मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
10 May 2017 - 5:30 pm

प्रिय मिपाकरांनो,

काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे.

ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा.

१. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१)

२. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६)

आपलाच,

मुवि

समाजजीवनमानतंत्रबातमीमाहिती

प्रतिक्रिया

सुखी's picture

10 May 2017 - 5:56 pm | सुखी

+1

कपिलमुनी's picture

10 May 2017 - 6:43 pm | कपिलमुनी

मिपावर शेती साठी एक विभाग आसावा असे वाटते. त्यामधे अनुभव , सल्ला , खरेदी विक्री ( अर्थात याचा मिपा प्रशासनाशी संबध नसेल्च) .
पण बरेच जणांना याचा म्हणून उपयोग होइल आणि गरजू शेत़कर्‍यांसाठी मदतही होइल.
जसे की हातसडीचे तांदूळ , खपली गहू , किंवा कडधान्ये , सध्याची तूर अशा गोष्टी डायरेक्ट शेतकर्‍यांकडून मिळतील.

हे सुचवून लै दिवस झालेत. पण आमचे सवंगडी ऐकतच नैत. :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता तुझा पत्ता देचं. तुला सल्ले, पुस्तकं आणि डाकुमेंट्र्या पाठवतो शेतीवरच्या.

- शक्तीमान गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री, ग्राम गुटिंगा पोस्ट सिखोली-

इरसाल कार्टं's picture

12 May 2017 - 9:40 am | इरसाल कार्टं

पुस्तकं नाही पाठवावीत तरी चालेल, लिंक तेवढ्या द्या.
अर्थात आम्ही शेतीत काही झेंडे रोवलेले नाहीत पण 'काहीतरी' करायची लै विच्छा आहे.

मुक्त विहारि's picture

10 May 2017 - 8:20 pm | मुक्त विहारि

इथे च वेगला विभाग केला तरजी जास्त लोकांना उपयोग होइल

इथे च वेगला विभाग केला तरजी जास्त लोकांना उपयोग होइल

Sonu Sabnis's picture

11 May 2017 - 9:59 am | Sonu Sabnis

+1

यशोधरा's picture

11 May 2017 - 10:32 am | यशोधरा

मुवि, यू टू?

ब्रुटस यु टू असा वाचावं का?

यशोधरा's picture

11 May 2017 - 11:55 am | यशोधरा

नाही, मुवि, यू टू, असंच वाचा.

मुक्त विहारि's picture

11 May 2017 - 1:36 pm | मुक्त विहारि

@ यशोधरा ताई,

"मुवि, यू टू?"

हे समजले नाही.

यशोधरा's picture

12 May 2017 - 6:13 am | यशोधरा

मुवि, मिपाचा उपयोग फक्त स्वतःच्या कायप्पा ग्रुपची झाइरात करणाऱयांपैकी तुम्ही पण का, असे सखेद विचारलेय.

अजिबात नाही....

१. हा माझा स्वतःचा गृप नाही. (मी व्हॉट्सच्या कुठल्याच गृपचा अ‍ॅडमिन पण नाही.)

२. इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग हवा, असे माझे स्वतःचे मत आहे.त्यासाठी आधी एक धागा काढून झाला आहे.

३. बर्‍याच मिपाकरांना शेतीत रस आहे पण , त्या मिपाकरांना आपापले विचार मांडायला, शेतीतले अनुभव सांगायला आणि शेती विषयक नविन तंत्रज्ञाची माहिती द्यायला एक व्यासपीठ असायला हवे, म्हणून हा गृप स्थापन झाला आहे.

=======

बहूदा तुमचे शंका समाधान झाले असावे, असे वाटते.

इथेच शेती साठी स्वतंत्र विभाग हवा, असे माझे स्वतःचे मत आहे

नीलकांतला विनंती करुन पाहिलेत का?

बर्‍याच मिपाकरांना शेतीत रस आहे पण , त्या मिपाकरांना आपापले विचार मांडायला, शेतीतले अनुभव सांगायला आणि शेती विषयक नविन तंत्रज्ञाची माहिती द्यायला एक व्यासपीठ असायला हवे

मग लिहा की मिपावरच. इतक्या जणांनी विनंती केली आहे, अजून काय हवे?

कायप्पा ग्रूपची जाहिरात मिपावर करणे पटत नाही.

