सैराट आन सैराटच

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 3:37 pm

रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली.
म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय.
परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी.
आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला.
आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती.
खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती.
एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव.
.
आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल.
परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार.
होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

ए जिगर. सैराट १५० झाले की राव प्रतिसाद.
माझा मीच करुन घेतो सत्कार ;)
थेट आर्चीचे डोळे असणार्‍या आमच्या हिरवीनीचा एन्लार्जड फोटो घेऊन.

प्रचेतस's picture

9 May 2016 - 4:38 pm | प्रचेतस

=))

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:56 pm | तर्राट जोकर

=))

गणेशा's picture

9 May 2016 - 6:16 pm | गणेशा

वा वा .. मस्त लिहिले आहे

विशाल कुलकर्णी's picture

12 May 2016 - 9:45 am | विशाल कुलकर्णी
वैभव जाधव's picture

12 May 2016 - 12:53 pm | वैभव जाधव

अभ्या भैताड, ह्यो धागा दोनशे कर्नार .
आधीच सांगिटलो हुतो तुला.

रातराणी ने पण भारी लिहिलंय ड्यू आयडी घिऊन ;)

दुर्गविहारी's picture

12 May 2016 - 5:27 pm | दुर्गविहारी

रेडिफवर मी पहील्यादाच मराठी चित्रपटाचे परिक्शण वाचले. द ग्रेट सैराट ___/\____
Beautiful Sairat

प्राध्यापक's picture

12 May 2016 - 5:40 pm | प्राध्यापक

मस्त अप्रतिम चित्रपट......

अविनाशकुलकर्णी's picture

13 May 2016 - 10:43 am | अविनाशकुलकर्णी
आर्बि२३९९'s picture

20 May 2016 - 5:39 pm | आर्बि२३९९

पर्वती झोपडपट्टी मधले शुटींग आहे असे मला आज कळलं (https://www.facebook.com/abpmajha/videos/10156973288055271/). आता ज्यांनी हा सिनेमा -neet पाहिला असेल त्यांना झोपडपट्टी मधला एक गुलाबी झेंडा आठवत असेल… गुलाबी झेंडा == TRS == Telangana ==Hyderabad :D

ह्याच्या 'attention to detail ' वर आपण फिदा हाय

अस्वस्थामा's picture

7 Jun 2016 - 6:37 pm | अस्वस्थामा

बादवे, बीबीसीवाल्यांनी पण नोंद घेतली बरं का सैराटची.. (सुदैवाने स्तुतीच केलीय या वेळेस. ;) )

सिरुसेरि's picture

8 Jun 2016 - 2:44 pm | सिरुसेरि

यावेळच्या दहीहंडीचे फ्लेक्स आतापासुनच डोळ्यासमोर येत आहेत .

समीरसूर's picture

8 Jun 2016 - 3:11 pm | समीरसूर

जबरदस्त परीक्षण!!! आपले लिखाण एक नंबरच असते. अगदी अर्चीसारखे तिखट-गोड! :-)

मला काही दिवसांत बरेच नग भेटले. मी प्रत्येकाला 'सैराट' पाहिला का विचारतो. काही नमुनेदार उत्तरे:

"चांगला आहे का? मी ऐकलं की वाह्यात आहे खूप? खरंच इतका चालतोय का? की नुसती हवा?" (तुझ्या त, नुसतं कुंपणावरून माशा हाकलतोय, जाऊन बघ की जरा)

"अरे, मी म्हटलं चंपकला की एट लिस्ट मराठी फिल्म इंडस्त्रीला कोंट्रिब्युट करण्यासाठी तरी थिएटरला बघू बट चंपक यु नो म्हटला की लेपटोपवरच बघू. तिथे इतकी क्राऊड असेल..." (हिच्यामुळेच तर मराठी फिल्म इंडस्ट्री चालू आहे. हिने खांदा हलवला की खल्लास!)

"थिएटरला जाऊन बघण्यासारखा नाहीये. इतका काही खास नाहीये. आजच मोबाईलवर मिळालाय. बघू सावकाश" (अरे साल्या, कधी तर पैसे काढ पाकिटातून!)

जाऊ द्या...राग येतोय मला...

बाकी अर्ची हे एक स्वप्न आहे. अर्ची एक गूढ रहस्य आहे. अर्ची पहाटेचा मंद गारवा आहे. अर्ची सुरेल मारवा आहे...जाऊ द्या.

