नोकरी : एक सोडणे

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 1:00 pm

टीप : खाली जे काही लिहिलंय ते गेल्या काही दिवसातले माझे अनुभव आहेत आणि १००% सत्य आहेत. अगदी नावेही बदललेली नाहीएत

माणूस जसा जसा मोठा होत जातो, फक्त वयाने नाही , मनाने मानाने आणि पैशाने , तेव्हा स्वतःची काही तत्वे काही नियम स्वतःच तयार करत असतो . समाजाचे नियम असतातच पण काय बरोबर काय चूक याचे , पण प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा हिशोब असतोच. आता तो हिशोब दुसऱ्याला पटतो कि नाही हा नंतरचा मुद्दा. यापूर्वी हा विचार फारसा करायचो नाही , पण गेल्या काही दिवसातले आलेले अनुभव इथे सांगावे वाटले म्हणून हा फाफट पसारा .

तर, " बास झालं बाहेरच्या गावात राहायचं नाटक. आता स्वतःच्या घरी स्वतःच्या गावात राहा आणि काय कमवायचं कमवा " असा आदेश मातोश्रींनी दिला आणि आम्ही बाहेर जायचे रस्ते स्वतःच बंद करून इथेच नोकरी शोधली आणि लागलो कामाला .

तर हा आमचा MD, ८-९ वर्षात नको तेवढं यश मिळालं . आणि कंपनी वाढली चांगली . माणूस टेक्निकली जबरदस्त आहे. पण थोड्या कटकट्या आहे असं ऐकलं होतं, पण तेव्हा पैश्याची गरज होती त्यामुळे समोर आहे त्याचा लाभ घ्यावा म्हणून नोकरीला लागलो. याला समोरच्याचं वय , पद आणि आपण कुठे आहोत हि जागा या गोष्टी न बघता हवं तसं बोलण्याची सवय . यामुळे कित्येक अगदी सुरुवातीपासून असलेले लोक दुखावून भरपूर नुकसान करून घेतलंय. एक-दोन कोर्ट केसीस हि झाल्या. पण शेपूट वाकडी ती वाकडीच . असो

झालं असं , कि या असल्या बोलण्याच्या मला हि दोनदा प्रसाद मिळाला, २ वर्षात फक्त दोनदा म्हणजे चांगलच नाही का ! बाकी आरडा ओरडा ऐकून घेतोच, चूक असताना घेतलाच पाहिजे . पण दोन्ही वेळा त्याने शिवी दिली आणि दोन्ही वेळा मी जमेल तेवढ्या आदराने हे सुचवलं कि शिवी न देता बोला. जी चूक असेल ती शिवी न देता दाखवून द्या. दोन्ही वेळा त्याने "अरे होतं कधी कधी . दुसऱ्याचा राग तिसऱ्या वर निघतो , एवढं मनावर नको घेऊ " इत्यादी पोथी वाचली.

तर आता , पुढील घटना अगदी तारखे प्रमाणे =]]

९ मे :

एक तर ५.३० ला ऑफिस सुटतं म्हणून हातातलं काम अर्धवट टाकून बाहेर पडायची सवय नाही . कितीही वेळ झाला तरी ते काम संपवून मगच बाहेर पडतो. त्यामुळे बहुतेकदा माझी ऑफिस मधून बाहेर पडायची वेळ ७-८ अशीच असते . आणि मालकाला सगळी कामे ५ नंतर सुचतात. आता हे तो मुद्दाम करायचा कि त्याला तेव्हाच आठवायचं हे तोच जाणे. पण त्याला काही नकार नवता माझा, या वयात काम करायला नकार देऊच नये नाही का ? तर या प्रकारे कैच्याकाय वेळेला काम करण्याची सवय असली . तरी एक नियम मी लावला होता, तो म्हणजे ऑफिस मध्ये असताना काय असेल ते सांगा , रात्र भर थांबून संपवेन काम हवं तर , पण एकदा गेट मधून बाहेर पडलो कि परत येणार नाही. (सर्वर बोम्बलला कि काहीही झालं तर येतोच माणूस हा भाग वेगळा , पण सर्वर काही रोज बंद पडत नाही ). तर अश्याच एका गोष्टीत अडकून १०.३० घरी पोचून जेवण करत होतो. आणि तेव्हाच फोन वाजला, मालकच होता .

म्हनला " आदित्य ऑफिस मध्ये ये पटकन , माझा सिस्टम प्रोजेक्टर ला लावायचाय"
खरं तर फक्त एक केबल लावायची असते फक्त. एक तर एप्रिल महिन्याच्या पगार अजून मिळालेला नवता. (अजुनी मिळालेला नाहीये हा भाग वेगळा ). आणि गेल्या वर्षभरात कैच्याकाय कारण देऊन कधी २०% कधी ३०% पगार कट केला होता . पहिले दोनदा मी भांडून ओरडून विनवण्या करून तो काढून घेतला होता , तेव्हा मला वाटलं कि खरोखर कंपनी तोट्यात आहे. तिसरेंदा कट केला तेव्हा मी अकौंटस मधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल कडे लक्ष द्यायला लागलो. पहिले दोनदा कापला तेव्हा आधी नवीन मर्क्स घेतली होती आणि दुसरे वेळी फ्रांस ट्रीप झाली होती साहेबांची, पूर्ण परीवाराला घेऊन. सहल करा,पण लोकांचे पैसे बुडवून नाही . आणि ते हि हक्काचे पैसे. आणि तिसरे वेळी समजलं कि बंगला मोठा बांधतोय , सेन्ट्रल एसी आणि इत्यादी . असो
या सगळ्यामुळे आधीच चिडलेला होतो , तरी शांतपणे म्हणालो कि आत्ताच घरी आलोय, एवढ्याश्या कामासाठी आता परत येता येणार नाही. आणि तसंही हि इमर्जन्सी नाहीये.

