मध्यंतरी '१७ अगेन' हा झॅक अॅफ्रॉन, मॅथ्यू पेरीचा चित्रपट बघण्यात आला. मिडलाइफ क्रायसिस मध्ये अडकलेल्या,
एक साचलेलं, हरलेलं आयुष्य जगणाऱ्या नायकाला एका अपघाताने अचानक पुन्हा सतरा वर्षीय होण्याची संधी
मिळते तेव्हा तो आपल्या चूका सुधारून, आयुष्याची घसरलेली गाडी परत रुळावर कशी आणतो त्याची ही कहाणी.
असे टाइम ट्रॅव्हल वर आधारित बरेच चित्रपट आधीही येऊन गेलेत, जसे की बॅक टू द फ्युचर, १३ गोइंग ऑन ३० इ.
चित्रपट हलकाफुलका मनोरंजक आहे, करण जोहरादी मंडळींनी या कथेवर आधारित पॉपकॉर्नपट हिंदीत आणला नाही
हे एक आश्चर्यच.
चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा विचार आला की खरेच असे झाले तर..?
आपल्याला जर परत वय वर्षे सतरा होण्याची संधी मिळाली तर..?
आपण आयुष्यात काय वेगळे करू ?
स्वत:बद्दल सांगायचे तर, १७ पेक्षाही बालपणात परत जाता आले असते तर आयुष्यातील एक दुर्घटना नक्कीच रिव्हर्स
करण्याचा प्रयत्न केला असता.
बाकी अर्थात आधी शिक्षणात बदल केला असता, नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन (NSD), जेजे वा तत्सम कला संस्थेतून
कला विषयक उच्च शिक्षण घेतले असते,
त्याशिवाय थोडी दंगा-मस्ती अजून केली असती, जी स्वत:ला फार सिरिअसली घेण्याची वाईट सवय लहानपणापासून
लागल्याने केली नाही ;)
थोडाफार स्वभावात बदल केला असता, बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या.
असो. ही यादी कितीही वाढेल. हे सर्व अजूनही केले तरी पुष्कळ आहे :)
परत सतरा वर्षीय होण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय वेगळे कराल वा आपल्या आयुष्यात काय बदल कराल ??
:)
प्रतिक्रिया
1 Sep 2016 - 8:43 pm | सही रे सई
चित्रपट पाहिल्यानंतर मनात असा विचार आला की खरेच असे झाले तर..?
आपल्याला जर परत वय वर्षे सतरा होण्याची संधी मिळाली तर..?
आपण आयुष्यात काय वेगळे करू ?
अगदी माझ्या मनातला प्रश्न मांडलास. परवाच मी एका मित्राशी बोलत होते. माझ्या दोनवर्षाच्या मुलीच बाल्पण बघून मलापण वाटायला लागल की मी पण अत्ता अशी लहान झाले तर काय बहार येईल.
पहिला विचार मनात आला तो म्हणजे माझ्या आइबाबांना जर मी लहानपणी त्रास दिला असेल तर तो कमी देण्याचा प्रयत्न करेन. अत्ता आईच्या रोल मधे आल्यामुळे कळत आहे की तिला व बाबांना किती छळलं असेल लहान असताना अजाणतेपणी.
बाकी मज्जा तर भरपूर करेनच.
1 Sep 2016 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला परत मागे जाऊन फक्त रुटीन आयुष्यातील दोन मिनिटाचा काळ कट करायचा आहे. बाकी, आयुष्यात या क्षणापर्यंत मागे काही राहीलं म्हणून बोच नाही. अलवेज हॅपी म्यान. :)
आता ती दोन मिनिटं काय असतील धागा कर्तीने अंदाज लावला पाहिजे. :)
-दिलीप बिरुटे
2 Sep 2016 - 12:20 pm | लोनली प्लॅनेट
हा विचार तर मी रोज करतो बारावी च्या परिक्षेतच आजारी पडलो होतो.... मागे जात आले तर आधी गॅप घेईन आणि चांगल्या गुणांनी पास होऊन Geology ,oceanography, anthropology, archaeology, astronomy या विषयांमध्ये शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होईन
2 Sep 2016 - 12:47 pm | नीलमोहर
- एवढी हुशारी जवळ असती तर काय होते, बाकी मलाही शक्य असते तर इथल्या कितीतरी चूका नक्कीच
मागे घेतल्या असत्या.