रमेश भिडे's picture

10 Jun 2016 - 12:43 pm | रमेश भिडे

लै च पिरमात पडलेला दिसताय आर्चीच्या!
इतकं काय याड लागलं???

माझीही शॅम्पेन's picture

10 Jun 2016 - 12:58 pm | माझीही शॅम्पेन

भिडे अण्णा (जल्ला मेला चुकीचा शब्द) एक वार सैराट बघाच

एकदम भारी लिवलाय अद्ध्यान अन् रातराणीन साल झिंग उतरना झालीय बघा सैराटची !!!

रमेश भिडे's picture

10 Jun 2016 - 1:18 pm | रमेश भिडे

बघितला की!
'एवढं' काय आवडण्यासारखं आहे ते समजलं नाही.

ख फ वर आधीही लिहिलेलं, पाटील आपल्या दांडग्या पोरांना आवरायचं सोडून त्यांना पाठीशी घालत असतो. आर्ची ही पण तशीच दांडगी आहे, बेजबाबदार आहे, सत्तेचा आणि बापाच्या पैशाचा आणि एकंदर सगळा माज असलेली आहे. याच मस्तीत एक पोरगा तिला आवडतो. त्याला 'थेट' पळवून न्यायचं धाडस दाखवते आणि फसते. त्यातनं जमिनीवर आल्यानंतर 'चलो, ठीक है' म्हनेस्तोवर माहेरचि माणसं येऊन 'कांड' करुन जातात.

आर्चीच्या बंगल्याचं नाव पाहिलं का? 'अर्चना'. ती पाटलाची लाडकी पोरगी हाय दादा. नंतर सगळं तपशिलात येतं. गुंठामंत्र्यांची बिघडलेली पोरं आठवत राहतात. इथे आर्ची पोरगा असती तर लोकांच्या याच प्रतिक्रया असत्या का???

माझीही शॅम्पेन's picture

10 Jun 2016 - 1:27 pm | माझीही शॅम्पेन

'एवढं' काय आवडण्यासारखं आहे ते समजलं नाही.

आता रामाची सीता कोण असा प्रश्न झाला हा , ढीगभर धागे आलेना मिपा वर , वाचले असतीलच की नवीन काय सांगणार

इथे आर्ची पोरगा असती तर लोकांच्या याच प्रतिक्रया असत्या का???

हा नवीन धाग्याचा विषय आहे (अजुन एक :) ) तुम्ही काढा मग त्यावर बोलू , हाकानाका

रमेश भिडे's picture

10 Jun 2016 - 1:31 pm | रमेश भिडे

तुम्ही उगाच सचिन चं द्विशतक हुकवणारे द्रविड़ बनू नका ओ!

समीरसूर's picture

10 Jun 2016 - 1:51 pm | समीरसूर

मला एकट्यालाच नव्हे, ८० कोटीचा धंदा 'सैराट'ला करून देणाऱ्या लाखो प्रेक्षकांना अर्चीने भुरळ घातली आहे. तिच्यामधला एक्स फ़ेक्टर जबरदस्त आहे. :-)

मला पण खुप आवड्ला हा पिक्च।र्‍ म्ह्णुण टॉच आयडी घेतला मी , इथे मर ठी टाईप करण अवघड आहे जरा पण .

धनंजय माने's picture

14 Jun 2016 - 10:31 am | धनंजय माने

काय गोड कामं करतात ओ हल्लीची पोरं....

आणि आमच्या वेळचे गावाकडे असलेले पात्र सुद्धा भाषेवर मेहनत घेत नव्हते. इकडे आक्ख्या गावरान बोलीत च सिनेमा बनतोय. आवडलं आपल्याला!

धनंजय माने's picture

14 Jun 2016 - 10:31 am | धनंजय माने

काय गोड कामं करतात ओ हल्लीची पोरं....

आणि आमच्या वेळचे गावाकडे असलेले पात्र सुद्धा भाषेवर मेहनत घेत नव्हते. इकडे आक्ख्या गावरान बोलीत च सिनेमा बनतोय. आवडलं आपल्याला!

कडू प्यार्याची बत्तीशी वठली राव. 200 झाले.
आपला सत्कार सेल्फ असतंय, कारन कुनाच्या बुडाखाली किती अंधार हाय समद्या मिपाला म्हैतेय. येत्या धाग्यात इरोधकांच डिपॉझिट जप्त झाल्याबिगर राहणार नाही.