यावर माणूस भडकला , " भोसडीच्या , पैसे देतो तुला कामाचे. जेव्हा बोलवेल तेव्हा यायचं. इमर्जन्सी आहे कि नाही मी ठरवणार तू नाही "

एक तर शिवी हा प्रकार प्रचंड चीड आणणारा आहे , म्हणजे . मैत्री खात्यात चालत असतात, पण एकदा तुम्ही ऑफिस किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी आला कि भाषेवर ताबा हवाच. त्यामुळे माझा हि पारा चढला , " हे बघ , पैसे घेतो ते काम करून . तुझी चाटून नाही . शिव्या आपल्या घरी द्यायच्या, मी आत्ता येणार नाहीये . जे उखडायचं ते उखड " आणि फोन कट केला .

आता या प्रकारानंतर नोकरी जाणार हे तर निश्चित होतं. १५ मिनिटात एच आर चा फोन आला . कि उद्या आलास कि आधी सरांच्या केबिन मध्ये ये . पण सकाळी मी गेलोच नाही केबिन कडे आणि कोणी बोलावलं हि नाही .पुढचे दोन दिवस काहीच बोललं नाही कोणी . हा HR आणि इतर सिनियर लोकांकरवी त्याने शांत राहण्याचा धमकीवजा सल्ला दिला होता .

१२ मे :

आमच्या एका मोठ्या क्लायंट कडून लोक आले होते , पुढचे ३ दिवस मीटिंग , प्रोजेक्ट टेस्टिंग इत्यादी प्रकार चालणार होते .सकाळी ८ ते संध्याकाळी ८ असा त्यांचा ३ दिवसाचा कार्यक्रम , या सगळ्यासाठी (कमीत कमी मीटिंग साठी तरी ) मी आणि आमचा इलेक्ट्रिशियन कायम आसपास असणं गरजेचं होतं. अवेळी पाउस आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेलं रस्ता रुंदीकरण यामुळे विजेचा काही भरोसा नवता.
पहिले दोन दिवस गेले आरामात , वीज कित्येकदा गेली . पण UPS आणि जनरेटर च्या भरोश्यावर चालून गेले दिवस. तिसरे दिवशी घोळ झाला. मीटिंग दरम्यान वीज गेली . आणि गेली ती गेली २ तास आलीच नाही . स्टोर्स च्या गोंधळा मुळे डीजेल नवतं आणलेलं.त्यामुळे जनरेटर बंद होता आणि व्हायचं तेच झालं. UPS बंद पडला. मिटिंग रूम मधेच बसलेलो होतो मी, लगेच फोनाफोनी करून इलेक्ट्रिशियन ला बोलवून आम्ही दोघांनी खिशातले पैसे घालून डीजेल आणलं , जनरेटर चालू केला पुढच्या ५ मिनिटात, हे सगळं होई पर्यंत कोणी काहीच बोललं नाही . वीज चालू झाली तसं आम्ही दोघे रूम मध्ये गेलो आणि आलेल्या लोकांकडे माफी मागितली , त्यांनीही "छोटीशी गोष्ट आहे रे, एवढं काय त्यात " म्हणून टाळून दिला विषय .

पण आमचा बॉस, "You bloody bastards, can't even keep a single thing working? now fuck off from here before i fire you" म्हणाला. नागलिंग , जो माझ्याबरोबर या सगळ्यात धावपळ करत होता . त्याला हि माझ्याबरोबर झालेले सगळे घोळ माहिती होतेच , आणि त्यालाही हा प्रसाद आधी मिळाला होता, तरी त्याने शांत पणे उत्तर दिलं. " Sir, once again. do not abuse. it is not our mistake that stores department didn't do their job"

यावर आलेला क्लायंट हि परत म्हणाला कि सोडून द्या हा विषय आणि पुढच्या कामाला लागा .
पण मालकाला राग आवरत नवता. त्याने हातातला वायरलेस माउस आमच्याकडे भिरकावला. तो लागला नागलिंग च्या डोक्यावर, आणि काही कळायच्या आत हा माणूस टेबल वर उडी मारून मालकाची कॉलर पकडून त्याला मारायच्या बेतात होतात. कसं बसं आवरलं त्याला सगळ्यांनी.

आलेल्या लोकांसमोर गोंधळ नको घालायला एवढी अक्कल बहुदा , त्यामुळे तेव्हा काही नाही झालं . पुढचे दोन दिवस आम्ही दोघेही प्रचंड कामात होतो. त्यामुळे लक्ष गेलंच नाही बाकी गोष्टींकडे.

१६ मे :-

हा दिवस तर अगदीच मजेदार होता, कंपनी मध्ये मराठे आडनाव असलेले आम्ही २ लोक आहोत, एक मी, आणि दुसरा रम मराठे, (नाही , मी नाव चुकलेलो नाही . मुद्दाम तसं लिहिलंय. त्याचं नाव राम आहे . पण वाचा खाली, कारण कळेलच ) हे मशीन शॉप मध्ये असतात, माणूस पन्नाशीत आहे, पण तरी सोबत काम करणाऱ्या तरण्या पोरांपेक्षा जास्ती काम करतात , पण एकच गोष्ट वाईट म्हणता येईल अशी म्हणजे, दुपारच्या जेवणासोबत कमीत कमीत "१५" तरी रम लागतेच. आणि ती तो कच्ची घेतो. पण , त्याचा कधी कोणाला त्रास नाही होऊ दिला. वर आणि हे सगळं करून हि वेळच्या वेळी सगळे पार्ट तयार असायचे ड्रील करून . या सगळ्या प्रकारामुळे आम्ही त्यांना रम मराठे बोलवत होतो. कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसापासून असल्यामुळे हे सगळे प्रताप चालून जात होते . HR सुद्धा अधे मध्ये सांगून जायचे , पण सगळ्यांना माहित होतं कि याने काही फरक पडणार नाहीये. २-३ दिवस जायचे मध्ये आणि माणूस परत "नीट " व्हायचा.