2 Sep 2016 - 8:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याकडून असं समजा की विनाकारण उगाच बंदूक हाताळतांना बंदुकीतून गोळी सुटावी तशी एक गोळी सुटली आणि इतकं मोठं अवकाश असतांना तिथे जायचं सोडून जिथे नेमकं नकोच लागायला तिथेच त्या गोळीने अनपेक्षितपणे वेध घेतला. (मी बंदूक हाताळायला जी मिनिटं घेतली ती मोठी चूक)
" मेरे मरने पर तो लाखो रोने वाले हैं,
तलाश उस पगली की है
जो मेरे रोने से मर जाए..."
-दिलीप बिरुटे
1 Sep 2016 - 8:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
समकालीन आयुष्यायात पॅरामिलिटरी अकादमी पाहिली, तिथे केले जाणारे संस्कार घेतले, देशसेवेचे व्रत घेतले, परत 17चा झालो तर आकाशपाताळ एक छाप मेहनत करून मी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी उर्फ NDA मध्ये प्रवेश घेईन, माझे भंगलेले स्वप्न पूर्ण करीन नखशिखांत ऑलिव्ह ग्रीन रंगात रंगून जाईन, परत एकदा पॅरा कमांडोज साठी प्रयत्न करेल :)
इफ ओन्ली 17 अगेन
1 Sep 2016 - 9:01 pm | प्रचेतस
डेक्कन कालेजात पुरातत्वशास्त्राचे शिक्षण घेतले असते आणि आता राखीगढी किंवा तत्सम ठिकाणी उत्खनन करत बसलो असतो :)
1 Sep 2016 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरातत्वशास्त्राचं प्रशिक्षण आताही घेता येईल एम.ए.इतिहास करा त्यात स्पेशलायझेशन पुरातत्वशास्त्र विभाग विषय घ्या. तुम्हाला मी पैठणला घेऊन जाईन. पालथी नगरी म्हणून तिथे आपण उत्खनन करू. सोन्याची नाणी अजुनही सापडात बघू तिथे नेमका काय जुगाड़ आहे ते....शोधुच. हाय काय आन नाय काय !
-दिलीप बिरुटे
1 Sep 2016 - 9:15 pm | प्रचेतस
आता नाही शक्य ते. जमेल असं वाटत नाही.
पालथी नगरी असल्यामुळेच उत्खनन करु देत नाहीत :(
1 Sep 2016 - 9:14 pm | कैलासवासी सोन्याबापु
+१ , मला जर शिपाई झालो नसतो तर डॉक्युमेंट कॉन्सरवशन अँड अरकायव्हिंग मध्ये विलायतेत उच्च शिक्षण घ्यायची इच्छा होती. कारण किती खजिना आहे भारतात तो conserve करायला हवाय :)
1 Sep 2016 - 9:21 pm | प्रचेतस
खरंच खजिना आहे.
नुसत्या पुण्याच्या पेशवे दफ्तरातच साडेतीन कोटी रुमाल आहेत.
1 Sep 2016 - 9:23 pm | गवि
मग नारायण सायकल हाणीत क्यांपापर्यंत का गेला?
1 Sep 2016 - 9:34 pm | प्रचेतस
मार्झोरीनच्या पेस्ट्रीज आणायला. :(
1 Sep 2016 - 9:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
नॅशनल ट्रेझर पार्ट वन तसे पाहता एक डिस्नी खजिनापट आहे वल्लीजी, तरीही त्यात एक सीन आहे बघा डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडेन्स संबंधी, च्यायला आपण भावूक होतो तो सीन पाहूनच! खंत वाटते आपल्याकडे होत असलेली हेळसांड पाहून, असो! मागे तुम्हांस लोथलचे फोटू पाठवले हुते, त्या विटा पाहूनही असेच वाटत होते, 4000+ इयर्स स्टील गोइंग स्ट्रॉंग! आज 21व्या शतकातल्या आधुनिक भारताला सुद्धा जे जमले नाही ते त्या लोक्स ने त्याकाळी केले होते, स्टँडर्डायझेशन ऑफ ब्रिक्स!!!! अफाट!!! असो, धागा वहावत जाईल देवा
1 Sep 2016 - 9:51 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
कालपरवाच पेपरला धोलविराच्या त्सुनामीपासून संरक्षण करणाऱ्या विटांच्या भिंतीबद्दल आलं होतं. अजूनही शाबूत आणि अजूनही मजबूत.
