एका बोक्याची गोष्ट - भाग ४

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जनातलं, मनातलं
16 Mar 2017 - 6:22 pm

एका बोक्याची गोष्ट - भाग ४
हा भाग समजण्यासाठी मी आमच्या मांजरांची वंशावळ देत आहे.
****वंशावळ क्रमांक १ ****
१. आमचा बोका - त्याचे नाव "बाबू"
पांढरा रंग पण मानेवर पाठीवर केशरी आणि शेपटी केशरी.
२. बाबूने बोलावून आणलेली एक मांजर अर्थात त्याची धर्मपत्नी - "अक्का"
पूर्ण पांढऱ्या रंगाची मांजर.
३.बाबू आणि अक्काची एका वयाची ४ पिल्ले -
(१) वाघोबा -अंगावर केशरी पट्टे असलेला बोका
(२)बाळू- पूर्ण सफेद, डोळे पिवळे असलेली भाटी
(३)निळू- पूर्ण सफेद, एक डोळा निळा, एक डोळा हिरवा असलेला बोका
(४)काळू- अंगावर काळे पट्टे असलेला बोका

**** वंशावळ क्रमांक २ ****
हेमा -- मोनिका -- अक्का
(१) १० वर्षापूर्वी आमची १ अतिशय लाडकी मांजर होती, तिचं नाव हेमा - पूर्ण पांढरी आणि निळे डोळे
(२)हेमा एकच वर्ष जगली, तिचं पिल्लू मोनिका -
मोनिकासुद्धा पूर्ण पांढरी आणि एक डोळा निळा आणि एक हिरवा असलेली होती.
(३)मोनिका ८ वर्षे जगली. तिने घातलेल्या अनेक पिल्लांपैकी एक म्हणजे अक्का...
हीच अक्का आमच्या बाबूने बोलवून आणलेली आहे.

एका बोक्याची गोष्ट - भाग ४
मुक्या प्राण्यांच्या भावना किती उत्कट असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा बोका. थोडं वयात आल्यानंतर बोका मांजरीच्या शोधात फिरायला लागतो हे आपल्याला माहिती आहे. पण एके दिवशी आमच्या बोक्याने एका मांजरीला घरात बोलावून आणायला सुरूवात केली. ही मांजर पूर्ण सफेद रंगाची आहे. आणि तिच्या साठी तो स्वतः उपाशी राहू लागला. ती मांजर अन्नासाठी दिवसातून १०-१२ फेर्या मारु लागली. अन्नासाठी तिचे होणारे हाल खरंच कष्टदायक होते. बर्याच लोकांची मांजर म्हणजे उंदीर मारणारा प्राणी एवढीच मानसिकता असते. मांजराला रात्री उपाशी ठेवले तरच ते उंदीर पकडतं असाही एक समज आहे.
अशा गैरसमजातून त्या मांजरीला पोटभर अन्न मिळत नव्हते हे नक्की. हे बघून शेवटी आईने त्या मांजरीलाही जेवायला घालायला सुरूवात केली. खरंतर अशी अनेक
उपाशी मांजरे आमच्या बोक्याच्या ताटातला उरलेला भात खाऊन जगत होती. पण या मांजरीला आम्ही स्वतः जेवायला घालू लागलो याचं आणखी एक कारण आहे. त्या मांजरीच्या मालकिणीने तिला एका क्ष व्यक्ती कडून आणले होते. अर्थात त्या क्ष व्यक्ती कडे त्या मांजरीची आई होती. तिचं नाव मोनिका.
त्या क्ष व्यक्तीला देखील मांजरांची खूप आवड होती. मोनिका ही सुद्धा पूर्ण सफेद रंगाची आणि एक डोळा निळा- एक डोळा हिरवा अशी मांजर होती. मी हे सगळं सविस्तर सांगतेय कारण जवळजवळ १० वर्षापूर्वी मोनिकाचा जन्म आमच्याच घरात झाला होता. हो, मोनिकाची आई आमच्याकडे होती. शुभ्र पांढऱ्या रंगाची, दोन्ही डोळे निळे असलेली होती. तेव्हा मी माझा भाऊ खूप लहान होतो. त्या निळ्या डोळ्याच्या मांजरीची आम्हाला खूप ओढ होती. पण दुर्दैवाने तिचा फारसा सहवास आम्हाला लाभला नाही. आमच्या डोळ्यादेखत ३ कुत्र्यांनी मिळून तिला मारलं. आता तिची फक्त २ पिल्ले उरली होती - मोनिका आणि तिचा भाऊ. मोनिकाला आम्ही क्ष व्यक्तीकडे आधीच देऊन टाकले होते. नंतरच्या काही दिवसांत मोनिकाचा भाऊही विषबाधा होऊन मेला आणि आमच्याकडची मांजरं संपली. नंतरचे कितीतरी दिवस कुठलीही पांढरी वस्तू दिसली तर आमच्या मांजरीचा भास व्हायचा. पुन्हा कधीही मांजर न पाळायचं ठरवलं होतं आम्ही. पण
४ वर्षापूर्वी हा बोका आणला आणि त्याने पुन्हा एकदा आमच्याच मांजरीच्या वंशजाचं घरात आगमन करुन दिलं. हेच कारण होत ज्यामुळे या मांजरीला आई स्वतः जेवायला घालू लागली. याचा परिणाम असा झाला की तिने तिच्या घरी जी तिची ४ पिल्ले होती ती आमच्या घरी आणून ठेवली.
आता असं म्हणतात की बोका मांजरीच्या पिलांना विशेषतः त्या पिलांमध्ये जे बोके असतील त्यांना मारतो. उलट आमचा बोका आणि ती मांजर दोघेही एकत्र बसून त्या पिल्लांची राखण करत असत. ती पिल्ले घरापासून जरा लांब गेली तर हा बोका त्या पिल्लांना बोलावून आणतो अगदी आजही. त्या पिल्लांच्या बापाचा रोल तो आजही निभावतोय. आज त्या पिल्लांची आई त्यांना जवळ घेत नाही, ओळखही दाखवत नाहीये - असं का तेही मी पुढे सांगणार आहे. पण हा पठ्ठ्या मात्र मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करतोय. त्यांना कोणी मारायला आलं तर हा लगेच धावत सोडवायला जातो.
ती पिल्ले २ महिन्यांची झाल्यानंतर त्यांची खरी मालकीण त्यापैकी २ पिलांना न्यायला आली आणि आम्ही ती दिली. आता आमच्याकडे २ पिल्ले आहेत. त्यांची नावे बाळू आणि वाघोबा. त्यांचे वय १ वर्ष २ महिने आहे अन् बाळूची २ पिल्ले आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे बाळूचे एक पिल्लू शुभ्र पांढरे आणि निळ्या डोळ्यांचे आहे. बाळू, वाघोबा आणि त्यांच्या आईच्या आणखी गोष्टी आहेत ज्या मी पुढील भागात सांगणार आहे.

