एका बोक्याची गोष्ट - भाग ३

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जनातलं, मनातलं
15 Mar 2017 - 3:28 pm

एका बोक्याची गोष्ट - भाग ३
* विशेष सूचना - ही एका बोक्याची गोष्ट नसून सत्यकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. *

वाचकांच्या प्रतिक्रियेतून एक सूचना मिळाली की 'आमच्या बोक्याला काय वाटतं' ते लिहा. या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!!! कारण मी हे विसरुनच गेले होते की त्याला काय वाटतं हे देखील आमच्या कुटुंबातील माणसांना समजतं.
हिवाळ्यातला एक किस्सा सांगते. थंडीच्या दिवसांत सकाळी आम्ही सगळे कुटुंबिय आणि आमचा बोका आमच्या अंगणात उन्हाला बसलो होतो. थोड्या वेळाने आमचा बोका पप्पांकडे बघून म्याव म्याव करायला लागला. खरंतर त्याला भूक लागल्यास तो कधीही म्याव म्याव करत नाही. भूक लागली की तो सरळ आमच्या स्वयंपाकघरात त्याच्या जेवणाच्या जागेवर जाऊन गप्प डोळे मिटून बसतो. त्यामुळे हा पप्पांना काहीतरी सांगतोय हे आम्हाला समजलं. पप्पा त्याच्या जवळ गेले तरी त्याचं म्याव म्याव चालूच. मग आम्ही पप्पांना त्याच्यापासून थोडं लांब बाजूला जायला सांगितलं मग तो गप्प बसला. याचं कारण आम्हाला कळेना म्हणून परत त्यांना जवळ यायला सांगितलं तर ह्याचं म्याव म्याव परत सुरू झालं. शेवटी पप्पांच्या लक्षात आलं की त्यांची सावली बोक्यावर पडत होती त्यामुळे त्याला ऊन लागत नव्हते. तो पप्पांना सांगत होता की तुम्ही माझ्या आडोशाला उभे राहू नका, मला ऊन हवय. हे निश्चित करण्यासाठी आम्ही प्रत्येकजण त्याच्या आडोशाला उभे राहून बघितले तर तो प्रत्येकाकडे बघून तसंच म्याव म्याव करत होता. तो आख्खा हिवाळा आम्ही रोज सकाळी हाच खेळ खेळत असायचो.
*आता दुसरा किस्सा - रात्रीच्या वेळी आम्ही सगळे टीव्ही बघत बसलो होतो. हा बोका माझ्या भावाच्या मांडीवर जाऊन बसला. भावाने त्याला हळूहळू थोपटायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्याने थोपटायचे थांबवले तर तो म्याव म्याव करायला लागला. आता तुम्हाला कळलंच असेल की त्याला काय सांगायचे होते. ;-)
*तिसरा किस्सा - आमच्या बोक्याचं आवडतं जेवण म्हणजे भाजलेला गोलमा आणि भात. पण कधी कधी त्याला कच्चा गोलमा खायची देखील लहर येते.
ते देखील तो व्यक्त करतो. :-)

http://www.misalpav.com/node/39168
एका बोक्याची गोष्ट भाग २

कथाअनुभव

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2017 - 3:56 pm | संजय क्षीरसागर

आगामी थंडीसाठी बोक्याला स्वेटर शिवा म्हणजे कुणाला उठायला लागणार नाही.

दुसरा विनोद फार आवडला ! आता बोक्याच्या मांडीवर बसलं तर काय होतं ते कळवा.

गोलमा हा काय प्रकार असतो ? त्यापेक्षा बोक्याला काश्मीरी पुलावची सवय लावा त्याचं सौंदर्य आणखी खुलून येईल.

टवाळ कार्टा's picture

15 Mar 2017 - 4:14 pm | टवाळ कार्टा

सर इथे झाडू फिरतोय....वॉच लावलाय...मी पळतो :)

कपिलमुनी's picture

15 Mar 2017 - 4:43 pm | कपिलमुनी

बोक्याला आडोशाला जायचा असल्यास तो काय सांगतो ??

म्हणजे .... "सगळ्यांनी डोळे झाका"

टवाळ कार्टा's picture

15 Mar 2017 - 5:46 pm | टवाळ कार्टा

३ दाच का?

