मी खूप विसराळू माणूस आहे. अनेक गोष्टी मी हमखास विसरतो. फोन/इंटरनेट ची बिल भरण्यापासून ते अगदी ऑफिसमधली टाईम शीट भरेपर्यंत अनेक गोष्टी आहेत .. शिवाय कामाच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी विसरत राहतो. अगदी बायकोने फोन केला, येताना अमुक एक गोष्ट घेऊन या तरी मी अक्षरशः ती घोकत घोकत गाडी चालवतो. मध्येच traffic मध्ये अडकलो तर ते सुद्धा विसरतो. पुन्हा घरी आल्यावर मला अशी अपूर्ण कामे करायला परत जावे लागते. त्यातून कटकटी होतात, भांडण होतात. काय करावं तेच समजत नाहीये. माझ्या पत्नीला काही जबाबदाऱ्या घे म्हटले तर तिच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. माझा manager म्हणतो तू एक्सेल शीट मध्ये लिहून ठेव, पण तिथे लिहून ठेवणे पण अनेकदा लक्षात राहत नाही. मी आत्ता पस्तिशीत आहे. आजकाल नवीन प्रॉब्लेम चालू झाला आहे. मला स्वप्न पडतात, आणि स्वप्नांमध्ये देवनागरी अक्षरे असतात पण, शब्द, आणि लिखाण एकदम उलट सुलट. काय वाचले आहे ते समजत नाही, आणि डोळे उघडले की सर्व गायब .. काहीच लक्षात राहत नाही. शेवटी एक शब्द काल पकडला - 'कृष्जोष्ट'. आता 'कृष्जोष्ट' हा शब्द गुगल केला तर काहीही सापडले नाही. जगातल्या प्रत्येक प्रश्नावर मी विचार करत राहतो. मग तो प्रश्न कसा सोडवायचा याची स्वप्न रंगवत राहतो. मी कन्या राशीचा आहे. कोणतीच गोष्ट प्रथम प्रयत्नात यशस्वी रीत्या होत नाही. एकदा तर मी बुक केलेली रेल्वेची तिकिटे अनवधानाने रद्द केली आणि मोठा तोटा सहन करावा लागला. मला एखाद्या अध्यात्मिक गुरूची तर गरज नाही ना? खूप उंच ठिकाणी किंवा एकांतात सतत राहावंस वाटतं, गडबड गोंधळ नको वाटतो.
एखाद्या गंभीर प्रकाराला तर मी सामोरा जात नसेल ना? थोडं Frustration आलं आहे.. काय करू तेच समजेना. माझ्यासारख्या मनस्थितीतून अजून कुणी गेलं आहे का?
प्रतिक्रिया
14 May 2016 - 11:18 am | नेत्रेश
शुभेच्छा!
14 May 2016 - 12:43 pm | कविता१९७८
हेच म्हणेन
14 May 2016 - 11:19 am | मुक्त विहारि
का, असाच एक टाइमपास म्हणून धागा काढला आहे?
14 May 2016 - 12:05 pm | अजया
हेच विचारायचे आहे.
अन्यथा थायराॅइड चेक करा एकदा म्हणाले असते.
14 May 2016 - 2:11 pm | मार्मिक गोडसे
थायराॅइड बरोबर विटामीन बी १२ टेस्ट सुद्धा उपयोगी आहे ना?
14 May 2016 - 4:25 pm | टवाळ कार्टा
या प्रश्नाचे उत्तर न विसरता दिले तर पुढचा प्रतिसाद ल्हितो
14 May 2016 - 11:58 am | सिरुसेरि
'कृष्जोष्ट' हे गरुडपुराणातील एखाद्या शिक्षेचे नाव वाटते आहे . जसे की "कुंभीपाकम" , "क्रुमीभोजनम" .
14 May 2016 - 1:45 pm | शब्दानुज
सगळयात आधी मला आजार झालाच आहे ही खात्र्ी स्वताःच स्वताःला करुन घेऊ नका. याची पाडताळणी करुन पहा. जर मी विसराळू आहे असे घोकत राहिलात तर तुम्ही नक्कीच विसराळू होत जाता. जसा विचार कराल तसे बनाल. त्यामुळे मला यापुढे गोष्टी लक्ष्ात राहणार हे स्वताःला दिवसभर खडसावत राहा..
गोष्टी लक्ष्ात ठेवण्याएवजी त्या गोष्टींचे परिणाम लक्ष्ात ठेवा. उदा. आज तुम्हाला घरुन भाजी आणायला सांगितली आहे. आता 'भाजी आणायची ' हे लक्ष्ात ठेवण्याएवजी आज रात्र्ी मस्त पावभाजी खायची आहे हे लक्ष्ात ठेवा. ती पावभाजीची आठवण तुम्हाला भाजी घेऊन जायचे आहे हे लक्ष्ात आणून देईल.
ज्या गोष्टी तुम्ही लक्ष्ात ठेउन केल्या त्या गोष्टींचे कौतुक स्वताःच करा. याची सवय लावा. आणि जास्त विचार करण्याएवजी काही प्रश्ण काळाच्या अोघात सुटत जातात यावर विश्वास ठेवा.
