Sheet Anchor of Indian Chronology

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
2 Feb 2018 - 3:16 am

अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही. अर्थात चन्द्रगुप्त, चाणक्य, नंदकुलाचा नाश ह्या घटनाहि होऊन गेल्या होऊन गेले कारण मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.

ही सगळी गोची चन्द्रगुप्त नक्की कोण आणि केव्हा होऊन गेला हे पाश्चात्य अभ्यासकांनी कसे ठरविले ह्यातून झाली आहे. पाश्चात्य अभ्यासकांचा ठराव आणि त्यातील गोची हा फार विस्तृत विषय आहे, येथे त्याचा आराखडाच थोडक्यात द्यायचा प्रयत्न करता येईल.

चन्द्रगुप्ताचा काळ ही एकच घटना भारताच्या प्राचीन इतिहासाला अन्य जगाच्या इतिहासाशी जोडते आणि त्यामुळे त्या घटनेला Sheet Anchor of Indian Chronology असे मॅक्समुल्लरने संबोधले. विन्सेण्ट स्मिथसारख्या अन्य जाणकारांनी त्याला दुजोरा दिला. ही गोष्ट एकदा पक्की मानली की चन्द्रगुप्ताच्या पुढच्या आणि मागच्या सर्व व्यक्ति आणि घटना केव्हा होऊन गेल्या हे अधिक-उणे करून ठरवता येते. पण ही मूळची गोष्टच कितपत पक्की आहे ह्याबाबत अन्य अनेक अभ्यासकांना पहिल्यापासून शंका आहे. तथापि मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथसारख्या विद्वानांच्या मतापुढे अशा संशयी अभ्यासकांच्या शंकांना कधीच वजन मिळाले नाही. हळूहळू मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथ ह्यांचे हे मत एका dogma मध्ये परिवर्तित झाले. १०० हून अधिक वर्षे आपल्या स्थानावर अढळ असलेल्या ह्या dogma ला विरोध म्हणजे एक वैचारिक बंडखोरीच. अशी बंडखोरी करणार्‍याला सर्व विद्यापीठे, प्राध्यापकाच्या जागा, academic conferences ह्यांचे दरवाजे बंद होऊ लागले.

चन्द्रगुप्ताचा काळ कसा ठरला? Indology ह्या शास्त्राचा जनक विल्सन जोन्स ह्याने स्थापन केलेल्या Asiatic Society of Bengal च्या १०व्या वर्षदिनाच्या निमित्ताने सोसायटीपुढे २८ फेब्रुअरी १७९८ ह्या दिवशी एक भाषण केले. त्याला अलेक्झँडरच्या मोहिमेबाबत ग्रीक लेखकांनी केलेल्या लेखनामधून Sandracottus (ह्याची अनेक स्पेलिंग्ज आहेत) हे नाव माहीत होते आणि तत्कालीन उपलब्ध संस्कृत लेखनामधून त्याला चन्द्रगुप्त हे नावहि माहीत होते. त्यातील एक दुसऱ्याशी जोडून अलेक्झँडरच्या संबंधात आलेला आणि नंतर सेल्यूकस निकेटरशी तह करणारा Sandracottus हाच त्याला माहीत असलेला चन्द्रगुप्त असा तर्क त्याने बांधला. ह्या तर्काला दुजोरा मिळाल्यासारखे दिसले तेव्हा, जेव्हा जेम्स प्रिन्सेपला फ़ेब्रुअरी १८३८ मध्ये अशोकाच्या ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या गिरनार लेखाचे (अशोकाचे १३ वे शिलाशासन) वाचन करता आले. त्या लेखामध्ये त्याला अशोकाचे समकालीम म्हणता येतील अशी भारताबाहेरच्या तीन राजांची नावे आढळली. ह्या राजांचा काळ माहीत असल्यामुळे त्यांचा काळ हा अशोकाचा काळ ठरला, त्यामुळे त्याच्या दोन पिढ्यामागच्या चन्द्रगुप्त हा अलेक्झँडरचा समकालीन आणि चन्द्रगुप्त मौर्याचा काळ म्हणजे इ.स.पूर्व ३१५ ह्या तर्काला बळ मिळाले. बौद्धांच्या समजुतीनुसार बुद्धाचे परिनिर्वाण चन्द्रगुप्तापूर्वी १६२ वर्षे झाले. त्यावरून गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणाचा काळ इ.स.पूर्व ४७७ असा ठरला. ह्याच रीतीने क्रमाक्रमाने सगळाच प्राचीन भारतीय इतिहास आज आपण मानतो तसा बसला आणि आता तो वज्रलेप झाल्यासारखे वाटते.

