आर्य हे दक्षिण भारतीय होते

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
9 Jul 2017 - 10:15 am

(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख)

आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे.

पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे. पण त्या काळातील माणूस आज हि जिवंत आहे. आजच्या माणसांचे अध्ययन करून संस्कृत भाषी आर्य कुठले हे ठरवणे सहज शक्य आहे.

इतिहासाचा सारांश: हिस्ट्री चेनेल वर माणसांचा प्रवास हा कार्यक्रम २-३ वेळा तरी पहिला असेल. हा कार्यक्रम माणसांच्या DNA अध्ययनावर आधारित होता. आजपासून पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून माणूस आंध्रप्रदेशच्या व दक्षिण भारताच्या किनार्यावर पोहचला. पन्नास हजारवर्षांपूर्वी आजपेक्षा समुद्राची पातळी २०० फूटहून अधिक खोल असल्यामुळे हा प्रवास सहज शक्य होता. आफ्रिकेतून आलेल्या टोळ्यांची जनसंख्या वाढली, काही दंडकारण्यात इत्यादी जंगलात स्थिरावले व वनवासी संस्कृती विकसित झाली. काही कावेरी, कृष्णा आणि गोदावरीच्या किनार्यांवर स्थिरावले. तिथे सभ्यता आणि संस्कृत भाषेचा जन्म झाला. मानवीय आचरणाचे नियम आखल्या गेले. त्या नियमांचे पालन करणारे स्वत:ला आर्य म्हणवू लागले. पालन न करणार्यांसाठी अनार्य शब्द वापरला जाऊ लागला. जनसंख्या वाढली, काही प्रवास करत प.समुद्र तटावर पोहचले व सरस्वती नदीच्या किर्नार्यावर प्रवास करीत सप्तसिंधू प्रदेशात पोहचले. जगातील सर्वात उपजाऊ अश्या सप्तसिंधू प्रदेशात सभ्यता स्थिरावली. नगर आणि ग्राम विकसित झाले, वैदिक साहित्य निर्मिती हि सुरु झाली. संस्कृत भाषा अधिक विकसित झाली. बदलत्या वातावरणात वावरू लागल्यामुळे मूळ संस्कृत शब्दांचे उच्चारण करणे त्यांना जड जाऊ लागले. काही संस्कृत शब्द लुप्त हि झाले. माणूस शेती करू लागला. भूमी आणि गौ धनासाठी युद्ध होऊ लागले. ऋग्वेदातील ऋचा या घटनांच्या साक्षी आहेत. बहुतेक १२-१३ हजार वर्षांपूर्वी एक मोठे दशराज्ञ युद्ध झाले. तृत्सु वंशातील राजा सुदास याने १० आर्य वंशातील राजांना पराजित केले. हजारो सैनिक मरण पावले. ऋग्वेदात राजा सुदासचे पुरोहित वशिष्ठ ऋषीला राक्षस म्हणून हि संबोधले आहे कारण या विनाशासाठी ते हि दोषी होतेच. याचा अर्थ सभ्य आणि सुसंकृत लोक म्हणजे आर्य आणि असंस्कृत हिंसाचारी म्हणजे राक्षस किंवा अनार्य. पुढे आर्य सभ्यता गंगा -यमुनेच्या खोर्यात पोहचली. काही "केस्पिअन सागर पार करून मध्य आशियात, युरोपात आणि काही पुढे सैबेरिया पार करून अमेरिकेत पोहचले"(असे हिस्ट्री चेनेल वाले म्हणतात). इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो. माझा एक सहयोगी गंगाराम काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सौबत मक्सिको येथे गेला होता. मी परतल्यावर विचारले मेक्सिको कसा वाटला. तो म्हणाला 'पटाईतजी वहां ऐसा लगा जैसे भारत में है, कोई बिहारी लग रहा था कोई पंजाबी'. निश्चित ही भारत का कोई रिश्ता मेक्सिको से अवश्य है".असो.

आता माणसाचे अध्ययन करून आर्य दक्षिण भारतीय होते हे सिद्ध करायचे आहे. माणूस म्हणजे मीच. मी ब्राम्हण कुळातील आहे अर्थातच भाकड इतिहासकारांच्या मते आर्य. माझे अध्ययन करून संस्कृत भाषिक आर्य मूळचे कुठले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.