1 Sep 2016 - 10:37 pm | अभ्या..
चांगली भाजलेली माती हे जगातले सर्वात टिकाऊ मटरेल आहे.
उत्खननात खापरेच सापडतात, धातू अथवा दगडसुद्धा झिजतात, नष्ट होतात.
2 Sep 2016 - 12:30 pm | लोनली प्लॅनेट
मलाही पुरातत्व शास्त्राची फार आवड आहे ...पिरॅमिड व अबू सिमबेल चे मंदिर पाहण्यासाठी आयुष्यात एकदातरी इजिप्त ला भेट द्यायचे स्वप्न आह
पुन्हा माचू पिचू.. मेक्सिको चे पिरॅमिड .. wow..
े
2 Sep 2016 - 1:49 pm | पद्मावति
मस्तं धागा नीमो. 17 अगेन......आयुष्य रीवाइंड करता आलंच तर काही चुका सुधारण्याची इच्छा आहे.
आहा...मस्तं. हियर.
ईजिप्ट, टर्की आणि जॉर्डन असा त्रिकोण करता आला तर....पण सध्याच्या अराजकते मुळे पुढली काही वर्षे तरी शक्य दिसत नाही :(
तसेच मला मेक्सिको, साऊथ अमेरिका, बालीला पण जायचंय. कितीतरी गोष्टी करायच्या आहेत ....miles to go before i sleep...
2 Sep 2016 - 2:06 pm | पद्मावति
सॉरी, सेम हियर असे वाचावे.
1 Sep 2016 - 9:47 pm | अजया
मी सतरा असते तर मेडिकल वेटिंग लिस्ट मधल्या दुसर्या नंबरसाठी थांबुन मेडिकलला गेले असते!
1 Sep 2016 - 10:43 pm | माम्लेदारचा पन्खा
हाय ते बरं हाय....जाऊद्या गाडी !
1 Sep 2016 - 10:47 pm | अभ्या..
सतरा खरच नको, जिंदगीतल बेक्कार वर्ष होते.
पळून जाऊन बाईकचे गॅरेज टाकलो असतो.
2 Sep 2016 - 11:44 am | प्रसन्न३००१
सेम हिअर...
१२वि च्या परीक्षेत फट्टे लागली होती... नापास नाही झालो तेच मिळवलं. पण तसंही याचा पुढील करिअरवर काहीच परिणाम नही झाला.. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठी होते
1 Sep 2016 - 10:54 pm | संदीप डांगे
तेव्हा घरातून पळून जाऊन दूर निर्मनुष्य जंगलात एकटेच जाऊन कायमचे राहावे असे खूप तीव्रतेने वाटत होते, तसं करायला मिळालं तर करिन... लय लोकांचे लय त्रास वाचतील... ;)
2 Sep 2016 - 6:56 am | कैलासवासी सोन्याबापु
कुठं जाता वारी हनमानाच्या डोक्यावर बसायला!! बसा अटीच गपचिप! =))
2 Sep 2016 - 8:32 am | नाखु
तसेही आता डांगे अण्णा जंगलातच हैत्,फक्त अण्णा त्यांना (माणसांच) जंगल म्हणून ओळ्खतेत इतकाच काय तो फरक.
बाकी मूळ लेख १७ वर्षाबाबत असल्याने "सोळावं" वर्षात जाणार्यांची कुचंबणा करणारं आहे ही बाब नम्रपणे नोंदवतो.
1 Sep 2016 - 11:04 pm | एस
मी सतराचाच आहे. फक्त वय एकवीस सांगतो. ;-) वीह्ही वाह्हू वाह्ह्यॅ!
