राम राम!
तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?!
काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे!
आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत.
१. सेक्स चॅट विथ पप्पु अॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल
२. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक
धागा उघडायला जड जाऊ नये म्हणुन केवळ लिंक्स देत आहोत, प्रतिसादांमध्ये व्हिडिओ टाकु!
आणि हो.. अर्धे मिपाकर हापिसातुन चोरुन चोरुन मिपा बघतात हे आम्हाला माहिती असल्याने, एक क्विक समरी सुद्धा इथे देत आहोत.
व्हिडिओ बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटेही आहेत.
१. विंडोज मुव्हि मेकर
हे एक चकटफु आणि चांगल्या दर्जाचं सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही व्हिडिओ एडीटर मध्ये आधी विषयाशी अनुरुप फोटो टाकावे लागतात, मग त्याच्या मागे ऑडिओ फाईल टाकावी लागते. अगदी बेसिक व्हिडिओ बनवायला हे पुरेसं आहे.
पण तुम्हाला हवं असेल तर फोटोंचा सिक्वेन्स बदलणे, टाईमिंग देणे, अॅनिमेशन्स देणे, ऑडिओ फाईल स्प्लिट करणे, तिला फेड इन - फेड आउट देणे इ. कामे करता येतात. फोटोंच्या खाली टेक्स्ट टाकुन त्यालाही खाली-वर-गोल-गोल वगैरे फिरवता येतं. पिक्चर सुरु होताना जशी नावं येतात तसंच करायचं असेल तर ते टेम्प्लेटही उपलब्ध आहेत.
फायदे -
१. वापरायला अत्यंत सोपे आणि सुटसुटीत. युझर इंटरफेस उत्तम
२. ऑफलाईन काम करु शकता. फोटो आणि ऑडिओ असला तर इंटरनेट वगैरेची गरज नाही.
तोटे-
१. सॉफ्टवेअर डालो करावे लागते आणि मग फक्त त्याच लॅपटॉप / कॉम्पुटरवर काम करावे लागते.
२. फार काही हाय-फाय ऑप्शन्स नाहीत. स्क्रिन कॅप्चर फिचर किंवा स्वतःची ऑडिओ लायब्ररी वगैरे उपलब्ध नाही.
२. युट्युब व्हिडिओ एडिटर
युट्युब मध्ये डॅशबोर्डमध्ये गेलात, की क्रिएट मध्ये व्हिडिओ हा पर्याय निवडा. इथे तुम्हाला व्हिडीओ बनवता येतो. सगळी पद्धत वर सांगितली तशीच आहे. फोटो घ्या आणि त्यामागे तुमची ऑडिओ फाईल लावा. इथेही अॅनिमेशनचे पर्याय आहेतच.
फायदे
१. इंटरनेट हाताशी असेल तर काहीही डाऊनलोड न करता जगात कुठुनही काम करता येते. आणि ते तुमच्या अकाऊंट्ला सेव्ह होत रहाते.
२. तुमच्या गुगल ड्राईव्ह मधले फोटो इथे आपोआप लिंक होत असल्याने, अल्बममधुन हवे ते फोटो सरळ व्हिडिओ मध्ये ड्रॅग करता येतात.
तोटे
१. इंटरनेट आवश्यक आहे. ते नसेल तर एडिट कराण्याचे पर्याय कदाचित वापरता येतील पण काम सेव्ह करता येणार नाही.
२. ऑडिओ एडीट (ट्र्म, स्प्लिट, फेड इन-आउट) करण्याचे पर्याय मला तरी अजुन सापडले नाहीत.
ह्या व्यतिरिक्त अजुनही खुप पर्याय आहेत, थोड्या जास्त करामती करायच्या असतील तर इतर सोफ्टवेअरचा आधार घ्यावा लगतो.. आम्ही ते प्रतिसादांमधुन टाकत राहुच.
आपल्या "गोष्ट तशी छोटी..!" उपक्रमात ह्याचा कसा उपयोग करुन घेता येईल?
१. कोणताही लेख ज्यात खुप सार्या चित्रांचा समावेश आहे, तो लेख हिडिओ आर्टिकल मध्ये जास्त भारी वाटेल. जसं की एखाद्या पिक्चरची ओळख करुन देताना, त्या पिक्चर मधले सीन कट करुन मध्ये टाकले आणि त्यावर टिपण्णी केली तर वाचकांना नक्की काय घडले हे इमॅजिन करत बसावे लागत नाही. सेट, मेकप, लोकेशन इ. "दाखवायच्या" गोष्टी व्हिडिओ आर्टिकल मध्ये मस्त उलगडतील.
२. समजा तुम्हाला "रोसेश साराभाई - एक अनवट कवी" ह्यावर बोलायचं असेल, तर रोसेशचा आवाज, शब्दफेक, "मॉमा" अशी आर्त हाक ह्या शब्दातीत गोष्टींना तुम्ही लेखात कसं बरं बसवणार?! अशा वेळेला साराभाईमधला रोसेशचा व्हिडिओ क्रॉप करुन तो वापरला तर विचार करा प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतील त्या कविता! अशी अनेक "रसग्रहणं" अशा पद्धतीने व्हिडिओ क्रॉप करुन होऊ शकतात.
३. ज्या मुलाखती आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन इथे प्रकाशित करतो, त्याच व्हिडिओ शुट करुनही इथे टाकता येतील. किंवा निर्मिती संस्थाची माहिती तिथले काम दाखवुन देता येईल. मेकप आर्टिस्टची मुलाखत असेल तर ती "आर्टिस्ट अॅट वर्क" असेल तरच खुलुन दिसेल. त्याचेही शुटींग अथवा फोटो टाकता येतील.
४. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कठपुतलीचा खेळ बघत असाल आणि पटकन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवत असाल, तर लगे हाथो दोन शब्द त्या कलाकारांशीही बोला. असं मनोगत आणि त्यांच्या कार्यक्रमाचं शुट एकत्र करुन छोटीशी डॉक्युमेंटरी सुद्धा होऊ शकते.
ही झाली काही उदाहरणं! तुमच्या डोक्यातुन अजुन सुपीक कल्पना येतीलच.
फक्त काहीही करताना आपण कॉपीराईटचा भंग होऊ देत नाही आहोत ना, हे जरूर तपासा!
समांतरः-
गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ?
नवीन उपक्रम : गोष्ट तशी छोटी..! - आवाहन
प्रतिक्रिया
18 Nov 2016 - 12:57 am | पिलीयन रायडर
१. सेक्स चॅट विथ पप्पु अॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल
२. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक
23 Nov 2016 - 3:49 am | पिलीयन रायडर
शक्य तिथे सगळीकडे एडिट करुन आता नवा व्हिडिओ अपलोड केला आहे.
आता बघा बरं.. अजुनही अॅडल्ट लिंक्स दिसत असतील तर प्लिझ कळवा. आम्ही अजुन चेक करु.
