मुलगी झाली

शेवटचा डाव's picture
शेवटचा डाव in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 9:21 am

गावाच्या बाहेर मोरीवर बसलो होतो .तोच खट खट बुलेट चा आवाज करीत पांडुभौ आला . त्याच तोंड उतरेल व्हत .
"कायर काय झाल पांडुभौ
"आर तुझी वहनीची वटी भरली"
"काय सांगतुस मग काय करायच ठरवलय तुला ध्यानात हाय ना शेवटाला पुजीच्या अन आर्चीच्या टायमाला शिजर केलय विहनीच "
"हो ठाव हायर पण आय काय ऐकणार नाय अस वाटतय "
अन मी पुन्हा सिता वहीनीच्या विचारात गुंतलो .आकरा वर्षे झाली पांडुभौ अन सिता वहीनी यांच्या लग्नाला, तशी पांडुभौ अन काकु काका (पांडुभौ चे आई वडील)यांची देखरेख ,शेतीतील कामे, घरात आल्या गेल्याची निट ठेप ,सगळ हसत मुखाने करानारी सिता वहीनी . पहिल्या दिड एक वर्षात पाळना हलवला पांडुभौ अन सिता वहीनीने , अन ज्योती झाली . पण काकुला ज्योती नको दिवा हवा होता . त्यावेळेस पासुन वहीनीचा काकु रागच करायला लागली .पण वहीनी नेहमी हसत खेळत आहे ते काम करायच्या . पुन्हा दोन वर्षानी स्वाती झाली
अन वहीनी जरा नरवसल्या . घरच्या ताणतणावाने पांडुभौ दारुच्या नशे कडे वळला तरीही वहिनी अगदीच स्तिथ मनाने सर्व अगदिच व्यवस्थित चालू आहे आशा अविर्भावात रहायच्या . अधुन मधुन त्यांचे लाल झालेले, सुजलेले गाल ,डोळे त्यांच्यावर पांडुभौ दारु पिऊन मारहान करतो से स्पष्ट दिसायच पण वहीनी कधीही सांगायच्या नाही . दरम्यान वहीनिला पुन्हा दिवस गेलेत त्यांचा चहर्यावर चिंतेची छटा स्पष्ट दिसत होती , अन पुजा झाली तेही शिजर झाल . वहीनीचा त्रास तसा अजुनच वाढला . काका नेहमी वहीनीला मुलीच्या मायेने जोपासत पण काकु पुढे तेही नाईलाज होते . पांडुभौ ने शेतात जाण बंदच केल होत सतत वहिनीला शिव्या देन मारहाण करन चालु असायच , या दरम्यान माझ लग्न झाल वहीनीने मनसोक्त आनंद घेतला . पांडुभौ मात्र घरातला पाहुणा बनुन राहीला . त्या नंतर वहीनिला आर्चना झाली हेही शिजरींग होत वहीनीच्या आशेचा पुर्ण अंत झाला होता, पांडुभौ जो कधी मधी दारु प्यायचा तो रोजच प्यायला लागला . वहिनीच्या या दिवसात होणाऱ्या त्रासाच वर्णन न केलेल बर . अशातच माझ्या सौ गरोदर राहीली वहिनी तिची काळजी मोठ्या बहीनी प्रमाणे घेत.अन मनोमन कामना करत की मुलगाच होऊदे . पण दैव जाणीले कोणी .अन आम्हाला मानसी झाली. मि लगेच मिसेस च्या ऑपरेशन ची तयारी केली
मला आईचा अन सासुबाई चा खुप विरोध होता पण मि वहिनीचे हाल होत म्हणुन माघार घ्यायची नाही हेच ठरवल अन ऑपरेशन करून घेतले.
पांडुभौ ने वहीनीच्या पाचव्या गरोदर पणाची माहीती दिल्यावर मि त्याला मागचे दोन शिजर झालेत त्याची आठवण करुन दिली. आणि ऑबार्शण करायला सांगीतले.
पण काकु ऐकत नव्हत्या ,शेवटी तो दिवस ऊगवलाच डाॅक्टर म्हणाले आईच्या जिवाला धोका आहे पण सर्वच ऐकुन न ऐकल्या सारखे.
डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नाने वहीनी वाचल्या .बाळ ही वाचले.
चार पाच तास वहीनी बेशुद्ध होत्या . मृत्यू शी संघर्ष करत शुद्धीवर आल्या .पण एक वाक्य ऐकल अन संघर्षांत हार मानाला वहिनीने कायमचा निरोप घेतला.
ते वाक्य होत "मुलगी झाली "

