मी हरवलो आहे असं ,
माझं मला कळवूनच ,
मी गहाळ झालो आहे.
last seen at 5.45
ही whatsapp वरची अफ़वा आहे .
घरून निघताना निळा शर्ट घातला होता
आणि घरात सगळे वाट बघत आहेत ,
ही पण एक आवईच आहे .
एसटी स्टैंड वर आणि स्टेशनच्या मुतारीत
पोस्टर दिसलेच तर कळवा ,
मलाच कधीतरी.
मी हातचा एक होतो
त्या घरालाच,
मी एक चकवा दिला आहे .
रात्रीच्या खर्जात प्रेम सेवा शरण गाणारं ,
माझंच बेमालूम version 2.0 वगैरे असंच काहीतरी आहे ,
believe me वगैरे कशाला ??
मी हरवलोच आहे .
प्रतिक्रिया
4 May 2017 - 8:26 pm | गवि
अफलातून....
4 May 2017 - 8:32 pm | वरुण मोहिते
उगाच नाय तुम्हाला गुरु बोलत रामदास काका .
4 May 2017 - 8:50 pm | खटपट्या
बर्याच दिवसांनी आलात आणि मस्त लिहिलंत...
4 May 2017 - 10:51 pm | संदीप-लेले
मी हरवलो आहे असं ,
माझं मला कळवूनच ,
मी गहाळ झालो आहे. ...
.... व्वा !
4 May 2017 - 11:11 pm | सुमीत भातखंडे
_/\_
5 May 2017 - 10:21 am | रातराणी
_/\_ !
5 May 2017 - 12:45 pm | संजय पाटिल
वा व्वा !!!! क्या बात!
5 May 2017 - 3:46 pm | उपेक्षित
आधी मला वाटल कि माझ्या कथेचे काकांनी विडंबन केले कि काय ?
बाकी कविता मास्टर क्लास आहे.
5 May 2017 - 3:59 pm | अभ्या..
_____/\______
क्लास
20 Sep 2017 - 6:45 pm | राघव
मस्त!
22 Jan 2021 - 8:23 am | NAKSHATRA
तुमच्यालिखाणाची हातोटी खूपच छ्हान आहे