येथे हे दुर्लक्षिले गेले प्राचीन इतिहासाची भारतीय परंपराहि अस्तित्वात आहे आणि ती अनेक पुराणांमधून आणि राजतरंगिणीसारख्या ग्रन्थांमधून मांडण्यात आली आहे. तिच्यामध्ये कलियुगप्रारम्भापासून तीन हजार वर्षे कोणते राजवंश होऊन गेले अशी जन्त्री आहे. त्यानुसार असे विधान करणे शक्य आहे की जोन्स इत्यादींना दिसलेला चन्द्रगुप्त हा मौर्य चन्द्रगुप्त नसून गुप्त वंशाचा संस्थापक गुप्त चन्द्रगुप्त आहे आणि मौर्य चन्द्रगुप्त हा त्याच्या अनेक शतके आधी होऊन गेला. अशोकाचे समकालीन मानले गेलेले तीन राजेहि कोणी दुसरेच आहेत असे मानण्यास जागा आहे. चन्द्रगुप्त-नंदवंश ह्यांच्या बाबतच्या प्रचलित कथा गुप्त चन्द्रगुप्तालाहि विरोधात नाहीत. अशा रीतीने Sheet Anchor of Indian Chronology जर रद्द करता आला तर भारतीय प्राचीन इतिहास आज वाटतो त्यापेक्षा खूपच जुना असावा असे म्हणता येईल.

पण ह्या ना त्या कारणाने पाश्चात्यांनी ही सर्व पुराणे आणि राजतरंगिणीसारखे ग्रन्थ शुद्ध इतिहास म्हणून अविश्वासार्ह ठरवले. त्यातील वंशावळी काही प्रमाणात मान्य केल्या पण त्यांचे काळ पुराणे दाखवितात त्यापेक्षा बरेच कमी करून घेतले आणि अशी बरीच कसरत करून चन्द्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३१५ (अधिक-उणे काही वर्षे) हे जुळवून घेतले. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास इ.स.पू. १५०० च्या अधिक मागे जात नाही हा सिद्धान्त जन्मला.

हे सर्व करण्यामागे भारत ह्या जित राष्ट्राचा इतिहास हा ग्रीक इतिहासापेक्षा अधिक प्राचीन असूच शकत नाही हा पाश्चात्यांचा साम्राज्यवादी पूर्वग्रह मुख्यत्वे कारणीभूत आहे अशी शंका पाश्चात्यांचे विरोधक घेतात.

हे सर्व विचार येथे पूर्ण विस्तारात मांडणे शक्य नाही कारण त्यांचा आवाका खूप मोठा आहे. असा काही प्रश्न अस्तित्वात आहे आणि भारतीय इतिहासाच्या कालगणनेबद्दलचा शेवटचा शब्द उच्चारला गेलेला नाही हे अधोरेखित करणे इतपतच ह्या धाग्याची व्याप्ति पोहोचते. ज्यांना अधिक जिज्ञासा असेल अशांनी The Sheet Anchor of Indian Chronology हे श्ब्द गूगलच्या शोधपेटीमध्ये घालून काय बाहेर पडते ते वाचावे. ’History of Classical Sanskrit Literature (लेखक M. Krishnamachariar)’ असे पुस्तक archive.org ह्या संस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्या विस्तृत प्रस्तावनेची xxxvii ते cx इतकी पाने ह्या प्रश्नाच्या विवेचनासाठी खर्च केली आहेत.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

अशोकाचे जे स्तंभ आहेत ते धर्म बदलण्या अगोदर बांधले गेले असते काही दानधर्माच्या निमित्ताने तर वेगळी नावे मिळाली असती कदाचित. सांचीचा हेलियोडोरस स्तंभ बघायची इच्छा आहे. नष्ट झालेल्या तक्षक्षिला विद्यापिठात काही ग्रंथ असावेत का?