तर त्या दिवशी काही घोळ झाला होता बहुदा आणि सकाळीच चढवून आले होते मराठे साहेब कामावर. आणि याची बातमी HR ने मालकाला दिली होती . आणि या हुशार माणसाला वाटलं कि मी पिउन आलोय कामावर आणि त्याने मला बोलावलं केबिन मध्ये.

ऑफिस मध्ये पोचल्याबरोबर मला केबिन मध्ये बोलावण्यात आलं . जाताना HR हि होताच सोबत , तो बडबडत होता . "आदित्य शांतपणे सोडव जे असेल ते , तो माणूस मोठा आहे आणि भरपूर ओळखी आहेत आणि उगाच भांडण वाढवू नको " आत गेल्यावर हि मालकांनी तेच सगळं सांगितलं. पण गोड बोलत. शालजोडीतून धमक्या देणं चाललं होतं. मी हि हसत हसत म्हणालो. "सर माझ्या घरातले मोठे कधी शिव्या देत नाहीत, ना कधी आवाज चढवतात. जे असेल ते समजावून सांगतात नीट . त्यामुळे त्यांच्याबद्दल चा आदर कित्येक पटींनी वाढलाय. लोकांशी नीट वागलात तर हि अशी वेळ येणार नाही . राहिली गोष्ट हे प्रकरण सोडवायची , तर मला लेखी माफी पाहिजे . किंवा सगळ्यासमोर हे कबुल करा कि तुम्ही मला शिवी दिली आणि तुम्ही चुकला. मी हि विसरून जाईन. तुम्हालाही लोकांचे पैसे कापत ट्रिप्स करता येतील "

शेवटचं वाक्य वर्मी बसलं बहुदा, आणि त्याने फोन उचलला . कोणा पिंटू जैन ला फोन लावला. आणि माझ्याकडे बघत म्हणाला कि एक कामगार दारू पिउन दंगा करतोय, मदत हविए लवकर ये.

काय होतंय हे समजत होतं, भीतीने फाटून हातात आली होती. तरी शांत बसून होतो . तसाही खुर्चीवरून उठलो असतो तर पाय कापत असल्यामुळे पडलोच असतो बहुदा . पुढच्या १०-१५ मिनिटात उगाच फालतू बडबड झाली . आणि तेवढ्यात एक माणूस आत आला . अशी उंची जास्त नाही , पण कमावलेलं शरीर होत चांगलंच . तो आत आला , माझ्याकडे लक्ष गेलं नसावं बहुदा. पण माझ्या जीवात जीव आला होता . कारण हा पिंटू जैन म्हणजे माझ्या शाळेतला २ वर्ष सिनियर, प्रवीण जैन . दोनदा नापास होऊन नववीत असताना माझ्या वर्गात आला होता . आणि दोन गल्ल्या सोडून घर होतं. आणि तेव्हा चांगला मित्र होता . पण त्यानंतर तो हि सगळी "समाजसेवा " करू लागला आणि आमचा संबंध संपला होता . योगायोग म्हणा , चांगलं नशीब म्हणा किंवा आणखी काही . पण मला मारायला माझाच वर्ग मित्र बोलावला होता .

एकदम बोलून गेलो . "काय बे ए भुसनळ्या , लग्न झालं म्हणे बे तुझं " आणि तो हि एकदम ओळख पटून "अद्द्या भाड्या , पुण्यात होतास कि , इकडी कधी आलास, आणि तुझे बाबा येउन गेले लग्नाला. तू चुकवलास साल्या " म्हणत माझा हात हातात घेतला .

आसुरी आनंद काय असतो माहितीये? तो झाला होता मला =]]

बाकी काही बोलू न देता त्याला म्हणालो कि मलाच मारायला बोलावलंय याने , आणि वरची सगळी कर्म कहाणी ऐकवली . आणि तो मालकावर च उलटला , कन्नड मध्ये त्यालाच शिव्या शाप देऊन शेवटी त्याचा वेळ वाया घालवल्या बद्दल ओरडून निघून गेला , आणि जाताजाता मला पगार डबल करून नोकरीवर ठेऊन घेण्याचा सल्ला देऊन गेला.

मी हि उठलो , तिथलाच एक कागद उचलला, आणि नोकरी सोडण्याची नोटीस देऊन केबिन मधून बाहेर पडलो.

पुढचा आठवडा एच आर आणि माझ्या मध्ये मेल मेल चे खेळ झाले , पगार जवळपास ७५% वाढवण्याची ऑफर दिली , पण यासगळ्यानंतर इथे काम करण्याची अजिबात इच्छा नवती.

माझ्या मित्राला हे सगळं सांगितल्यावर त्याने आपल्या कंपनीत बोलून फोनवर इंटरव्यू हि घ्यायला लावला होता , आणि १ जून पासून नोकरीवर रुजू होण्याचा मेल हि आलाच होता २५ तारखेला.

तरीही एक नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्या जागेसाठी ४-५ उमेदवार देऊन ठेवले होते. त्यांचे इंटरव्यू हि चालले होते . पण अजुनी एक शेवटचा किडा वळवळत होता मालकात. त्याने मला बोलवून सांगितलं कि आम्ही तुला black list करतोय , आणि बेळगावातली दुसरी कुठलीही कंपनी तुला घेणार नाही . तुझ्या नवीन कंपनीत हि हे करूच , तू कुठे काम करतोस हे शोधायला वेळ लागणार नाही. असं काही होईल याचा अंदाज होता मला ,आणि तसं मी नवीन कंपनीत बोलून हि ठेवलं होतं. आणि तिथल्या एच आर ने सांगितलं होतं त्याप्रमाणे, हि वाक्यं ऐकल्यानंतर मी कसं बसं हसू आवरत त्याला फोन लावला मालकाच्या केबिन मधूनच.

आणि फोन स्पीकर वर ठेवला. संवाद पुढील प्रमाणे .

