काटा रुते कुणाला…..भाग २

Jabberwocky's picture
Jabberwocky in जनातलं, मनातलं
6 Nov 2016 - 10:01 am

काटा रुते कुणाला.... भाग १

हा विशाल हा माझा इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतचा मित्र. नंतर मात्र तो वेगळ्या कॉलेज ला आणि मी वेगळ्या. तशी गेल्या दोन अडीच वर्षात याची आणि माझी भेट फारच कमी झाली होती. आणि आता हा अचानक असा धूमकेतू सारखा माझ्यासमोर प्रकट झाला होता, माझी उत्कंटा वाढत होती. काय बोलायचं असेल याला आणि ते हि हा खूपच सिरीयस मूड मध्ये दिसतोय. नक्की काय ते पत्ता लागत नव्हता.
एकदाचे आम्ही त्या लहान मुलांसाठी असलेल्या कॉलोनीच्या छोट्या उद्यानात पोचलो. आजूबाजूला लहान पोर खेळत होती. जिथून आमचा संवाद इतर कुणालाही ऐकू जाणार नाही अस एक रिकामी बाकडं आम्हाला बूड टेकवायला मिळालं.
बोल आता कसलं महत्वाचं काम आहे, काय बोलणार आहेस? मी म्हणालो.
अरे बोलतो कि काय एवढी घाई आहे ? विशाल
साल्या हि तुझी घाणेरडी सवय गेली नाही अजून, उगाच एखाद्याचा जीव टांगणीला लावायचा आणि स्वतः मजा घेत बसायचं. मी म्हणालो
अरे तस नाही रे, मी बोलणारच आहे, पण आधी सांग रेवा कशी आहे?
ती एकदम छान आहे पण तीच इथे काय?
अरे सहज विचारलं. बर मला सांग तुमच्या दोघांमध्ये काही आहे का रे, म्हणजे प्रेम वगैरे काही आहे का तुमचं एकमेकांवर? विशाल
मला या प्रश्नांची एव्हाना चांगलीच सवय झालेली होती. त्यामुळे मला त्याच्या या प्रश्नाचा अजिबात राग आला नाही. कारण मला माझ्या शाळेतला भेटणारा एखादा मित्र किंवा कधीकधी मैत्रणीसुद्धा हा प्रश्न नक्की विचारायचे. आणि माझं उत्तर देखील ठरलेलं असायचं.

अरे असं काहीच नाही रे. आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. जसा तू आणि मी. मी सरावाने उत्तर दिल.

मग काय चालू आहे सध्या तुमच्या दोघांचं? विशाल

आता मात्र माझं टाळकं सटकलं.
तू हे विचारायला इथवर आला आहेस का? तुला जे महत्वाचं बोलायचं ते सोडून बाकीचं काय लावलंय. मी म्हणालो.

अरे चिडतोस कशाला मी आपलं सहज विचारतोय. सांग ना काय चालू आहे तुमचं. विशाल

परत तेच. हे बघ आमच्या दोघांचं काहीच चालू नाहीये. आम्ही फक्त आणि फक्त चांगले मित्र-मैत्रीण आहोत. विशल्या खरं सांग तुला कुणी पाठवला तर नाही ना आमच्या दोघांची माहिती काढायला? मी रागात म्हणालो.
मी अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात तो हि उसळला. म्हणाला तुला असं वाटूच कास शकत की कुणीही मला पाठवेल आणि मी तुझ्याकडे असल्या कामासाठी येईन?

मला थोडस ओशाळल्यासारखं झालं पण तरीही आपला पुणेरी बाणा न सोडता मी म्हणालो, आला ना राग साल्या, तू असे प्रश्न विचारल्यावर समोरचा माणूस वैतागणार नाही तर काय? आणि याच्यापुढे तू हा प्रश्न मला विचारू नकोस.

मीच काय पण आता हा प्रश्न तुला कुणीच विचारणार नाही. विशाल
म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? मी
तू जे ऐकलंस तेच. विशाल
मला समजेल असं बोलशील का जरा. मी
जा जाऊन रेवालाच विचार. विशाल रागात बोलला, मी त्याला चांगलचं दुखावलं होत.
पण तीच काय इथे मधेच. काय संबंध? मी
तिचाच संबंध आहे? आणि जे मला वाटत होत तेच नेमकं झालंय. तुला काहीच माहित नाहीये रेवाचं काय चाललंय ते. विशाल
तू नेमकं कशाबद्दल बोलत आहेस? मी
आता मला काळजी वाटायला लागली. रेवा म्हणजे माझ्यासाठी काय ते मलाच माहित. तिला काही झालंय कि काय आणि मला अजून काहीच कस माहीत नाही आणि आता हा पुढे काय सांगणार आहे तिच्याबद्दल जे मला माहित नाही. असे अनेक प्रश्न माझ्या मेंदूत दंगा घालायला लागले.

