छ. शिवाजी महाराज सर्वात थोरले यांचे चि. छ संभाजी महाराजांच्या काकांचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या बंधूंचे नावही संभाजी राजे होते याची फारशी कुणास कल्पना अथवा स्मरण नसते - पण इतिहास सांगताना गोंधळ व्हावा म्हणून नव्हे तर मूळ यशस्वी राजाचे ब्रँडींग (आणि त्याच्या समवे येणारे लाभ घेण्यासाठी) पुढील पिढीत चालू ठेवण्यासाठी वडलांचेच नाव मुलासही ठेवण्याची परंपराही बर्‍ञाच प्राचीत राजघराण्यात असे . इंग्लंडच्या सरदारकीत अशी प्रथा अलिकडे पर्यंत असावी चुभूदेघे.

गामा पैलवान's picture

14 Mar 2018 - 1:37 pm | गामा पैलवान

माहितगार,

ईतर कुणी नको आहे हे निक्षून दाखवून देण्यातली त्यांची जिद्द महत्वाची नाही का ? भारतीय लोक जिद्दी पणाच्या गुणात कुठेतरी कमी पडत असावेत असे वाटते.

आजिबात नाही. मारवा यांच्या मजकुरातलं हे वाक्य पराकोटीचं महत्त्वाचं आहे :

.... excellent system of government already established, the aid of tried and faithful servants like Ram Row and your other ministers, ....

कोल्हापूरच्या राजासाठी प्रजेचं हित महत्त्वाचं. त्यासाठी इंग्रजांशी नमतं घेतलं तरी चालून जावं. राज्य करणे हे जोखमीचं व कौशल्याचं काम आहे. इंग्रजांवर प्रजेच्या हिताची कसलीही जबाबदारी नव्हती.

आ.न.,
-गा.पै.

मुळ छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रिन्स राजाराम यांच्यातली तुलना रोचक होइल.
१- अगदी प्रिन्स यांच्याइतके आयुष्य जरी बघितले तरी २० वर्षापर्यंतचे शिवाजी यांनी तोरणा जिंकणे पासुन ते बरेच कर्तुत्व गाजवलेले दिसते. म्हणजे २० वर्षापर्यंतचे शिवाजींचे कर्तुत्व आणि २० वर्षापर्यंतचे प्रिन्स राजाराम यांचे कर्तुत्व इतकी तुलनाही बरेच काही सांगुन जाते.
२- मुळ छत्रपतींनी अत्यंत दुरदृष्टीने ओळखलेला टोपीकरांचा धोका , त्यातील दुरदृष्टी वगैरे आणि प्रिन्स यांचा टोपीकरांकडे बघण्याचा दृष्टीकोण हा ही रोचक आहे.
३- राज्यव्यवहार कोष बनवुन घेणारे मुळ छत्रपती संस्क्रुत व मराठी भाषेला प्राधान्य देणारे छत्रपती आणि इंग्रजी शिकण्याची धडपडच नव्हे तर ती बोलुन साहेबाचे स्वागत
साहेबाच्याच भाषेत करुन त्याला इम्प्रेस करण्यासाठी धडपडणारे प्रिन्स राजाराम.
४- शिवाजी त निर्माण झालेला सेल्फ अवेयरनेस स्वाभिमान आणि प्रिन्स मध्ये निर्माण झालेला सेल्फ अवेयरनेस आणि स्वाभिमान
बरेच मुद्दे आहेत
असो
४-

गामा पैलवान's picture

16 Mar 2018 - 7:00 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

शिवाजीसम केवळ शिवाजीच आहे. त्यालासुद्धा अनेकांसमोर झुकावं लागलं. निदान तसा अभिनय तरी करावा लागला. राजारामाचा कार्यकाळ तर अवघा चार वर्षं. शिवाय दत्तक असल्याने त्याला राज्यकारभाराचं शिक्षण मुळापासून करावं लागलं. हातात सैन्य नाममात्र आणि प्रजेची पूर्ण जबाबदारी. डोक्यावर इंग्रज ठाण मांडून बसलेला. अशा परिस्थितीतही त्याने सुधारणा केल्याच ना. त्या बघा म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

17 Mar 2018 - 1:29 pm | माहितगार

स्वाभिमानाला तिलांजली देऊन ?

