(रिहॅब चे दिवस भाग ६ )!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
1 Oct 2016 - 1:24 am

बऱ्याच लोकांनी विचारलेलं व्यसनाच्या काळात काय झालं . खरं सांगू काही झालं नव्हतं कारण पैसे होते त्यामुळे काही आयडिया करून पैसे मिळवावे कुठेही बसून प्यावी असंही नव्हतं. पित असतानाही काम चालू होतं. प्रामाणिकपणे ते नोकरीला असो कि व्यवसायात . होणाऱ्या बायकोसोबत इथे आलो कि भारतभर फिरत होतो . व्यसन चालू असतानाही. वैयक्तिक मला काही नुकसान झालं नाही रिहॅब चे २ महिने सोडले तर .
पण किती वेळा बायको विचारायची वरुण तू ठीक आहे. नीट वागतो. विश्वासही आहे. पण आमच्या मनात त्यावेळी हि फिरताना किती भीती असते माहित आहे का ? निरुत्तर व्हायचो तेव्हा . वेड्यात काढायचो तिला. आईसोबतही कित्येक ठिकाणी जावं लागायचं . नातेवाईकांना तर माहित होतं पितो पण दुसरीकडे गेल्यावर तिला काय वाटत असेल हा हि विचार केला नाही कधी . कारण मी माझ्याच मस्तीत. कदाचित हा विषय बायकाच समजू शकतात नीट.
वास्तविक घरी कधी ड्रिंक ला ना नव्हती . थोडा कर प्रमाणात कर चालेल . मग ते घरी असो वा कुठेही . प्रॉब्लेम चालू झाला जेव्हापासून मी प्रमाणाबाहेर करायला चालू केलं . सकाळी रात्री कधी पण . तरी आपण चुकीचं वागलोच नाही लोक उगाच ड्रिंक वरून बोलतात असा वाटायचं . तेव्हा बदल न होणं स्वाभाविक होतं. घरच्यांनी बोलण्याचं अजून एक कारण होतं नोकरी निमित्ताने इतक्या देशात फिरत होतो चांगलं करियर होतं पण एका फटक्यात विचार न करता नोकरी सोडलेली बरं व्यवसायात म्हणाल तर मला कधीच रस नव्हता घरच्या व्यवसायात. पण तिथेही त्यामुळे जाणं आलंच . किती छंद होते पण काही करू शकत नव्हतो. वाचन सर्वात महत्वाची आवड पण रोज झोपताना ४-२ पानं वाचली कि उद्या हे वाचणारे अशी स्वतःलाच प्रॉमिस बास. सकाळी उठलो एक दोन पेग झाली की कसलं प्रॉमिस आणि कसलं काय .
बाकी सगळं व्यवस्थीत चालू होतं. एक आत्मविश्वास होता कि इतकं ड्रिंक केला तरी तरी आपलं नीट चालू आहे. पण काही दिवसाने याला तडे जायला सुरवात झाली. पूर्वी रात्री ड्रिंक लागायचं हळू हळू सकाळी रोज लागायला लागलं. कधी अचानक काम असलं आणि बाहेर जायचं असलं तर पिता येत नाहीये म्हणून अस्वस्थ वाटू लागायचं. तरीही स्वतःलाच समजावणं कारण आत्मविश्वास.
समजत होतं कित्येकदा पण आता बाहेर येणं कठीण आहे माहित होतं स्वतःलाच. सगळ्या जवळच्यांनी खूप सांगून पहिला पण ऐकायचं नव्हतं.
अश्यातच रिहॅब ला गेलेलो विचार करायला वेळही मिळाला आणि ड्रिंक ला गॅप हि. मस्त वातावरण ग्रुप अनुभव शेयरिंग सगळं होतं पण प्रत्येकाला मनातून वाईट जरूर वाटत होतं.
आमचा फ्लोर फक्त रिहॅब चा होता बाकी वर हॉस्पिटल काही घटना वर पहिल्या खूप मन ढवळून निघालं. मागील भागात बोललोच आहे लास्ट फ्लोर ला व्यसनाने पार वाया गेलेले लोकं होती त्यांना साधा तंबाखू हि पुरेसा नसे तोच खाऊन परत सुकवून खायचे पाहिलं तेव्हा भडभडून आलं असंही करू शकतात लोकं. मध्ये २ फ्लोर तिथे काय असेल ते तर विचारूच नका मानसिक रुग्ण असलेले. असं खूप काही. दोन महिने पूर्ण झाले तेव्हा घरचे आले नेण्यासाठी. बोलताना निघताना खूप आश्वासनं दिलेली मी . आठवतं होतं आई आणि बायकोचा बोलणं . इथे असताना बायकोचा पहिलाच आलेला व्हॅलेंटाईन डे चा फोन त्यावेळी भरून आलेला मन . बाकी सगळंच. गाडीत जातानाही विचारांवर कन्फर्म होतो.पण एकदा घरी आल्यावर राग उफाळून आला. खरं म्हणजे मला काही दिवस सोडले तर घरच्यांनी सगळी व्यवस्था नीट केली होती खाणं वाचन सगळंच . पण राग का व्यसनाची तीव्रता माहित नाही परत प्यायला चालू केला . मला नं सांगता नेलंच कसं हा प्रमुख राग .तरीही समजून घेतलं. जे केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं बोले. आमचं कुटुंबही मोठे एकत्र राहत नसलो तरी सगळे मनाने एकत्र आहोत सगळेच पाठीशी होते. काही दिवसाने अक्कल येत गेली बदल झाला म्हणजे सगळंच बदललं असं नाही . आजही मी रविवारी ड्रिंक करतो कुठेही असुदे , पिकनिक ला गेलो कि करतो मित्रांसोबत पण एक प्रमाण आहे त्यावर इच्छा असली तरी बायको आठवते आई आठवते आयुष्यभर हे कायम राहील .सिगरेट वर्षातून एखाद दोन वेळी अगदीच ग्रेट मूड असेल तर तंबाखू पूर्ण बंद जो काही दिवस रिहॅब ला खात होतो . प्रयत्न केला तर बदल घडतो . १००% घडावा अशी कोणाचीही अपेक्षा नसते पण थोडं केलं तरी ज्यांची अपेक्षा आहे ते खुश होतात इतकं कळलं. जे बदल झाले त्यात मी आता सुखी आहे कधीपण प्यावी वाटत नाही आणि बरेच काही बदल . माझ्यासाठी तरी हे यश आहे. पुढील बदलांसाठी अजून प्रयत्न करेन बघू जमलं तर. अरे हो सांगायचंच राहिला घरच्या व्यवसायात मला कधीच रस नव्हता त्यामुळे २ महिन्यांनी परत आल्यावर परत वरिष्ठांशी संपर्क केला . काही इंटरव्यू झाले परत झाल्यावर पुन्हा तिथेच रुजू झालो .नव्या जोमाने काम चालू केलं बढतीही मिळाली. वेगळं वाटत आहे आता .असो प्रयत्न केले तर निश्चित होतं. सगळं नाही पण थोडं तरी.
ता. क (मिसळपाव वर कित्येक वर्ष वाचनमात्र होतो तेव्हाही ते कुटुंबासारखा होतं आजही आहे त्यामुळे फक्त इथेच शेयर केला. बाकी लिहिण्याचा कंटाळा त्यामुळे बरेच तपशील राहिले असतील. अजूनही वेगळ्या काही गोष्टींवर लिहायचंय बघू त्यासाठीही प्रयत्न करिन . )

