एका बोक्याची गोष्ट भाग २

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जनातलं, मनातलं
14 Mar 2017 - 8:46 pm

एका बोक्याची गोष्ट - भाग २
बर्याच वर्षापूर्वी मी ही गोष्ट लिहायला घेतली होती.
ज्या गोष्टीत आमच्याकडे असलेल्या एका बोक्याचा उल्लेख होता. त्यावेळी आमच्याकडे फक्त एकच बोका होता. आज एकूण ६ मांजरे आहेत. आमचा एक बोका सोडला तर इतर ५ मांजरे आम्ही स्वतः आणलेली नाहीत . ती आमच्याकडे कशी आली हे तुम्हाला वाचायला नक्की आवडेल. ही कहाणी मी आता नियमितपणे तुम्हाला सांगणार आहे.
तत्पूर्वी आधीची कहाणी पूर्ण करते, ज्याचा विषय आहे - आमचा बोका... आणि त्याचे बालपण...
तर लहानपणी त्याने दूध पचत नसल्याने ६ महिने दुधाला तोंड लावले नव्हते. त्या ६ महिन्यात केवळ तांदळाची भाकरी आणि पाणी हाच त्याचा आहार होता.
सारखी भाकरी खाल्ल्याने त्याचे पोट बिघडले. तो अक्षरशः मरायलाच टेकला. आमच्या न्हाणीजवळ अंथरूणावर त्याला झोपवले. तिथे एक सुकाट भाजून त्याला भरवले. त्याच्यामुळे तो भरपूर पाणी पिऊ लागला. तो सकाळी उठला आणि पहिल्यासारखा खाऊ पिऊ लागला. पण भाकरी नाही. तेव्हापासून त्याने भाकरी खायची जी सोडली ती आजपर्यंत...
मग त्याने भात सुकाट आणि गोलमा खायला सुरूवात केली.

आम्ही कोकणात राहत असल्याने पावसाळ्यात एकदा तरी आमच्याकडे नदीचे मासे पप्पा पकडून आणतात.
नदीच्या माशांमध्ये क्षारांचे प्रमाण समुद्राच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे नदीचे मासे चवीला अळणी लागतात. तर सांगायची गोष्ट ही की आमचा बोका नदीच्या माशांकडे ढुंकूनही बघत नाही, आता बोला..
समुद्राच्या माशांमध्ये 'सौंदाळे' नावाचे मासेही तो खात नाही. कारण तेही चवीला थोडे अळणी असतात.
त्याच्या समोर मासा ठेवून मी फोटो देखील काढलाय. पण इथे कसा टाकू ते कळत नाहीये.
हे झालं खाणंपिणं. झोपताना त्याला वेगळं अंथरुण दिलेलं आहे जे तो दोन्ही पायाने नीट चेपतो आणि मगच झोपतो. त्याचा हा रोजचा दिनक्रम बघताना खूप मजा येते. आहे ना गंमत !

कथाअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Mar 2017 - 10:58 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम लेख...बोक्याचे भावविश्व अगदी डोळ्यासमोर उभे राहीले...पुढिल भागात बोक्याला काय वाटते ते सुद्धा लिहा...पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

संजय क्षीरसागर's picture

14 Mar 2017 - 11:01 pm | संजय क्षीरसागर

`टंच माझा बोका' असा पुढचा भाग फोटोसकट टाकावा.

आमचा बोका शुद्ध शाकाहारी आहे.
काकडी,टमाटे,मक्याचे कणीस अशे पदार्थ खातो.

टवाळ कार्टा's picture

14 Mar 2017 - 11:27 pm | टवाळ कार्टा

यात श्लेष फक्त मलाच दिसतोय का? =))

नेत्रेश's picture

15 Mar 2017 - 1:30 am | नेत्रेश

तुमच्या प्रोफाईल फोटोमधला बोका लैभारी दीसतोय.

गावाकडच्या नवलेखकांना हतोत्साहीत करण्याचा काही प्रस्थापितांचा क्षीण प्रयत्न पाहुन मिपाकर म्हणुन शरम वाटली. तुम्ही तीकडे लक्ष देउ नका. पुढच्या लेखनास शुभेच्छा.

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 12:55 pm | निलम बुचडे

प्रोफाइल फोटो मध्ये आहे ती आमच्या बोक्याची कन्या 'बाळू'..
बाळू, तिची आई आणि तिच्या भावंडांची गोष्ट मी पुढे सांगणार आहेच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2017 - 1:42 pm | संजय क्षीरसागर

बाळू, तिची आई आणि तिच्या भावंडांची गोष्ट मी पुढे सांगणार आहेच.

अशाच टाईपच्या गोष्टी इथे खुशीबाई सांगत असतात.

त्यांची `पायी केले गं बाई मी अष्टविनायक' ही प्रदीर्घ लेखमाला तुमच्यासारखीच फोटो अपलोड होत नसल्यानं रखडली आहे.

कंजूस's picture

15 Mar 2017 - 8:21 am | कंजूस

भारी आहे व्यक्तिचित्रण.
पुढचे भाग पटापट लिहा. अजून पाच मांजरे म्हणजे ५२ आठवड्यांची मालिका नक्कीच होईल.

( चंट माझा बोका या आगामी वात्रट कथेचे पेटंट टकाकडे आहे. लंडन व्हाया बंगळुरु परतल्यावर लिहिणार आहे तो. इतरांनी लिहू नये. )

कंजूस's picture

15 Mar 2017 - 8:23 am | कंजूस

शेवटची कॅामेंट तुमच्या लेखासाठी नाही हे राहिलं.

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 10:37 am | निलम बुचडे

उत्कृष्ट नवलेखकाचा पुरस्कार मिळावा म्हणून मी हे सगळं लिहितेय, असं नाहीये. गेल्या ४ वर्षात आमच्या घरात जे काही घडलंय तेच लिहीतेय. ही एका बोक्याची गोष्ट नसून सत्यकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
मांजरांवर उकळते पाणी, उकळते तेल ओतणारी, धारदार शस्त्राने जीवघेणा वार करणारी माणसे आमच्या शेजारीच राहतात. अशा माणसांना मांजरांचे कौतुक सांगणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणून मी हे सगळं कौतुक मिपावर खरडतेय. एवढंच !!!
इथे तरी मांजरांवर प्रेम करणारी माणसं मिळतील असं वाटलं म्हणून हा प्रपंच...

लिहा तुम्ही. आम्ही वाचतोय.

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 3:44 pm | निलम बुचडे

धन्यवाद सौरा..

मांजरांवर उकळते पाणी, उकळते तेल ओतणारी, धारदार शस्त्राने जीवघेणा वार करणारी माणसे आमच्या शेजारीच राहतात

अरे बाप्रे! त्यांचा निषेध..!
मिपावरही तसले आयडी रहातात बरे! सांभाळून रहाणे...

निलम बुचडे's picture

15 Mar 2017 - 3:49 pm | निलम बुचडे

हो खरं आहे..
आमच्याकडे मांजरांवर बंदूक चालवणारी माणसं सुद्धा आहेत.
सकाळी घरातून बाहेर पडलेली मांजरं रात्री सहीसलामत घरी येतील याची शाश्वती नसते आम्हाला.

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2017 - 3:59 pm | संजय क्षीरसागर

बोक्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट मिळतंय का पाहा.