टायपो ( कथा )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
10 Apr 2017 - 8:32 pm

टायपो ( कथा ) ( काल्पनीक )

घनदाट जंगलांनी व्यापलेला अ‍ॅमॅझॉन खो-याचा विस्तीर्ण आणी तेवढाच दुर्गम भुभाग . या जंगलामधे अनेक नरभक्षक रानटी टोळ्या , जंगली हिंस्त्र श्वापदे यांचा कितीतरी शतकांपासुन वावर आहे . किवागो ही या रानटी टोळ्यांमधली एक शक्तीशाली जमात . किवागो योद्धे हे कायम आपल्या हद्दीच्या रक्षणासाठी विषारी तीरकामठे घेउन पहारा देत असत . कुणा इतर टोळीने येथे प्रवेश करायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांची खैर नसे . किवागो योद्धयांच्या विषारी बाणांना ते एका क्षणात बळी पडत .

दिवस संपुन हळुहळु अंधार पडु लागला होता . नेहमीप्रमाणेच किवागो योद्धे आपल्या हद्दीवर डोळ्यात तेल घालुन पहारा देत होते . त्यांच्या हातात विषारी तीरकामठे सज्ज होते . पाठीवरच्या भात्यांमधे विषारी बाण भरलेले होते . तर काही किवागो योद्धे हातात भाले घेउन गस्त घालत होते .

अचानक त्यांना समोर विजा चमकल्याचा भास झाला . पण तो भास नव्हता . समोर खरोखरच विजेच्या ठिणग्या पडत होत्या . काही क्षणांत या ठिणग्या नाहिशा झाल्या . त्या ठिणग्यांमधुन अवतरला एक अजस्त्र महाकाय मनुष्य . एखाद्या राक्षसासारखा भासणारा तो महाकाय मनुष्य किवागोंच्याच दिशेने संथपणे एकेक पाउल टाकत येत होता . त्याच्यापुढे किवागो योद्धे एखाद्या खेळण्यासारखे दिसत होते . किवागो आधी थोडे चरकलेच . पण लगेच सावध होउन त्यांनी आपापली शस्त्रे सरसावली , आणी ते त्या अजस्त्र मनुष्यावर विषारी बाणांचा , भाल्यांचा वर्षाव करु लागले .

पण त्या महाकाय मनुष्यावर त्या बाणांचा काहिच परिणाम झाला नाही . त्याच्यासमोर एखाद्या सुईसारखे नाहितर काडीसारखे वाटणारे ते बाण त्याच्या अंगाला आपटुन खाली पडले . किवागो घाबरुन मागे मागे सरकु लागले . ते पुरते गोंधळुन गेले . तेवढ्यात त्या राक्षसी आकाराच्या मानवाच्या डोळ्यांतुन प्रखर प्रकाश किरण बाहेर पडु लागले . किवागो अजुनच घाबरले . त्यांच्यामधे पुरता गोंधळ उडाला .

त्याच वेळी या प्रसंगापासुन कितीतरी वर्षे दुर असलेल्या एका सैनिकी केंद्रामधे बरीच गडबड चालु होती . त्या केंद्राचे प्रमुख आपल्या केबिनमधे आतुरतेने येरझारा घालत होते . ते कशाची तरी अधीरतेने वाट पाहात होते . तेवढ्यात केबिनमधला फोन खणखणला . त्यांनी तो त्वरेने उचलला . त्यांना अपेक्षित असलेला तो फोन त्यांच्या सहका-याचाच होता . केबिनजवळच्या संगणक कक्षातुन त्याने तो फोन केला होता .

" यस ?" प्रमुखांनी आतुरतेने विचारले .

" सर ... द फिनीक्स हॅज लँडेड सक्सेसफुली ." पलिकडुन आवाज आला . एका अत्यंत महत्वाच्या आणी अत्यंत खर्चीक अशा सैनिकी प्रोजेक्टचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्याचा तो सांकेतीक भाषेतला संदेश होता . प्रमुखांच्या चेह-यावर समाधानाचे हसु उमटले .

"दॅट्स अ ग्रेट न्युज . कॉन्ग्रॅटस टु ऑल ." असे म्हणुन त्यांनी फोन ठेवला आणी ते त्वरेने केबिनजवळच्या संगणक कक्षामधे गेले . त्यांची टीम तिथेच बसलेली होती .

सर्वांनी प्रमुखांचे हसुन स्वागत केले . प्रमुखांनीही परत सर्व टिमचे अभिनंदन केले . आता त्यांना उत्सुकता लागुन राहिली होती , ती या प्रोजेक्टच्या पुढल्या टप्प्याची .