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2017 - 8:07 pm | संजय क्षीरसागर

"१) सगळ्यांनी २)डोळे ३) झाका"

किसन शिंदे's picture

15 Mar 2017 - 5:19 pm | किसन शिंदे

पांचटपणा सगळा

टवाळ कार्टा's picture

15 Mar 2017 - 5:45 pm | टवाळ कार्टा

हेच गोग्गोड शब्दात लिहिले कि आमचे प्रतिसाद उडतात

पैसा's picture

15 Mar 2017 - 5:41 pm | पैसा

1

सरल मान's picture

15 Mar 2017 - 5:54 pm | सरल मान

पण पहिला भाग सापडत नाही, २ आणि ३ मिळाले. बोक्यान्चे भाव विश्व समजायाला नक्कीच मदत होतेय....येउ द्यात अजुन...

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 7:46 pm | निलम बुचडे

http://www.misalpav.com/node/33524
एका बोक्याची गोष्ट - भाग १

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 6:46 pm | निलम बुचडे

माझ्या लेखांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व !!! ज्यांना कुणाला हे लेखन आवडत नसेल त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगावे. उगीच टोमणेबाजी करुन स्वतःवरच्या संस्कारांचे प्रदर्शन करु नये. मला ही टोमणेबाजी आवडलेली नाही हे मी स्पष्ट शब्दांत सांगतेय. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण चूक म्हणतो त्यावेळी बरोबर काय हे देखील आपल्याला सांगता आले पाहिजे, चूक म्हणणे खूप सोपे असते पण दुरुस्ती सुचवणे कठीण. मी जे काही लिहीतेय ते प्रामाणिकपणे लिहितेय. जे आमच्या घरात घडून गेलय त्याचे साक्षीदार फक्त मी आणि माझे कुटुंबियच आहेत.बाकी कोणी विश्वास ठेवा अगर ठेवू नका. ज्या गोष्टी वर आपला विश्वासच नाही अशा गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यात काय अर्थ आहे तीसुद्धा टोमणेबाजीच्या रुपात ????
मी उद्या पुढचा भाग प्रकाशित करणार आहे. प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत द्या. कारण माझ्यावर स्पष्ट शब्दांत उत्तर देण्याचे संस्कार आहेत, टोमणेबाजीचे नाहीत. बाकी प्रत्येकाने काय करावं हे प्रत्येकाने ठरवावं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2017 - 9:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादही आवडला. लिहित राहा. प्रामाणिक माणसाचं आणि प्रामाणिक अनुभव लिहिणा-यांचं कोणीच नसतं.

बोक्याचा फोटो असेल तर धाग्यात टाका.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 11:19 pm | निलम बुचडे

धन्यवाद सर. कृपया मला फोटो अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन करा.

जव्हेरगंज's picture

15 Mar 2017 - 8:24 pm | जव्हेरगंज

वाचतोय!!

Cat

सानझरी's picture

16 Mar 2017 - 11:08 am | सानझरी

ईमोजी लई आवडला.. :)

विषयांतर करु नका. लेखनाबद्दलच प्रतिक्रिया द्या. माझ्याबद्दल नको.

भारी नाहीये ना.. मग अशा प्रतिक्रिया लिहायचे कष्ट का घेता..
आणि मानसिक वयाचं म्हणाल तर मुक्या प्राण्यांच्या भावना समजायला मनाने खूप लहान व्हायला लागतं. ते सांगून कळणारच नाही. त्या अनुभवातूनच जायला लागतं. कधीतरी लहान व्हायला लागतं.

किसन शिंदे's picture

15 Mar 2017 - 9:19 pm | किसन शिंदे

विषयांतर करु नका. लेखनाबद्दलच प्रतिक्रिया द्या. माझ्याबद्दल नको.

पहिली प्रतिक्रिया लेखनावरच तर होती.

भारी नाहीये ना.. मग अशा प्रतिक्रिया लिहायचे कष्ट का घेता..

मुख्य बोर्डावर धागा टाकला तेव्हा तुमचं काम संपलं, वाचकांना ते चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार आहे ना हो ताई.