कंजूस's picture

2 Feb 2018 - 5:28 am | कंजूस

नालन्दा?

अनुप ढेरे's picture

2 Feb 2018 - 10:03 am | अनुप ढेरे

हा लेख वाचनात आला.

http://indiafacts.org/flawed-sheet-anchors-of-indian-history/

कितपत विश्वासार्ह आहे महिती नाही.

प्राची अश्विनी's picture

2 Feb 2018 - 12:25 pm | प्राची अश्विनी

यावर कुणी संशोधन केलं किंवा लिहिलं तर लगेच बघा इतिहास बदलायला निघाले असा सूर येईल.

अरविंद कोल्हटकर's picture

2 Feb 2018 - 9:22 pm | अरविंद कोल्हटकर

तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. प्रस्थापित इतिहास पुन: चाळवायचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला लगेचच Revisionist, विहिंप/संघाचा चेला असे शिव्याशाप मिळू लागतात. केवळ academic interest आणि सत्यशोधनासाठी मी हे करीत आहे असा कितीहि दावा त्याने केला तरी प्रस्थापित विद्वान त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. वर माझ्या लेखातच मी ओझरते उल्लेखिल्याप्रमाणे विद्यापीठातील जागा, शिष्यवृत्त्या, परिषदांची निमंत्रणे सगळे त्याला बंद होते.

सध्या Indology चे केन्द्र अमेरिकेकडे सरकले आहे. तेथील प्रस्थापित प्राध्यापकांना Revisionist वाटतील अशा विचारांचा वासहि सहन होत नाही आणि विद्यापीठातील जागा, शिष्यवृत्त्या, परिषदांची निमंत्रणे हे सगळे त्यांच्याच हातात असते.

ह्याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कैखुश्रु दादाभाई सेठना (१९०४-२०११) ह्यांचे ’Ancient India in a New Light' हे पुस्तक होय. प्रस्थापित विचारांना आह्वान देणारे हे विद्वत्तापूर्ण पुस्तक अनुल्लेखाने मारले जात आहे.

University of British Columbia मधील Emeritus Professor (आणि माझे कॉलेजपासूनचे मित्र) डॉ.अशोक अकलूजकर ह्यांचे पॉंडिचेरीमधील हे व्याख्यान हाच मुद्दा मांडते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2018 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

आणि दुर्दैवाने या सगळ्याला भारतिय विद्यापिठांत मानाची पदे मिळवून बसलेल्या मंडळींचा पाठिंबा आहेच. भारतिय इतिहासासाचे पूर्वग्रहनिरपेक्ष व शास्त्रिय पद्धतीने संशोधन व्हायला हवे. पण, त्यासाठी पुरेश्या श्रम, अर्थ आणि तळमळीची वानवा आहे. या शिवाय, "भारताचा खरा इतिहास बाहेर आला तर त्याचा फायदा कोणाला होईल ?" या प्रश्नाचे उत्तर नेहमीच सत्याच्या मार्गात उभे राहिले आहे... मग ते पाश्च्यात्य असोत की स्थानिक :(

अरविंद कोल्हटकर's picture

3 Feb 2018 - 1:44 am | अरविंद कोल्हटकर

ह्या कोंडीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग मला दिसतो.

भारत सरकारने पुढाकार घेऊन भारातात कोठेतरी एक कॉन्फरन्स बोलवावी. तिला जगभरचे ह्या क्षेत्रातील नामवंत विद्वान पुरेसे मानधन देऊन बोलवावेत. कॉन्फरन्सपुढे एकच विषय चर्चा आणि निर्णयासाठी ठेवावा - तो म्हणजे भारताच्या इतिहासाची सध्याच्या बहुमान्य timeline चे पुनर्निरीक्षण करणे आवश्यक आहे काय?

कॉन्फरन्सचे यजमानपद JNU सारख्या नि:पक्षपाती/डाव्या विद्यापीठाकडे द्यावे, जेणेकरून भाजप शासन इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहे ह्या आरोपाला उत्तर द्यायची सोय होईल.