" ग्रेट जॉब जोकर्स . सो द फर्स्ट फेज ऑफ द प्रोजेक्ट T- 333/301 इज डन . द मोस्ट अ‍ॅडव्हान्स्ड अ‍ॅन्ड स्ट्रॉन्गर मॉडेल डेव्हलपड बाय अस . हाऊ द नेक्स्ट फेज इस गोईंग ऑन ? हॅव वी रिसीव्हड स्नॅप्स फ्रॉम द T- 333 आफ्टर लँडिंग ? " प्रमुखांनी चौकशी केली .

"यस सर . T- 333 हॅज स्टार्टेड टु ट्रान्समीट द स्नॅप्स ऑफ द सरांउंडिंग्स थ्रु सिग्नल्स . " टिममधील एकाने उत्तर दिले . आणी समोरच असलेल्या मॉनीटरकडे बोट केले . T- 333 ने पाठवलेली छायाचित्रे तिथे दिसत होती . प्रमुख बारकाईने ती छायाचित्रे पाहु लागले . त्यांच्या कपाळावर किंचीत आठ्या पडल्या .

" बट .. दिज स्नॅप्स डजंट लुक लाईक ऑफ अ डेव्हलप्ड एरीया ? कॅन यु चेक अगेन ? " त्यांनी टिमकडे पाहुन विचारले . टिममधल्या लोकांनाही तो फरक लक्षात आला . सगळे गोंधळुन एकमेकांकडे पाहु लागले . कुणीच काही बोलेना . नक्की काय गडबड झाली असेल ते कुणालाच समजत नव्हते .

" लँडींग पॅनलपाशी कोण होतं ? हु वॉज ऑपरेटींग द लँडींग पॅनल ? " प्रमुखांनी कठोर आवाजात विचारले . एका गटाण्या डोळ्याच्या माणसाने हात वर केला .

"मिबीन तु ? तुला कोणी तिथं बसवलं ? समवन चेक व्हॉट हि हॅज डन . " प्रमुखांनी फर्मावले . टिममधल्या एकाने तत्परतेने मिबीनचे पॅनल , त्यावरील याआधी रन केलेले कोड तपासले . काय प्रकार झाला ते त्याच्या लक्षात आले . तो काळजीने प्रमुखांना म्हणाला .

"सर . इट वॉस अ टायपो . मिबीनने २०१७ च्या जागी १०१७ टाइप केले . हि टाइप्ड 1017 अ‍ॅट द फेज ऑफ लँडींग "

"टायपो ? व्हॉट डु यु मीन बाय टायपो ? हा टायपो आपल्याला केवढ्याला पडला ? डु यु हॅव एनी आयडीया ? ज्या T- 333 ला २०१७ सालामधे पाठवायचे होते , त्याला तु १०१७ सालामधे पाठवले ? हा टायपो आपल्या मानवजातीला केवढा भारी ... " संतापाच्या भरात प्रमुखांच्या तोंडुन शब्द फुटेनासे झाले . ते मिबीनकडे पाहुन रागारागाने नुसतेच हातवारे करु लागले .

"उं.. म्याउ..." म्हणत मिबीन घाबरुन तिथल्या एका खुर्चीखाली जाउन लपुन बसला .

त्याचवेळी समोरच असलेल्या मॉनीटरवर T- 333 कडुन आलेले पुढचे संदेश झळकत होते .

"वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." , "वेटिंग फॉर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन.." .

आता लवकर काहितरी निर्णय घेणे भाग होते . प्रमुखांनी स्वताला कसेबसे सावरले . आपल्या पुढ्यातला स्पिकर त्यांनी ऑन केला . ते बोलु लागले .

" T- 333 , धिस इज द चीफ ऑफ द मिशन फिनीक्स . द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर यु इज , धिस मिशन हॅज बीन टर्मिनेटेड . स्टार्ट द सेल्फ डिस्ट्र्क्शन प्लान नाउ . "

" रॉजर दॅट ."

"आय रिपीट , गो अहेड फॉर द सेल्फ डिस्ट्र्क्शन ." प्रमुखांनी परत जड आवाजात सुचना केली .

"आय आय सर ."

"ओव्हर अ‍ॅन्ड आऊट ." असे बोलुन प्रमुखांनी पुढ्यातला स्पिकर ऑफ केला . मिबीन आता शांतपणे खुर्चीखालुन बाहेर आला .

किवागो योद्ध्यांच्या दिशेने सरकणारा तो अजस्त्र महाकाय मनुष्य अचानक जागच्या जागी थांबला . त्याच्या डोळ्यांतुन बाहेर पडणारे प्रखर प्रकाश किरणही आता बंद झाले होते . किवागो योद्धे जरा सावरुन त्याच्याकडे बघत होते . मनातल्या मनात आपल्या टोळीच्या किवारा देवाचा ते धावा करत होते . या अमानवी संकटातुन आता तोच आपल्याला वाचवेल अशी त्यांना शेवटची आशा होती .