https://www.facebook.com/ilovecatsbynilam/
इथे तुम्हाला बाळू अन वाघोबाचे फोटो बघायला मिळतील.
यु ट्युब वर एक चॕनेलही आहे. त्याच्या काही लिंक खाली देतेय.
Title:None,Content:https://youtu.be/UHr5tfa-e0w
https://youtu.be/Hpp59exHS3A
https://youtu.be/JgFj3_Bo3tY
https://youtu.be/aGRGMvxZ_K4
https://youtu.be/gguac8tXGRs
https://youtu.be/-d4ozTd2b5Y
https://youtu.be/wyCRKbqiyMs
https://youtu.be/rg28gp6WJhM
https://youtu.be/92GRD2CJeYg
फेसबुकलाच watch video अशी लिंकदेखील आहे

कथाअनुभव

प्रतिक्रिया

सप्तर्षीच्यां मांजरा नंतर तुमचेच मांजर आंजावर फेमस होणार आहेत.
येऊ द्या अजुन किस्से.!

सानझरी's picture

16 Mar 2017 - 6:47 pm | सानझरी

लोल.. ठ्ठोsssss..
वारले मी..

बाबू-अक्कांच्या पूर्वजांविषयी काही नवलविशेष?

ते शापित गंधर्व आणि अप्सरा होते बहुतेक.
रात्री ओली मटणपार्टी झाल्यावर सकाळी गंधर्वाचे डोके धरले. त्याला देण्यासाठी गवतीचहाएवजी दुर्वासांच्या कुंडीतील दुर्वा अप्सरेने उपटल्या तेंव्हा त्यांना शाप मिळाला. एखाद्या ख्यातनाम मराठी संस्थळावर वादग्रस्त प्राणीमत्वे म्हणून जेंव्हा उध्दार होईल तेंव्हा समस्त मार्जारकुळाला सद्गती मिळेल असा उ:शाप होता.
आलीय ती वेळ आदूबाळा, आलीय ती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2017 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) भारी प्रतिसाद.

-दिलीप बिरुटे

सुखी's picture

16 Mar 2017 - 10:52 pm | सुखी

जबरी प्रतिसाद

शलभ's picture

17 Mar 2017 - 12:38 am | शलभ

खतरनाक...;)

संजय पाटिल's picture

17 Mar 2017 - 10:22 am | संजय पाटिल

हसून लोळलो...