मी : किरण सर, आदित्य मराठे बोलतोय, परवा आपलं बोलणं झालं होतं . तर माझे इथले बॉस तुमच्याशी बोलणार आहेत .

किरण : दे फोन दे .

दीपक (म्हणजे जुन्या कंपनीचा मालक ) : kiran ,this is deepak here, you might know me. I am the MD of this company.. this guy aditya is working here, and we are not relieving him in any case. and even if he does. i would like to inform you that he drinks on duty and his behavior is not suited in a professional organization.
I am sure that when a company like us says that,. you won't hire him.

किरण : Mr. Deepak, first of all. you cannot just call me kiran as if you know me. basic manners suggest you add " Mr" before someone's name.
second , these threats of black listing Mr. Aditya are a big fat joke. and if you want to take any legal actions, I would suggest you to please go ahead. I can assure that even aditya can take you on easily ,as during our discussion about this issue he mentioned that his close relative is an advocate specializing in labor cases. and apart from that. we are just way out of your league sir. so clear out whatever balances are pending and leave him be. and if not.. well, he is our employee from first of June. and i can guarantee you that only thing blacklisted after we are done with you will be you and your company.

आदित्य, बाळ तू ये १ तारखेला , आपली बस येते ९.३० वाजता बोगारवेस ला. भेटू तेव्हाच .

आणि फोन कट .

तिथून जे बाहेर पडलो ते तिथला दिवस हि पूर्ण न करता घरी पोचलो . आठवडा भर घरी नुसता झोपून काढलाय.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

8 Jun 2016 - 1:08 pm | एकुलता एक डॉन

तुम्ही IT मध्ये असे करून दाखवा
resign केले कि पगार वाढवून नाहीच मिळत

असे केलेळी लोक पाहण्यात आहेत ,
सगळं तुमच्या हातातल्या प्रोजेक्ट आणि आधी केलेल्या कामावर असतं :)

पण तुम्ही म्हणताय तसंही होताच बहुतेकदा ,, कारण तुमच्या पेक्षा अर्ध्या पगारावर तेच काम करायला नको तेवढे लोक तयार असतात :)

कपिलमुनी's picture

8 Jun 2016 - 1:15 pm | कपिलमुनी

आयटीमध्ये फक्त रीझाईन केला तरच पगार वाढतो : आपल्या कंपनीमधे किंवा दुसरीकडे !

एकुलता एक डॉन's picture

8 Jun 2016 - 5:09 pm | एकुलता एक डॉन

MNC मध्ये resign मारा
लगेच दुसरा टपूनअसतो

जबराट , जाम जुने किस्से अठोले

कपिलमुनी's picture

8 Jun 2016 - 1:16 pm | कपिलमुनी

मन मोकळे करायसाठीच धागा आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 1:17 pm | टवाळ कार्टा

=]]

रमेश भिडे's picture

8 Jun 2016 - 1:18 pm | रमेश भिडे

वड ए वड!

नादखुळा धूरळा च!
(सिनेमाटिक लिबर्टी घेतली नाहिएस ना?)

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 1:23 pm | अद्द्या

पहिलीच ओळ वाचली नाही का ?

म्हायत्ये, खुट्टा हलवून पक्का केला बे!

कपिलमुनी's picture

8 Jun 2016 - 1:21 pm | कपिलमुनी

शिव्या ऐकून घ्यायचा काम नाय :)
रीलीव्हींग आणि एक्सपिरीयन्स लेटर घे

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 1:24 pm | अद्द्या

यस सर

रीलीव्हींग आणि एक्सपिरीयन्स लेटर घे..

आन काय ते पीयफ गीयफ आसंल ते पन घेउन सोड बग..! सगळं मिळतं बरोबर.

माझीही शॅम्पेन's picture

8 Jun 2016 - 1:24 pm | माझीही शॅम्पेन

वाह वाह लायिच भारी लिहिलाय दोस्ता , काय अप्पा वरुन इतक दिटेल्वरि कळल नव्हत , जाउ दे झाल गेल गंगेला मिळाल आता नव्या नोकरीच्या प्रचंड शुभेच्छा !!!

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 1:29 pm | टवाळ कार्टा

कायप्पावर तर काही वेगळेच लिहिलेले =))

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 1:30 pm | अद्द्या

=]]]]

स्पा's picture

8 Jun 2016 - 1:36 pm | स्पा

आम्हालाही अँडवा

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 2:12 pm | टवाळ कार्टा

आमाला पावर नाय...ज्यांना हाय ते इथे (जास्त येत) नाय ;)

अरे वा, हुच्च लोकांचा वेगळा ग्रुप आहे का? =))

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 3:03 pm | किसन शिंदे

शॅम्पेन ना? असेल असेल.. =))

माझीही शॅम्पेन's picture

10 Jun 2016 - 12:04 pm | माझीही शॅम्पेन

शिंदे सरकार .. हे काय नवीनच ऐकतोय आम्ही आजी-माजी-भावी संपादक नसल्याने हुच्च होण्याची संधी नाहीच आम्हाला :)

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 3:04 pm | टवाळ कार्टा

अद्द्या हुच्च आहे?

मी-सौरभ's picture

9 Jun 2016 - 4:54 pm | मी-सौरभ

पण टका भाऊ तुमचे काय?

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2016 - 5:00 pm | टवाळ कार्टा

माझे काय?

मी-सौरभ's picture

9 Jun 2016 - 5:09 pm | मी-सौरभ

अरे तुला कुठल्या कॅटेगरी मधे मोजायचा.
काहींना तु अनाहिता चा लाडका वाटतोस;
बाकीचे दुसरेच काही बोलतात.

आय माय कन्फ्युज्ड ;)

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2016 - 10:05 am | टवाळ कार्टा

खि खि खि....

पैसा's picture

8 Jun 2016 - 1:29 pm | पैसा

मस्त धडा शिकवलास! त्याला कोणीतरी झापड द्यायला पाहिजेत खरे तर!