1 Sep 2016 - 11:29 pm | बोका-ए-आझम
फक्त माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आहे. ते नेमके मी त्याच्या दुप्पट वयाचा झाल्यावर गेले.:(
1 Sep 2016 - 11:34 pm | साधा मुलगा
शैक्षणिक जीवन ठीक होते , त्यात आणखी चांगले मार्क्स मिळवून पुढे काहीही उपयोग झाला नसता आणि पुढे व्यावसायिक जीवनातही काही फरक पडला नसता. पण त्याकाळी आवडायच्या अश्या मुलीला/मुलींना प्रोपोज अथवा किमान कोफीपानासाठी तरी विचारले असते. timepass म्हणून पण लफडे करता येते हि कल्पना त्यावेळी माहिती नव्हती. आता त्या मुलींची लग्न होऊन पोरं झाली आहेत. असो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
2 Sep 2016 - 1:19 am | रुपी
मला असेही सगळे मी १७ चीच दिसते असे म्हणतात.. त्यामुळे मी वागतेही त्याला साजेल असंच ;)
2 Sep 2016 - 8:25 am | नावातकायआहे
गायभने! १२वीआठवते...
2 Sep 2016 - 8:40 am | झुमकुला
NDA मध्ये प्रवेश घेऊन भूदलात रुजू झालो असतो
2 Sep 2016 - 12:15 pm | सुबोध खरे
हा एक विपणनाचा डावपेच (marketing strategy) आहे. घाऊक प्रमाणावर घेतली तर १३० किरकोळ घेतली तर १८० रुपये.
घाऊक भाव हा कमीत कमी दहा किलोला म्हणजे माणूस विचार काय करतो? ५०० रुपये वाचतात नाही तरी डाळ आपल्याला लागणार आहेच त्यातून नंतर भाव वाढला तर?
म्हणजे १० किलो डाळ एका फटक्यात खपली.
शिवाय किरकोळीत घेणारा माणूस म्हणतो जाऊ दे महाग आहे तर अर्धाच किलो घ्या.
पण हिशेब डोक्यात पक्का कि आपले २५ रुपये बुडाले. मग जेंव्हा हातात पैसे येतात तेंव्हा दहा किलो घेऊन टाका. पंचवीस रुपयाचा तोटा ५०० रुपये फायद्यात वळता झाला.
अशा वीस किरकोळ घेणाऱ्या लोकांना पिशव्या बांधून देण्यापेक्षा सौ सुनार कि एक लुहार कि. हा हिशेब आहे.
५० % सूट म्हणून जाहिरात करणाऱ्या कंपन्या आपले कपडे ५० % सूट म्हणून देत नाहीत तर एकावर एक फुकट म्हणून आपला मागच्या वर्षीचा न खपलेला माल तुम्हाला खपवतात तसेच आहे. एकच हवा असले तर ३० % सूट मिळते. पॅन्टलून , सॅन फ्रिस्को, पीटर इंग्लंड इ कंपन्यांचे पावसाळ्यात सेल असेच असतात.
2 Sep 2016 - 12:17 pm | सुबोध खरे
प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी आला क्षमस्व
2 Sep 2016 - 2:02 pm | माम्लेदारचा पन्खा
काही अर्थबोध होईना प्रतिक्रिया वाचून !
2 Sep 2016 - 2:04 pm | कंजूस
आपल्याला नाय १७ चं आकर्षण.हाय तो पुढचा स्पीड बराय.
2 Sep 2016 - 2:40 pm | स्वीट टॉकर
आमच्या बोटीवरचा कॅप्टन कोचीनचा होता. त्याने घर बांधताना चाणाक्षपणे दोन प्लॉट्स शेजारशेजारचे विकत घेतले होते. एकावर बंगला बांधून पाच वर्षं राहिल्यावर त्याने 'ह्या घरात कायकाय सुधारणा पाहिजेत' याची यादी केली आणि दुसर्या प्लॉटवर तसा सुधारित बंगला बांधला. मला तो भेटला तेव्हां या दुसर्या बंगल्यात राहायला जाऊन तीन वर्षं झाली होती. मला म्हणाला, "मी तेव्हां तीन प्लॉट्स विकत घ्यायला पाहिजे होते. या घरात देखील चुका आहेतच!"