तुम्ही दोघे सध्या एकमेकांशी बोलत आहात कि नाही? विशाल
हो. मी
नेहमीच बोलता की कधीतरी? विशाल
अरे रोजच बोलतो. मी
मग तरीही तिने तुला अजून काहीच कस नाही सांगीतलं त्याबद्दल? विशाल
म्हणजे कशाबद्दल. मी
काही नाही जाऊदे. विशाल
मी काय तुझ्या पाय पडावं अशी तुझी अपेक्षा आहे का आता? मी
विशालच्या चेहरा बुचकळ्यात पडल्यासारखा झाला. काय बोलावं हे त्याला कदाचित सुचत नसावं.
मग मीच म्हणालो जाऊदेत तुला नसेल सांगायचं तर मी तिलाच विचारतो.
नको विचारूस. ती कदाचित तुला सांगणार नाही. विशाल
का नको आणि का नाही सांगणार ती. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो ती तिची कोणतीही गोष्ट माझ्यापासून कधीही लपवून ठेवत नाही. मी म्हणालो.
पण या वेळेस ती लपवत आहे. विशाल
आता मात्र मला काहीच सुचत नव्हतं. पण आता एवढं नक्की वाटत होत की हा विशाल काहीतरी वाईट बातमी घेऊन माझ्याकडे आला होता, आणि ती देखील रेवाविषयी. विशालचा घर रेवाच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर होत. आणि विशालच्या आणि रेवाच्या घरचे संबंधही खूप चांगले होते. मी आणखीनच काळजीत पडत चाललो होतो.
तू आता सांगशील का कृपा करून. मी जमेल तितकं काळजी लपवण्याचा प्रयत्न करत बोललो.
जाऊदे रे नाहीतरी ती तुझ्या टाईप ची नाहीये. तुला ती सूट करत नाही. विशाल
रेवाबद्दल बोलताना नीट बोलायचं बरका? मी
अरे तस नाही रे मला म्हणायचंय की ती काही या पृथ्वीतलावरची शेवटची मुलगी नाहीये. तुला तिच्यापेक्षा चांगली मुलगी नक्की मिळेल. विशाल
काय फालतूपणा लावलायस? मी
अरे खरंच रे एक ना एक दिवस तुला तुझं खरं प्रेम तुझं ट्रू लव्ह मिळेल? विशाल

आता एख्याद्याच्या घरातलं कुणीतरी गेल्यावर जस एख्यादाला धीर देतात त्या धाटनीत विशाल माझ्याशी बोलायला लागला.
मी शक्य तितका शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो कारण मला त्याला हे दाखवायचं नव्हतं की रेवाविषयी माझ्या काय भावना आहेत.
तू उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोयस. तुला हे माहित आहे की मी आणि रेवा फक्त मित्र-मैत्रीण आहोत. आणि असंही या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा माझ्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी म्हणालो.

मग असच आहे तर तू का बोलतोस रोज तिच्याशी? विशाल
अरे बाबा आता सवय झालीय आम्हाला ती? मी
तू म्हणतोस की ती तुझी फक्त मैत्रीण आहे, मग मी पण तुझा मित्र आहे की, माझ्याशी बोलत नाहीस तू रोज? विशाल
अरे ती माझी जिगरी आहे रे? मी जीभ चावली
मग मी नाही का तुझा जिगरी? लहानपणापासून सोबत आहोत की आपण. रेवा तरी आठवीत असताना आली ना आपल्या वर्गात. विशाल
अरे तस नव्हतं म्हणायचं मला. मी
अरे बाबा आता तरी कबूल कर की तुझ्यात आणि रेवाच्यामध्ये मैत्रीपेक्षा पुढे अजून काहीतरी आहे? शेवटी आपल्याला जे हवं ते सिद्ध केल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद आता विशालच्या चेहऱ्यावर दिसायला लागला.
शेवटी तू लाल करणारच. मी
अरे आता तूच बोल मी काही बोलत नाही. विशाल
बर बाबा असेल काहीतरी आमच्यामध्ये मैत्रीपेक्षा पुढे. पण अजूनतरी ते मला तस वाटत नाही. आणि जोपर्यंत मला तस वाटत नाही तोपर्यंत मी ते कस मान्य करू? तूच सांग.
तू जे म्हणत आहेस ते नक्की खरं असेल तर मग ठीक आहे. आणि तुझ्यासाठी नक्कीच चांगलं आहे. विशाल
आणि जर ती मला आवडू लागली तर काय? मी
तर मग तुझी वाट लागली आहे असं समज. विशाल
ते कस काय?
ते असं की तीच आता लग्न ठरलं आहे, आणि काल तिचा साखरपुडा पण झाला आहे. विशाल
त्याच्या या वाक्यानंतर पुढचे दोन मिनिट मी फक्त शांत बसलो होतो. मला माझ्या कानांवर विश्वास नव्हता. हा आपली गम्मत करत असावा असा विचार माझ्या मनात आला.
आज काय एक एप्रिल आहे की काय मला मूर्ख बनवायला? सकाळपासून तुला कुणी भेटलं नाही वाटत. मी
नाही माझ्या मित्रा आज एक एप्रिल पण नाही आणि मी तुला मूर्खतही काढत नाहीये. विशाल
अरे पण मी काल रात्री तिच्याशी बोललो, आज सकाळीपण बोललो पण ती तर मला काहीच बोलली नाही या बद्दल. मी
कारण तुला हे सगळं माहिती व्हावं अशी तिची इच्छा नसावी. विशाल
पण मला माहित होऊ नये अशी का इच्छा असेल तिची? मी चिडून
कारण कदाचित ती तुला गमवून बसेल असं तिला वाटत असेल. विशाल
तू खरं बोलतोयस ना नक्की?
हो रे.
पण असं का वागेल ती?
ती तुला हे सांगायला घाबरत असेल कदाचित. विशाल
किंवा मग ती मला तिचा साधा मित्रही समजत नसावी. इतकी महत्वाची गोष्ट ती मला सांगत नाही याचा काय अर्थ घ्यायचा. मी कुणीच नाही का तिच्या आयुष्यात. तसच असेल म्हणूनच तर तिने असं केलं. मी अगतिकपणे बोलून निघालो.
हे बघ यामुळेच ती तुला हे सगळं सांगत नाहीये. तू चुकीचा विचार करतोयस. तुझा गैरसमज होतोय. विशाल म्हणाला.
हो का मीच चुकीचा विचार करतोय का एवढं सगळं झालं तरी? मी