चांगल्या लोकांसोबत राहा. मित्र्ांसोबत वेळ घालवा. काही छंद असतील तर जोपासा. संदीप माहेश्वरींचे काही प्र्ेरणादायी व्हिडीअो आहेत ते पहा.
बाबाबुवा यांच्या नादाला बिलकुल जाऊ नका. तुमच्या लेखातुन तुमचा या गोष्टींवर जास्त विश्वास आहे असे प्रथमदर्शनी तरी वाटते. प्र्ाणायामसारखे साधे सरळ उपाय असताना बाहेर उपाय शोधु नका. आणि तरीही फरक पडत नसेल तर मात्र मानसोपचार घ्या.
14 May 2016 - 2:03 pm | मार्मिक गोडसे
इथले सल्ले बघायला विसराळू धागालेखक येईल ह्याची काय गॅरेंटी? धागा टाकून विसरला असेल तर?
कदाचीत टाईमपास म्हणूनही हा धागा काढला असेल. स्वप्नातील 'कृष्जोष्ट'. हा शब्द आठवण्यासाठी धागालेखकाने कोणती युक्ती वापरली हे जाणून घ्यायला आवडेल.
14 May 2016 - 2:14 pm | रातराणी
कंटाळा काय यायचा त्यात. मी एकदा क्रेडिट कार्ड हरवल म्हणून घर कोपरा न कोपरा धुंडाळला. नाही सापडलं. मग एक दिवस पर्सच्या चोरकप्प्यात सापडलं. मधल्या चार पाच दिवसात मी विसरून गेलेले आपलं कार्ड हरवले म्हणून. होत असं कधी कधी. टेन्शन नाय घ्यायच. महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवायची, फोनमधील रिमाइंडर लावणे इ उपाय करून पाहू शकता.
14 May 2016 - 2:20 pm | गोंडस बाळ
वा शब्दानुज आभारी आहे मार्गदर्शनासाठी, नक्कीच प्रयत्न करीन. उलट मी बाबा बुवांवर विश्वास अजिबात ठेवत नाही. पण काही काही वेळा वाटून जातं ना, म्हणून लिहिले ..
@मार्मिक गोडसे - कृष्जोष्ट - डोळे उघडले की मी विसरतो. म्हणून जाग आली होती पण डोळे तरीही बंदच ठेवले, आणि घोकत राहिलो कृष्जोष्ट,कृष्जोष्,कृष्जोष्ट आणि मग घोकत असताना मोबाईलवर voice नोट पाठवून ठेवली.
14 May 2016 - 2:49 pm | मार्मिक गोडसे
व्हेरी गूड! ह्याचा अर्थ तुमच्या शरीरात केमिकल लोचा नक्कीच झालेला नाहीये. कारण झोपताना तुम्ही स्वतःला डोळे न उघडण्याची कमांड दिली होती, तुमच्या सबकाँशस माइंड ने ते काम व्यवस्थीत केले,ह्याचा अर्थ तुम्ही जागे झाल्यावर तुमचे जागृत मन भरकटत असेल. ते ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करा उदा. प्राणायम, ध्यानधारणा ई.
14 May 2016 - 2:57 pm | किसन शिंदे
मलाही असाच म्हणजे विसराळूपणाचा त्रास आहे...फक्त खूप छोट्या प्रमाणात.
14 May 2016 - 3:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
एक चांगली टंचनिका ठेवा विसरलेल्या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी.
पैजारबुवा,
14 May 2016 - 5:00 pm | जव्हेरगंज
अरे हो की !
यासारख्या सोप्या गोष्टी आधी ट्राय करून बघा ;)
14 May 2016 - 6:17 pm | कानडाऊ योगेशु
ख्या ख्या ख्या!!!
टंच ह्या शब्दावरुन आमच्या ह्या धाग्यावर भोंडला खेळला गेला होता त्याची पुसटशी आठवण आली आणि ड्वॉले पाणावले.
14 May 2016 - 6:20 pm | अभ्या..
मला लै दिवस कुतुहल आहे.
टंचनिका म्हणजे अॅक्चुअल काय असते?
माझा गेस तर अल्लगच हाये पण खरे तर कळू द्या.
14 May 2016 - 9:48 pm | कानडाऊ योगेशु
मला तर टंचनिका म्हटले कि चंद्रशेखर पत्कींच्या व्यंगचित्रातल्या स्त्रियाच डोळ्यासमोर येतात. ;)
15 May 2016 - 11:05 am | बॅटमॅन
पत्कींचं माहिती नाही परंतु प्राचीन काळी आवाज नामक मासिकाचा दिवाळी अंक यायचा त्यात टंच चित्रे असायची ते आठवले....
15 May 2016 - 11:14 am | अभ्या..
तेच ते ब्याटू. पत्की, ज्ञानेश सोनार आणि वसंत हळबे यांच्या चित्रात टंचनिका अवतरायच्या. आहाहाहा.
सध्या घनश्याम देशमुख कि काय ते अशीच रेखाटताना दिसतात बोलक्या रेषा.