चांदणे संदीप's picture

14 Jun 2016 - 9:08 pm | चांदणे संदीप

टॉच आयडी घेऊन आर्ची पण आलीये!!
=))

नाखु's picture

14 Jun 2016 - 5:34 pm | नाखु

दोनशे (प्रतिसादा)निमित्त अभ्याशेठ यांचा सत्कार या ठिकाणी जव्हेरगंज भाऊ याचे उप्स्थीतीत्,या ठिकाणी म्हाराष्ट्रातील लोककलांचे अभ्यासक आणि रसरशीत ग्रामीण जीवणाचे अनुभवी लेखक श्री धन्या भाऊ उर्फ गावडे मास्तर यांचे हस्ते, याठिकाणी तसेच का तर वेळ" असल्याने ज्येष्ठ लेणीबाज आणि सौंदर्यप्रेमी वल्ली चिंचवडकर्,याठिकाणी मध्य पुण्यातील धडाडीचे नेतृत्व वप्याभाऊ यांम्च्या उप्स्थीतीत्,अखिल मिपा "बघता काय्,लिहिते रहा" संघाचे आजीवन अध्यक्ष" सुक्ष्रीके यांच्या विद्यमाने पुण्यात मंडई गणपतीजवळ करण्यात येत आहे.
याठिकाणी फूल ना फुलाची पाकळी ऐवजी थेट पुष्पगुच्छ याठिकाणी सर्वांचे लाडके आत्मुदा (मिपा भाव विष्व फेम व यमकांचे स्वामी) यांनी दिला आहे. या ठिकाणी अभ्या यांना एक जलरंगांची पेटी,एक ताव आर्ट पेपर आणि एक पेन्सिल संच देण्यात येत आहे. या ठिकाणी त्यांनी प्रेमाने दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करावा ही विनंती.
अभ्या शेठ यांनी मान्य केल्यासच त्यांना "मस्तानी"पेय देण्यात येईल. आग्रह मान्य करावा ही याठिकाणी गाववाल्यांकडून नम्र विनंती.

सचिव
अखिल मिपा धागा शताब्दी/द्विश्ताब्दी सत्कार समिती पिंचि शाखा .

अभ्या..'s picture

14 Jun 2016 - 5:39 pm | अभ्या..

आयोव.
मंडळ आभारी आहे
मंडळ लै भारी आहे
मंडळी तर लैच भारी आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2016 - 8:35 pm | अत्रुप्त आत्मा

@,एक ताव आर्ट पेपर ››› http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-052.gif

प्रचेतस's picture

14 Jun 2016 - 8:44 pm | प्रचेतस

यमकांचे स्वामी =))

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2016 - 11:23 am | टवाळ कार्टा

लेणीबाज =))

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2016 - 8:19 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif

ईश्वरसर्वसाक्षी's picture

14 Jun 2016 - 5:48 pm | ईश्वरसर्वसाक्षी

अखिल मिपा "बघता काय्,लिहिते रहा" संघाचे आजीवन अध्यक्ष" सुक्ष्रीके यांच्या विद्यमाने
अगागा मेलो ::))

धनंजय माने's picture

14 Jun 2016 - 6:52 pm | धनंजय माने

हा शुद्ध हलकटपणा आहे नादखुळा अण्णा

ईश्वरसर्वसाक्षी's picture

14 Jun 2016 - 6:57 pm | ईश्वरसर्वसाक्षी

त्यात हलकट पणा कसला आलाय.

सिरुसेरि's picture

14 Jun 2016 - 7:23 pm | सिरुसेरि

अर्चीला दहावीच्या परिक्षेसाठी शुभेच्छा .

वपाडाव's picture

15 Jun 2016 - 5:20 pm | वपाडाव

धा येळा सुबेच्चा

देशपांडे विनायक's picture

15 Jun 2016 - 10:38 am | देशपांडे विनायक

अर्चीन शहाण्यामुलीसारखे वागत दुष्काळ म्हणून वाढदिवस साजरा केला नाही .
पण मिपा वर हि ----

मितभाषी's picture

16 Jun 2016 - 11:41 am | मितभाषी

कोण कोणास म्हणाले
ये उपट्या तुझं आळाप्नं कुडय

धनंजय माने's picture

16 Jun 2016 - 12:23 pm | धनंजय माने

अरे काय आहे हे???

मितभाषी's picture

16 Jun 2016 - 8:44 pm | मितभाषी

सैराटचा डायलॉग आहे.