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

स्वतःच्या चुकांबद्दल, त्यातही व्यसनाबद्दल प्रांजळपणे बोलणं किंवा लिहिणं सोपं नाही. ते तुम्ही मिपासारख्या सार्वजनिक फोरमवर करण्याची हिंमत दाखवलीत त्याबद्दल _/\_. तुमच्या घरच्यांचं विशेषतः होणार्‍या पत्नीचं कौतुक वाटतं. अशीच एक शेजारी राहणार्‍या मुलाला व्यसनातून सोडवताना प्रेमात पडलेली आणि नंतर त्या मुलाशी लग्न करणारी मैत्रिण आठवली.

रिहॅब आणि रिलॅप्सच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून पुढचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!

फारच छान. तुम्ही व्यसनमुक्त होण्यासाठी तुम्ही व घरच्यांनी केलेले प्रयत्न आवडले. शुभेच्छा!

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2016 - 9:07 am | पिलीयन रायडर

उत्तम!!! ह्या सगळ्यात तुमचे घरचे आणि होणारी बायको पाठीशी उभी राहिली हे फार महत्वाचे.

आता तुम्ही इतक्या मनापासुन लिहीलंय की हे वाचुन कदाचित कुणी व्यसन सोडायला प्रवृत्त होईल.

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2016 - 9:39 am | टवाळ कार्टा

+१११११

ते सोडवण्याचा प्रयत्न करणार्या एखादीलाही हा प्रेरणादायी वाटेल नक्की,

भावी आयुष्याला शिभेच्छा आणि जो संयम बाळगलायच तो नीट जोपासा.