बालपणी संध्याकाळी वडील घर परतल्यावर, देवा समोर दिवा लावल्यावर, रामरक्षा इत्यादी स्त्रोते आम्ही म्हणायचो. शाळेत गेल्यावर कळले या भाषेला संस्कृत असे म्हणतात. आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. पहाडगंज येथील नूतन मराठी मराठी शाळेत शिक्षण सुरु झाले. शाळा मराठी असली तरी ५ टक्क्याहून कमी मराठी मुले असतील. ५ टक्के आरामबाग येथील सरकारी कर्मचार्यांची मुले त्यात अधिकांश दाक्षिणात्य. शाळेत शिकणारी बहुसंख्यक मुले पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची. त्यात हि सर्वातजास्त मुलतानी टांडा येथील. (मुलतान म्हणजे आर्यांचे मूलस्थान असे काहींचे मत आहे). उंच पुरे घार्या डोळ्यांच्या मुलतानी मुलांमुळे नूतन मराठी शाळा कैक वर्ष बास्केटबॉल विजेता राहिली होती. त्या काळी ११वी बोर्ड होता. आठवीत संस्कृत भाषेत ९० टक्के मार्क मिळाले तरी ९वीत प्रवेश घेताना मी हिंदी हा विषय घेतला. संस्कृत शिकविणार्या शास्त्री सरांना हे कळले त्यांनी प्रेमाने मला जवळ बोलविले. (शास्त्री सर हे बनारसचे होत. चांगले संस्कृत शिकवायचे. संस्कृत घेणाऱ्या अधिकांश मुलांना ७५ टक्केहून जास्त मार्क मिळायचे.). मला समजावीत म्हणाले अरे गाढवा, संस्कृत हि भाषा तुम्हा मद्रासी-मराठी मुलांसाठीच आहे. संस्कृत घेशील तर तुला सहज ८०-८५ टक्के मार्क्स मिळतील. संस्कृतच्या भरोश्यावर प्रथम श्रेणीत हि पास होशील. हिंदीत तर बोर्डात प्रथम येणार्यालाही ७५ टक्के मार्क्स मिळत नाही. ज्यांना संस्कृत कळणे आणि बोलणे शक्य नाही अश्या पंजाबी, सिंधी आणि मुलतानी मुलांसाठी हिंदी भाषा आहे. हे वेगळे मी निश्चय बदलला नाही. हिंदीत ५४ टक्के मार्क्स मिळाले आणि ९ मार्कांनी प्रथमश्रेणी चुकली. माझ्या भावाने संस्कृत घेतली. त्याचे ८० टक्क्याहून जास्त मार्क्स आले व प्रथम श्रेणी हि. असो. पण एक मात्र खर देशातील उत्तर पश्चिमेच्या भागातील लोकांना संस्कृत बोलणे जड जाते. काही दिवसांपूर्वी आस्था टीवी वर संस्कृत मधील एक कार्यक्रम पहिला. दक्षिण भारतीय विद्वान सहज आणि समजणारी संस्कृत बोलत होते, पण एका उत्तर भारतीय हरियाणवी अतिप्रसिद्ध संस्कृत विद्वानाचे उच्चारण स्पष्ट नव्हते. दिल्लीतही दक्षिण भारतीय आणि मराठी ब्राह्मणांची डिमांड पूजापाठ साठी जास्त आहे. त्यांना दक्षिणाही जास्त मिळते. कारण एकच संस्कृत भाषेतील स्पष्ट उच्चारण. संस्कृत भाषेचे अधिकांश विद्वान् विन्ध्याचल पार अर्थात दक्षिणात्य आहेत. आता विचार करा मध्य आशिया किंवा युरोपात संस्कृत भाषा विकसित होणे संभव आहे का?