आणि मानसिक वयाचं म्हणाल तर मुक्या प्राण्यांच्या भावना समजायला मनाने खूप लहान व्हायला लागतं. ते सांगून कळणारच नाही. त्या अनुभवातूनच जायला लागतं. कधीतरी लहान व्हायला लागतं.

ओके!

शैलेन्द्र's picture

15 Mar 2017 - 9:57 pm | शैलेन्द्र

युद्ध होणार

टवाळ कार्टा's picture

15 Mar 2017 - 10:09 pm | टवाळ कार्टा

हि घ्या आमची शांतीदूत ;)

cat

पैसा's picture

15 Mar 2017 - 10:31 pm | पैसा

टॉमची मैत्रीण वाटतं!

खेडूत's picture

15 Mar 2017 - 10:03 pm | खेडूत

j

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 11:01 pm | निलम बुचडे

भाषा जपून वापरा
माझा आक्षेप चांगल्या - वाईट प्रतिसादावर नाहीये, तर भाषेवर आहे. वाचकांनी कोणतीही प्रतिक्रिया देताना उपहासात्मक भाषा अर्थात टोमणेबाजीचा वापर करु नये. कारण त्या प्रतिक्रिया मिपावरील अनेकजण वाचतात. आणि माझ्या लेखांवर ज्या उपहासात्मक भाषेत प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत त्यावरुन मी एखादा अक्षम्य साहित्यिक गुन्हा केल्याचं प्रतीत होतंय. त्या प्रतिक्रिया वाचून मिपाकरांचे माझ्याबद्दल काय मत बनले असेल याची तुम्हीच कल्पना करा.
वास्तविक मी तर कुठलंही साहित्यिक लेखन केलं नाही, मी तर फक्त सत्य अनुभवकथन केलंय. ज्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाहीय कदाचित, असं मला वाटतंय. तसं असेल तर तुमचा या लेखनावर विश्वास नाही असं स्पष्ट सांगा. बाकी माझं काहीही म्हणणं नाही.

शैलेन्द्र's picture

15 Mar 2017 - 11:09 pm | शैलेन्द्र

मॅडम, हे मिसळपाव आहे, मी इथे 9 10 वर्ष आहे, अनुभवावरून सांगतो, त्रागा करू नका, लोकांना सुधारायला जाऊ नका, तुम्ही काय कसं लिहिलंय ते सोडून द्या, प्रतिक्रियांचाही खिलाडू वृत्तीने आनंद घ्या, काही काळात हे सगळे तुमचे मित्र होतील.

किसन शिंदे's picture

15 Mar 2017 - 11:20 pm | किसन शिंदे

अगदी बरोबर बोललात शेठ

किसन शिंदे's picture

15 Mar 2017 - 11:18 pm | किसन शिंदे

मी तर फक्त सत्य अनुभवकथन केलंय. ज्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाहीय कदाचित, असं मला वाटतंय. तसं असेल तर तुमचा या लेखनावर विश्वास नाही असं स्पष्ट सांगा. बाकी माझं काहीही म्हणणं नाही.

माणसांसारखे जनावरांना भाषेचे ज्ञान नाही पण आपल्या हावभावातून वा कृतीमधून ते समोरच्याला आपल्याला नेमकं काय सांगायचंय ते बरोबर दाखवतात.

वास्तविक पाहता ज्या लोकांच्या घरी आवडीने कुत्री किंवा मांजरी पाळले जातात, त्या सगळ्यांना थोड्याफार फरकाने असेच अनुभव येतात त्यात तुम्हाला आलेल्या अनुभवात नवीन ते काय?

विचारा हवं तर आमच्या गविंना त्यांचा ब्राऊ कसा होता ते, किंवा पैसाताईंना...त्यांच्या मांजरीचे अनुभव.

पण इथे तुमच्या एकूण बोलण्यातून तुम्ही अगदी जगावेगळे अनुभवले आहे असाच सूर दिसतोय आणि त्यातूनही ते ज्या पद्धतीने इथे वाचकांसमोर मांडताय ते प्रचंड बालिश वाटतंय.

असो.