मोदक's picture

1 Oct 2016 - 4:44 pm | मोदक

+111111

राजाभाउ's picture

4 Oct 2016 - 3:27 pm | राजाभाउ

असेच म्हणतो
+११११११११

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Oct 2016 - 10:01 am | अनिरुद्ध.वैद्य

रिहॅब आणि रिलॅप्सच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून पुढचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!

+१११

पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!

तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी शुभेच्छा आणि व्यसनाच्या गर्तेतून बाहेरही येऊ शकतो हा सकारात्मक संदेश देणारे तुमचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे.

सुबोध खरे's picture

1 Oct 2016 - 10:31 am | सुबोध खरे

मोहिते साहेब
एक कळकळीची विनंती आहे. शक्य असेल तर दर रविवारचे किंवा मित्रांबरोबरचे दारू पिणे सोडून द्या.
याचे कारण आज तुमची आर्थिक मानसिक आणि सामाजिक परिस्थिती चांगली आहे पण काही वेळेस परिस्थिती बदलते आणि अशा नैराश्य याउलट परिस्थितीत व्यसन सोडवलेला माणूस परत व्यसनाच्या आहारी जाउ शकतो. आपल्याला नियंत्रणात आहे असे वाटत असलेली परिस्थिती केंव्हा हातातून सुटून गेली हे समजत नाही.
नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करून घेतलेल्या अनुभवातून सांगत आहे. कृपया दीड शहाणपणाचा सल्ला म्हणून सोडून देऊ नका.

पी. के.'s picture

1 Oct 2016 - 11:06 am | पी. के.

+१११११

संदीप डांगे's picture

1 Oct 2016 - 12:09 pm | संदीप डांगे

तीव्र सहमत,

नाखु's picture

1 Oct 2016 - 12:42 pm | नाखु

एक्दम सोळा आणे सल्ला

आणि वेळेवर ही!!!

वरुण मोहिते's picture

1 Oct 2016 - 12:48 pm | वरुण मोहिते

तसेच प्रयत्न चालू आहेत थोडा काळ जाईल पण होऊ शकेल आता

प्रयत्न केले तर निश्चित होतं. सगळं नाही पण थोडं तरी.

दॅटस इट.
शुभेच्छा वरुण.

छान, वरूणभाऊ! डॉ खऱ्यांच्या प्रतिसादाशी सहमत.

नीलमोहर's picture

1 Oct 2016 - 3:29 pm | नीलमोहर

मनापासून आलेले लिखाण आवडले, तुमचा सकारात्मक दृष्टिकोनही,
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

सूड's picture

3 Oct 2016 - 3:25 pm | सूड

वाचले सगळे भाग

नंदन's picture

3 Oct 2016 - 5:23 pm | नंदन

आवडली. पिरातै आणि डॉ. खरे यांच्या प्रतिसादांशी सहमत आहे.

तुमचे स्वतःचे अनुभव वाचायला मिळाले आणि आवडले.. हळूहळू रविवारचे आणि मित्रांसोबत ड्रिंक्स पण बंद करण्याचा प्रयत्न करा..कारण मर्यादा सोडून कधी वाहवत गेलो हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही...तुम्हाला शुभेच्छा.

कोणी चांगले सल्ले दिले कोणी हुरूप वाढवला त्यांचाही आभारी आहे .

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2016 - 3:58 am | अभिजीत अवलिया

सगळे भाग वाचले

संदीप चित्रे's picture

6 Oct 2016 - 9:14 pm | संदीप चित्रे

इतक्या मोकळेपणाने लिहिणं सोपं नाहीये.
रविवारची घेणं थांबवता येते का ते जरूर बघा!

इडली डोसा's picture

9 Oct 2016 - 9:21 am | इडली डोसा

व्यसनापाई कितीतरी धड्पड्या आणि आयुष्यात खूप काही करु शकणार्‍या लोकांची वाताहत झालेली बघितली आहे. तुम्ही या सगळ्यातुन बाहेर पडण्यात यशस्वी झालात त्याबद्दल तुमचे अभिनंदन... आणि इथुन पुढे या व्यसनापासुन जितके लांब राहता येईल तितके लांब राहण्यासाठी शुभेच्छा!!

चाणक्य's picture

11 Oct 2016 - 10:53 pm | चाणक्य

.

महेश रा. कोळी's picture

11 Oct 2016 - 7:56 pm | महेश रा. कोळी

मना पासून कौतुक वाटतय! तुमच्या आई आणि होणाऱ्या पत्नीला सलाम!