समीकरणाच्या एका बाजूला
कधी कधी दुसरी बाजूच सापडत नाही
ते असंच लटकत राहतं मग तिज्यायला
म्हणजे कसं ना,
की (a+b)^2 ला पत्ताच नसतो
(a^2 + 2ab + b^2) चा
आणि याचा त्याला पत्ता नसतो
कुणीतरी सांगतं मग
की बाबा (a+b)^2= (ab)^2
किंवा असच काहितरी
आणि 'यालाच जीवन म्हणायचं' वगैरे
मग सुरू होते एक फरफट...
कधीमधी त्याला जाणवतंही
की काहीतरी चुकतंय
पण हाकत राहतो तो गाडी
कारण,
त्याला नीटसं समजत नसतं
समीकरणच चुकतंय की आपण
कधी भास होत राहतात त्याला
समीकरण सुटल्याचे
तर कधी स्वीकारली जाते
ती असमानता
कधी निद्रिस्त ज्वालामुखीसारखी
खदखदत राहते ती आत.
मला रविवारी सुट्टी असते
.
.
.
मला रविवारी दिसतात आरश्यात
माझी काही लटकलेली समीकरणं.
------------------------
(टीप:- मिकाने कवितेत सुचवलेल्या सुधारणांबद्दल त्याचे आभार)
प्रतिक्रिया
4 Jul 2016 - 7:41 pm | प्राची अश्विनी
छान कल्पना! आवडली.
4 Jul 2016 - 9:04 pm | रातराणी
भारीये.
4 Jul 2016 - 9:35 pm | धनंजय माने
तसाच विचार केला तर असतं ज्यांना माहिती
(a+b)^2 म्हणजे 'नेमकं किती'
त्यांचं गणित सुटतं नक्की?
(a2+2ab+b2) हे खरंच असतं,
की असतो फ़क्त दिखावा?
का असतं असं समीकरण,
का सोडवायचं गणित,
नुसती सगळी थिअरी च साली
राहून जातं प्रॅक्टीकल.
कोणी म्हटलं कर १०५ चा वर्ग
तर नसतं काही उत्तर
टाका बघू समिकरणात वरच्या
करा (१००+५)^२
सापडेल कदाचित का सोडवायचं गणित
आणि का म्हणायचं वयं पंचाधिकं शतम्
-बळंच कवी
5 Jul 2016 - 7:14 am | मिसळलेला काव्यप्रेमी
गमती गमतीत खुपच छान लिहीलत की मानेमामा...
6 Jul 2016 - 11:39 am | धनंजय माने
बच्चन साहेबांनी एक्स्ट्रा कलाकाराला दिलेली शाबासकी मानावी काय?
का
श्शा- बास्की!
5 Jul 2016 - 7:13 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अत्यंत संवेदनशील रचना..
चाणाक्य __/\__!
6 Jul 2016 - 12:02 pm | एस
दोन्ही समीकरणं, आपलं कविता आवडल्या.
6 Jul 2016 - 12:13 pm | स्पा
क्या बात !!!!