संपादक - कृपया व्हिडिओच्या साईझ चुकत असतील तर दुरुस्त कराल का?
18 Nov 2016 - 2:50 am | खटपट्या
चांगलंय !!!
18 Nov 2016 - 2:53 am | स्रुजा
नाव नोंदवा खटपट्या भाऊ.
18 Nov 2016 - 5:49 am | खटपट्या
म्हणजे सबस्क्राइब करायचे ना?
18 Nov 2016 - 6:20 am | पिलीयन रायडर
ते तर कराच पण लेखही द्या..
18 Nov 2016 - 12:26 pm | खटपट्या
वर दोन दीलेल्या वीडीओमधे आवाज कोणाचा आहे? छान निवेदन
18 Nov 2016 - 5:56 pm | पिलीयन रायडर
माझा! :)
18 Nov 2016 - 9:20 pm | स्रुजा
हे घ्या लेखांचे विषय : http://www.misalpav.com/node/37981
18 Nov 2016 - 6:04 am | अभिजीत अवलिया
अशा वेळेला साराभाईमधला रोसेशचा व्हिडिओ क्रॉप करुन तो वापरला तर विचार करा प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतील त्या कविता!
--- एक शंका. अशा प्रकारे एखाद्या मिपाच्या मालकीच्या नसलेल्या व्हिडिओचा भाग मिपा युट्युब चॅनलवर वापरणे हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?
18 Nov 2016 - 6:10 am | पिलीयन रायडर
मी असे अनेक व्हिडिओ पाहिलेत ज्यात एखाद्या पिक्चरचे परीक्षण ह्या पद्धतीने केलेले असते. ह्यात आपण जाहिरात करत नसुन समीक्षा करत आहोत, ज्याला हरकत नसावी. शिवाय मिपा कोणतेही आर्थिक व्यवहार करत नाही.
पण तरीही जाणकारांनी माहिती द्यावी. मलाही प्रताधिकारांचे नियम माहिती नाहीत.
18 Nov 2016 - 9:19 pm | स्रुजा
ऑफिशिअल ट्रेलर वापरता यावा असं वाटतंय.
18 Nov 2016 - 6:06 am | कंजूस
फोटो( आणि व्हिडिओ ) मोबाइलमध्ये असतील तर मेमरी कार्ड एलइडी टिव्हीच्या युएसबीत टाकले की काम होते.आपोआप प्ले होतात फोल्डर्स.शिवाय स्लाइडशो अॅपस् आहेत बरीच पाच ते पंचवीस एमबीची.आइफोनात मात्र मेमरी कार्ड नसते. :(
18 Nov 2016 - 6:15 am | पिलीयन रायडर
हो काका.. विंडोज मध्येही फोटो ओपन केला की स्लाईड शो हा पर्याय असतोच.
पण ते व्हिडीओ आर्टीकल नाही. त्यात आपले भाष्य आपल्या आवाजात मागे वाजणे महत्वाचे आहे.
शिवाय अॅनिमेशन्स, ऑडीओ एडीटींग हे ही आवश्यक आहे.
18 Nov 2016 - 7:04 am | कंजूस
अॅनिमेशन्स नाही करता येत ऑडीओ हवा तो फोनमधला टाकता/बदलता येतो. आता कम्प्युटरातून लोक फोनकडे वळलेत. फोनमधले क्यम्रे काय अफलातून आलेत एक टेलिफोटो सोडले तर सर्व छान येतं. एक मुख्य गोष्ट पंधरा मिनिटांचेवर कोणाला आपले फोटो पाहण्यात सहनशिलता संपते. तीन मिनिटात तीस फोटोंचा स्लाइडशो असे चार झाले की जांभया सुरू होतात याचे भान ठेवायला लागते.
18 Nov 2016 - 8:24 am | पिलीयन रायडर
मोबाईल अॅप्स बद्दलही माहिती देणार आहोत काका.
तुम्हाला माहित असलेल्या अॅप्स बद्दलही लिहा.
18 Nov 2016 - 7:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पप्पू आणि पापाचा व्हिडियो बघितला. दिलेला आवाज गोड आहे. उपक्रमास शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
18 Nov 2016 - 7:23 am | कंजूस
एनडीटिव्हीवर पाच/सहाला पाच मिनिटे अगोदर पप्पु/अखिलेश/ममता/मोदी सर्वांचे विनोदी कार्टुनस येतात( ते नंतर वाटसपवर फिरतात)
18 Nov 2016 - 1:35 pm | कंजूस
नाउमेद करण्याचा हेतू नाही परंतू------
ही जी काही अॅप्स होती फोटोंचा स्लाइडशो बनवण्याची त्यामधल्या खास सोयी १) गॅलरीतले फोटो निवडणे, त्यांना दाखवताना सरकवण्याचे निरनिराळे प्रकार निवडणे, किती वेळ स्क्रीनवर दिसेल तो वेळ ठरवणे, २) त्याला मेमरीमधले कोणतेही संगीत मागे वाजेल असे निवडणे ,३) ही एक फाइल म्हणून वेगळी साठवणे.
ही फाईल मग कुणालाही पाठवता येते. ब्लुटुथ/इमेल इत्यादीने.
दोन वर्षांपुर्वी हे सर्व कौतुकपूर्ण असले तरी छोटे स्वस्त एलइडी टिव्ही फुल एचडी (+IPS)आल्यावर या सॅाफ्टवेरचे महत्त्व कमी होत आहे कारण १) टिव्हिच्या युएसबीला कार्ड रीडरमध्ये मेमरी कार्ड टाकले की कधीही स्लाइडशो,व्हिडिओ पटकन बघता येतात. डीजिटल कॅम्राचे कार्डही बसते. २) कोणत्याही सॅाफ्टवेरवर अवलंबून राहावे लागत नाही. ३) टिव्हीचे माध्यम फक्त मेमरी कार्ड वाचते ,त्यात उलट ब्लोट टाकून करप्ट करत नाही, कम्प्यूटरमध्ये तो धोका असतो. ४)कार्डास फार्मॅट करत नाही, ५) टीवी उचलून (२२-२४ इंची) नेण्याइतका हलका असतो. प्रोजेक्टरची गरज नाही पडत. अथवा फक्त युएसबी इक्स्टेन्शन केबल + कार्डरीडर नेऊन दुसय्रा मोठ्या टिव्हिला जोडून सादर करता येते.
वाटसपचा प्रसार झाल्याने एकमेकास फोटो पाठवलेले असतातच तर आपण आणखी चाळीसेक फोटोंचा स्लाइडशो (=२०० Mb च्या आसपास )पाठवण्याचा खटाटोप कशाला करायचा?
ओडिओ टाकण्याबद्दल विशेष काही साध्य होत नसावे. बघणारे थांबवून काहितरी प्रश्न विचारतातच ते सांगावे लागतेच.
18 Nov 2016 - 5:55 pm | पिलीयन रायडर
काका, तुम्ही आम्ही वर दिलेले व्हिडिओ पाहिलेत का? तुम्ही उपक्रमाचा व्हिडिओ पाहिलाय का? हे स्लाईडशो नाहीत.
