एका ठिपक्याची रांगोळी ह्या आगामी कादंबरीचा भाग

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 10:04 am

चाकोरीबाहेर जाऊन चाकोरी न सोडण्याचं तंत्र आज्जीला खासच जमलं होतं .
आज्जी तेव्हा विठ्ठल सायन्नाला म्हणजे ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलला दाई होती.
चौथी पास झालेल्या बायांना तेव्हा मिड वायफरीला प्रवेश मिळायचा.
ठाण्यात तेव्हा अडलेली बाळंतीण सोडवण्यासाठी गरीबांसाठी असं हे एकच हॉस्पीटल होतं.
तेव्हा मालती बाई चिटणीसांच पण हॉस्पीटल नसावं. वैद्य किंवा देवधर तेव्हा नव्हतेच.
सांगायचं ते काय की आज्जी दिवसभर बाळंतपणं करण्यात गुंतलेली.
ननूमामा म्हणजे आज्जीच्या सवतीचा मुलगा.त्याला त्याच्या मामानी हट्ट करून नंदुरबारलाच ठेवून घेतला होता.
माझी आई तेव्हा दुसरीत.कन्या शाळेत.तिला एकदा शाळेत रवाना केलं की आज्जी सिव्हीलला यायची.ड्युटी असो नसो दिवसभर तिथेच काम करायची.
सैपाक करणं हे तिच्या आवडीचं काम नव्हतं अशातला भाग नाही पण दिवसभर सिव्हीलमध्ये असली की दोन्ही वेळचं जेवण मेस मध्येच व्हायचं . रात्री खोलीवर जाऊन सतरंज्या झटकून पडलं की दिवस संपायचा.
ननूमामा नंदुरबारला असला तरी त्याच्या मामाचं अनंतचतुर्दशीला एक पोस्त कार्ड यायचं .
त्यात त्याच्या बहीणीची अविधवा नवमीची तिथी आणि आजोबांची तिथी कुठल्या तारखेला आहे त्याचा तपशील देऊन वर एक टिपणी
असायची. "पेन्शन तुमच्या नावावर असल्याने ही जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे."
त्यावर आज्जी पण एक पत्र लिहून टाकायची. "माझ्या पसार्‍यात मला तिथी सांभाळायचं काही जमायचं नाही पण अमावस्येला काय ते करीन."
सर्वपित्री अमावस्येला ती सोबतच्या दोन दाया आणि दोन वॉर्ड बॉइजना मेस मध्ये बोलवायची. त्यांच्या थाळ्या मागवायची. एक्या-तुक्या सासरा आणि नवरा यांच्यासाठी. सरल आणि निर्मला -दोन सवती सवतींसाठी.
त्यांच्या समोर थाळ्या आल्या की त्यांना नमस्कार करायची. एक्यातुक्याला विडीकाडीसाठी बारा आणे .बायांना लुगडी आणि बांगड्यांसाठी सात रुपये.
झाली तिथी पार पडली.
मग कधीतरी आई विचारायची "आई, अगं तुझ्या आईबाबांचं काय "
त्यावर आज्जीचं उत्तर ठरलेलं असायचं "अगं माझे आईबाप पुण्यात्मे !!!
.ते बसलेत अमृताच्या वाट्या पित ते कशाला येतायत मेसमध्ये जेवायला
"तुझ्या बापाची गोष्ट वेगळेय. त्याचा जीव आहे ना माझ्यावर '"
हे म्हण्ता म्हण्ता तिचा आवाज चिरकायचा.
हा एकच दिवस असा की आज्जी रात्री जेवायची नाही.
रात्री एका ऐवजी दोन सतरंज्या घालायची .
एका सतरंजीवर पांढरी चादर घालायची. रंगीत धाबळी हांतरायची. उशाशी चांदीचा प्याला भरून दूध ठेवायची. .........
आणि रात्रभर जागीच असायची.
(आज्जी तेव्हा जेमतेम सत्तावीस वर्षाची असेल)
* एका ठिपक्याची रांगोळी ह्या आगामी कादंबरीचा भाग .

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2016 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त ! कादंबरीची वाट पाहतोय. शुभेच्छा !

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2016 - 10:27 am | बिपिन कार्यकर्ते

(आज्जी तेव्हा जेमतेम सत्तावीस वर्षाची असेल)

मास्टरपीस... सगळं सगळं सांगून झाल्यावर जे सांगायचं असतं ते शेवटच्या वाक्यात आलं.

बाकी शैली, भाषा, फ्लो वगैरेबद्दल काही बोलायसारखं उरलंच नाहीये आता.

संपूर्ण वाचायची घाई होतीये आता.

सगळं सगळं सांगून झाल्यावर जे सांगायचं असतं ते शेवटच्या वाक्यात आलं.

हेच म्हणते.

नीलमोहर's picture

30 Sep 2016 - 10:39 am | नीलमोहर

उत्कट लेखन,
बोलण्यासारखं काही नाही, उत्सुकता आहे फक्त.

