तिला न पाहता होणारी तगमग न समजणारी होती , काय होतंय आपल्याला ? नक्की काय होतंय ? आपण तिच्या प्रेमात , ... छे उगाच काहीतरीच काय ,.... पण मग असं का होतंय .. समोर असतो तेव्हा तिच्याशी पटत नाही आणि भांडण होतात आपली , असं वाटत कि ती नसलेली बरी, पण ती नसली कि असं का वाटतय ? कि काहीतरी चुकतंय .. नाही माहित पण असं वाटतय हे नक्की आहे .....
" ए हाय , कसा आहेस ? "
" कुठं होतीस ? "
" का आता काय आहे ? काय झालाय का ? हे बघ असं प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरू नकोस . मला तर माहितही नाही काही ....."
" तू नव्हतीस तर ठीक वाटत नव्हत . "
" हो तुला भांडायला कोणी नसेल तर बरं वाटणार नाही ना .."
" तू असतेस तेव्हा भांडतो , पण आता तू नव्हती तर ठीक वाटत नव्हत . "
" साहजिक आहे तुला सवय झालीय माझ्याशी भांडण्याची , त्यामुळे मी नसताना तुला ठीक वाटत नव्हत .
सवय झालीय , पण ती तुझ्याशी भांडायची नाही तर तुझी . "
" म्हणजे ... "
" म्हणजे तू नव्हतीस तर जीव कासावीस झाला होता, कामात लक्ष लागत नव्हत माझं , का ते मला माहित नाही , वाटतंय तुझी सवय झालीय मला . "
" काहीतरीच काय चल जाऊया का ? "
" थांब ना थोडी बोलायचं होत तुझ्याशी . "
" बोल ना "
" कस सांगू आणि कस नाही ते नाही समजत आहे , पण एक सांगू तुझ्याबद्दल काहीतरी वाटतय एव्हढं नक्की . पण हे फक्त मलाच वाटतंय कि तुलाही ? "
" अरे काय वाटतंय , काय बोलतोय ? ते समजत हि नाहीय मला . "
" समजत नाहीय कि समजून घेत नाहीयेस . "
" आपण जाऊया का ? आज तुझं काही खर नाहीय ? आपण नंतर बोलूया ना ....."
" अग ऐक तरी "
" please मला comfortable नाही वाटत आहे. आपण जाऊया please "
" ठीक आहे चल "
आता कोणीही काही बोलत नव्हत आणि कुणाला काय बोलावं आणि एकमेकांकडे पहावं हेही समजत नव्हत. जातानाही ती सहजता नव्हती दोघांच्यात . तिने कसतरी वर पाहिलं त्याच्याकडे आणि मुश्किलीने smile करून ती निघालीही .
खूप अवघडलेपण वाटत होत काय विचार करावा ? खरच असाच विचार करतोय का तो ? कि मलाच वाटतय असं . काल खरंच काय सुचतही नव्हत , त्याचीच आठवण येत होती . समोर असला कि भांडत असतो नेहमी . पण नव्हता समोर तर काही सुचत नव्हत मला . कधी वाटलं नाही असं पण आता असं का वाटतंय . काय करू थांबवू असा विचार करायचा कि जस वाटतंय तस वाटू देऊ. नको मला असा विचार करून चालणार नाही किती फरक आहे आमच्यात आणि परत ... नकोच हा विचार नकोच
" ए हाय कशी आहेस ? "
" ठीक आहे "
" काय ग काय झालं अशी का दिसतेयस ? "
" कुठं काय काही नाही बर येते मी थोडं काम आहे माझं . "
" असं का करतेयस ? काय झालाय सांगशील का ? "
" काहीच नाही ... "
" असं नाही करू देणार तुला मी , आज मला सांगितल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही मी . "
" तुला कळत नाहीये का मला काम आहे ? आता वेळ नाही मला मला जाऊ दे . "
" हे बघ "
" please ... "
" ठीक आहे जा तू , पण वेळ असेल तेव्हा नक्की सांग मला काय झालाय ते . "
........ क्रमशः
प्रतिक्रिया
24 Sep 2017 - 4:41 am | एस
पुभाप्र.
24 Sep 2017 - 11:44 am | पद्मावति
पु.भा.प्र.