मुव्हि मेकर किंवा युट्युब हे ही "स्लाईड शो" बनवत नाही.
व्हिडिओ आर्टीकल ही एक लहानशी फिल्म असते. जेव्हा विषय हा वाचण्यापेक्षा बघण्याचा अथवा ऐकण्याचा जास्त असतो तेव्हा लेखापेक्षाही व्हिडिओ जास्त प्रभावी माध्यम असतं. ह्यात तुम्ही नुसते फोटो एकामागे एक लावायचे नाही आहेत, तर एका सिनेमासारखे किंवा माहितीपटा सारखे एका सुत्रात बांधायचे आहेत. फोटोच का? कारण व्हिडिओ सुद्धा वापरता येतोच, पण त्यासाठी शुटींग करणे, तेवढ्या मोठ्या फाईलला एडीट करणे इ. अवघड काम आहे. तुलनेने स्टिल्स मध्ये काम करणं सोप्पं आहे. ह्यामागे "संगीत" वाजत नसुन, तुम्ही स्वतः केलेले नरेशन वाजत आहे. हा थोडक्यात तुम्ही केलेला एकपात्री प्रयोग आहे. पडद्यामागे रहायचं की पुढे यायचं हा तुमचा प्रश्न.
तुम्ही कोणता टिव्ही इकडुन तिकडे उचलुन नेण्याबद्दल बोलताय काहीच कळत नाहीये, आणि कोण मध्येच थांबवुन प्रश्न विचारणारे?
आपण यु ट्युब वर टाकायच्या आर्टीकल्स विषयी बोलत आहोत. आणि ते म्हणजे "स्लाईड शो" नव्हे.
18 Nov 2016 - 6:30 pm | कंजूस
ओके. विषय समजण्यात थोडा गोंधळ झाला. हेतू/उपयोगिता आणि सादरीकरणात फरक आहे.नवीन माध्यम.मुव्हिमेकर अॅप्स आणि स्लाइडशो अॅप्स वेगळी असावीत असं दिसतय. उगाच वेगळं मत मांडलं . अवांतर समजा.
18 Nov 2016 - 5:52 pm | प्रसाद गोडबोले
उपक्रमास शुभेच्छा !
बाकी व्हिडीयो एडिटिंगसाठी अॅडोब प्रेमियर प्रो शिकण्याची मनापासुन इच्छा आहे पण कधी योग येणार देव जाणे !
18 Nov 2016 - 5:56 pm | पिलीयन रायडर
धन्यवाद!
शिकल्यानंतर ह्या सॉफ्टवेअरची माहिती नक्की द्या!
18 Nov 2016 - 6:42 pm | प्रचेतस
उपक्रमास शुभेच्छा.
18 Nov 2016 - 6:48 pm | जयंत कुलकर्णी
मलाही आता बर्याच गोष्टी समजल्यात. धन्यवाद या धाग्याबद्दल. व्हिडिओ आर्टिकल ही संकल्पना आवडली. मी असली आर्टिकल पाहिली होती पण ती बनवायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण हा प्रकार प्रभावी आहे हे निश्चित.
धन्यवाद !
18 Nov 2016 - 6:51 pm | प्रचेतस
ह्या उपक्रमात लघुपट बनवणंही अपेक्षित आहे का किंवा कसे?
वेरूळच्या लेण्यांत तिथल्या शिल्पांवर डॉक्युमेंटरी बनवायचा प्रयत्न आत्मुबुवांनी केला होता. मला वाटतं त्यांचा स्वताचा एक सेल्फी व्हिडीओ देखील बेडसे लेणीतील स्तूपाच्या पार्श्वभूमीवर आहे.
ते एक उत्तम निवेदक आहेत असे येथे नमूद करू इच्छितो.
18 Nov 2016 - 7:38 pm | पिलीयन रायडर
हो, मी सुद्धा तो व्हिडिओ पाहिला होता. बुवा खरंच उत्तम निवेदक आहेत! आणि त्यांना ह्या उपक्रमासाठी गाठायचा आमचा प्लान होताच!
सध्या आम्ही फक्त उपक्रमांच्या विषयाच्या अनुषंगाने विचार करत आहोत. पण अर्थातच उपक्रमानंतर सर्वच प्रकारचे विषय करुन पहायचे आहेत. त्यासाठीच्या लिस्ट मध्ये आपले नाव सर्वात आधी सुचले होते! :) आपल्या कोणत्याही धाग्याचं एका उत्तम माहितीपटात रुपांतर करता येईल... रादर करायचंच आहे.
लघुपट (शॉर्टफिल्म) सुद्धा कुणाला बनवायची असेल तर नक्की प्रयत्न करा. उपक्रम झाला की लगेच चॅनल सर्वांनाच खुले होणार आहे. पण तरीही तुमच्या कल्पना आम्हाला तातडीने कळवा. कदाचित उपक्रमात आणायलाच एखादी आयडीया आम्हाला मिळुन जाईल!
18 Nov 2016 - 9:16 pm | स्रुजा
होय, इथे बुवांचा विचार आम्ही खुप आधीच करुन ठेवला होता.
इथे आपल्या विषयांची यादी आहे : http://www.misalpav.com/node/37981
पिरा म्हणते आहे तसं, हे व्हिडीओ आर्टिकल्स आपल्याला या विषयांसंदर्भात आणायचे आहेत , या उपक्रमासाठी.
नंतर चॅनल खुलं होणार आहे. तेंव्हा करायच्या खुप गोष्टी डोक्यात आहेत, एक तुमच्या शिल्पांचं आर्टिकल करायचं फार दिवसांपासून मनात आहे.
22 Nov 2016 - 10:32 am | कैलासवासी सोन्याबापु
ते एक उत्तम निवेदक आहेत असे येथे नमूद करू इच्छितो
आत्मुबुआ वेदशाळेत शिकलेत न हो? असे असल्यास आपले बुआ उत्तम निवेदक असणे क्रमप्राप्तच म्हणावे लागेल मला. निव्वळ याज्ञकी करणे वेगळे अन वेदशाळेचे शिक्षण वेगळे, मुळात वेद मौखिक परंपरेने पुढे चालत आल्यामुळे वेदवेत्ते मंडळीने त्यांना रचतानाच साऊंड डिझाईन डोक्यात ठेवले होते का असा प्रश्न पडावा इतके ते आश्चर्यकारक रित्या रचलेले आहेत, त्याची घासून संथा घेतल्यावर आवाजात एक वजन येते अन पॉज घेणे, लय वाढवणे इत्यादी नैसर्गिक रित्या जमते असे वाटते
(ह्यात धार्मिक पेक्षा ऐतिहासिक अन अनुषंघिक अभ्यासाचा भाग जास्त आहे हे नमूद करतो)
22 Nov 2016 - 9:32 pm | चतुरंग
मौखिक परंपरेमुळे साउंड डिझाईन त्यात आले आहेच.