आता कसं बोललात, याला म्हणतात भाषा. या आधीच जर काहीजणांनी अशी सरळ भाषा वापरली असती तर..
मला एवढंच म्हणायचंय की तुम्हाला नेमकं काय सांगायचंय ते सरळ स्पष्ट भाषेत सांगा. उपहास करु नका. कारण माझ्यासारख्या माणसांना उपहासाची भाषा कळत नाही आणि त्या भाषेत बोलताही येत नाही.
आता तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद -
मला आलेले अनुभव हे जगावेगळे नाहीत हे बरोबर आहे आणि ते मांडण्याची पद्धतही बालिश आहे हेही मान्य. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला ते सुधारायचंच आहे, पण मला प्रयत्न तर करु द्या. माणूस चुकल्याशिवाय सुधारणार कसा ? सगळे एकदम अंगावर तुटून पडल्यानंतर सुधारणा तर सोडूनच द्या, काही लिहावंसं सुद्धा वाटत नाही. बाकी तुमच्या या प्रतिसादाबद्दल शतश्ः आभार.

संजय क्षीरसागर's picture

16 Mar 2017 - 11:16 am | संजय क्षीरसागर

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला ते सुधारायचंच आहे, पण मला प्रयत्न तर करु द्या. माणूस चुकल्याशिवाय सुधारणार कसा ?

एखाद्याकडे आवाजच नाही आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली तर लोक किती वेळ ऐकून घेतील ? लोक सांगतायंत की तुझ्याकडे आवाज नाही तरी ती व्यक्ती दडपून गातच राहिली तर काय होईल ? आणि त्या व्यक्तीला हे पटून सुद्धा की आपल्याकडे आवाज नाही आणि आपल्याला गाताही येत नाही, ती व्यक्ती म्हणाली की मी तुमच्यासमोर सराव करुनच गायला शिकेन तर लोक काय करतील?

निलम बुचडे's picture

16 Mar 2017 - 1:40 pm | निलम बुचडे

मी या आधीही म्हटलं होतं की मी काही उत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मिळविण्यासाठी हे सगळं लिहीत नाहीय.
तुम्ही सर्वांनी मला या स्पर्धेत ओढून घेतलंय. मी फक्त माझे अनुभव लिहीतेय. जे साहित्यिक रसास्वादासाठी नसून निखळ आनंदासाठी आहेत. पण ते तुमच्या लक्षातच येत नाहीये त्याला मी काय करु ?

संजय क्षीरसागर's picture

16 Mar 2017 - 2:07 pm | संजय क्षीरसागर

हा पब्लिक फोरम आहे. स्वतःच्या आनंदासाठी घरच्याघरी प्रॅक्टीस करायला ही घ्या तुम्हाला डायरी.

.

औरंगजेब's picture

16 Mar 2017 - 8:46 am | औरंगजेब

100% अनुमोदन

लवकर टाका....

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2017 - 1:37 pm | मराठी कथालेखक

मला वाटतंय माझ्यासारख्या मांजरप्रेमींसाठी हा धागा चांगला आहे.
सामान्यत: पाळिव प्राण्यांची आवड असणार्‍यात जास्तकरुन श्वानप्रेमी असतात. मांजर फारसं हौसेनं पाळलं जात नाही. आणि पाळलं तरी त्याला दूध घालण्यापलीकडे त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवलं जात नाही.
मी फ्लॅटमध्ये रहातो, फ्लॅट दिवसभर बंद असते. मांजर अशा बंद जागेत नीट रहात नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही मला मांजर पाळता येत नाही.
त्यामुळे तुम्ही लिहिलेले किस्से वाचणे मला रंजक वाटते आहे.
फक्त एक सूचना करावीशी वाटते - एकाच धाग्यावर अनेक किस्से येवू द्या.

इतरांनी 'साहित्य' म्हणून या धाग्याकडे नाही पाहिलं तरी चालू शकेलच.

इतरांनी 'साहित्य' म्हणून या धाग्याकडे नाही पाहिलं तरी चालू शकेलच.
मला अगदी हेच म्हणायचं आहे.

मी फ्लॅटमध्ये रहातो, फ्लॅट दिवसभर बंद असते. मांजर अशा बंद जागेत नीट रहात नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही मला मांजर पाळता येत नाही.

