ग म भ न ....

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
9 Mar 2017 - 8:31 pm

सकालधरन॓ माय लय आटवत हुती
उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली
बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं
आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन
सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू?
आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का,
रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल”

मी सिकाया गेलो. काल्याकूट पाटीवर सफेत सफेत आक्षरा फटाफट लिवाया सिकलो.
मास्तरीन बोल्ली,” मुला, हुशार आहेस रे तू”
लय बेश वाटलं
मास्तरीन झकास, दूद पाव फसकलास

भंगारपाली बेगी-बेगी करूनशान म्हैनाभर साळ॓त गेलो
येक डाव मास्तरीन बोल्ली, “ आज परीक्षा घेते, आहेस तयार?”
आपुन बोल्लो हाय तय्यार
ती म्हटली, “ ग कशातला?” आपुन बोल्लो “गटारीचा”
ती म्हटली, “ म कशातला?” आपुन बोल्लो “मटक्याचा”
ती म्हटली, “ भ कशातला?” आपुन बोल्लो “भ॓गारचा”
ती म्हटली, “ न कशातला?” आपुन बोल्लो “नालीचा”
ती म्हटली, “ क कशातला?” आपुन बोल्लो “कचऱ्याचा”
ती म्हटली, “ घ कशातला?” आपुन बोल्लो “घंटा-गाड़ीचा ”
दुदासारक॓ सफेत हासून बोल्ली,” अरे बाळा, ग- गणपतीतला, म-मक्यातला, भ-भटजीतला, न- नळातला, क-कमळातला, घ-घरातला”
आपुन मिष्टेक कबूल केली.
मॉप आक्षार॑ सिकलो फुडे ,
काना : काटीवानी, येलांटी : भंगार डिपोच्या गोल छपरावानी, आक्षरावरला टिम्ब : कपालीच्या टिकलीवानी
सवालाची खून म॑जी परश्न चिन्न : भंगार सावडायच्या आकड्यावानी.... आस॓ बर॓च काय काय.....

बापाला आक्षर सिकतो बोल्लो. त्यो मावा थुकून म्हनला " आरं पोरा, आक्षरानं नादावू नग॓स.
म्या बी मॉप आक्षर॓ सिकलो तुज्यावानी. पन आपल्या-तुपल्या भंगार जिंदगीला आक्षरा काय कामाची?
आपल्या जिनगीला रग्गड पुरतोय
तुज्या साळ॓च्या पाटीचा कालाकूट रंग
अक्षराच्या लायनी॓मदली बेवारस खाली जागा
भेटंल त्या छपराची येलांटी
भाडुत्री बाईच्या कपालीच्या टिकलीचं टिम्ब
अन रोजच्या रोटीचा सवाल -....... कचरा सावडायच्या आकड्यावानी आतडं पोखरनारा"

तवाधरन॓ सा॓गतो, पाटी-खडू कड॓ नजर बी मारावीशी वाटत नाय...........

समाजअनुभव

प्रतिक्रिया

खेडूत's picture

9 Mar 2017 - 9:49 pm | खेडूत

असे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहिले असल्याने विशेष आवडली.
त्यावरून आमचीच जुनी शतशब्दकथा आठवली.

अनन्त्_यात्री's picture

10 Mar 2017 - 9:46 am | अनन्त्_यात्री

धन्यवाद खेडूत !

पैसा's picture

13 Mar 2017 - 9:09 am | पैसा

हम्म..