आदिजोशी's picture

8 Jun 2016 - 1:30 pm | आदिजोशी

एकदम लाईव्ह अ‍ॅक्शन :)

जव्हेरगंज's picture

8 Jun 2016 - 1:37 pm | जव्हेरगंज

जाम खत्रा!

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Jun 2016 - 1:38 pm | माम्लेदारचा पन्खा

आम्हीही असेच वागतो ......पण स्वप्नात !

सिरुसेरि's picture

8 Jun 2016 - 1:39 pm | सिरुसेरि

सुन्न करणारे अनुभव . अशा ठिकाणी २ वर्षं थांबलात हेच ...
तुमचीही काही कारणे असतील . मजबुरीका नाम .. . नाईलाजको क्या ईलाज .

अस्वस्थ करणारा अनुभव. कसे काय लोक असे वागतात ..

दाते प्रसाद's picture

8 Jun 2016 - 2:06 pm | दाते प्रसाद

मला समजले कुठली कंपनी आहे ही

त्यांच्याबद्दल एका ईंग्रजी पुस्तकात बरंच लिहुन आलं होतं

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 2:58 pm | अद्द्या

कुठलं म्हणे ?

दाते प्रसाद's picture

8 Jun 2016 - 5:19 pm | दाते प्रसाद

टेक मी होम - Mission Impossible वाचा

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 5:28 pm | अद्द्या

ते होय =]]

पांथस्थ's picture

10 Jun 2016 - 4:42 pm | पांथस्थ

एकदम मस्त इशारा केला आहे मूळ व्यक्तिमत्वाकडे. लगेच सापडले गूगल मधे.

बाकी, लेखकाने उशिरा का होइना योग्य निर्णय घेतला! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

एकुलता एक डॉन's picture

10 Jun 2016 - 5:12 pm | एकुलता एक डॉन

मेरे को नाहीन मिल

मृत्युन्जय's picture

8 Jun 2016 - 2:11 pm | मृत्युन्जय

तुमचा मालक हाफ मॅड आहे हे नक्की.

रमेश भिडे's picture

8 Jun 2016 - 2:18 pm | रमेश भिडे

रच्याकने, त्या (वायरलेस माऊस डोक्यावर लागल्याने टेबलावर उडी मारुन मालकाची कॉलर पकडायला जाणाऱ्या) नागलिंगचं काय स्टेटस???

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 3:05 pm | टवाळ कार्टा

डसला असेल =]]

'नारबाची वाडी' मधला मनोज जोशीचा डॉयलॉक आठवला. "काय शिंचं नाव आहे, चारचौघात घेताना दोनदा विचार करावा लागतोय"

ह.घ्या.

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2016 - 10:02 am | टवाळ कार्टा

=))

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 2:19 pm | किसन शिंदे

हे असे सणकू डोक्याचे एम डी/ व्ही पी कसे काय होतात देव जाणे!

यशोधरा's picture

8 Jun 2016 - 2:26 pm | यशोधरा

गुड जॉब.

अशा ठिकाणी काम करणं अवघड होउन बसतं. आपल्याकडे यासाठी कायदे कडक नाहियेत. कामावर असताना अनैतिक भाषेत बोलणं, शारिरीक इजा पोहोचवणं याबाबत बाहेरील देशात कडक कायदे आहेत.
उदा: कामाच्या वेळांव्यतिरीक्त बॉस कॉल करु शकत नाही व काम करण्यास भाग पाडु शकत नाही.
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/germany/10276815/Out-of...

मस्त!! मी आधीची कुंपणी सोडली होती तेव्हाचे प्रसंग डोळ्यासमोर आले.
नव्या नोकरीसाठी शुभेच्छा!!

समीरसूर's picture

8 Jun 2016 - 2:52 pm | समीरसूर

हॉरीबल आहे हे!!! तुमच्या समजुतदारपणाचं कौतुक वाटतं. माणसात हा समजुतदारपणा पाहिजे. शिवाय तुम्ही वेळच्या वेळी नम्रपणे मालकाला त्याच्या चुकीच्या बोलण्याच्या पद्धतीविषयी समज देत होतात. आणि योग्य वेळी चिडून तुम्ही तुमची बाजू भक्कम आहे हे दाखवून दिलंत. मानलं तुम्हाला. इतका संयम क्वचित कुणाकडे असतो.

पण कुणी आपल्या कर्मचाऱ्यांशी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकतं आणि तरी ही त्याचा व्यवसाय नफ्यात चालवू शकतं याचं खूप आश्चर्य वाटतं.

जाऊ द्या. झालं ते झालं. नवीन नोकरीसाठी तुम्हाला सर्वोत्तम शुभेच्छा! आपल्या कष्टाच्या आणि हुशारीच्या बळावर तुम्ही तिथेही यशस्वी व्हाल याची खात्री आहे.

पिटू जैनला आमचा नमस्कार सांगा! त्याने मैत्रीची जाण ठेवली.

बाकी आडनाव 'जैन' आणि तो लोकांना बडवण्याची कामे अवैधरीत्या करतो हे वाचून मौज वाटली. :-) काही काही आडनावे काही खास क्षेत्रातच शोभून दिसतात. 'जैन' हे उद्योग-व्यवसायातले आडनाव. उद्या एखादा ऑफीस बॉय 'मल्होत्रा' किंवा पेथोलोजी ल्याबसाठी रक्त, लाघवी गोळा करणारा 'ओबेरॉय' असला तर हरकत काही नाही पण आश्चर्य नक्की वाटेल.

('सैराट'च्या परीक्षणाच्या वेळी झाले तसे निरर्थक वाद होऊ नये म्हणून डिसक्लेमर: कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. जनरलायझेशन नाही. 'ओबेरॉय' नावाच्या माणसाने रक्त, लाघवी गोळा करण्यावर आक्षेप नाही. वर्षानुवर्षे काही आडनावांची ओळख निराळी होते म्हणून विचित्र वाटते इतकंच!)