अर्रर्रर्र.. आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहतो, पण आमच्याकडे आहे मांजर. ती जाम introvert आहे म्हणून काहीच त्रास होत नाही. मनात आलं तर २० मिंटं बाहेर फिरुन येते.. बाकी पूर्ण वेळ घरातच.. आम्ही खूप घरं बदलली, सगळीच तिसर्‍या मजल्यावरची.. पण प्रत्येक घरी आमच्याकडे मांजर आलीच.. आणि तेही आपणहून..

फक्त एक सूचना करावीशी वाटते - एकाच धाग्यावर अनेक किस्से येवू द्या.

असंच म्हणते..

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2017 - 3:16 pm | मराठी कथालेखक

माझ्याकडे दिवसभर घरात कुणीच नसतं मला वाटत नाही की मांजर एकटं राहू शकेल. झालंच तर मांजराला किचनमध्ये जाण्यापासून अडवणं शक्य नाही (किचनला दार वा पार्टिशन नसल्याने) आणि मांजराचा किचनधला वावर (खासकरुन ओट्यावरचा) , भांड्यात तोंड घालणं वगैरे घरात कुणाला आणि मलाही अजिबात आवडणार नाही. या सगळ्याचा विचार करता मांजर न पाळलेलंच ठीक.
बाकी तुमच्या मांजराचे किस्से पण येवू द्या... मांजराचे स्वभाववैशिष्ट्य (introvert\extrovert )ई ची निरिक्षण लिहू शकाल काय ?

सानझरी's picture

16 Mar 2017 - 3:37 pm | सानझरी

माझ्याकडे दिवसभर आई-बाबा असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. ती introvert असली तरी तरी आम्ही तीला लागतोच. बाहेरचं कोणी आलेलं तिला खपत नाही. बाहेरचं काणी आलं की ती ३-४ तास काहीच बोलत नाही, खाणं-पिणं पण सोडते. आमच्या किचनला पार्टिशन नाहीच्चे, पण ती आजपर्यंत कधी ओट्यावर चढली नाही. माझ्या मांजरीचा स्वभाव जगावेगळा आहे, तीला दुध अजीबात आवडायचं नाही. आत्ता कुठे थोडंसं प्यायला लागलीये. आम्ही आजपर्यंत असंख्य मांजरी पाळल्या, पण कधी कोणी ओट्यावर नाही चढलं. एकदा फक्त आवाज मोठा करून 'नाही' म्हटलं कि ऐकतात ते. (हा व्यक्तिगत अनुभव. मांजरी तितक्या प्रकृती असू शकतात.) आमच्या घरी मुनिया येतात दर वर्षी. तिला एकदा नाही म्हणून सांगितलं तेव्हा पासून ती मुनियांकडे बघत नाही. खिडकीत एक शिंजीर रोज येतो, त्यालाही ती काही करत नाही. बुलबुल, पारवे, चश्मेवाला असे पक्षी रोज येतात बाल्कनीत, पण त्यांना ती काही करत नाही. (ती त्यांना सहज पकडू शकते तरी..)
फक्त ती जाम possessive असल्यामुळे तीला ते बाल्कनीत आलेले खपत नाहीत. तीथेच खाली बसून ती त्यांना तिच्या भाषेत वेगवेगळे आवाज काढून जा म्हणते, आणि तरी ते गेले नाही तर आई-बाबांजवळ नाराजी व्यक्त करते.. हे तीचं घर, तीची बाल्कनी, तीची माणसं.. यात कोणीही आलं कि ती अबोला धरते..
हे अनुभव फार व्ययक्तिक असतात, कुणाला विश्वास बसेल न बसेल.. आणखी लिहीण्यासारखं खूप आहे. पण असो..

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2017 - 4:43 pm | मराठी कथालेखक

तुमचे अनुभव /निरिक्षण इथे मांडल्याबद्दल धन्यवाद
वाचायला मजा आली.
तुम्ही लिहित रहा. कुणाला विश्वास ठेवायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.

सानझरी's picture

16 Mar 2017 - 4:50 pm | सानझरी

धन्यवाद..
एक मजेशीर गोष्ट..
आमची मांजर बकरी असल्यासरखी गवत खाते, म्हणजे फक्त दुर्वा. वरचे तीन पाते फक्त. सकाळी तिला ते दिलं नाही तर घर डोक्यावर घेते.. :ड
(मांजरी पोट ठिक रहावं म्हणून दुर्वा खातात)

मराठी कथालेखक's picture

16 Mar 2017 - 4:59 pm | मराठी कथालेखक

हा हा.. म्हणजे रोजच तुम्हाला दुर्वा आणून ठेवाव्या लागतात तर... सगळ्या ऋतुत मिळतात का ?
बाकी घरचे सगळे गावाला जात असतील तर मांजर सोबत घेवून जाता की ती घराबाहेर राहते ?