अमृत's picture

30 Sep 2016 - 10:44 am | अमृत

कादंबरीच्या प्रतिक्षेत.

नावातकायआहे's picture

30 Sep 2016 - 11:07 am | नावातकायआहे

कादंबरीच्या प्रतिक्षेत

नंदन's picture

30 Sep 2016 - 11:10 am | नंदन

अगदी असेच म्हणतो!

तुषार काळभोर's picture

30 Sep 2016 - 12:49 pm | तुषार काळभोर

बाकी आम्ही काय बोलावे...

कादंबरीच्या प्रतिक्षेत...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Sep 2016 - 10:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कादंबरी कधी येतेय? हे असं उगाचं त्रास नका देउ.

रातराणी's picture

30 Sep 2016 - 10:39 am | रातराणी

अप्रतिम.

सुधांशुनूलकर's picture

30 Sep 2016 - 10:42 am | सुधांशुनूलकर

खास रामदासकाका शैली.
कादंबरी मस्तच असणार याबद्दल कोणतीही शंका नाही.
काका, मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

नाखु's picture

30 Sep 2016 - 11:04 am | नाखु

सहमत.

सर्वपित्रीचा योग असाही.

शेवटल्या वाक्याला घशात आवंढा अडकला!
आता सगळं वाचेपर्यंत येताजाता आज्जी आठवत राहणार...__/\__

रुपी's picture

30 Sep 2016 - 10:52 am | रुपी

सुंदर!

रामदास जी
किती मोजक्या शब्दांत तुम्ही थेट ह्र्द्याला भिडणारं लिहुन जातात.
किती मिनीमम स्ट्रोक्स मध्ये आजीचं चित्रं डोळ्यासमोर उभ केलतं
आज सर्वपित्री अमावस्येचा योग साधलात का ? पण अमावस्येचा योग कोणी साधत नाही सहसा.
भावुक करुन टाकतात तुम्ही आमच्यासारख्या दगडांना.

आज सर्वपित्री अमावस्येचा योग साधलात का ?

सर्वपित्री ७ तारखेला आहे, पितृपंधरवड्याचं औचित्य म्हणू शकू फार तर.

एस's picture

30 Sep 2016 - 11:02 am | एस

सुंदर.

अनुप ढेरे's picture

30 Sep 2016 - 11:03 am | अनुप ढेरे

मस्तं! वाट पहात आहे कादंबरीची.

अजया's picture

30 Sep 2016 - 11:14 am | अजया

कादंबरी कधी येणार?

रामदासकाका, काय लिहायचं आम्ही अन काय बोलायचं?
आता फक्त तुमच्या कादंबरीची वाट पाहायाची. येऊद्या लवकर.

राजाभाउ's picture

30 Sep 2016 - 12:13 pm | राजाभाउ

+१ असेच म्हणतो.

मित्रहो's picture

30 Sep 2016 - 11:53 am | मित्रहो

कादंबरीची वाट बघतोय

वरुण मोहिते's picture

30 Sep 2016 - 12:06 pm | वरुण मोहिते

कादंबरीच्या प्रतीक्षेत

स्वाती दिनेश's picture

30 Sep 2016 - 12:07 pm | स्वाती दिनेश

तुमचं नवीन काही लेखन येतय म्हटल्यावर ते अधाशासारखं वाचून काढलं जातंच.. कादंबरीची वाट अर्थातच पाहत आहे.
(अति अति अवांतर- बरेच, बरेच दिवस झाले हो भेटून.. हेच त्या केसु, बिका आणि नंदूलाही लागू आहे..)
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2016 - 12:56 pm | बिपिन कार्यकर्ते

कोण स्वातीताई?
कोण केसु?
कोण नंदू?

;) ;) ;)

संजय पाटिल's picture

30 Sep 2016 - 12:11 pm | संजय पाटिल

चला, पुन्हा लिहीते झालात तर..
कादंबरीची वाट पाहतोय..

लॉरी टांगटूंगकर's picture

30 Sep 2016 - 12:12 pm | लॉरी टांगटूंगकर

रामदासकाकांना बोर्डावर बघून अचानक जर आज द्रविड खेळायला उतरल्यावर होईल तसा आनंद झाला.
प्रकाशनपुर्व नोंदणी कुठे आणि कशी करायची हे कळवणे.

माणदेशी's picture

30 Sep 2016 - 4:50 pm | माणदेशी

बऱ्याच दिवसांनी रामदासकाकांचं लेखन वाचलं. आता फक्त वाट पहात आहे कादंबरीची.

माणदेशी's picture

30 Sep 2016 - 4:50 pm | माणदेशी

बऱ्याच दिवसांनी रामदासकाकांचं लेखन वाचलं. आता फक्त वाट पहात आहे कादंबरीची.

पैसा's picture

30 Sep 2016 - 12:19 pm | पैसा

कादंबरीला शुभेच्छा!