मुक्त विहारि's picture

12 May 2017 - 1:15 pm | मुक्त विहारि

http://misalpav.com/node/36560

हा धागा एकदा काढल्यावर परत संपादकांना मुद्दाम व्यनि करणे पटत नाही.

"मग लिहा की मिपावरच."

http://misalpav.com/node/39757

हा धागा काढला आहे.

"कायप्पा ग्रूपची जाहिरात मिपावर करणे पटत नाही."

तो गृप "शेती"त रस असणार्‍या मिपाकरांसाठी आहे. इथे ह्या विषयात रस असणारे किती? हे जर मला माहित असते तर मी मग प्रत्येकाला व्यनि केला असता. पण माझ्या दुर्दैवाने असे मिपाकर मला माहित नसल्याने आणि अशा प्रत्येक व्यक्ति पाशी मी पोहोचत नसल्याने, धागा काढला.

मु वि, शेतीवाडीच्या गप्पा असा धागा काढा न. तिथे आमच्यासारखे हौशी शेतकरी लिहू वाचू लागतील.

मुक्त विहारि's picture

11 May 2017 - 8:16 pm | मुक्त विहारि

ह्या गृपवर पण तुम्ही अशा गप्पा मारू शकता...

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2017 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुविसाहेब,

वर लोक म्हणत आहेत तसा इथेच एक चर्चेचा धागा काढा असे सुचवतो. त्याचा आजी, माजी, हौशे, गवशे, नवशे, भविष्यात शेतकरी होऊ शकणारे, लिहिणारे आणि केवळ वाचणारे अश्या सगळ्याच शेतीबद्दल आपुलकी असलेल्यांना फायदा होईल.

शेती हा विषयच खूप मोठा आहे.

केवळ एक धागा काढून त्याचा काहीच उपयोग नाही.

पिकांमध्ये पण बरेच मुख्य प्रकार पडतात.

१. पालेभाजी (पालक, मेथी, माठ इ.)

२. फळ्भाजी (ह्यात परत २ उपप्रकार झुडूप वर्गीय आणि वेल वर्गीय.)

३. फळ-फळावळ

४. कुंपण वर्गीय

५. बहू वार्षिक ( उदा. साग, खैर)

६. औषधी वनस्पती

अजूनही बरेच असतील.

ह्यातील प्रत्येक पिका-विषयी एक-एक स्वतंत्र लेख तयार होईल.

"मिरची" हा विषय घेतला तरी, त्यावर एक लेख होवू शकतो.

जमल्यास आजच "मिरची" ह्या विषयावर लेख टाकतो. आपल्या सर्वांनाच अंदाज येईल, की एका धाग्यात "शेती" हा विषय आटोपता येवू शकतो का?

खेडूत's picture

12 May 2017 - 12:06 pm | खेडूत

टाका टाका.
याशिवाय गैरपिकीय विषय खूप आहेत, जसे
१. पीक विमा कसा काढावा अन भरपाई मिळवावी
२. पशुपालन/ कुक्कुटपालन
३. अन्य जोडधंदे
४. पाण्याचा परिणामकारक वापर आणि साठवण
५. वाटेकर्‍याच्या उपद्व्यापांपासून बचाव/ राखण
६. पेरणी, मशागत, फवारणी
७. शेतातले प्रथमोपचार
८. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
.
.

जवळजवळ मिपा-अ‍ॅग्रोवनच म्हणा ना!

मुक्त विहारि's picture

12 May 2017 - 3:24 pm | मुक्त विहारि

ह्या मिपावरच शेती विषयी स्वानुभवाने लिहू शकतील अशा व्यक्ती कमी नसतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2017 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच म्हणतो, प्रत्येक वेगळ्या विषयावर एक एक धागा टाका. काही वेळाने, क्रिटिकल मास निर्माण झाले की तंत्रज्ञांना आपोआप नवीन विभाग तयार करणे आवश्यक वाटेल. :)

मुक्त विहारि's picture

12 May 2017 - 3:22 pm | मुक्त विहारि

शेती विषयाचे स्वानुभव लिहायला सुरुवात तर करतो.

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2017 - 2:03 pm | प्रसाद गोडबोले

वाह , मला आवडेल ह्या ग्रुपात ज्वाईन व्हायला !

खरंतर आमची तशी खरी शेती नाही पण ओनलाईन शेती भरपुर आहे ! आता घराच्या बाल्कनीत शेती करेन म्हणतो !

किसन शिंदे's picture

12 May 2017 - 2:32 pm | किसन शिंदे

हे डे?