कथासमीक्षाअनुभव

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2017 - 11:51 am | मराठी कथालेखक

चांगली कथा...पण ग्रामीण भाषेऐवजी शहरी भाषेत जास्त आवडली असती...

शेवटचा डाव's picture

11 Mar 2017 - 7:29 am | शेवटचा डाव

हा माझा मिपा वरिल पहिलाच लेख
पुढे निश्चीत सुधारणा करन्याचा प्रयत्न करिन

ग्रामिण भागातुन आसल्यामुळे आंगवळणी ग्रामिणभाषा आहे

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 8:04 pm | जव्हेरगंज

ग्रामिण भागातुन आसल्यामुळे आंगवळणी ग्रामिणभाषा आहे>>>> क्या बात है!!!

ग्रामीण भाषेतच लिहीत चला. इथे ग्रामीण भाषेचे चाहते भरपूर आहेत.

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 8:02 pm | जव्हेरगंज

असहमत!

ग्रामिण बाजात वाचायलाच मजा आली असती!!

ज्योति अळवणी's picture

11 Mar 2017 - 1:07 am | ज्योति अळवणी

ओह! अजूनही खरच अशी परिस्थिती आहे. फक्त गावातच नाही तर शहरात देखील

शेवटचा डाव's picture

11 Mar 2017 - 7:36 am | शेवटचा डाव

खरय ताई पण स्रिला खरच पुरषी
अहंकाराने जोखडलय की
स्वताच स्रियानेच स्रियाना जोखडलय याचा विचार करायला हवा

शेवटचा डाव's picture

11 Mar 2017 - 7:36 am | शेवटचा डाव

खरय ताई पण स्रिला खरच पुरषी
अहंकाराने जोखडलय की
स्वताच स्रियानेच स्रियाना जोखडलय याचा विचार करायला हवा

शेवटचा डाव's picture

11 Mar 2017 - 7:37 am | शेवटचा डाव

खरय ताई पण स्रिला खरच पुरषी
अहंकाराने जोखडलय की
स्वताच स्रियानेच स्रियाना जोखडलय याचा विचार करायला हवा

शेवटचा डाव's picture

11 Mar 2017 - 7:44 am | शेवटचा डाव

असाच प्रतिसाद देत चला

अन किपँड मोबाइल वर लेख व प्रतीक्रिया टंकलिखीत करत आसल्यामुळे जरा व्याकरणीय चुका होतात त्या बद्दल क्षमस्व

जव्हेरगंज's picture

11 Mar 2017 - 8:07 pm | जव्हेरगंज

कथाबीज दणकट आहे!

विशेषकरुन शेवट मला आवडला!!

पायाभरणी अजून चांगली करा. वाटल्यास पुन्हा लिहून काढा. चांगली कथा वाया जायला नको असं वाटतं!!

शेवटचा डाव's picture

12 Mar 2017 - 1:14 pm | शेवटचा डाव

ही कथा पुन्हा तर नाही .....पण भरपूर कथा लिहण्याचा मानस आहे

कविता१९७८'s picture

14 Mar 2017 - 5:30 pm | कविता१९७८

छान कथा

पहिला प्रयत्न निश्चितच चांगला आहे..
ही सत्यघटना असेल तर खुपच काळजीच कारण आहे अशी परिस्थिती..

शेवटचा डाव's picture

25 Aug 2017 - 8:25 pm | शेवटचा डाव

हि घटना सत्य आहे की असत्य हे सांगण्याच धाडस होत नाही