आयला काय मुर्ख माणुस आहे तो दिपक का कोण ते. टायरमध्ये घालुन मारला पाहिजे साल्याला.
जाउ दे आता, जास्त लिहायचे तर शिव्याच येतील.

दिपक.कुवेत's picture

8 Jun 2016 - 3:07 pm | दिपक.कुवेत

लेख आणि अनुभव. आपके हिम्मत की दाद देता हूं.

वा वा अद्द्या भौ!! ओळख असू द्या भौसाहेब!

अप्रतिम डिटेलिंग!

सतिश पाटील's picture

8 Jun 2016 - 4:54 pm | सतिश पाटील

तुम्ही एवढ सगळ सहन केलंत, कमाल आहे तुमची.
आमच्यासारख्याने कधीच त्याला कोपच्यात घेतला असता.

च्यामारी आद्द्या, धुरुळा करतुयास की लका तिकडं.
एनीवे हे शिव्या देणं सोलापुरात नॉर्मल समजलं जातं. पुण्यामुंबईत ज्या शिव्या अपवादाने ऐकू येतात त्या इथे सर्रास वापरल्या जातात. त्यातल्या त्यात काही माणसे तर अगदी एका वाक्यात चार शिव्या घालून बोलतात.
नोकरीत कधी खाव्या लागल्या नाहीत पण व्यवसायात एका बिल्डरला अशाच सवयी होत्या. त्याचे मॅनेजर पण मालकाचे ऐकून ऐकून तोच कित्ता गिरवायचे. त्याची बोलायची सुरुवातच "तिच्या भैणीचा ****" असायची. रोज रोज तेच ऐकून कंटाळलो. दोन तीनदा सांगून बघितले. बदलायला तयार नाही. बर शिव्या अशा डायरेक्ट द्यायचा नाही. इनडायरेक्टली शिव्या असायच्या. एकदा एका बोर्डाच्या मापात माझी चूक नसताना त्याने चालू केले. दोन बाय दहाचा बोर्ड रिकामा राहिला होता. साइटवर बोलावून "ह्या बोर्डाच्या आयचा ***, ह्या रिकाम्या जागेत काय******" ह्या भाषेत चालू झाले. ऐकले ऐकले अन सांगितले " टाकतो तुझा नंबर आणी पुढं लिव्हतो ह्येच्या भैणीचा *****". तो एकदम चमकला. त्यानंतर मी जे नॉण्स्टोप चालू केले ते त्याच्याच स्टाइलने. त्यापुढे त्याने माझ्याशी बोलताना तरी शिव्या वापरल्या नाहीत.
असो. प्रेमाने दिलेल्या चार शिव्या ऐकायला काही वाटत नाही, विनाकारण अथवा तसे नाते नसताना दिल्या तर जागच्या जागी वाजवायचे हिच मेथड बरी वाटते.

अद्द्या's picture

8 Jun 2016 - 8:06 pm | अद्द्या

टाकतो तुझा नंबर आणी ,.,,,,,,,,,,,,

_/\_

प्रचेतस's picture

8 Jun 2016 - 6:50 pm | प्रचेतस

ग्रेट आहेस. अर्थात अशा माजोरड्यांना असाच धडा शिकवला पाहिजे.

अजया's picture

8 Jun 2016 - 7:07 pm | अजया

शाब्बास रे अद्द्या!

च्यायला. असल्या मालकाला तर ठोकूनच काढला पायजे. एमप्लॉयी म्हणजे काय शिव्या सहन करायला ठेवलेला माणूस नाही. मी तरी माझ्या कुठल्याही माणसाला शिव्या घालत नाही. चूक केली तर दोन-तीन वेळा समजावून सांगतो.

एस's picture

8 Jun 2016 - 8:49 pm | एस

भले शाब्बास!

इकडे एकच नियम असतो. हे लोक ओफिसात नसतात तेव्हा वरच्या बॅासच्या घरी नोकर म्हणून हजेरी लावतात.त्यांची अेक्षा त्यांच्या हाताखालच्या लोकांनीही तसेच वागावे ही असते.ज्या बिझनेस ट्रिप्स दाखवलेल्या असतात त्यात बिझनेस काही नसतो.

यसवायजी's picture

8 Jun 2016 - 10:56 pm | यसवायजी

औनआउन.. भारीच केलास सोड बे. आज गृपवर लैच तारीफ वाचलो आनी वेळ काडून वाचून सोडलो बग.

स्वानुभवातील लेखांमध्ये एक वेगळाच तडका असतो. तो इथे अगदी मस्त जाणवला.
नवीन नोकरीसाठी शुभेच्छा.

रेवती's picture

9 Jun 2016 - 12:38 am | रेवती

हम्म्म......... काहीही वैताग अनुभव येतात. त्या नागोबालाही कंपनी बदलायला सांगा. या मनुष्याबरोबर रहायचं म्हणजे नस्ता ताप असेल डोक्याला!

खटपट्या's picture

9 Jun 2016 - 5:03 am | खटपट्या

"नागोबा"

लोळ :)

नाखु's picture

9 Jun 2016 - 8:23 am | नाखु

भारी आणि अस्सल असल्याने खासम खास.

नागोबाला म्हणाव्म डसल्या खेरीज सोडू नको मालकाला (चांगला/मेहनती) कर्मचारी असेल तर तूच घे तुझ्या कंपनीत तेव्ह्ढाच दीपकचा दिवा फडफडेल आणि काजळी धरेल.

नवीन नोकरीला शुभेच्छा !!!

चाकरमानी नाखु

अद्द्या's picture

9 Jun 2016 - 8:01 pm | अद्द्या

हो ,
त्याला माझ्या सोबत ओढलाय मी :)

ऑगस्ट मध्ये लागेल इकडे

नाखु's picture

10 Jun 2016 - 9:33 am | नाखु

अता दिपकाचे काय म्हण्णे आहे याच्याव्र ते पण येऊ दे जरा.