हा विडिओ बघा एरहार्ड बंधूंनी म्हटलेला रुद्र. डोळे मिटून ऐका अंगावर काटा येतो!
https://youtu.be/KKwY8OwXN-o
22 Nov 2016 - 11:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
मस्तच आहेत हो एरहार्ड बंधू! मला असा सरारून काटा येतो 'भारत एक खोज' च्या टायटल कार्ड्स ऐकताना, 'पृथ्वी से पहले सत नही था' किंवा 'वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान' ही 2 नासदीय सुक्तांची ट्रांसलेशन असो हिंदीतली तुफान आहेत, एकतर 'व्हॉइड' उर्फ शुन्यावस्था च इतकं शास्त्रोक्त वर्णन किंवा सूर्याचे वर्णन अन उपयोग हे आजपासून हजारो वर्ष अगोदर इतके काटेकोर नोंदवलेले आहेत हेच मला सर्द करून टाकते, त्यात ती दोन्ही अनुवादित सूक्त किंवा ऋचा नीट आरोह अवरोह जपून म्हणले गेलेले अन त्याला वनराज भाटियांचे संगीत! हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु
22 Nov 2016 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा
प्रचेतस, पि. रा, स्रुजा - मी याबाबत हवी ती मदत अगदी अवश्य करीन.
22 Nov 2016 - 10:05 pm | स्रुजा
झकास ! बुवा, लवकरच व्यनि करतो आम्ही.
18 Nov 2016 - 8:05 pm | कंजूस
इकडे लेखात जरा फोटो जास्ती झाले की नेटप्याक गंडतात. व्हिडिओ आर्टिकलच्या प्लेअरच्यापुढे किती MB आहे,किती मिनिटांचा आहे ते दिलं तर मोबाइलच्या नेटवर पाहायचा अथवा वाइफाइवर हे ठरवता येईल. HD video एका मिनिटाचे ८० MBचे असतात.फुल HD 140 MB, VGA 24 MB.फक्त फोटोवाला लेख ब्राउज करायला वाचायला २-४MB.डेटा उडतो.
19 Nov 2016 - 10:33 am | पिलीयन रायडर
हो काका, त्या बद्दलही लिहीतो.
सध्या आमचे मुव्हि मेकर मधले व्हिडिओ खुप हेव्ही आहेत. ३० एम्बी वगैरे. पण त्याच्या प्रोजेक्ट फाईल्स फक्त १०-१५ केबीच्या आहेत. तेव्हा तुम्ही प्रोजेक्ट फाईल दिली तर आम्ही कन्व्हर्ट करुन टाकु शकु बहुदा.
युट्युबमध्ये प्रोग्रेसिव्ह डालो आहे. त्यामुळे जस जसा व्हिडिओ पहाल तसा डेटा खर्च होईल.
व्हिडिओ पहाताना डेटा जाणारे हे मान्य आहेच. पण त्याला पर्याय नाही. आम्ही अजुन हलके फुलके ऑप्शन शोधत आहोतच.
27 Nov 2016 - 1:33 pm | अभिजित - १
ऑ !! काका आहात कुठे ? गोवा राज्य कॅशलेस होणार आहे ३१ डिसेंबर पासून. मोदींचा तर अक्खे भारत कॅशलेस करायचा विचार आहे. आता 3G 4G विथ १ GB कमीतकमी चे कनेक्शन लागणार. न्हावी, वडापाव वाला, रिक्षा , बस , कामवाली , हॉटेल सगळी कडे फक्त आणि फक्त कॅशलेस .. दर महिना ३०० रु नेट कनेक्शनची . अधिक paytm मध्ये पैसे भरायला १ टक्के फी .. तयारी ठेवा ..
माफ करा चुकीची जागा आहे का मेसेजची ? पण मेसेज चुकीचा नाही. परत या टॉपिक वर येत नाहीए .. सॉरी ..
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/less-cash-first-cashless-s... - आधी 'लेस-कॅश', नंतर 'कॅशलेस' होऊ या:
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/goa-will-be-first-state-to... - ३१ डिसेंबरपासून गोवा देशातील पहिले कॅशलेस राज्य
18 Nov 2016 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं उपक्रम. लेखन-वाचनापलिकडे जाउन मराठी उपक्रम चालु होताहेत तेही कुठल्याही नफ्या तोट्याची गणितं नं करता हे खरोखर उल्लेखनिय आहे. :) किप इट अप. मदतीला आहेचं.
18 Nov 2016 - 10:45 pm | एस
फारच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. मनःपूर्वक शुभेच्छा. आम्ही सोबत आहोतच. :-)
18 Nov 2016 - 10:51 pm | स्रुजा
तुमच्याशिवाय होणार च नाहीये हा उपक्रम एस भाऊ. व्हिडीओ आर्टिकल्स बद्दल पुरेशी माहिती दिली आहे , आमच्या मते. तुम्ही तुमचे एक्स्पर्ट कॉमेंट्स पण द्या.
18 Nov 2016 - 10:59 pm | आनंदयात्री
या उत्तम उपक्रमास अनेक शुभेच्छा!
19 Nov 2016 - 4:12 am | कंजूस
दोन वर्षांपूर्वी पक्षांचे आवाज हा ओडिओ असलेला लेख दिला होता.त्यामध्ये फक्त शेअरिंग साइटच्या लिंक्स होत्या पण प्लेअर नव्हते. चांगल्या सिक्यअर शेअरिंग साइट्सही माहित नव्हत्या. त्यानंतर कुणी ओडिओचा प्रयोग केला नाही. गेल्या महिन्याभराततही दोन ओडिओ प्लेअर खरडफळ्यावर दिलेले होते. पण तिकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं.
ज्यांना हे माध्यम जमलं आहे त्यांनी असले ओडिओ/व्हिडिओ लेख देण्याचा सपाटा लावायला हवा. त्यासाठी दूर अजिंठा वेरूळ लेणीच गाठली पाहिजे असे नाही. पाककृतींचे सादरी करण अथवा ओडिओ द्या. वाद्ये वाजवणार्यांनी ओडिओ देण्यास सुरुवात करावी.ओडिओ/व्हिडिओ प्लेअर देण्याचे templates मिपावर मोबाइलमधून फोटो कसे द्यावेत या लेखामध्ये दिलेले आहेतच.
19 Nov 2016 - 8:55 am | पिलीयन रायडर
मिपा युट्युब चॅनलला १०० सबस्क्रिपशन्स झाल्या आहेत हो!!!
आता लोक्स, व्हिडिओ आर्टिकल्स बनवायला लागा बरं झटपट!!
22 Nov 2016 - 9:04 am | जव्हेरगंज
छान माहितपुर्ण लेख!!!
बरीच माहिती मिळाली!!
दोन्ही व्हिडीओ आवडले!!
