काटा रुते कुणाला…..भाग ४ http://www.misalpav.com/node/37957
सकाळी केंव्हातरी मी जागृती अवस्थेत आलो. घड्याळाकडे पाहिलं सकाळचे 9 वाजले होते. शनिवार असल्यामुळे काही करण्यासारखं नव्हतं. मी पुन्हा तसाच डोळे झाकून पडून राहिलो. जाम थकवा जाणवत होता. शरीराला नसले तरी मनाला श्रम घडले होते हा त्याचाच परिणाम.
थोड्यावेळाने आई मला उठवायला आली. तिने तिचा हात माझ्या कपाळावर ठेवला.
काय करतेयस? मी म्हणालो.
तुझा ताप गेला की नाही पाहत होते. आई
पण मला नाहीये ताप. मी
अरे आत्ता नाहीये पण गेले दोन दिवस तापाने नुसता फणफणला होतास. आई.
काय? मी बुचकळ्यात पडलो.
तुला आठवत नाही. आई
नाही. मी म्हणालो
बरं जाऊदे. आज कॉलेज ला नको जाऊस. आराम कर. आई म्हणाली आणि बाहेर निघून गेली.
मला बरं वाटत होत त्यामुळे मी विचार केला आज एक चक्कर मारून येऊ कॉलेज ला हॉस्टेल वर, थोडं मोकळं वाटेल.
मी आवरून बाहेर आलो. आणि नाश्ता करायला बसलो. आईने पोहे दिले. मी मुकाट्याने खायला लागलो. पण मनात गोंधळ चालला होता. आई कस काय म्हणाली की गेले दोन दिवस तुला ताप होता. आणि मला कस आठवत नाही. पण तिला विचारायची हिम्मत झाली नाही कारण सगळं रेवा प्रकरणाचा हँगओव्हर परत सुरु झाला असता.
मी विचार करत होतो तेवढ्यात आई म्हणाली. अरे रेवाला फोन कर. बिचारी दोन दिवस झाले चकरा मारतेय तुझ्यासाठी घरी. आज सकाळी पण येऊन गेली. झोपला होतास म्हणून कॉलेज ला गेली तशीच.
आता आणखीनच डोकं गरगरायला लागलं. हे दोन दिवस ताप आणि रेवाचं येऊन जाणं. काय चाललं आहे मला काहीच कस आठवत नाहीये.
मी बरं ठीक आहे करीन फोन संध्याकाळी म्हणालो.
त्यापेक्षा भेटूनच ये तिला. आई म्हणाली
पाहतो. मी
मी बाजूला पडलेलं वर्तमान पत्र हाती घेतलं आणि आता मला या दोन दिवसांचा छडा लागला.
ते ताज वर्तमान पत्र आजचा वार सोमवार आहे आणि तू अजून कुठल्या जगात आहेस असा प्रश्न विचारात माझ्यासमोर उभं राहील.
याचा अर्थ मी गेले दोन दिवस ग्लानीमध्ये होतो आणि मला कसलीही शुद्ध नव्हती.
शुक्रवारी रात्री झोपल्यानंतरपासून ते आज सकाळपर्यंतचे दोन दिवस माझ्या आयुष्यातून कायमचे हरवले होते.
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 10:54 am | अमरप्रेम
वाचतोय...मस्त चाललंय...
9 Nov 2016 - 1:47 pm | सुखी
छान चाललय... जरा मोठ्ठे भाग टाका की..... स्टार्टर मारताच गाडी बन्द करावी लागतीये...
9 Nov 2016 - 2:38 pm | Jabberwocky
नक्की प्रयत्न करेन
9 Nov 2016 - 1:52 pm | प्राची१२३
छान !!! वाचते आहे...