आणि हो ज्या ग्रहकासमोर हा किस्सा झाला त्याचे काम मिळाले का कंपनीला? नसेल तर तुझ्या नवीन कंपनीला ते काम मिळवून दे.

(माज उतर्वायची) एक ही संधी सोडू नकोस
शिव्यांची भाषा कुठेही (कार्यालयात तरी नक्की) अप्रिय असलेला नाखु

सुबोध खरे's picture

9 Jun 2016 - 10:25 am | सुबोध खरे

आदित्य शेट
आपला वरिष्ठ शिव्या देतो हे चूकच आहे पण काही वेळेस शिव्या देणे हा एक सवयीचा भाग असू शकतो किंवा ती एक सवय असू शकते आणि त्या माणसाच्या मनात काही नसेलही
परंतु आपण लिहिलेला खालील भाग हा जास्त चिंता करण्यासारखा आहे
"गेल्या वर्षभरात कैच्याकाय कारण देऊन कधी २०% कधी ३०% पगार कट केला होता . पहिले दोनदा मी भांडून ओरडून विनवण्या करून तो काढून घेतला होता , तेव्हा मला वाटलं कि खरोखर कंपनी तोट्यात आहे. तिसरेंदा कट केला"
याचा सरळ अर्थ हाच आहे कि या माणसाची दानत नाही. कंपनी तोट्यात असेल तर चांगला मालक आपल्या कर्मचार्यांना विश्वासात घेऊन समजावतो. पण आयजीच्या जीवावर बायजी उदार असा प्रकार असेल तर तो एक "स्पष्ट संकेत" म्हणून घेणे अतिशय आवश्यक आहे आणि हा "संदेश" मिळताच आपण दुसरीकडे नोकरी शोधणे आवश्यक आहे. कारण तुम्ही दाबले जात असताना त्याला प्रतिक्रिया दिली नाही तर हा माणूस आपल्याला अजून "पिळून" घेणार यात शंका राहत नाही.
मी मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात(एशियन हार्ट) विभागप्रमुख असताना तेथील सर्वेसर्वा असणार्या अध्यक्षांनी (डॉक्टर रमाकांत पांडा) एक टूम काढली. यापुढे सर्वाना पगार ७० % आणि ३० % समाधानकारक कामाप्रमाणे (PERFORMANCE INCENTIVE) मिळतील. या मध्ये माझाहि पगार ७० % च दिला. मी ताबडतोब इमेल लिहिल्या कि हे आपण केलेल्या कराराच्या विरुद्ध आहे आणी हे मला सपशेल अमान्य आहे. माझा एकट्याचा ३० % पगार त्यांनी दोन दिवसात दिला आणी बाकी सर्वांचा अडकवला. यावर बरीच चर्चा झाली तेंव्हा मी स्पष्टपणे सांगितले कि कराराच्या बाहेरची कोणतीही गोष्ट मला मान्य नाही.
पुढच्या महिन्यात परत त्यांनी माझा ३० % पगार कापला. ताबडतोब त्याच्या दुसर्या दिवशी मी जाणे बंद केले. यावर तुमच्या कडून कराराचा भंग होतो ई मला "समजावण्याचा" प्रयत्न केला गेला. मी उलट न्यायालयात जाण्याची धमकी दिली. त्या रुग्णालयात पाय तर ठेवलाच नाही परंतु ३० % पगार आणी मागच्या वर्षाच्या संचित रजेचे पैसे सुद्धा वसूल करून घेतले.
एशियन हार्ट रुग्णालयाच्या इतिहासात "संपूर्ण" पैसे घेऊन बाहेर पडलेला मी एकमेव माणूस आहे.
कर्मचार्यांचे/डॉक्टरांचे पगाराचे पाच ते सात आकडी पैसे बुडवले गेलेले आहेत. तीन महिने मी थंड पणे घरी बसलो होतो आणी त्याकालावधीत सर्व तयारी करून माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आणी आज मी सुखात आहे (याचे थोडेसे श्रेय मी डॉ. रमाकांत पांडा यांना देईन.)

तात्पर्य -- जर आपला वरिष्ठ असा वागत असेल तर तिथले आपले दिवस भरले असे समजून पुढच्या कार्यवाहीस लागणे.

शिव्या देणे हि खूप जणांची सवय असते , त्यात काही वाईट नाही . वर अभ्यानी उदाहरण दिलंच आहे,

मुद्दा शिव्या देणे किंवा न देणे हा नसून तो कामाच्या ठिकाणी आणि समोरच्याने वारंवार त्या बद्दल नावड दाखवून हि देणे हा आहे .

समोरचा माणूस आपल्या कंपनीत नोकरी करणारा नसून तो गुलाम आहे. हे दाखवून देणारं वागणं असतं काही लोकांच.

बाकी म तुमचा किस्सा हि मस्तच :)

सुबोध खरे's picture

9 Jun 2016 - 8:09 pm | सुबोध खरे

मुद्दा शिव्या देणे किंवा न देणे हा नसून तो कामाच्या ठिकाणी आणि समोरच्याने वारंवार त्या बद्दल नावड दाखवून हि देणे हा आहे .समोरचा माणूस आपल्या कंपनीत नोकरी करणारा नसून तो गुलाम आहे. हे दाखवून देणारं वागणं असतं काही लोकांच.
अगदी बरोबर.१००% मान्य
केवळ एखादा तुमचा "नोकर" आहे म्हणून काहीही बोलणे किंवा शिव्या देणे हे १०० % चूकच आहे.

चांगली अद्दल घडवली - नावाला जागलात असही म्हणता येईल. :) समीरसुर व डॉ. खरे यांचे समर्पक प्रतिसाद आवडले/पटले.

अद्द्या's picture

9 Jun 2016 - 8:02 pm | अद्द्या

सगळ्यांचे आभार :)

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2016 - 8:03 pm | प्रसाद गोडबोले

प्रिय मित्र आदित्य ,

स.न.वि.वि.