हे बघ मित्रा मुली खूप संवेदनशील असतात रे त्यांच्या भावनांबद्दल....ब्ला ब्ला ब्ला
मुलींवर P.H.D. केल्यासारखा विशाल पुढे बडबडत राहिला. एका क्षणी तर मला वाटलं की रेवा त्याची बहीण आहे आणि हा त्याच्या बहिणीने सॉरी त्याच्या सुंदर, सालस, निरागस बहिणीने केलेली माझ्या स्वप्नांची माती पाहून हा तिच्या वतीने माझी समजूत घालत बसलाय. माझं विशालच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. माझा स्वतःवरचा ताबा आता सुटत चालला होता. इतका वेळ मी कसेतरी दाबून ठेवलेले अश्रू आता केंव्हाही बाहेर पडतील अशी भीती मला वाटू लागली. आणि विशाल समोर रडायचं म्हणजे त्याला माझ्या रेवावर असलेल्या प्रेमाची पोचपावती दिल्यासारखाच होणार होत. मी मन घट्ट केलं. मी माझ्या भावनांच्या बाबतीतलं अगदीच आतला माणूस आहे. माझ्या भावना मी कधीच कोणासमोर उघड्या करत नाही. मला ते आवडत नाही. अगदी ती व्यक्ती रेवा जरी असली तरीही नाही. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशीच कधी चर्चा करत नाही. मला ते दुबळेपणाचा लक्षण वाटत. रेवानेही कितीतरी वेळा प्रयत्न केला माझ्या अंतरंगात डोकावण्याचा पण तिला मी कधीच दाद दिली नाही. ती थोडीशी दुखी व्हायची अशा वेळेस. मला म्हणायची, मी माझी प्रत्येक गोष्ट आधी तुला सांगते पण तू मला कधीच काहीच सांगत नाहीस. मी तिला फक्त म्हणायचो, मी असाच आहे बघ.

विशाल दहा ते पंधरा मिनिट बोलत राहिला, शेवटी त्याच्याही लक्षात आलं की मी काहीच ऐकत नाहीये. मग म्हणाला ऐतोयस ना मी काय बोलतोय ते.

मी हो म्हणालो.

मग कंटाळून तोच म्हणाला चल उशीर झालाय निघुयात आपण घरी. मी घड्याळात पाहिलं आठ वाजलेले. आम्ही उठलो आणि घराकडे निघालो. वाटेत आम्ही काहीच बोललो नाही. माझ्या घरापाशी पोचल्यावर विशाल म्हणाला, अच्छा चल निघतो मी.

ठीक आहे. मी
मी घराकडे वळता वळता थांबलो आणि का कुणास ठाऊक मी त्याला विचारलं, तुला आज इथे रेवाने तर नव्हतं ना पाठवलं मला हे सगळं सांगायला.
नाही रे. विशाल
नक्की
हो रे. चल निघतो आता.

कथा

प्रतिक्रिया

Jabberwocky's picture

6 Nov 2016 - 10:11 am | Jabberwocky

यशोधरा's picture

6 Nov 2016 - 10:31 am | यशोधरा

विशालशीच झालाय काय सापु?

Jabberwocky's picture

6 Nov 2016 - 5:19 pm | Jabberwocky

नाही....विशालशी नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुसर्‍याच भागात तुम्ही मन मोडलं राव आमचं. :)
वाचतोय.

-दिलीप बिरुटे