गामा पैलवान's picture

17 Mar 2018 - 1:48 pm | गामा पैलवान

माहितगार,

हो. एकवेळ स्वाभिमान नसला तरी चालेल, पण प्रजेचं हित सर्वोच्च.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

17 Mar 2018 - 1:59 pm | माहितगार

छ. शिवाजी महाराज (थोरले) दोन्हीही साधत आणि म्हणूनच मारवांनी तुलना दिली असावी.

गामा म्हणतात प्रजेच हित सर्वोच्च
पिन्स राजाराम १८६६ साली कोल्हापुरच्या गादीवर बसले ( वा इंग्रजानी बसवले कसेही घ्या ) इथे बरोबर अव घ्या ९ वर्षापुर्वी याच इंग्रज सरकार विरोधात संपुर्ण भारतातुन १८५७ चा पहीला व्यापक देशपातळीवरील उठाव झाला होता. म्हणजेच १८५७ पर्यंतच्या इंग्रज राजवटीला त्यांच्या शोषणाला अन्यायाला कंटाळुनच येथील प्रजेने उठाव केलेला होता. हा उठाव अत्यंत कुशलतेने क्रुरतेने इंग्रंजानी चिरडुन टाकला होता. तो इतका चिरडला की त्यानंतरची स्वातंत्र्याची पहाट उगवायला तब्बल जवळपास एक पुर्ण शतक खर्ची पडले. येथील प्रजेला इंग्रजाच्या राज्यात हित साधले जात होते तर येथील जनतेने इंग्रजांविरोधात उठाव केला असता का ?
म्हणजे ज्या प्रजेच हित प्रिन्स राजाराम बघत होते ती प्रजा इंग्रजांच्या राजवटीत मोठी हित साधत होती असे म्हणायचे आहे काय ?
गंमत म्हणजे खुद्द कोल्हापुर चा १८५७ च्या च उठावात एक महत्वाचा सहभाग होता तो यशस्वी झाला नाहीहा भाग वेगळा.
तर अशा या पार्श्वभुमीवर आलेले प्रिन्स राजाराम जे सु-शिक्षीत होते. ज्यांना इंग्रजीचेही व प्रगत युरोपियन जगाचेही बर्‍यापैकी भान होते. त्यांना इंग्रजांचा कावा समजला नाही की अजुन काही ? त्यांना आपले पुर्वज शिवाजींनी टोपीकरांशी कसे डिल केले याचा इतिहास ही नक्कीच माहीत असणार
त्याहुन आश्चर्य म्हणजे इतका मोठा जो काय १८५७ च्या उठावात रक्तपात झाला पराभव झाला त्या विरोधात ज्यांंनी तो केला त्या इंग्रजांविरोधात प्रिन्स राजारामा च्या लिखाणात कुठेही साधा राग वा निषेध ही दिसत नाही. ( व्यक्तीगत डायरीत माणुस बुजलेला ही नसतो कोणी बघणार नाही असे लिहीतांना लिहीणार्‍याची खात्री असते)
पण प्रिन्स राजारामाच्या डायरीला अजुन दोन दिवस बघितल्यावरही मला तरी पहील्या वाचनात असा काही उल्लेख तर सोडा साधा मागसुमही दिसत नाही
या तटस्थतेला काय म्हणावे ? ठीक आहे डायरीत नसेल लिहीले
पण ज्या रीतीने ते इंग्रजांच्या एकुण प्रचंड प्रभावाखाली आलेले आहे ते स्पष्ट च दिसत आहे. म्हणजे अवघ्या ९ वर्षाचाच काळ लोटलेला आहे १८५७ होउन , कोल्हापुराचा त्यात सक्रिय सहभाग आहे. तर तेथील जनतेत त्यांच्या वडिलधार्‍यात मित्रांत १८५७ च्या इंग्रजी अन्य्यायाच्या जखमा किमान ताज्या तर नक्कीच असतील.
प्रिन्स राजारामांना या उठावाची माहीती चर्चा नक्कीच कधी केली असेल.
इतके सर्व असुनही त्यांना इंग्रजांविषयी ..................
एक बंडखोरीच्या गुलामगिरीच्या पातळींविषयी वाचलं होत कुठेतरी साधारण अस होत की
पहील्या पातळीवर गुलाम हा जोरदार सक्रिय बंड करतो आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जोरदार आक्रमक असतो वार करतो प्रतिकार करतो वगैरे
दुसर्‍या पातळीवर गुलाम हा विजेत्याकडुन जरी पराजित झाला तरी त्याच्या मनात संताप खदखदत असतो व तो जमेल तसे गनिमि काव्याने वा इतर छुप्या मार्गाने का होइना अंडरग्राउंड प्रतिकार करत असतो इथे या पातळीवर ही त्याच्या आत्म्यातील ज्योत पेटलेलीच असते.
पण तिसरी अवस्था फार केविलवाणी असते इथे गुलाम हा आपल्या मालका विरोधातील सर्व संताप विझवुनच टाकत नाही तर उलट तो आता त्याच्या मर्जीसंपादना साठी च धडपड करु लागतो त्याची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत, त्याचे मॅनर्स त्याची संस्कृतीची कॉपी करत म्हणजे इथे त्याच्या अस्मित्चा पुर्ण विलय होउन जाऊन तो आपण गुलाम आहोत हेच आपले मोठे भाग्य आहे असे समजु लागतो.
जनरली अफ्रिकन सिनेमात जिवावर उदार होउन प्रतिकार करणारे ब्लॅक हिरो पेक्षा जसे गोर्‍यांच्या घरात त्यांनी " माणसाळवलेले" त्यांचे नोकर अधिक केविलवाणे भासतात तसे काहीसे.
असोच