असे होऊ शकेल काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2018 - 3:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारत सरकारने पुढाकार घेऊन भारातात कोठेतरी एक कॉन्फरन्स बोलवावी. तिला जगभरचे ह्या क्षेत्रातील नामवंत विद्वान पुरेसे मानधन देऊन बोलवावेत. कॉन्फरन्सपुढे एकच विषय चर्चा आणि निर्णयासाठी ठेवावा - तो म्हणजे भारताच्या इतिहासाची सध्याच्या बहुमान्य timeline चे पुनर्निरीक्षण करणे आवश्यक आहे काय?

इथपर्यंत उत्तम आहे. मात्र...

कॉन्फरन्सचे यजमानपद JNU सारख्या नि:पक्षपाती/डाव्या विद्यापीठाकडे द्यावे, जेणेकरून भाजप शासन इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहे ह्या आरोपाला उत्तर द्यायची सोय होईल.

हे फार naive होईल. इंदिराजींनी राजकिय पाठिंब्याच्या बदल्यात कम्युनिस्टांना अनेक शिक्षण आणि इतिहास संबंधित संस्थात (JNU, ICHR, etc) अनेक महत्वाची पदे डाव्यांना दिली. JNU मधल्या आणि इतर अनेक इतिहासकारांनी याधीच भारतिय इतिहासाची भरपूर मोडतोड केली आहे. त्यांच्या हाती मुखत्यारपद देणे म्हणजे भारतिय इतिहासाच्या मोडतोडीचे हेतूपूर्वक मोडतोड करणार्‍यांच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल !
मी उजव्या विचारसरणीचा समर्थक नाही... किंबहुना कोणत्याही एकेरी (डाव्या अथवा उजव्या) विचारसरणीला आंधळा पाठींबा देणे हे आपल्या बुद्धीला (चलाखीने किंवा फसवणूकीने) मुरड घातल्याशिवाय शक्य नाही असे मला वाटते.

मुळात नि:पक्षपाती व डावे हे एकमेकविरोधी शब्द आहेत. कम्युनिस्ट (आणि त्यातही सत्ताधारी नेत्यांच्या सोईचा प्रकार) सोडूण दुसरा कोणता पक्ष कोणत्याही राजवटीत आजतागायत आढळून आला आहे काय ?!

आजपर्यंतचा जागतिक अनुभव पाहता, आपल्याला सोईचा /आवडलेला इतिहास "तयार करण्यात" आणि सोईचा नसलेला / न आवडलेला पूर्वेतिहास नष्ट करण्यात डावे तरबेज असतात असेच नव्हे तर तसे करणे हा त्यांच्या विचारधारेचा अविभाज्य भाग असतो. कहीही करून लोकांचे जुने विचार आणि जुनी संस्कृती कनिष्ठ व लाजिरवाणी होती सिद्ध केले की त्यांच्यामध्ये आपली नवीन विचारसरणी रुजविणे सोपे होते, हे साधे मानसशास्त्रिय तत्व यामागे आहे. या बाबतीत अतिधार्मिक एकाधिकारशाही आणि कम्युनिस्ट राजवट (जी एक-पार्टी-एकाधिकारशाहीच असते) यांच्यात कोण वरचढ हे सांगणे मोठे कठीण आहे. अतिधार्मिक एकाधिकारशाहीत त्या धर्माचे नसलेल्या लोकांची परिस्थिती अणि कम्युनिस्ट राजवटीत कम्युनिस्ट नसलेल्या लोकांची परिस्थिती, यांत फारसा फरक असतो की नाही, हे वेगळे सांगायची गरज नाही !

डाव्यांच्या (JNU तर त्यांच्या शैक्षणिक (अकॅडेमिक) नेतेपदी आहे) अश्या कृतींची अनेक संशोधकांनी उदाहरणे देऊन सतत तक्रार केलेली आहे. "How JNU distorts Indian history" अशी विचारणा जालावर आणि विशेषतः युट्युबवर करून थोडेसे संशोधन केल्यास याची असंख्य उदाहरणे मिळतिल. त्यातील काही...

यातील शेवटच्या क्लिपमध्ये ६ ते ८ मिनिटांपर्यंतचे Dr David Frawley यांचे अनुभव आणि विशेषतः त्यांचा दुसरा (JNU मधला) अनुभव जरूर पाहण्या-ऐकण्याजोगा आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2018 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात...

कॉन्फरन्सचे यजमानपद JNU सारख्या नि:पक्षपाती/डाव्या विद्यापीठाकडे द्यावे.