22 Nov 2016 - 10:15 am | कंजूस
नवीन ओडिओ मिक्स केलेला कोंडेश्वर धबधबा व्हिडिओ ट्राइअल. ( फाइल साइज 2 . 3 MB , 24 SEC )
22 Nov 2016 - 8:09 pm | पिलीयन रायडर
मस्तच!!! २४ सेकंदात फक्त एका उत्तम स्पॉटची माहिती मिळाली. :)
काका, ऑडिओ कसा मिक्स केलात हे ही इथे सांगा ना. इतरांना मदत होईल. तुम्ही वापरत असलेल्या सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा इथे संकलित होईल.
22 Nov 2016 - 8:10 pm | पिलीयन रायडर
*फक्त २४ सेकंदात
22 Nov 2016 - 8:50 pm | jp_pankaj
मस्त हो कंकाका
22 Nov 2016 - 10:44 am | कंजूस
आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो , तेव्हा त्यामधल्या शब्दांचा आढावा गुगल सर्च, युट्युब डेटाबेस घेतो आणि त्याच्याशी संबंधित इतर व्हिडिओ /जाहिराती गुगलकडून दाखवल्या जातात ( त्याचे त्यांना पैसे मिळतात ). हे नवीन नाही.
" सेक्स चॅट विद पप्पु ? " यामधले "सेक्स" आणि "पप्पु" हे दोन शब्द आग्यामोहोळ उठवायला आणि वेचक व्हिडिओजना आमंत्रण देण्यास पुरेसे आहेत इकडे लक्ष द्यावे ही विनंती.
सध्या फेसबुकवर व्हिडिओ टाकून नंतर त्याचा प्लेअर बनवायच्या खटपटीत आहे. फेसबुक अधिक सुरक्षित आहे॥
22 Nov 2016 - 8:05 pm | पिलीयन रायडर
मी स्वतः तीन अकाऊंट्स आणि मोबाईल्/लॅपटॉप, दोन्ही वरुन चेक केलंय. मला कधीही हा त्रास झालेला नाही. जेव्हा मागे मी ही सिरिज पाहिली होती, तेव्हाही "सेक्स" ह्या शब्दामुळे मला काही भलते व्हिडिओ दिसले नव्हते.
कंजुस काकांशिवाय अजुन कुणाला असा अनुभव आला तर प्लिझ कळवा. आम्ही २-३ जणांना विचारलंय वेगवेगळ्या देशातल्या, अजुन कुणालाही असा त्रास नाही.
इन जनरल, युट्युब वर होम पेज वर खाली तुम्ही रिस्ट्रिक्टेड मोड ऑन करु शकता. त्याने असे व्हिडिओ दिसणार नाहीत.अजुन माहिती "पॉलिसी & सेफ्टी" ह्या टॅब मध्ये मिळेल. (सध्या माझा हा मोड ऑफ आहे, पण तरीही मला तसे व्हिडिओ दिसत नाहीत.)
फेसबुक हा ही एक उत्तम पर्याय आहे. पण फेसबुक फक्त प्लेअर म्हणुन काम करतो. युट्युब सारखा व्हिडिओ एडीटर त्यात नाही. मी स्वतः फेसबुकवर लिमिटेड फोटो टाकते, बाकी सर्व गुगलवर सेव्हड असतात. युट्युब गुगलला लिंक्ड असल्याने ते फोटो / व्हिडिओ लगेच ड्रॅग करता येतात. म्हणुनही मला युट्युब जास्त सोयीचे वाटते. आणि योग्य त्या सेटींग असल्या की ते सेफही आहेच. फेसबुकवर सुद्धा अश्लील कंटेंट असतो. तो कुणी रिपोर्ट केला तसेल तर असाच अचानक दिसु शकतो. शिवाय फेसबुकही अशाच पद्धतीने पैसे मिळवते. तसं अॅबसोल्युट सेफ काहीच नसतं.
22 Nov 2016 - 8:20 pm | कंजूस
१)केवळ विरोध करायचा म्हणून तो प्रतिसाद नसून तो फीडब्याक दिला.
२)प्रत्येकवेळी व्हिडिओ बदली होतात.
३) ऑडिओ कसा मिक्स केलात हे ही इथे सांगा ना. इतरांना मदत होईल. तुम्ही वापरत असलेल्या सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा इथे संकलित होईल.
नक्की देतो. फार सोपं आहे. परंतू विंडोज स्टोरवरची दोनचार एमबीची अॅप्स आहेत. डिवेलपरचे नाव देतो त्याचे अॅन्डा्राइडवर शोधा.
नंतर देतो.
22 Nov 2016 - 8:24 pm | पिलीयन रायडर
१. हो, फीडबॅक म्हणुनच घेतला! :)
२. हो. पण जर रेस्ट्रिकटेड मोड असेल तर तुम्हाला अॅडल्ट कंटेंट दिसणार नाही.
३. धन्यवाद! :)
22 Nov 2016 - 8:59 pm | स्रुजा
कंजुस काका, आम्ही एक प्रिकॉशन म्हणुन व्हिडीओ चं नाव बदललंय. आता बघता का जरा , युट्युब चे सजेशन्स बदलले आहेत का?
https://www.youtube.com/watch?v=wGBOwaA_XxU
22 Nov 2016 - 11:03 pm | कंजूस
धन्यवाद! नक्कीच फरक होईल याने. मुलं जेव्हा कार्टून्स पाहतात तेव्हा इतर त्याप्रकारचेच व्हिडिओज झळकत असतील.
23 Nov 2016 - 1:31 am | रुपी
जेव्हा अकाऊंटमधून ळोग-इन करुन किंवा मोबाईल, लॅपटॉपवरुनही व्हिडिओ बघता, तेव्हा आधीच्या ब्राउजिंग हिस्टरीवरुन तुम्हाला रिलेटेड व्हिडिओज दिसतात. पूर्ण हिस्टरी, कूकीज सगळं डिलिट केलं तर वेगळा अनुभव आहे. एवढंही करायचं नसेल तर फक्त 'न्यु प्रायव्हेट विंडो' उघडून त्यात ह्या व्हिडिओची लिंक टाकली तर काकांसारखाच अनुभव आला.
आता तुम्ही नाव बदललंय तर कदाचित हळूहळू रिलेटेड व्हिडिओज बदलतील.
23 Nov 2016 - 2:03 am | स्रुजा
ओके, एकदा नवीन व्हिडीओ पण बघशील का?
23 Nov 2016 - 2:16 am | रुपी
पाहिला ना.. सध्या तरी कंजूस काकांसारखाच अनुभव आहे.. म्हणून तर शेवटच्या वाक्यात लिहिलंय हळूहळू बदलतील..
23 Nov 2016 - 2:26 am | स्रुजा
ओके, थांब आम्ही अजुन एक बदल करतोय. तो झाला की परत सांगु.
22 Nov 2016 - 12:27 pm | खटपट्या
अहो पिरातै, मी विंडोज मुव्हीमेकर डाउनलोड केला की सिमेंटटेक अँटीवायरस त्याला डीलीत करते,
22 Nov 2016 - 7:50 pm | पिलीयन रायडर
ऑईंग!!! मला तर असा काहीच त्रास झाला नाही.
