('नाही कळले कधी' गाण्याच्या चालीवर आधारित)
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..
तुच ती सुंदरी.. तुच ती सुंदरी..
ऐक ना साजणे
हाक ती साजिरी
तुच माझी सखी
तुच ती सुंदरी..
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..
मंद ते हासणे.. धुंद ते बोलणे..
उतरले अंतरी.. लाजरे चांदणे..
संगतीने तुझ्या.. जडली प्रिती उरी..
तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी..
तुच माझी प्रिया.. तु असे तारिका..
गर्द तार्यांतली.. तु असे चंद्रिका..
पाहता सुर्यही.. लाजला अंबरी..
तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी..
ऐक ना साजणे..
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..(
प्रतिक्रिया
23 Nov 2016 - 11:43 pm | पुंबा
*वरील कवितेची रेसिपी*
साहित्य:साखर 2 वाट्या, एक वाटी गुळ, एक वाटी पिठीसाखर
कृती: पाक एक तारी करून त्यात एक वाटी गुळ आणि 2 चमचे गुलकंद घालावे. हे मिश्रण परातीत काढून छान हलवून घ्यावे. यात एक वाटी पिठी साखर घालून त्याचे लाडू वळून घ्यावेत. कवितेचे लाडू तयार.
23 Nov 2016 - 11:59 pm | चांदणे संदीप
ही पाकृ अंडे घालून करता येईल का? (घालून = वापरून)
Sandy
24 Nov 2016 - 12:11 am | पुंबा
अंडं चालेल पण मग गोडपणा कमी होईल त्यासाठी आणखी एक वाटी पिठीसाखर घालावी.
24 Nov 2016 - 3:26 pm | नाखु
अर्धा वाटी मध आणि दहा बारा बेदाणे कसे विसरलात तेच कळेना !!!!
पाकृ टंकताना सावधानता बाळगणे आवश्यक नाहीतर असे विसरायला होते.
विसराळू विनु
नाखु मनके बेदाणे
24 Nov 2016 - 5:15 pm | नाखु
<ऐक ना भवाने>
होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी..
तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी..
ऐक ना भवाने
हाक ही दबकी
तुच माझी दावणी
तुच ती नाटकी.
होत ही.. खातरी.. खुपसली खंजीरी.. आठवली भिंगरी.. पाहता ही नुरी..
तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी..
मंद ते सम्जणे.. फुंद ते बोलणे..
उमजले नंतरी.. काढते भांडणे..
संगतीने तुझ्या.. नुरली प्रिती उरी..
तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी..
तुच माझी दशा.. तु भासे त्राटीका..
उच्च वादातही.. तु दिसे चंडिका..
पाहता दैत्यही.. लाजला अंतरी..
तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी..
ऐक ना भवाने
होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी..
तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी..
25 Nov 2016 - 3:42 pm | सस्नेह
नाखु काका जोशात !
25 Nov 2016 - 4:19 pm | बोका-ए-आझम
नाखु काकांची गर्लफ्रेंड अरब अाहे?
25 Nov 2016 - 4:23 pm | नाखु
विडंबकांची गर्लफ्रेंड जरब अाहे.
25 Nov 2016 - 8:49 pm | बोका-ए-आझम
आणि आडनाव तिचे परब आहे!
25 Nov 2016 - 8:52 pm | jp_pankaj
=))
25 Nov 2016 - 7:53 pm | पिलीयन रायडर
=))
फारच हसवलत आज!!!!
25 Nov 2016 - 8:47 pm | आदूबाळ
याच डंगरीबद्दल चर्चा सुरू आहे का?
25 Nov 2016 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा
@डंगरी››› लै दिसानी ऐकला हा शब्द!
27 Nov 2016 - 1:06 am | शार्दुल_हातोळकर
अगाबाबौ.... जबरदस्त हो नाखु भाऊ.... =))
5 Dec 2016 - 4:59 pm | रातराणी
नाखुकाका रॉक्स!
25 Nov 2016 - 12:40 am | कवितानागेश
हसू कि रडू?
25 Nov 2016 - 2:41 pm | कवि मानव
पार चोता केला राव चांगल्या गाण्याचा
@सोहम - छान गीत !!
25 Nov 2016 - 5:20 pm | सस्नेह
'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच ना हो ?
25 Nov 2016 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच ना हो ? ››› ह्या ह्या.. .. अजून २वर्षांनी हे हितेच नवकवींची विडंबनं पाडताना दिसतील बगा! =))
25 Nov 2016 - 7:08 pm | अत्रुप्त आत्मा
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच ना हो ? ››› ह्या ह्या.. .. अजून २वर्षांनी हे हितेच नवकवींची विडंबनं पाडताना दिसतील बगा! =))
25 Nov 2016 - 8:04 pm | एस
णवकवींना प्रोतसाहाण दिले पाहिजे.
- (जूनकवी) एस.
27 Nov 2016 - 1:04 am | शार्दुल_हातोळकर
छान लिहिले आहे.
29 Nov 2016 - 12:04 am | सोहम कामत
धन्यवाद..
29 Nov 2016 - 12:42 am | सूड
"नाही कळले कधी" हे गाणं आहे?