काही म्हणतात, आर्य गोर्या रंगाचे व उंच पुरे होते. रंगाचा आणि उंचीचा संबंध जातींनुसार नव्हे तर वातावरणाशी आहे. माझे वडील दिल्लीत स्थायी झाले. दिल्लीत लालनपालन झाल्यामुळे माझ्या चुलत भावांपेक्षा आम्हा दिल्लीकर भावंडांची उंची जास्त आहे व रंग ही उजळ. पुढील पिढी अर्थात माझे पुतणे, भाचा आणि माझा मुलगा यांची उंची आमच्या पिढी पेक्षा जास्त आहे. हि काही माझ्या घरची परिस्थिती नाही. आता मी जनकपुरी जवळ बिंदापूर या शहरी गावात राहतो. जनकपुरीत बरेच मराठी ३०-४० वर्षांपासून राहतात. एखाद अपवाद सोडता सर्वांच्याच घरी आजची पिढी पूर्वीपेक्षा जास्त उंच आहे. दोन-तीन पिढीत एवढा फरक पडतो. शेकडो पिढ्यात रंग आणि उंची यात किती फरक पडेल. निश्चितच दक्षिणेतून उत्तरेकडे गेलेल्या आर्यांचे रंग आणि रूप बदलले. तरीही मूळ रंगाची आठवण नेहमीच स्मृतीत राहिली. आपल्या सर्व देवता काळ्या रंगाच्या आहेत. क्षीर सागर मध्ये निवास करणारे आर्य देवता विष्णू, काळ्या रंगाचे, राम आणि कृष्ण काळ्या रंगाचे, परशुराम हि काळेच होते. नीलकंठ शंकर हि काळेच. रावण मात्र गोरा आणि सुंदर होता. कालिका देवी काळीच होती. सीता ते शकुंतला सर्वच सुंदर कन्या सावळ्या होत्या. जिच्यामुळे महाभारत घडले ती अग्नीवर्णी द्रौपदी सावळी होती. संस्कृत साहित्यात विदर्भ कन्या सुंदर (सावळ्या) असतात. आमची सौ. हि वैदर्भी आहे. अर्थात सुंदर आहे. देवी -देवतांच्या मूर्त्या काळ्या दगडातच तैयार करण्याची परंपरा आज हि आहे. मुगल देशात आल्यानंतरच संगमरमरच्या पांढर्या मूर्त्या बनू लागल्या.

सारस्वत ब्राह्मण केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान ते पंजाब पर्यंत पसरलेले आहे. ते आर्यांचा दक्षिण ते उत्तर भारताच्या प्रवासाचे जिवंत साक्षीदार आहेत. सारस्वत ब्राह्मण गंगा-यमुनेच्या मैदानापासून ते बंगाल पर्यंत हि पसरले आहेत. अर्थात संपूर्ण भारतात मानवी प्रवासाचे (आर्यांच्या प्रवासाचे) जिवंत प्रमाण हि आहेत. या शिवाय मी आणि सर्व दक्षिण भारतीय हि आर्य दक्षिण भारतीय असण्याचे जिवंत पुरावे आहोत.

निष्कर्ष एकच जर स्वत: आर्य म्हणवणारी कुठली जाती असेल तर निश्चित ती दक्षिण भारतीयच आहे. संस्कृत भाषी आर्य हे दक्षिण भारतीय होते हेच सत्य. बाकी सर्व भाकड कथा.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

माहितगार's picture

9 Jul 2017 - 10:36 am | माहितगार

संस्कृत साहित्यात विदर्भ कन्या सुंदर (सावळ्या) असतात. आमची सौ. हि वैदर्भी आहे. अर्थात सुंदर आहे. देवी -देवतांच्या मूर्त्या काळ्या दगडातच तैयार करण्याची परंपरा आज हि आहे. मुगल देशात आल्यानंतरच संगमरमरच्या पांढर्या मूर्त्या बनू लागल्या.

:)

शास्त्रिय किती ते अजून ठरयचे आहे परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचे "देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण परिचय ग्रंथ" मधील मत अगदी तुमच्या सारखे नसले तरी जवळपास पोहोचणारे असावे. (तुम्हाला तेवढाच दिलासा :)

तुम्हाला किंवा इतरांना मराठी विकिपीडियावरील ब्राह्मण समाज लेखात संदर्भासहीत लेखनात सहभाग घ्यावयाचा असेल तर तेथील चर्चा पानावर संदर्भ ग्रंथांची एक यादी उपलब्ध केलेली आहे.

गामा पैलवान's picture

9 Jul 2017 - 11:52 am | गामा पैलवान

विवेकपटाईत,

तुमचं दक्षिणी संस्कृतविषयी निरीक्षण एकदम योग्य आहे. उत्तरेतल्या लोकांचं संस्कृत जरा अशुद्ध असतं. मात्र हा कल गेल्या सातआठशे वर्षांत प्रविष्ट झाला असावा. दक्षिण भारत मुस्लिम आक्रमणांपासून पहिले पाचशे वर्षे तरी मुक्त होता. त्यामुळे हिंदू कलाशास्त्रतत्त्वादि विषय दक्षिणेत अधिक बहरले. विशेषत: अर्वाचीन तत्त्वज्ञांची फळी पूर्णपणे दक्षिण भारतीय आहे.