हो, सगळ्या ऋतुत मिळतात दुर्वा. आणि आता आम्ही एक दुर्वांसाठी शेप्रेट कुंडी केली आहे, सो नो प्रॉब्लेम.
आम्ही २०१४ मधे हिमालयात फिरायला गेलेलो, त्यानंतर ही घरी आली. २०१४ पासून आम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलो नाहीये. फारफार तर सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येतो. रात्रभर बाहेर आहोत असं कधी झालं नाही. ती जवळ येत नाही त्यामुळे तिला सोबत घेऊन जाणं शक्य नाही. आमच्या सगळ्या ट्रिपा ती आल्यापासून बंद झाल्यात, पण त्याचं आम्हाला काही वाटत नाही. ती आमच्याशिवाय राहू शकत नाही आणि आम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही..
(रच्याकने हीचं नाव आम्ही 'शोनी' ठेवलंय. सारखं सारखं मांजर किंवा ती म्हणायला कसंसंच होतंय.)
आतापर्यंत ज्या असंख्य मांजरी पाळल्यात त्यांना घराबाहेर रहायची सवय होती. त्यामुळे आम्ही दोनेक आठवडे जरी बाहेरगावी गेलो तरी ते बाहेर मजेत रहायचे. पण शोनी घर सोडून राहत नाही. ही आमची पहिलीच अशी मांजर कि जी २४ तास घरातच राहते..

एकाच धाग्यात अनेक गोष्टी नकोत.
असेच वेगवेगळे धागे हवेत. कारण या बोक्याची कन्या 'बाळू'..बाळूची आई आणि तिच्या भावंडांची- अन्य नातलगांची इत्यंभूत माहिती एरवी कशी काय मिळेल?
तर बाळूप्रमाणे बोक्याचे नांवही इथे द्यावे, अन्य मांजरांचीही नांवे- म्हणजे कन्फ्यूजन न होता सलग तीस चाळीस भागांत पूर्ण मालिका बसेल. मला स्वतःला मांजरे फार आवडतात, पण पाळणे शक्य होत नाही. मांजरद्वेष्ट्या आयडींकडे दुर्लक्ष्यच करणे योग्य!

(जाता जाता - आमच्या सदाशिव पेठेत रहाणार्‍या एका कट्टर मांजरप्रेमी मित्राला आम्ही बोक्या म्हणतो. ते का त्याची गोष्टही कधीतरी सांगेनच.)

कविता१९७८'s picture

16 Mar 2017 - 5:14 pm | कविता१९७८

तुम्ही मनातले लिहीताय ही जरी चांगली गोष्ट असली तरीही तुम्ही ही जी काही मज्जा लिहिलिये ती मज्जा ज्यांनी मांजरी पाळली आहेत त्यांना सर्वांनाच अनुभवायला मिळत असेल. आणि ज्यांनी पाळल्या नाहीत त्यांना तरी या गमतीत काही रस नसेल कारण जरा हटके , गमतीशीर किंवा अविश्वसनीय असं काहीच नाहीये यात. आमच्या पार्क मधे मोकाट कुत्री (श्वान) आहेत, एक कुत्री गेट कडी न लावता बंद केले असेल तर एका पायाने (हातासारखा वापर करुन) उघडते आणि बाहेर येते.

निलम बुचडे's picture

16 Mar 2017 - 6:13 pm | निलम बुचडे

खूप मजेशीर गोष्टी वाचायला मिळाल्या. बरं वाटलं. पुढील भागात मी आमच्या बोक्याची संपूर्ण वंशावळच देणार आहे.

अभ्या..'s picture

16 Mar 2017 - 6:35 pm | अभ्या..

पुढील भागात मी आमच्या बोक्याची संपूर्ण वंशावळच देणार आहे.

मस्तच. येऊ द्या आद्यबोक्याला.