मी इथुन डालो केलंय - https://support.microsoft.com/en-us/help/14220/windows-movie-maker-download
माझ्या कडे विन्डोज १० आहे, पण तरीही इथुन डालो केलेलं मुव्हि मेकर चालतंय माझ्याकडे. माझ्याकडे मॅकफी आहे.
22 Nov 2016 - 9:01 pm | स्रुजा
त्याला सेफ म्हणुन टाका तुमच्या अॅव्हा च्या यादीत. असं व्हायला नाही पाहिजे खरं तर कारण तो नेटिव्ह प्लेअर आहे विंडोज चा. विन १० वापरत असाल तर एकदा अपडेट पण डालो करा.
22 Nov 2016 - 8:09 pm | सूड
बघतांव आणि सांगतांव.
22 Nov 2016 - 8:31 pm | वरुण मोहिते
चांगला उपक्रम . सबस्क्राईब करा हो सगळ्यांनी. अनेक चांगल्या गोष्टी या निमित्ताने पाहायला ऐकायला मिळतील .
22 Nov 2016 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं कल्पना ! आता मिपाकरांच्या एकाहून एक सरस कलाकृती पहायला मिळणार !
22 Nov 2016 - 10:58 pm | कंजूस
व्हिडिओ लेख निवेदनासह कसा बनवावा
आता मिपा युट्युब पेज सुरू केलं आहे त्यावर आपले व्हिडिओ देण्याची सोय झालेली आहे. इतके वर्ष आपण लेख देत होतो आणि त्यासोबत फोटो. मिसळपाव साइटच्या सर्वरवर फोटो साठवायची सोय नसली तरी गुगल,याहू,फेसबुक इत्यादी मोठ्या इंटरनेट सेवा देणाय्रा कंपन्यांच्याकडून दिल्या जाणाय्रा काही हजार मेगाबाइट्स मोफत साठवणीचा उपयोग करून फोटो देत होतो. व्हिडिओ लेख , प्रात्यक्षिकं देण्याचा विचार आतापर्यत केला नसला तरी आता करणं शक्य झालं कारण मोबाइलमधले कॅम्रे अधिकाधिक उत्तम व्हिडिओ चित्रण करू लागले,तसेच डेटा सेवेचे दर कमी होऊ लागले. कंम्प्युटरच्या संकुचित बोजड माध्यमातून बाहेर पडून कुठेही नेता येणाय्रा बहुगुणी मोबाइलचा उपयोग वाढला.
चांगला व्हिडिओ कसा असावा हे आपण लगेच सांगू शकतो. लहान असावा, चित्राबरोबर उचित माहिती सावकाश सांगितली जावी ,आवाज स्पष्ट असावा इत्यादी. परंतू हे सर्व साध्य कसे करायचे? काय काय अडचणी येतात त्यासाठी काय करता येईल ते थोडक्यात पाहूया.
१) व्हिडिओ शूटिंग
व्हिडिओ शूटिंग करताना तीस चाळीस सेकंदांचे केले तर ते नंतर अपलोड करण्यास सोपे जातात. छोटेछोटे भागही नंतर हवे ते जोडता येतात. व्हिडिओ रेझलुशनकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आताचे मोबाइल कॅम्रे व्हिजिए ( 640x480 ), HD ( 1280X960 ; 1280X720 ) ,FULL HD ( 2560X1920; 1920X1080 ) इत्यादी रेझलुशनचे व्हिडिओ शूटिंग करू शकतात. तसेच 24/30/60/120 frames per second अशा वेगातही करतात. हे दोन्ही जेवढे जास्त तेवढा व्हिडिओ पाहाण्यास चांगला वाटतो. परंतू फाइल साइज वाढत जाते. शूटिंगचे रेझलुशन आणि वेळ यावर नियंत्रण ठेवून कमीतकमी फाइल साइजमध्ये चांगला व्हिडिओ मिळवायला हवा. साठवलेली
फाइल AVI अथवा MPEG फॅार्मॅटमध्ये असते. फाइल इक्सटेन्शन .avi / .mp4/ .m4a असेल.
जर का आपण शूटिंग करतानाच आहे तोच आवाज हवा असेल तर प्रश्न नाही परंतू काही वेगळी कॅामेंटरी नंतर जोडायची असेल तर ओप्शनमधले सेटिंग बदलून साउंड 'म्यूट' ठेवा.
२) व्हिडिओ कम्प्रेसर अॅप
अशी अॅप्स वापरून केलेल्या व्हिडिओचे रेझलुशन कमी करता येते. फाइल साइजचे MB कमी करता येतात. अॅपने बदललेली फाइल त्या अॅपमध्ये नसून मेमरी कार्डवर आली पाहिजे.
३) साउंड रेकॅार्डिंग अॅप्स
केलेला व्हिडिओ चालवून कोणती दृष्ये आल्यावर काय सांगायला पाहिजे ते कितव्या सेकंदादरम्यान याची प्रथम नोंद करा. किती लांबीचे शूटिंग हे पाहून ठेवा. आता एक टाचण लिहून ते एक दोनदा अशा गतीने बोला की नोंद केलेल्या वेळेस ठराविक माहिती बोलली जाईल. एखाद्या बंद खोलीत हे सर्व एका साउंड रेकॅार्डींग अॅप'ने रेकॅार्डींग करा. ही फाइल WAVE अथवा MPEG formatमध्ये असेल आणि फाइल इक्स्टेन्शन .wav / .wave / mp3 असेल. लांब व्हिडिओइतकीच हवी. फाइल स्टोरिजला हवी.
४) आवाज देणारे अॅप्स/ मिक्सर/एडिटर अॅप
हे एक मिक्सर अॅप असते. प्रथम व्हिडिओ फाइल निवडा ,नंतर ओडिओ फाइल ,नंतर मिक्स करण्यावर क्लिक केल्यावर दोन्ही मिक्स होईल॥ म्हणजे नक्की काय होते? ही अॅप्स फार ग्रेट नसतात त्यामुळे व्हिडिओ शूटिंगच्यावेळचा आवाज जाणार नाही पण तुमचे निवेदनमात्र जोडले जाते. ही एक वेगळीच फाइल मेमरीमध्ये साठवली जाते आणि मूळ दोन्ही फाइल्सना काही फरक केला जात नाही. आवाज/ निवेदन बदलावे वाटले तर पुन्हा नवीन आवाज जोडता येईल. पाककृतीवगैरेच्या शूटिंगदरम्यान येणारे आवाज असणे फार उपयुक्तच ठरतील.
५) आता हा तयार झालेला निवेदनासहचा व्हिडिओ मिपाच्या लिंकला पाठवा.संपिदकमंडळ मिपाच्या युट्युब पेजला अपलोड करतील. अथवा तुमच्या लेखात द्यायचा असल्यास तुमच्या पेजला अपलोड करून शेअर लिंक मिळवा. त्या लिंकचा वापर करून व्हिडिओ प्लेअर देता येईल. इम्बेड कोड कॅापी करून लेखात दिल्यासही काम होते. यासाठी युट्युब अपलोडर अॅप्सही पटकन काम करतात आणि शेअरिंग लिंक देतात.