गामा पैलवान's picture

18 Mar 2018 - 12:20 am | गामा पैलवान

पगला गजोधर,

तुमची अपेक्षा काय आहे द्वितीय राजारामांकडून? इंग्रजांसमोर बावळटासारखं वागावं? त्यापेक्षा इंग्रजी शिकून त्यांची मर्मस्थानं धुंडाळलेली काय वाईट?

बडोद्याचे सयाजीराव गायकवाड शिक्षण व सामाजिक सुधारणांच्या उपरोक्त राजारामांची मोठी आवृत्ती होते. त्यांच्यावर कोणी कधी तुम्ही करता तसे आरोप केले नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

अरविंद कोल्हटकर's picture

18 Mar 2018 - 6:20 am | अरविंद कोल्हटकर

मारवाजी,

मला वाटते की २०व्या वर्षी ज्याचे आयुष्य संपले अशा एका मुलगाच म्हणता येईल अशा व्यक्तीला शिवाजीसारख्यांच्या बरोबर तोलून तुम्ही त्याच्यावर मोठाच अन्याय करीत आहात. (तुमच्या ह्या कठोर शेरमारीत काहींना तारतम्याचा अभावहि जाणवू शकेल.)

फार खोलवर इतिहासाची जाणीव सोडून द्या पण तुम्ही दिवाण जर्मानी दास ह्यांचे 'महाराजा' हे मनोरंजक चुटक्यांनी भरलेले पुस्तक जरी चाळले तरी तुम्हाला दिसेल की यच्चयावत महाराजे, राजे, महारावळ, नबाब, जामसाहेब अशा पदव्या मिरवणारे जवळजवळ सर्व जण ब्रिटिश रेसिडेंटाच्या भृकुटिभंगाकडे एक डोळा ठेवून असत. (ग्वाल्हेरचे शिंदे, ज्यांना पाटीलबाबा महादजींचा वारसा होता, ह्यांचे नाव जॉर्ज जिवाजीराव (१९१६-६१) असे होते आणि त्यातील 'जॉर्ज' हे नाव ब्रिटनचे राजे जॉर्ज ५वे ह्यांच्यावरून घेतलेले होते कारण जॉर्ज जिवाजीराव ह्यांचा जन्म झाला तेव्हा ब्रिटनचे राजे जॉर्ज ५वे हे होते. इतकी स्वामिनिष्ठा त्यांच्या अंगी होती. त्यांची दोन मैल लांब किताबावलि आहे Lieutenant-General His Highness Ali Jah, Umdat ul-Umara, Hisam us-Sultanat, Mukhtar ul-Mulk, Azim ul-Iqtidar, Rafi-us-Shan Wala Shikoh, Muhtasham-i-Dauran, Maharajadhiraj Maharaja Shrimant Sir George Jivaji Rao Scindia Bahadur, Shrinath, Mansur-i-Zaman, Fidvi-i-Hazrat-i-Malika-i-Mua'zzama-i-Rafi-ud-Darja-i-Inglistan, Maharaja Scindia of Gwalior, GCSI, GCIE, KStJ आणि त्यामधील Fidvi-i-Hazrat-i-Malika-i-Mua'zzama-i-Rafi-ud-Darja-i-Inglistan ह्या किताबाचा अर्थ Vassal of Her Majesty the Honoured and Exalted Queen of England असा आहे.