त्या अजस्त्र मनुष्याने अचानक आपल्या डाव्या मनगटावर असलेल्या यांत्रिक कळीवर दाब दिला . समोरच्या किवागो योद्ध्यांकडे पाहुन तो पुटपुटला .

"आय विल बी बॅक ."

त्याच्या नुसत्या पुटपुटण्यानेही किवागो योद्धे घाबरुन परत मागे सरकले . तो आवाज त्यांच्या कानात चांगलाच घुमला .

पुढच्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला . त्या अजस्त्र महाकाय मनुष्याच्या शरीराच्या पार चिंधड्या उडाल्या . त्यामधुन धातुंचे असंख्य तुकडे उडुन इकडे तिकडे विखरुले गेले . त्याच्या शरीराचे अनेक भाग दुरवर जाउन पडले .

आपल्यावर चालुन आलेल्या राक्षसाचा नाश झालेला पाहुन किवागो योद्धे खुश झाले . आनंदाने बेभान होउन ते विजयोत्सव साजरा करु लागले . ही आपल्या किवारा देवाचीच किमया असे समजुन ते आकाशाकडे हात करुन देवाचे आभार मानु लागले .

किवागो योद्धे आनंदाने बेभान होउन नाचत होते . विजयोत्सव साजरा करत होते .

दुरवर एका दगडांच्या ढिगाखाली दोन यांत्रिक दिवे बराच वेळ लुकलुकत होते .

-------------- समाप्त --------------- काल्पनीक ------ एका गाजलेल्या चित्रपटावर आधारीत फॅन फिक्शन -------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

10 Apr 2017 - 9:21 pm | जव्हेरगंज

जबरी हो!
भारी कल्पना!!!

बादवे, कोणता चित्रपट?

अमु१२३'s picture

11 Apr 2017 - 11:09 am | अमु१२३

..

मस्तच जमलीय हो सिरुसेरीजी,
खूप आवडली.
लिहित राहा आपण, शुभेच्छा.

रुपी's picture

11 Apr 2017 - 2:04 am | रुपी

जबरी कथा! आवडली.

पुंबा's picture

11 Apr 2017 - 10:46 am | पुंबा

भारी कथा..

छानच आहे ! पण अशीच म्हणजे संपूर्ण नाही पण याच्याशी थोडंसं सार्धम्य असणारी संकल्पना माझ्या मनात रुळत होती. त्यावर थोडं लिहिलंही होत. आता हा विषय येऊन गेल्याने लिहिता येणार नाही याच वाईट वाटतंय.

जगप्रवासी's picture

12 Apr 2017 - 1:01 pm | जगप्रवासी

लिहा तुम्ही

सुमीत's picture

11 Apr 2017 - 3:26 pm | सुमीत

आवडली कथा, अस्ताला विस्ता

अत्रे's picture

12 Apr 2017 - 5:55 am | अत्रे

कथा आवडली!

बादवे इतर सर्व वाक्ये इंग्रजीत बोलणाऱ्या प्रमुखाचे "हे केवढ्याला पडलं आपल्याला" हे मधेच मराठीतले वाक्य वाचून हसू आलं. म्हणजे कोणी हॉलिवूड पात्र ते एकदम मराठी मध्यमवर्गीय माणूस :)

हा हा हा . कथेतला हा टायपो लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद . मराठी आणी ईंग्रजीचा ताळमेळ साधताना कसरत झाली .

जगप्रवासी's picture

12 Apr 2017 - 1:04 pm | जगप्रवासी

अत्रे म्हणाले तसे नेमकं तेच वाक्य वाचून मी ही हसलो "आपल्याला केवढ्याला पडला"

एस's picture

12 Apr 2017 - 1:41 pm | एस

छान कथा.

सिरुसेरि's picture

12 Apr 2017 - 3:42 pm | सिरुसेरि

आपणा सर्वांचे खुप आभार .

पैसा's picture

12 Apr 2017 - 4:07 pm | पैसा

मस्त कथा!

मितान's picture

12 Apr 2017 - 4:28 pm | मितान

मस्त!

मराठी कथालेखक's picture

12 Apr 2017 - 4:47 pm | मराठी कथालेखक

पण संवाद मराठीतून मराठीतून असायला हवे होते.. कथानकातले पात्र जरी परदेशी असतील तरी वाचक देशी असल्याने संवाद मराठीतून असावेत असे मला वाटते.

सिरुसेरि's picture

3 May 2021 - 3:19 pm | सिरुसेरि

टर्मिनेटर / TERMINATOR