साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!
जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!
एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?
फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!
सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!
—सत्यजित
प्रतिक्रिया
9 Apr 2017 - 5:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
पडली का घशाला कोरड आहे?
चखण्याचा तेवढा आधार आहे
प्यायली होती विदेशी काल येथे
आज देशीही का महाग आहे?
एकही बार कसा सापडेना
हा कोणता जणू महामार्ग आहे?
फूंकतो आहे कधीचा धूर मीही
खिशात माझीया गायछाप आहे!
सारखा हिंदाळतो हा प्राण माझा
त्या सूलाची वाईनही चवदार आहे!
~~~~मद्यजित (पैजारबुवा)
9 Apr 2017 - 5:12 pm | अभ्या..
अगागागागागागागा
पैजारबुवा रॉक्स अगेन अँड अगेन.
.
तुस्सी ग्रेट हो म्हाराजा
9 Apr 2017 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा
@सारखा हिंदाळतो हा प्राण माझा
त्या सूलाची वाईनही चवदार आहे!
~~~~मद्यजित (पैजारबुवा)›››
9 Apr 2017 - 6:39 pm | सत्यजित...
चांगभलं...!
पुढच्या वेळी काफिया इ. सांभाळला तर मजा येईल विडंबनाची!
तसा 'या' विषयात जरा तोल गेला ते ठिकै!
9 Apr 2017 - 7:17 pm | जव्हेरगंज
9 Apr 2017 - 8:20 pm | शार्दुल_हातोळकर
9 Apr 2017 - 8:21 pm | शार्दुल_हातोळकर
9 Apr 2017 - 5:32 pm | प्राची अश्विनी
गझल आवडली.
9 Apr 2017 - 6:42 pm | सत्यजित...
धन्यवाद!