असे राजनिष्ठेचे वर्तन सर्वजण दाखवीत असतांना बिचार्‍या कोल्हापूरच्या अल्पवयीन छत्रपटींना इतके कडक स्टँडर्ड कशासाठी?

(त्यांना इतक्या कडकपणे मोजतांना त्या वयामध्ये आपण स्वतःअसतांना किती मॅच्युअर होतो असा विचार तुमच्या मनामध्ये आला नाही का?)

तुमच्या खोलवर इतिहासाच्या जाणिवेवरील आधारीत प्रतिसादावरुन तुम्हीच हे स्पष्ट करताय की
प्रिन्स राजाराम हे देखील जॉर्ज जिवाजीरावांच्या सारख्याच इतर सर्व इंग्लीश कोकरांच्या कळपातलेच एक कोकरु होते
त्याहुन पुढे जाऊन ब्रिटीश रेसीडंटास "इम्प्रेस" करणारी केविलवाणी धडपड करणारे फायनर कोकरु होते.
तुमच्या खोलवर इतिहासाच्या जाणिवेवरुन ब्रिटीशाने या कोकरांना त्यांनी ठरवले तरीही त्यांच्या जनतेचे भले करु देण्याची क्षमता या कोकरांत शिल्लक ठेवली होती का ?
ब्रिटीशांनी यांना स्वतःचे निर्णय कधीतरी घेऊ दिले होते का ? बॉलरुम डान्सींगचे धडे गिरवण्यात व फोटो काढुन घेण्यात धन्यता मिरवणारे आणि पुढील राजपुत्रांना युरोपियन टुरीझमचा आनंददायी वारसा देणारे प्रिन्स राजाराम तुमच्या मते तुम्ही म्हणतात

छत्रपतींची दैनंदिनी वाचून असे जाणवते पुष्कळ काही करण्याची क्षमता आणि इच्छा असलेला हा राजा दुर्दैवाने अल्पायुषी ठरला आणि त्यातून कोल्हापूरच्या जनतेचे मोठे नुकसान झाले.

तेव्हा तुमच्या चिवट आशावादाचे, त्याहुन अधिक तुमच्या क्षमता जोखण्याच्या क्षमतेचे (ब्रिटीश व प्रिन्स दोघांच्या बाजुने) व अशा कोकराच्या आवर्जुन केलेल्या कौतुकाचे मोठेच कौतुक वाटते. उद्या तुम्ही पुढच्या प्रवासात जॉर्ज जिवाजीरावांचे राणी व्हिक्टोरीया च्या सन्मानार्थ रचलेले कवन ही शोधुन दाखवले तरी आश्चर्य वाटणार नाही.

काय असेल बरे याचे कारण ? म्हणजे छत्रपती शब्दाशी कनेक्ट असणार्‍या भावना असाव्यात बहुधा , म्हणजे जसे मी ही छत्रपती शब्दाशी इमोशनली कनेक्ट असेल कुठेतरी सबकॉन्शअसमध्ये त्यामुळे कदाचित शेर शिवराज चा वंशज " छावा" च असला पाहीजे अशी अवास्तव अपेक्षा नकळत ठेवली गेली असेल कदाचित

Too much Rashness च्या extreme vice विरोध बिंदुवर mean virtue courage हा असतो. तो extreme vice cowardice नसतो हे आपण जाणताच.
असो

गामा पैलवान's picture

18 Mar 2018 - 2:10 pm | गामा पैलवान
गामा पैलवान's picture

18 Mar 2018 - 2:57 pm | गामा पैलवान

वरील प्रतिसाद मारावा यांना उद्देशून आहे. पगला गजोधर यांचे नाव चुकून आले आहे. त्याबद्दल खेद आहे. चुकीची माफी असावी.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Mar 2018 - 2:59 pm | गामा पैलवान

मारवा,

म्हणजे छत्रपती शब्दाशी कनेक्ट असणार्‍या भावना असाव्यात बहुधा

असाच निष्कर्ष तुम्हालाही लागू करता येईल. इंग्रजी भाषेशी असलेल्या दु:स्वासाची भावना बहुधा तुम्हांस बाधित करीत आहे.

आ.न.,
-गा.पै.