असे करण्याने इतिहासाच्या कोकराला, लांडग्याला सोईचा पडेल असा सापळा रचून, त्यात स्वतःहून ढकलण्यासारखे होईल ! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2018 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि याच संदर्भात हे दिल्ली विश्वविद्यालयात २००८ मध्ये शिकवल्या रामायण कोर्सबद्दल चकित करणारे मुद्दे...

रामायण केवळ एक काव्य आहे हे सुद्धा मान्य करायची तयारी असलेल्या कोणाला या प्रकरणात संस्कृती किंवा इतिहासाच्या मोडतोडीपेक्षा बरेच काही हेतू दिसले तर ते चूक ठरेल का ?

हा सगळा सावळागोंधळ थांबणार असेल तर कोण्या खरेच निष्पक्ष असणार्‍या संस्था अथवा खास गठीत मंडळाच्या अधिपत्त्याखाली भारताच्या इतिहासाचे/संस्कृतीचे संशोधन होऊन एकदा काय तो अधिकृत इतिहास नक्की ठरवला तर सर्वोत्तम. पण सद्या चाललेल्या खर्‍या-खोट्या-कल्पित इतिहासाच्या हितसंबंधी राजकारणाच्या भाऊगर्दीत कोणता एक इतिहास सगळ्यांना मान्य होईल, हा आशावाद भोळा असेल असेच... अतिशय अतिशय दुर्दैवाने... मला वाटते :(

manguu@mail.com's picture

10 Feb 2018 - 12:31 am | manguu@mail.com

सीता रावणाची मुलगी होती , याचे उल्लेख दक्षिण रामायणात आहेत. ( संदर्भ - वेदवती शाप कथा )

मनमोहन सिंगाच्या काळात शिकवत होते म्हणे .. सीता रावणाच्या शिंकेतून पडली.

तर लगेच मनमोहन सिंग अशास्त्रीय शिकवतात , म्हणून बोंब.

मुळात इक्ष्वाकु कुळाचा इक्ष्वाकु हाच शिंकेतून उत्पन्न झाला , असे हजारो वर्षे शिकवतात ना ? त्याला जबाबदार कोणते पंतप्रधान ?

अरविंद कोल्हटकर's picture

10 Feb 2018 - 12:52 am | अरविंद कोल्हटकर

माझ्या लेखाचा फोकस ह्या प्रतिसादापेक्षा थोडा वेगळा आहे. 'सीता रावणाच्या शिंकेतून जन्मली' अशा विधानांमगे पुरावा असा काही नसावा. माझ्या लेखात जो पुनर्विचार मांडला आहे त्यामागे अनेक पुराणांमधील राजावलि, राजतरंगिणीसारखे ग्रन्थ, माहीत असलेल्या इतिहासाशी १०० टक्के नाही तरी काही प्रमाणात जुळते घेण्याची क्षमता अशा गोष्टी आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2018 - 4:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

कठीण आहे ! किती जाड भिंगांचा आणि किती गडद रंगाचा चष्मा वापरता हो तुम्ही =)) =)) =))

१. तुमच्या लेखनावरून तुम्ही बुद्धीमान आहात असा माझा ग्रह झालेला आहे (ती बुद्धी कोणत्या दिशेने जाते याबद्दल मतभेद असू शकतात ! :) ). तरीही, तुम्हाला संशयाचा फायदा देऊन, मला वर काय म्हणाचे होते ते एsssकदम सोप्या शब्दांत सांगतो :

(अ) "सीता रावणाच्या शिंकेतून पडली." अश्या प्रकारची माहिती असलेले कोर्स तयार करून ते भारतातल्या मान्यवर विद्यापिठात शिकविणारे,
(आ) ज्यांच्या धडधडीत पक्षपाताबद्दल अनेक परदेशी संशोधकांनी माध्यमांत उघड तक्रार केली आहे ते आणि
(इ) "खरा इतिहास राजकीयदृष्ट्या सोईचा नाही, त्याऐवजी आम्हाला सोईस्कर असलेला बनावट इतिहास खरा आहे असे सांगितले पाहिजे" अशी परदेशी संशोधकांना गळ घालणारे
...अशी बनेल वृत्ती असलेल्या डाव्यांना* "नि:पक्षपाती" कसे म्हणता येईल ? आणि त्यांच्या हातात सर्व सुत्रे दिली तर केवळ पक्षपाती निर्णयच मिळतील.