आर्य संस्कृतीचा प्रभाव दक्षिणेत जास्त प्रमाणावर दिसतो या तुमच्या निरीक्षणांशी मी सहमत आहे. मात्र आर्य दक्षिण भारतीय होते या सरसकट निष्कर्षाशी नाही.

आ.न.,
-गा.पै.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

9 Jul 2017 - 1:33 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

आर्य हा शब्द वांशिक नसून भाषिक आहे ही इथल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी मारलेली लोणकढी थाप आहे.
जगाचा UV light map बघितला तर सहज लक्षात येईल की भारतात अल्ट्राव्हॉयलेट रेडीएशनचे प्रमाण जवळपास आफ्रिकेईतकेच आहे.
आफ्रिकेतून जी पहिली शाखा बाहेर पडली ती इथे आल्यावर Australoid या वंशात उत्क्रांत झाली.तरीही काळा रंग हा गुणधर्म त्यांनी सोडला नाही.हेच मुलनिवासी होत.
भारतात नितळ गोरा रंग,बांधेसूद शरीरयष्टी अश्या गुणधर्माचे जे लोक आहेत ते सर्वांचे मुळ भारताबाहेर सेन्ट्रल आशियात आहे.यात ब्राह्मणच आर्य आहेत असा दावा नाही पण जसे आपण जातीव्यवस्थेत वर जातो तसा लोकांचा रंग उजळ होत जातो,हेच ते आर्य .

विवेकपटाईत's picture

9 Jul 2017 - 3:39 pm | विवेकपटाईत

आज सिद्ध झाले आहे. आफ्रीकेतूनच मानव जगभर पसरला. रंगाचा वातावरणाशी संबंध नसता तर आज सर्वच काळे असते. तुमच्या दोन एक पिढ्यांपासून उत्तर भारतीय मराठी नातलगांच्या घरी जाऊन पहा त्यांच्या रंगात बदल झालेला तुम्हाला आढळेल.

ऋग्वेदात युद्धाचे भरपूर वर्णन आहे. संस्कृत निष्ठ शब्द युरोपियन भाषेत सापडतात त्याचे एकच कारण भारतातून युद्धात पराजित होऊन काही टोळ्या युरोप कडे गेल्या. तसेच कही सायबेरिया पार करूँ अमेरिकेत पोहचले. एकदा निदान मेक्सिको जाऊन पहा तिथे गेल्यावर तुम्हाला भारतीय सभ्येतेची साम्य दिसून येइल. तिथून आलेल्या अनेक प्रवासी भारतीय लोकानी याचे वर्णन केले आहे. एवढेच नव्हे मक्सिको ओलंपिक वर जसदेव सिंह यांच्या पुस्तकात ही उल्लेख आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

9 Jul 2017 - 4:31 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

बरेच भोळसट तर्क बाळगून आहात.चालू द्या....एवढेच म्हणतो.

माहितगार's picture

10 Jul 2017 - 7:37 am | माहितगार

@ टर्बोचार्जड फिलॉसॉफर

(पटाईतांचे समर्थन करावयाचे म्हणून नव्हे) ह्या विषयाचा आमचा अभ्यास कमी असल्यामुळे काही शंका; तसे गूगल इमेजेस वर काही UV light map दिसतात पण त्वचेच्या रंगावरील इंपॅक्टचे समिक्षीत संशोधन संदर्भासहीत UV light map चे दुवे अभ्यासण्यासाठी उपलब्ध होऊ शकतील का ?

शंका
१) UV light map चा आणि Equator पासूनच्या अंतराचा काही संबंध असतो का ? असल्यास तो काय असतो ?

२) जास्त अल्ट्राव्हॉयलेट रेडीएशनचे म्हणजे जास्त काळा रंग आणि कमी अल्ट्राव्हॉयलेट रेडीएशनचे म्हणजे कमी काळा रंग अथवा उजळ होत जाणारा रंग असे म्हणावयाचे आहे का ?

३) आपल्या तर्कानुसार समजा जास्त रेडीएशन मधिल मंडळी कमी रेडीएशनच्या प्रदेशात गेली किंवा कमी रेडीएशनची क्षेत्रातील मंडळी जास्त रेडीएशनच्या क्षेत्रात गेली तर कितव्या पिढी पर्यंत किंवा किती हजार वर्षात रंग बदलून मिळतो ?