खेडूत's picture

16 Mar 2017 - 6:41 pm | खेडूत

जब्बरदस्त.
हा भागही खूप आवडला. तुम्ही सरावानेच त्यांना ओळखू शकत असणार. की त्यांच्या गळ्यात रिबीन्,लेस इ. लावता?

निलम बुचडे's picture

16 Mar 2017 - 10:41 pm | निलम बुचडे

हो ओळखता येतात. रंग एकसारखा असला तरी चेहर्याची ठेवण वेगवेगळी आहे. कधीकधी गफलत होते. पण आवाजावरुन पटकन ओळखता येतात. प्रत्येकाची म्याव करण्याची पद्धत म्हणजे स्वर, पट्टी वेगवेगळी आहे. रिबन, लेस गळ्यात ठेवतच नाहीत, लगेच काढून टाकतात.

लैच म्हंजे लैच जिव्हाळ्याचा विषय आहे, वाचतोय,
वाघ जातकुळीतला आणि तरी पाळायला सर्वात सोपा प्राणि
एका वेळी / काळी घरात १२ ते १७ मांजरं सुखासुखी सांभाळलेला आणि मी

@ खेडुत - घरातली मांजरे, त्यांच्या बसायच्या जागेवरुन ओळखण्याची पद्धत आहे बहुमार्जारी घरांमध्ये. अर्थात प्रत्येकाचे आवाज आणि फार सवयीचे असतील तर
पंजे आणि नखाने ओरखडणे देखिल वेगळे ओळखता येते.

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2017 - 8:09 pm | मराठी कथालेखक

१२ ते १७.. अरे बापरे.. तुमचे अनुभव पण लिहा ना

जव्हेरगंज's picture

16 Mar 2017 - 7:30 pm | जव्हेरगंज

पळत येऊन आधी तुमचाच लेख वाचणार!!

Runct

मांजर डोक्यात जातात. कोणाला हवी आहेत का आमच्या इमारतीत कमीत कमी ६ तरी आहेत. हवी आसल्यास घेउन जा(मालकांच्या नकळत)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2017 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहा पिलं जर का कुणाकडे गेली तर किमान तीन लेखमालिका याव्यात असं अपेक्षित आहे का तुम्हाला ?
तसं असेल तर नेऊ नेऊ सोडा ही मांजरं असे वाटते. बाकी, मांजरं माझ्याही डोक्यात जातात.

-दिलीप बिरुटे

भीमराव's picture

16 Mar 2017 - 10:18 pm | भीमराव

आमच्याकडे पण १ बोका आहे, तो ना छान छान लेखमालीका लिहीतो

टवाळ कार्टा's picture

16 Mar 2017 - 10:31 pm | टवाळ कार्टा

अय्या .....कित्ती ग्गोड नै

किसन शिंदे's picture

16 Mar 2017 - 11:25 pm | किसन शिंदे

बोकायन. एक जाडजूड पुस्तक होऊ शकेल या बोकायनावर.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 Mar 2017 - 11:40 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

निलम ,आमच्याकडे ही २००९ ते २०१६ पर्यंत २० च्या वर मांजरे पाळुण झाली,त्यामुळे लेखाशी रिलेट करु शकतो.लेख छान आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 Mar 2017 - 11:41 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

या पुढे मांजर न पाळायचे ठरवले आहे.

शैलेन्द्र's picture

16 Mar 2017 - 11:44 pm | शैलेन्द्र

दम आहे, आणि लागतोय पण

शैलेन्द्र's picture

16 Mar 2017 - 11:44 pm | शैलेन्द्र

दम आहे, आणि लागतोय पण

शैलेन्द्र's picture

16 Mar 2017 - 11:44 pm | शैलेन्द्र

दम आहे, आणि लागतोय पण

शैलेन्द्र's picture

16 Mar 2017 - 11:45 pm | शैलेन्द्र

दम आहे, आणि लागतोय पण

गामा पैलवान's picture

17 Mar 2017 - 3:48 am | गामा पैलवान

अभ्या..,

त्याला देण्यासाठी गवतीचहाएवजी दुर्वासांच्या कुंडीतील दुर्वा अप्सरेने उपटल्या

काहीही हं अभ्या..! कुंडीतल्या दुर्वा उपटून चहात टाकायला अप्सरा काय डंब ब्लाँड होती? ;-)

आ.न.,
-गा.पै.

सानझरी's picture

17 Mar 2017 - 10:59 am | सानझरी

लोल...

फक्त खुर्चीतून पडायचा राहिलो आहे.

लोथार मथायस's picture

19 Mar 2017 - 4:16 am | लोथार मथायस

मिपावर सुरु झाली असे आधी वाटले पण हा वेगळा बोका आहे