गणपतीचे दिवस !

विश्वेश's picture
विश्वेश in जनातलं, मनातलं
15 Aug 2016 - 11:14 am

आज सकाळी नेहमीची धावपळ चालू असतांना घरात नवीनच आलेल्या बाप्पांनी हाक मारली "अरे कसली एवढी घाई … ?"
"अरे तुझं बर आहे बाप्पा, तुला आता १० दिवस नुसती ऐश करायची आहे … मोदक, पेढे, मखर, आरास … आम्हाला काम आहे … बॉस आहे तिकडे … " मी पोराचे शाळेचे दप्तर भरता भरता उत्तरलो…
"बर बर … मग आज आमचे छोटे उस्ताद … तुमचे चिरंजीव तरी … " बाप्पा काय विचारणार याचा अंदाज आल्याने मी वेळ न दवडता लगेच म्हणालो "छे आज त्याच्या शाळेत गणपती फेस्टिव्हल चे सेलिब्रेशन आहे. बघितलं नाहीस का, एथनिक वेअर, खाऊचा डबा … आणि हो तू विचारायच्या आत सांगतो गृहलक्ष्मी ला सध्या कंपनीमध्ये फार काम आहे … रिलीज चालू आहे त्यात गौरीला हाल्फ-डे घेतलाय आणि विसर्जन नेमकी शुक्रवारी आले असल्याने तिची पंचाईत झाली आहे …" बोलता बोलता पोराचे दप्तर भरून तयार झाले.

पटकन समयीतल्या कालच्याच वाती लांबवल्या तेल रिफील केले, पोराच्या हाती घंटी दिली आजी आजोबांना समजले कि आरतीची वेळ झाली, ते हि रांगेत येउन उभे राहिले अन आरती सुरु झाली. नेहमीपेक्षा अंमळ जास्त वेगात अन "स्मरणे मात्रे मन" गाळून पटकन आरती उरकली, काका हलवाई कडून आणलेले फ्लेवर्ड पेढे प्रसाद म्हणून टेकवले. बायकोने कालच्या प्रसादाचा काला (विविध लोकांकडून, सोसायटीमधून वगैरे आलेल्या आणि घराच्या उरलेल्या प्रसादाचे मिश्रण) एका डब्यात भरून दिला आणि आम्ही निघालो.

"अरे काहीतरी चमचमीत आण संध्याकाळी प्रसादाला, गोड खाऊन खाऊन कंटाळा आला, त्या काका हलवाईच्या मटार करंज्या … बघ म्हणजे जमले तर … आणि हो …" बाप्पा पुन्हा बोलू लागले
आधीच घाई, त्यात बाप्पा पुन्हा अजून वेळ खाणार म्हणून मीच आधी क्लियर केले , "आ(जो)बा, तुम्ही सांगा हो बाप्पाला किती बिझी श्येडूल असते वीकडे चे, बाप्पा ते प्रसादाचे वगैरे डिपार्टमेंट आजी आबांचे असते. चलो बाप्पा संध्याकाळी भेटू … " असे म्हणून काढता पाय घेतला.

एव्हढे सगळे करून मी आणि बायको आपापल्या कंपनीत, पोरगा शाळेत (नटून थटून) वेळेवर पोचल्याने मनातल्या मनात बाप्पा मोरया म्हणत नेहमीच्या टपरीवर चहाचा पहिला घोट घेतला …

आता १० दिवस घरी आजी आबांची मजा आहे, वेळ घालवायला नाही म्हंटले तरी अजून एक पाहुणा आहे असे म्हणत मी फेसबुकवर ४-५ मित्रांचे घरगुती गणपतीचे फोटो लाईक केले.

- विश्वेश

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

15 Aug 2016 - 2:32 pm | किसन शिंदे

छान लिहिलंय. अजून थोडं लिहायला हवं होतं.

अभ्या..'s picture

15 Aug 2016 - 7:25 pm | अभ्या..

आं???
अजून थोडे म्हणजे किती? आंं
.
नवीन असून लिहिताहेत ते बघा....नायतर...................

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2016 - 5:52 pm | ज्योति अळवणी

काहीस वास्तववादी चित्र... जे आजकाल अनेक शहरातील घरांमध्ये बघायला मिळत.

एस's picture

15 Aug 2016 - 7:06 pm | एस

:-)

सस्नेह's picture

16 Aug 2016 - 8:38 am | सस्नेह

छान लिहिलय :)

सूड's picture

16 Aug 2016 - 2:31 pm | सूड

ह्म्म!!