( मी वापरलेली चारही अॅप्स दोनचार एमबीची विंडोजवरची होती )
करून पाहा.
22 Nov 2016 - 11:16 pm | पिलीयन रायडर
मस्त माहिती देत आहात काका!!
मी पण माझी एक पुरवणी जोडते.
१. व्हिडिओ शुटींग
ह्यात दुसरा पर्याय म्हणजे फोटो वापरणे. किंवा फोटो + व्हिडिओ वापरणे. ह्यानेही फाईल साईज कमी होते.
२. व्हिडिओ कॉम्प्रेसिंग
हे अजुन आम्हीसुद्धा वापरुन पाहिलेले नाही. वापरुन कळवतो. :)
३. रेकॉर्डींग
स्रुजा ह्यावर विस्तृत लिहु शकेल.
आम्ही आत्तापर्यंत लॅपटॉप किंवा मोबाईल रेकॉर्डर वापरला आहे. बर्यापैकी काम होते.आम्ही आधी मसुदा लिहितो, मग तो रेकॉर्ड करतो आणि मग त्या हिशोबाने, त्या त्या शब्दाला आवश्यक फोटो जोडतो. मुव्हि मेकरचा जो ट्युटोरिल व्हिडिओ आहे, तो स्क्रिन कॅप्चर करुन केलाय. (स्क्रिन कॅप्चरला वेगळे अॅप वापरले). आणि ते करतानाच ऑडिओ मोबाईलवर रेकॉर्ड केला.
मुव्हि मेकरमध्ये ऑडिओ / व्हिडिओ हवे तसे ट्रिम करता येतात. आणि व्हिडिओचा व्हॉल्युमही हवा तो ठेवता येतो.
४. मिक्सिंग - अलाईनमेंट
हेच काम मुव्हि मेकर करते. व्हिडिओला ऑडिओ जोडणे. आणि फोटो असतील तर त्यांना अॅनिमेशन देणे. टेक्स्ट टाकणे. इ.
५. व्हिडिओ किंवा मिव्हि मेकर प्रोजेक्ट फाईल - misalpav.channel@gmail.com ला पाठवा. अधिक मदतीसाठी मला/स्रुजाला व्यनि करा.
23 Nov 2016 - 12:28 am | कंजूस
ओडिओ रेकॅार्डींगसाठी फोनमधला रेकॅार्डर वापरलात तर त्याच्या सेटिंगमध्ये दोन पर्याय दिसतील.साउंड क्वॅालटि १)लो/स्पीच , २)हाइ/म्युझिक. तर पर्याय क्रमां पहिला वापरू नका. त्याने AMR या फॅार्मॅटमध्ये रेकॅार्डिंग होईल ते आपल्या मिक्सिंगला उपयोगाचे नाही. दुसय्रा पर्यायाध्ये MPEG पद्धतीत .mp3 /.mp4 / .m4a फाइल मिळतील त्याच उपयोगाच्या आहेत.
अॅप्स(size , डिवेलपर )विंडोज 8.1---
१)थेट mp3/ mp4/m4a फाइल करणारे साउंड रेकॅार्डर बरेच अॅपटस आहेत कोणतेही वापरा.
२)"Add Audio to Video ( 2 MB ,Cidade ),
३ )Video compressor ( 1 MB ,Eduardo ,Semprebon ),
४ ) Upload to Youtube ( 5 MB , BC3 Technologies )
23 Nov 2016 - 10:00 am | निनाद
झकास कल्पना आहे!
आता मिपाकरांच्या एकाहून एक सरस कलाकृती पहायला मिळणार असे वाटते. यात कुणी अॅनिमेशन्स पण करा...
हे आमच्या कन्येचे अगदी लहान असताना बनवलेले अॅनिमेशन. ही कल्पना डिजिटल कॅमेर्यावर फोटो वेगाने पाहताना सुचली. मी त्याला खत पाणी घालून ते पुर्ण करून घेतले होते.
23 Nov 2016 - 10:04 am | निनाद
त्या नंतर ती (आणि मी ही) थोडे मोठे झाल्यावर हे अॅनिमेशन बनवले.
यासाठी शाळेत झालेले बोलणे कारणीभूत ठरले. प्र्यावरणाविषयी जागृती करायची या विचाराने तेव्हा झपाटलेले दिवस होते ते :)
23 Nov 2016 - 11:51 am | खटपट्या
वा. हे कसे केलेत तेही सांगा. मला भींती रंगवण्याचा छंद आहे. म्हणजे भींतींवर चित्रे चीतारण्याचा छंद. मला सुरवातीपासून शेवटपर्यंत असा व्हीडीओ बनवायचा आहे. टाइमलॅप्स मुव्ही की असेच काहीतरी म्हणतात या प्रकाराला.
23 Nov 2016 - 5:07 pm | निनाद
क्यामेरा एका ठिकाणी पक्का केला आणि प्रत्येक हालचालींचे फोटो काढत गेलो. अनेक फोटो काढून त्यांना मुव्हीमेकर ने एकत्र केले.
जितके जास्त फोटो काढाल तेव्हढे ऍनिमेशन सुंदर होते.
भिंत रंगवताना एक, आणि दर दहा ब्रश झाल्यावर एक असे फोटो काढत राहिलात तर आपोआप असा विडिओ तयार होईल.
फक्त क्यामेरा एकाच ठिकाणी पक्का करणे आवश्यक!
24 Nov 2016 - 1:55 am | निनाद
टाइम लॅप्स चे अप्प मिळतात त्याने ही शक्य आहे
24 Nov 2016 - 1:48 am | निनाद
क्यामेरा एका ठिकाणी पक्का केला आणि प्रत्येक हालचालींचे फोटो काढत गेलो. अनेक फोटो काढून त्यांना मुव्हीमेकर ने एकत्र केले.
जितके जास्त फोटो काढाल तेव्हढे ऍनिमेशन सुंदर होते.
भिंत रंगवताना एक, आणि दर दहा ब्रश झाल्यावर एक असे फोटो काढत राहिलात तर आपोआप असा विडिओ तयार होईल.
फक्त क्यामेरा एकाच ठिकाणी पक्का करणे आवश्यक!
25 Nov 2016 - 11:13 am | खटपट्या
भींत रंगवताना दर दहा सेंकदांनी फोटो आपोआप निघेल अशी काही सेटींग आहे का बघतो...
23 Nov 2016 - 9:24 pm | पिलीयन रायडर
अप्रतिम!!!!!
बस्स ह्याच स्पिरिटची गरज आहे! आपण सामान्य माणसं आहोत. फार काही हाय फाय नाही जमणाअर कदाचित. पण साध्या सोप्प्या गोष्टीतुनसुद्धा किती सुंदर काही बनु शकतं!