प्रांजळ अनुभव कथन आवडले. बाकी ऑफीसात शिव्यांचा वापर हा प्रकार मीही अनुभवालाय मागल्या वर्षी ! आपल्या कंपुतील लोकांना ते कॉर्पोरेट बॅटल माहीत आहेच ते ! अर्थात कॉर्पोरेट कंपनी असल्याने मी सरळ डायरेक्टर लेव्हन अन एह्च आर कडे एस्कलेट केले. दोन डायरेक्टर पुण्यात आल्यावर मला परसनली भेटले होते ! व त्या नंतर बॉस ने सरळ अपोलोजॉईझ केले.

अर्तात तुझी कंपनी भिन्न असल्याने तुझा अनुभव बराच भिन्न आहे , तु जे केले आहेस ते करायला डेअरिंग लागते !

बाकी पुढील वाटचालीस शुभेच्छा !

आपला विनम्र
प्रगो

अद्द्या's picture

9 Jun 2016 - 8:09 pm | अद्द्या

धन्यवाद सर :)

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 8:18 pm | रमेश भिडे

>>>कॉर्पोरेट बॅटल

हा शब्दप्रयोग 'इथे' लागू होतोय? शंकानिरसन करावे

मोठ्या कॉर्पोरेट हाउसमधे तर थेट शीव्या देणे दुरच, एखादा दुसर्‍याला शिव्या देत असेल आणि ते आपल्या कानावर पडले तरी आपण कारवाइ करु शकतो. माझा एक मॅनेजर मित्र बोलताना बर्‍याच शिव्या देत असे. त्याच्या बाजूला बसणार्‍या एका मुलीला त्या शीव्या ऐकून खूप अवघडल्यासारखे होत असे. कारण शिव्या अश्लील होत्या. तीने एचार ला तक्रार केली. शीव्या रेकॉर्ड केल्या गेल्या. आणि तो मित्र ५ वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल करत असताना त्याला नारळ दीला गेला.

नमकिन's picture

10 Jun 2016 - 8:40 am | नमकिन

स्वामी भक्त स्वामी आदर्श ठेवून शिव्या पेरत बोलत असतात, वैषम्य वाटते.
इतर कही आदर्श दिसत नाहींत.

रमेश भिडे's picture

10 Jun 2016 - 12:35 pm | रमेश भिडे

माझ्या माहितिप्रमाणे दोन कॉर्पोरेट हाउसेस भांडतात तेव्हा त्यास कॉर्पोरेट battle असं नामाभिधान आहे.
असो, बदलीन.

५० फक्त's picture

10 Jun 2016 - 4:56 am | ५० फक्त

लई भारी काम गड्या,

कामावर शिव्या हा एक मोठा विषय आहे, आमच्या म्हंजे आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथं शिव्या हा फार कॉमन प्रकार आहे, पण तो कामाच्या शेवटच्या पातळीवर हापिसात नाही.

हापिसात पुर्वी एक उत्तर भारतीय होता, त्यानं जॉइन केलं तेंव्हाच सगळ्यांना सांगितलं की मी मजेत शिव्या देतो सिरियसली घेउ नका वगैरे.. एक दोन वेळा ऐकलं आणि नंतर एकदा सगळ्यांसमोर त्याच्या कुटुंबियांची प्रेमळ चौकशी केली, मग एचार कडं गेला, चौकशी झाली, एकत्र मिटिंग झाली, दोघांनाही नोटिस आल्या, पण त्यानंतर ३-४ महिन्यांतच तो सोडुन गेला, त्यामुळं पार्ट -२ होण्याची कधी वेळ आली नाही.

पण जे केलेंस त्याबद्दल अभिनंदन आणि नविन नोकरीत बेस्ट ऑफ लक...

पियुशा's picture

10 Jun 2016 - 11:49 am | पियुशा

अद्द्या भारी केलेस तु :)

सस्नेह's picture

10 Jun 2016 - 4:48 pm | सस्नेह

दॅट्स द स्पिरिट..!

सविता००१'s picture

10 Jun 2016 - 5:41 pm | सविता००१

लैच भारी काम आहे हे. असंच करायला हवं.

प्रदीप साळुंखे's picture

10 Jun 2016 - 5:52 pm | प्रदीप साळुंखे

छान काम केलस मित्रा!!
बाकि, या अशा अनुभवांमुळेच मी गुलामगिरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला,शिवाय बापजाद्यांची शेतीही आहेच.

शिव्या देण चुकिचच आहे. गुंड बोलवणे आणखिनच चु़क.
पण दुसरी बाजुही कळायला हवी होती.मालक अस का वागला हे ही कळायला हव होत.
तुमची कंपनी लक्षात आली, मालक कसाही असला तरी कंपनी खरच भारी होती.

अद्द्या's picture

11 Jun 2016 - 10:48 am | अद्द्या

"चांगली " शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते :)

its a matter of perspective . पण असो , धन्यवाद :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 9:10 am | डॉ सुहास म्हात्रे

शिव्या देणे, गुंड बोलावणे, इतरांचा पगार कापून स्वतः मजा मारणे... कहर आहे !

जरा जास्तच सहनशील आहात. त्या कंपनीला लाथ मारून बाहेर पडलात ह्ये मात्र ब्येस केलेत.

बापरे! एवढ सगळं होईपर्यंत कसे काय शांत बसला तुम्ही!

सिरुसेरि's picture

11 Jun 2016 - 10:39 am | सिरुसेरि

बेळगावचे रावसाहेब हरिहर यांची आठवण झाली . तरीही तो काळ वेगळा होता आणी हा काळ वेगळा आहे .

आमच्या इथे हिटलर आलाय. काडीचीही अक्कल नसलेला. 5 वर्ष जेथे इमानेएतबारीत काम केले. ते सोडावे लागणार बहुतेक.