दुशली ब मधल्या शेंबड्या पोरालासुद्धा समजेल हे !

(* : इथे डावे तसे करत आहेत. पण तीच गोष्ट डाव्या, उजव्या, किंवा अजून कोणत्याही विचारधारेच्या व्यक्तींनी केली तरीही ती माझ्यासाठी तितकीच निषेधार्ह असेल. पूर्णविराम.)

२. "सीता रावणाच्या शिंकेतून पडली" किंवा "इक्ष्वाकु कुळाचा इक्ष्वाकु हाच शिंकेतून उत्पन्न झाला" असे कोणीही म्हणत असले तरी, सद्याचा प्रश्न असा आहे की, "ते तुम्हाला स्वतःला सत्य आहे असे वाटते, की केवळ विक्षिप्त कविकल्पना वाटते ?"

अ)"शिंकेतून माणसाचा जन्म होणे शक्य नाही आणि तसे विद्यापिठातल्या कोर्समध्ये शिकवणे चूक आहे" असे माझे म्हणणे आहे.

आ) "तसे होणे शक्य आहे" असे म्हणणे असलेल्याला काय म्हणावे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही !

इ) "तसे होणे शक्य नाही पण तरीही एखाद्या सामाजिक गटाला बदनाम करण्यासाठी किंवा त्याची कुचेष्टा करण्यासाठी विद्यापिठातल्या कोर्समध्ये तसे शिकवावे" असे मत असलेल्या आणि ते अंमलात आणणार्‍या व्यक्तींना समतोल, संशोधक, इतिहासकार, इत्यादीपैकी एखादे संबोधन तरा सोडाच पण "सज्जन माणूस" असेही संबोधन लावता येणार नाही. अश्या असंतुलीत, मानवी मुल्यांचा विधिनिषेध नसणार्‍या आणि आपल्या हितसंबंधांसाठी सत्याची पायमल्ली करणार्‍या माणसांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार देणे धोक्याचे असते.

हे चष्मा लावलेल्या व्यक्तीला समजायला थोsssडेसे कठीण आहे पण पाचवीपर्यंत शिकलेल्या समतोल विचाराच्या व्यक्तींना सहज समजेल ! :)

तुम्हाला (वरीलपैकी एक किंवा दोन्हीही) समजले नसल्यास, तुमचे चालू द्या. तुमच्या कोलांट्या उड्यांनी लोकांचे मनोरंजन मात्र होत आहे ! =)) =)) =))

अनुप ढेरे's picture

3 Feb 2018 - 11:08 am | अनुप ढेरे

आमच्या एका मित्राने हा लेख वाचुन या थिअरीबद्द्ल काही आक्षेप नोंदवले आहेत.

-- गुप्त राजे आणि हूण यांच्या लढाया झाल्या आहेत. जर गुप्त राजे अलेक्ष्झांडरच्या काळात झाले तर हूण पण अलेक्झांडरच्या काळातले का?
-- आणि हूणांच्या आधी असलेले शक आणि त्यांचे सत्रपपण अलेक्झांडरच्या आधीचे असणार.
-- पण मग सत्रपांपैकी नहपानाला हरवणारा सातकरणीपण अलेक्झांडरच्या आधीचा काय?
-- आणि तसं असेल तर सातवाहन रचनांवर ग्रीक प्रभाव दिसतो तो कसा?

प्रचेतस's picture

3 Feb 2018 - 1:16 pm | प्रचेतस

गुप्त राजे (इस ३१९) आणि अलेक्झांडरचा(इसपू ३२३) काळ शिलालेख आणि नाण्यांमुळे सिद्धच आहे. मुद्दा आहे तो फक्त चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडाचा, त्याबाबतीत पुरेशी स्पष्टता नाही. रुद्रदामन क्षत्रपाच्या गिरनार लेखात मात्र चंद्रगुप्त मौर्याचा उल्लेख आहे, 'मौर्य चंद्रगुप्ताने सुदर्शन तलाव बांधला'

लेख आवडला.
आणि याच संदर्भात हे दिल्ली विश्वविद्यालयात २००८ मध्ये शिकवल्या रामायण कोर्सबद्दल चकित करणारे मुद्दे... काय बोलणार? उद्वेगजनक आहे सगळं :(

अरविंद कोल्हटकर's picture

4 Feb 2018 - 5:02 am | अरविंद कोल्हटकर

मी वर उल्लेखिलेले के.डी.सेठना ह्यांचे ’Ancient India in a New Light' हे पुस्तक मिळाले तर अवश्य वाचा. मधल्या काळात त्याचा पुढील सारांश त्याच्या अंतरंगाची पुरेशी कल्पना देईल.