भीडस्त's picture

30 Sep 2016 - 1:28 pm | भीडस्त

टिपिकली रामदास'

गौतमी's picture

30 Sep 2016 - 1:29 pm | गौतमी

लवकर पुढचे भाग येऊद्या. शुभेच्छा.

विचित्रा's picture

30 Sep 2016 - 1:57 pm | विचित्रा

नेहमीप्रमाणेच

सिरुसेरि's picture

30 Sep 2016 - 2:26 pm | सिरुसेरि

शुभेच्छा. पुभाप्र .

आदूबाळ's picture

30 Sep 2016 - 3:37 pm | आदूबाळ

कब है कादंबरी?

अभिरुप's picture

30 Sep 2016 - 3:46 pm | अभिरुप

तुमचे लेखन वाचल्यावर असं वाटतं की मिपावर फक्त वाचक म्हणूनच रहावे.
आजही जेव्हा दूध पिण्याची वेळ येते तेव्हा "काटेकोरांटीची फुलं" आठवल्याशिवाय रहात नाही. जबरदस्त ताकद आहे तुमच्या लेखणीत. तीच आम्हा वाचकांसाठी आणि समस्त मिपाकरांसाठी मेजवानी आहे.लिहिते रहा.

समीरसूर's picture

30 Sep 2016 - 4:31 pm | समीरसूर

अप्रतिम! अतिशय हृदयस्पर्शी लेखन! कादंबरीसाठी शुभेच्छा! कधी येईल बाजारात?

धनावडे's picture

30 Sep 2016 - 5:37 pm | धनावडे

कादंबरीसाठी शुभेच्छा,

स्रुजा's picture

30 Sep 2016 - 5:50 pm | स्रुजा

वाह ! कधी येणार कादंबरी?

सखी's picture

3 Oct 2016 - 9:27 am | सखी

कधी येणार कादंबरी?

धर्मराजमुटके's picture

30 Sep 2016 - 5:52 pm | धर्मराजमुटके

शब्दप्रभू नमस्कार. आता ह्या रामदासी संप्रदायात सहभागी व्हायलाच हवं.

रेवती's picture

30 Sep 2016 - 6:37 pm | रेवती

ग्रेट लिहिलयत.

आज्जी डोळ्यासमोर उभी राहीली. जुने ठाणेही डोळ्यासमोर उभे केलेत. माझा जन्म मालतीबाइ चिटणीसांच्या हातचा. त्यामुळे उगाच मन भूतकाळात गेले...

मस्त!कधी मिळेल पूर्ण कादंबरी वाचायला?

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2016 - 8:59 am | पिलीयन रायडर

अर्थातच आवडलं!!!

नूतन सावंत's picture

2 Oct 2016 - 8:42 am | नूतन सावंत

जेवायला बोलवायचं न नुसतं पण दाखवायचं असं झालाय मला.प्रकाशनाची तारीख काय आहे.

सौन्दर्य's picture

2 Oct 2016 - 8:59 am | सौन्दर्य

अतिशय मोजक्या शब्दांत आजीची व्यक्तिरेखा रंगवलीत. शेवटचे वाक्य काळजात घर करून गेले, कारण आजी म्हंटली म्हणजे कमीत कमी साठीच्या पुढची स्त्री डोळ्यासमोर आली. पुढील वाचनाची उत्सुकता लागली आहे.

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2016 - 2:35 pm | बोका-ए-आझम

म्हणजे आता रामदासकाका आॅफलाईन जगातही तलवार गाजवणार तर! कादंबरी घेणारच!

शिव कन्या's picture

3 Oct 2016 - 10:01 pm | शिव कन्या

"अगं माझे आईबाप पुण्यात्मे !!!
.ते बसलेत अमृताच्या वाट्या पित ते कशाला येतायत मेसमध्ये जेवायला
"तुझ्या बापाची गोष्ट वेगळेय. त्याचा जीव आहे ना माझ्यावर '"
हे म्हण्ता म्हण्ता तिचा आवाज चिरकायचा.

भिडलं एकदमच!

सविता००१'s picture

4 Oct 2016 - 2:09 pm | सविता००१

अप्रतिम.
वाट पहातेय कादम्बरीची. कधी होणार प्रकाशित?

धनावडे's picture

4 Jun 2017 - 2:18 am | धनावडे

कादंबरी कधी येणार? की आली?

धनावडे's picture

27 Aug 2018 - 11:15 pm | धनावडे

कधी येणार कादंबरी? की आली?

अतिशय भिडणारं, सुंदर लिखाण...शीर्षक फार समर्पक! खूप दिवसांनी तुमच्या लिखाणाची मेजवानी मिळाली, तृप्त झाले.

क्या बात!! कादंबरीच्या प्रतिक्षेत आहे.

सविता००१'s picture

28 Sep 2018 - 5:44 pm | सविता००१

काका, कधी येणार कादंबरी?

NAKSHATRA's picture

22 Jan 2021 - 6:42 pm | NAKSHATRA

कादंबरी मस्तच असणार याबद्दल कोणतीही शंका नाही.