४) रेडीएशने बदललेला रंग जेनेटीकल म्युटेशन होऊन पुढच्या पिढीत संक्रमीत होत असल्यास त्याची काही समिक्षीत संशोधनाचे दुवे संदर्भासाठी उपलब्ध होऊ शकतील का ?

-(अज्ञानी) माहितगार

दीपक११७७'s picture

10 Jul 2017 - 1:19 pm | दीपक११७७

सहमत

एस's picture

9 Jul 2017 - 6:04 pm | एस

वॉव!

गामा पैलवान's picture

9 Jul 2017 - 6:18 pm | गामा पैलवान

टफि,

आर्य हा शब्द वांशिक नसून भाषिक आहे ही इथल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी मारलेली लोणकढी थाप आहे.

आर्य नावाचा वंश कुठे अस्तित्वात होता बरें? आर्य नावाची भाषा कुठे अस्तित्वात होती बरें? उजवी विचारसरणी म्हणजे काय? हिंदुत्ववादी का? तसं असेल तर सरळ हिंदुत्ववादी असं का म्हणंत नाही तुम्ही?

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

9 Jul 2017 - 7:03 pm | जेम्स वांड

आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन (माझ्या जातीकरिता मी) लिहिलेला तर्क पूर्ण लेख,

असं सुरुवातीला लिहिलं असतं तर पुढली चर्पटपंजरी वाचायचे कष्ट वाचले असते =))

सतिश गावडे's picture

9 Jul 2017 - 7:05 pm | सतिश गावडे

हो हो.अगदी असेच आहे हे. अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञानीही abcdefghijklmnopqrstuvwxyz.org या वेबसाईटवर हेच म्हटलंय.

अभ्या..'s picture

9 Jul 2017 - 7:10 pm | अभ्या..

मैं भी हूं आर्य.
.
यीप्प्प्प्पी...................

सतिश गावडे's picture

9 Jul 2017 - 7:57 pm | सतिश गावडे

सोलापूर दक्षिण महाराष्ट्र आहे की दक्षिण भारत?

अभ्या..'s picture

10 Jul 2017 - 2:54 pm | अभ्या..

कायकी, माझा तालुका मात्र दक्षिण सोलापूर आहे.

जेम्स वांड's picture

9 Jul 2017 - 7:21 pm | जेम्स वांड

आम्रविकेत राहून आपले विल स्मिथ, सॅम्युएल जॅक्सन, जेमी फॉक्स वगैरे फाकडू कृष्णवर्णीय कसे राहिले?

(ते तसेच स्टड आहेत राव, अजून कश्याला पावडर लाली लागत्ये त्येस्नी)

कपिलमुनी's picture

9 Jul 2017 - 7:57 pm | कपिलमुनी

संशोधनासाठी वापरलेली संदर्भसूची पाहून ड्वाळे पाणावले .

विशुमित's picture

10 Jul 2017 - 10:55 am | विशुमित

+111111

दीपक११७७'s picture

10 Jul 2017 - 1:31 pm | दीपक११७७

आर्यांचा विचार करताना मोहन जोदारो आणि हड्डप्पा संस्कृती कसे विसरता येईल.
मुळात ३००० वर्षा पुर्वी भारताच्या सिमेतच रहात असलेले हे लोकं अचानक गायब(म्हणजे कुठे समावले) कसे झाले.
याचा कसलाही छडा विज्ञानाला लागलेला नाही. याचा छडा न लावता केवळ आर्य-संस्कृत संदर्भात मांडलेले तर्क, शोध परिपुर्ण होणार नाहीत.

सुज्ञ's picture

10 Jul 2017 - 1:31 pm | सुज्ञ

आपले दिल्ली कसे आहे ? श्री श्री 420 काय म्हणतात ? बऱ्याच दिवसात काही लीळा नाहीत त्यांच्या. आमच्या मनोरंजनाचं जरा मनावर घ्या म्हणावं

कपिलमुनी's picture

10 Jul 2017 - 4:47 pm | कपिलमुनी

विडंबन किंवा उपहसात्मक असेल तर साफ गन्डलेला आहे

सिरुसेरि's picture

11 Jul 2017 - 2:03 pm | सिरुसेरि

आर्य / आर्या म्हणले की अल्लु अर्जुनचे रेल्वेवरचे "आ आन्टे अमलापुरम " हे गाणे आठवते . चाणक्य गुरु हे उत्तरेकडचे ( मगध / पाटलीपुत्र / विदिशा ) असुनही त्यांचा उल्लेख "आर्य चाणक्य " केला जात असे हे महत्वाचे आहे .