Sethna ventures into what can only be described as high adventure in his radical reconstruction of ancient Indian chronology in Ancient India in a New Light? To summaries his findings in brief, Sethna marshals evidence from the Puranas and archaeology to argue that the Sandrocottus of Megasthenes could not have been the Mauryan king, but was the founder of the Gupta Dynasty. I had pointed out to him after he had completed the first part of the work that unless the Asokan epigraphs could be tackled convincingly, his new chronology would break down. Sethna proceeded to do this also over 300 pages of a closely argued thesis pushing Asoka back to 950 B.C. and allocating to the Gupta Empire the period 315 B.C. - A.D. 320.

Sethna's 606 page tome, with a 15 page bibliography and a 23 page index, is an outstanding instance of ratiocination proceeding inexorably from a chronological absurdity fastened upon unerringly by the clear ray of his perception. Pulakesin IPs Aihole inscription of 634 A.D. shows Indian chronology in vogue fixing 3102 B.C. as the date of the start of the Kaliyuga, while also referring to the Saka Era of 78 A.D. According to modern historians, this is the time of the Gupta Empire, when this system of chronology was made up by the Puranic writers. Now, according to the Puranas the Guptas come around the last quarter of the 4th century B.C. If the modern dating of the Guptas is accepted, it means that the Puranics, face to face with the Gupta kings, placed them in antiquity six hundred years in the past! It is peculiar that so obvious an absurdity should have escaped our own historians. Can we help concluding that we are still unable to rid our minds of the overpowering influence of the dismissal by western scholars of our own ancient records: The Puranas? They believe in the historicity of Homer and excavate Troy, but will not allow that same probability to the Puranas simply because they speak of a civilized antiquity in a colonized country when the western man was living in caves, and that is unacceptable from a subject race. On the grounds of the reductio ad absurdum of the Puranics placing their contemporary monarchs six centuries in the past, Sethna proposes that the Guptas referred to in the Puranas are the descendants of that Chandragupta whom Megastlienes refers to as Sandrocottus, contemporaneous with Alexander. Consequently, the Mauryan Chandragupta and his grandson Asoka needs must recede considerably farther into die past.

The rest of the book is a thrilling venture as Sethna daringly steers his slender craft through uncharted seas crossing one insuperable barrier-reef after another to reach a destination in whose existence he firmly believes. The most important of these is the supposed linking of the Greeks with Asoka. Sethna's penetrating insight reveals that the Asokan "yona raja" Amtiyoka of Rock Edict XIII cannot refer to a Greek king and that the dating of this edict proposed by Bhandarkar is quite mistaken even on the basis of the current chronology. Next the Asokan inscription in Greek and Aramaic at Kandahar is analyzed and the conclusion arrived at that the two inscriptions are not contemporaneous; that the Greek comes much after the Aramaic and, indeed, explicates it: That the "Yavanani" script referred to by Panini is this Aramaic script going back to the pre-9th century B.C. period. The Kandahar II and Laghlman Aramaic inscriptions are then taken up and proven to be much before the 3rd century B.C. as theorized at present. Finally, examining the evidence for the reigns of the Sungas, Kanvas and Satvahanas, Sethna arrives at 950 B.C. as the date of Asoka's accession.

राही's picture

10 Feb 2018 - 11:16 pm | राही

इतिहास आणि पुरातत्त्वाशी संबंधित अशा काही ग्रूप्सवर या पुस्तकाविषयी अभिप्राय विचारले असता ' अगदी फडतूस', 'pure BS' अशी मते मिळाली. या क्षेत्रांतले तज्ज्ञ आणि अभ्यासक या ग्रूप्सवर वावरतात.