23 Nov 2016 - 10:07 am | निनाद
व्हिडियो मध्ये शेवटी श्रेय नामावली आणि प्रसिद्धी दिनांक जरूर टाका.
23 Nov 2016 - 11:03 am | कंजूस
निनाद, फाइल साइज टाका.
24 Nov 2016 - 1:53 am | निनाद
हे आधीच आहे अपलोड केलेले. मूळ प्रत कुठे आहे हा प्रश्नच आहे. कदाचित काढूनही टाकली असेल :(
24 Nov 2016 - 5:56 am | कंजूस
या आताच्या व्हिडिओची म्हणतोय.
24 Nov 2016 - 6:35 am | निनाद
साइझ कशी शोधू? कुठे कळेल?
मी फोटो घेताना अगदी कमी रिझोल्युशन ठेवले होते.
25 Nov 2016 - 11:10 am | कंजूस
निनादचे व्हिडिओ लिंक्स
१) Gargi' Fish ,file size 600 Kb आमच्या कन्येचे अगदी लहान असताना बनवलेले अॅनिमेशन.
२ ) प्र्यावरणाविषयी जागृती .Gragi's tree. File size 2.77 MB
25 Nov 2016 - 11:12 am | कंजूस
२ ) प्र्यावरणाविषयी जागृती .Gragi's tree. File size 2.77 MB
24 Nov 2016 - 9:10 am | कंजूस
कोंडेश्वर धबधब्याचा व्हिडिओ माझ्या फेसबुक वर अपलोड करून
त्याची लिंक ही.. फाइल साइज 1.5 MB.
ब्राउजरमध्ये याचा डाउनलोड पर्याय असतो . UC BROWSER मध्ये आहेच. व्हिडिओ फाइल मेमरी कार्ड/ स्टोरिजमध्ये साठवली जाते. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता येतील. युट्युबच्या जाहिरातींपासून सुटका होईल.
या फेसबुक लिंकचाच प्लेअर बनवता आला नाही अजून.
( युट्युबवरचे व्हिडिओ डाउनलोड करण्याचे बरेच अॅप्स असले तरी ती डाउनलोड केलेली फाइल फोनच्या मेमरीमध्येच अथवा अॅपमध्ये राहाते. मेमरी कार्डावर घेता येत नाही ही मोठी अडचण आहे. फोन मेमरी कमी पडेल इतर कामासाठी )
24 Nov 2016 - 2:04 pm | कंजूस
१) सेक्स चॅट विथ पप्पु अॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकलची लिंक = youtube dot com watch? v=wGBOwaA_XxU
ही अॅड्रेसबारमध्ये टाकली की This Video is Private हा मेसिज येतो आणि सगळे जडबंबाळ व्हिडिओज हजर होत आहेत.
२)//आम्ही एक प्रिकॉशन म्हणुन व्हिडीओ चं नाव बदललंय. आता बघता का जरा , युट्युब चे सजेशन्स बदलले आहेत का?//
--तुम्ही हे पप्पूच्या व्हिडिओला कॅज्मेटिक बदल केले तरी लिंक सेमच ठेवली आहे!!!
हे सर्व प्रकरणच डिलीट केले नाहीतर तुमचा आइएसपी अॅड्रेसही गुगल लक्षात ठेवेल हे नक्की.
25 Nov 2016 - 5:27 am | पिलीयन रायडर
नवा व्हिडिओच अपलोड केला आहे, म्हणुन जुनी लिंक दिसत नाही. वर दुसर्याच प्रतिसादात मी नवा व्हिडीओ लावला आहे.
नको ते प्रश्न?? पप्पु & पापा - व्हिडिओ अर्टिकल - ह्या नव्या नावाने आता व्हिडिओ दिसेल.
आम्ही केलेल्या टेस्ट नुसार आता कसंही पाहिलं तरी लहान मुलांचेच व्हिडिओ दिसत आहेत. तुम्ही पण चेक करा आणि सांगा.
25 Nov 2016 - 7:01 am | निनाद
नको ते प्रश्न?? पप्पु & पापा
- व्हिडिओ अर्टिकल हा व्हिडियो प्रताधिकार मुक्त आहे का?
25 Nov 2016 - 7:25 am | स्रुजा
मिसळपाव चा कॉपीराईट आहे.
25 Nov 2016 - 7:22 am | कंजूस
आता जे लिंक असलेलं हेडिंग दिलय "नको ते प्रश्न?? पप्पु & पापा - व्हिडिओ अर्टिकल" याबरोबरच फाइल साइज 4.4MB असं दिलं तर बरं होईल कारण व्हिडिओ पाहणारच आहोत तर ही लिंक "युट्युब व्हिडिओ डाउनलोड अॅप"मध्ये टाकून व्हिडिओ अगोदर सेव करून घेतला. तो ओफलाइन पाहता येतोय.लिंकही बदललेली दिसली. शेवटी सेक्स चॅट-- ची फाइल जोडली आहे का? ती "डॅमेजड" असं दिसलं.प्लेअरबरोबर लिंक आणि फाइल साइज द्या.आता नवीन व्हिडिओखाली तसले व्हिडिओ दिसले नाहीत.ओके.
25 Nov 2016 - 7:27 am | स्रुजा
पर्फेक्ट, धन्यवाद काका.
पण फाईलचं नाही कळलं. स्क्रीन शॉट टाकता का/?
25 Nov 2016 - 6:27 am | स्रुजा
फक्त कॉस्मेटिक बदल केलेले नाहीयेत. हिस्टरी पण बिल्ड अप व्हायची गरज नाहीये. एज लॉक इथे उपयोगाचं नाही, त्याचं काम नेमकं उलटं आहे.
आधीच्या व्हिडीओ चे आणि ऑडिओ फाईल्स चे नाव एक च होते. आम्ही ते दोन्ही बदलुन आता नवाच व्हिडीओ टाकलाय. आता लॉगिन न करता आणि इतर सजेशन्स न येता हा व्हिडीओ ३ वेगवेगळ्या लॅपटॉप वर पाहिला. कॅश क्लीअर करुन पण पाहिलंय .. सजेशन्स हे आपण नंतर काय बघतो त्यावर बिल्ड अप होत जातात. ती प्रोसेस या नंतर होईल. आत्ता तरी खुप च रँडम व्हिडीओ दिसतायेत. तरी कुणाला काही दिसलं तर सांगा, पण आता होणार नाही तसं.
25 Nov 2016 - 7:27 am | कंजूस
//आत्ता तरी खुप च रँडम व्हिडीओ दिसतायेत.//
-
होय. सूचक शब्द बदलल्याचा परिणाम असेल.ओके.लिंक आणि फाइल साइज दिल्यास "युट्युब डाउनलोडर" अॅप वापरून ओफलाइन सेव करता येईल.फाइल साइज पाहून मोबाइल नेटवर पाहायचं का नाही ठरवायला सोपे होईल.