तात्पर्य काय, तर '17 again' नी फक्त भूक चाळवली जाईल. पोट '17 again and again and again' नी देखील भरणार नाही.
2 Sep 2016 - 4:07 pm | संदीप डांगे
पटले! मन कधी भरत नाही हे खरेच!
अवांतरः ते घरात राहून नंतर सुधारण्याच्या कल्पनेवर एवढ्यात एक सुचलेले! बंगला बांधण्यास साधारण पन्नास लाखाच्या पुढेच खर्च येतो. बरेचदा बांधल्यावर अनेक ठिकानी तोडफोड होते, बरीच गैरसोय अशीच स्विकारली जाते. तेव्हा सिनेमाच्या सेट सारखा बंगला आधी बांधून त्यात थोडे दिवस राहून बदल करुन बघून फायनल डिझाईन प्रत्यक्ष बांधले तर अनेक नंतरचे खर्च आणि भानगडी कमी होतील. ह्यात फर्निचरपासून गॅजेट्सपर्यंत सर्व 'ट्राय' करुन बघता येईल. चला आता याचाही बिजनेस प्लान बनवायला घ्यावा! ;)
2 Sep 2016 - 11:29 pm | रातराणी
मस्त प्रतिसाद!
2 Sep 2016 - 2:55 pm | पैसा
2 Sep 2016 - 4:13 pm | पद्मावति
खी खी खी.....
ऋषि आणि टीना, दोघेही तू सोला मै सतरा म्हणताहेत वरवर पण मनातल्या मनात म्हणत असतील '' चल झूटी....चल झूटे.........."
2 Sep 2016 - 4:34 pm | मारवा
अजुन थोडा लहान होता आलं आणि थोडी परीस्थीती बदलण्याची पण मुभा दोन्ही मिळाले तर
पोटभर जेऊन घेतलो असतो, माझी स्वतःची नवी कंपासपेटी घेतली असती, नवी पुस्तके नव दफ्तर, शाळेजवळच्या गाडीवरुन
केव्हाही कितीही वेळा क्रिम बिस्कीट घेऊन खाल्ल असत.
साल सगळच जुन सगळच अपुर.
2 Sep 2016 - 4:41 pm | रायनची आई
परत १७ ची झाल्यास मी अजून सिरियसली अभ्यास करेन, आयुष्य मोकळेपणाने एन्जॉय करेन आणि आईच्या घरी मनसो़क्त राहून घेइन.आता लग्न झाल्यावर, स्वतः आई झाल्यावर कळत की तिला किती त्रास दिला होता,उलट उत्तर दिली होती,गृहीत धरल होत..
2 Sep 2016 - 4:55 pm | ज्ञानोबाचे पैजार
अजून दोन वर्षांनी जेव्हा मी अठरा वर्षांचा होईन तेव्हा मी या विषयावर विचार करेन.
तो पर्यंत मी बाकिच्यांच्या प्रतिक्रीया वाचत बसतो.
पैजारबुवा,
2 Sep 2016 - 5:05 pm | संदीप डांगे
अहो, इकडे सतरा वर्षांचं होण्याबददल चर्चा सुरु है.. एकशेसतरा नाही.
तो अठराच्या आधीचा गाळलेला शब्द टाका परत.. लब्बाड कुठले!
2 Sep 2016 - 5:38 pm | अद्द्या
स्वतःलाच चार कानाखाली लावल्या असत्या.
"हरामखोरा अभ्यास कर.. सोड तो गेम थोडे दिवस " असं म्हणून . .
परत गेम चालू केला असता.. =]]
No regrets.. जे आहे ते चांगलंय ..
2 Sep 2016 - 6:48 pm | मोदक
+१११
No regrets.. जे आहे ते चांगलंय..!
2 Sep 2016 - 6:20 pm | जेपी
इंटरनेट वर मिपा शोधल असत ..सदस्यत्व घेतल असत..
नुकतच चालु झालत..
च्यामारी जेष्ठ मिपाकर म्हणुन मिरवता आल असत..
गेलाबाजार मिपा संपादक झालो असतो.
शक्य झाल तर हे जमाव ही भासंपदी प्रार्थना..
(no guilt in personal life)