15 May 2016 - 12:03 pm | कानडाऊ योगेशु
राईट्ट. आवाज मासिकच. पण मला व्यंगचित्रकाराचे नाव माहीती होते म्हणुन आवाज हा संदर्भ डोक्यात आला नाही. पण खाली अभ्या म्हणतो ताप्र्माणे आवाज मधल्या खिडकीचित्रातल्या स्त्री कॅरेक्टर्सच मला आठवल्या.
14 May 2016 - 3:45 pm | माहितगार
१) सबंध केक एका घासात खाता येत नाही अशी म्हण आहे, समस्येची सगळे भाग एका खाली एक लिहून त्यातील प्राधान्य कशाला याची यादी करुन ज्या समस्या हाताळण्यास सोप्या आहेत त्या आधी निपटून टाकाव्यात.
२) मी वैद्यकीय विषयातला तज्ञ नाही, कोणती औषधे चालू आहेत मागे कोणती औषधे घेतली होती त्यांचे काही साईड इफेक्ट झाले असण्याची शक्यता आहे का ? हे MD अॅलोपथीच्या मेडीसीन क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर सोबत बसून चर्चा करुन घ्यावी (माझे व्यक्तीगत मत)
३) मी वैद्यकीय विषयातला तज्ञ नाही, वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने थायराॅइड अथवा विटामीन बी १२ किंवा इतर काही टेस्ट शक्य असतील तर करुन घेण्यास हरकत नसावी. बी १२ चे प्रश्न रोजच्या जेवणात दूध अंडी फिश इत्यादीचा शक्य समावेश केल्यास हलके होऊ शकतात असे अलीकडील मिपा चर्चेवरुन वाटते
२) काही विषीष्ट गोष्टीचे टेंशन असेल तर त्या समस्या सोडवण्यासाठी सहज काही करण्यासारखे सकारात्मक रचनात्मक आहे का ते थोडे थोडे करा म्हणजे समस्या सुटली नाही तरी त्यासाठी काही केल्याचे मानसिक समाधान मिळून टेंशन कमी होईल.
३) क्रिटिकल गोष्टी आणि नॉन क्रिटीकल मध्ये गल्लत करण्याचे टाळा, क्रिटीकल गोष्टी आणि नॉन क्रिटीकल गोष्टी यात फरक करा आणि क्रिटीकल गोष्टी लक्षात ठेवण्यास प्राधान्य द्या. नॉन क्रिटीकल गोष्टीतली प्रेशर किमान सुरवातीस गुंडाळून बाजूला/साईडला ठेवा. जसे घरातील गॅस इस्त्री गिझर वेळच्यावेळी बंद करणे, घराला लॉक लावणे, एटीएम मधून पैसे कार्ड घेणे, ऑफीसची बॅग सांभाळणे, जिथून कुठून निघाल तेव्हा निघताना किल्ली मोबाईल बॅग इत्यादी आवश्यक बाबी घेतल्या का यास प्राधान्य द्यावे शुन्यचा बल्ब बंद करण्याचे सहज लक्षात राहील्यास करावे पण जे क्रिटीकल नाही ते टेंशन घेउन करत बसू नये. इम्प्रूव्हमेंटेच्या दुसर्या लेव्हल वर टाकावा. (घरातल्या, घरातून अथवा ऑफीस मधून निघताना ऑफीस मधील असा फरक करावा - ऑफीसमध्ये ग्राहक-मग बॉस - मग रिपोर्टींग असा विषीष्ट प्राधान्यक्रम ठरवून घ्यावा )
४) टेंंशन कमी झाले की विशीष्ट क्रिया लक्षात ठेवण्यासाठी मनाला अॅटो सजेशन देता याव्यात. अर्थात जाणकार मंडळी या बद्दल अधिक सांगू शकतील पण हे महत्वाचे असे वाटते.
५) ट्राय टू बी मेटीक्युलस बट डोन्ट एंटरटेन मायक्रो मॅनेजर्स, प्रत्येक गोष्ट नेमके पणाने करा पण बारीक बारीक सूचना सांगणार्यांना -तुमच्या जवळचे नातेवाइक मित्र बॉस असले तरी - थारा देऊ नका. बारीक बारीक सूचना करणारी मंडळी १ तुमचे प्राधान्य क्रम काय असावयास हवेत हे लक्षात घेत नाहीत प्राधान्यक्रम आणि बारीक सूचनातून येणारी प्राधान्य नसलेली कामे यात कन्फ्युजन झाले की गोंधळ आणखी वाढतो २ बॉस मायक्रो मॅनेजर असेल तर बदली करुन घ्या किंवा हातातला चालु जॉब न सोडता जॉब बदलून घ्या. ३) घरातल्या व्यक्तींची कामे लक्षात ठेवत बसून नका यादी करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावरच ढकला.
चुकभूल देणेघे जाणकार आणि तज्ञांचा सला घ्या मी या विषयातला जाणकार अथवा तज्ञ नाही.
14 May 2016 - 5:40 pm | अजया
अरे वा! माहितगारांचा प्रतिसाद आवडला.
14 May 2016 - 5:49 pm | गोंडस बाळ
@माहितगार - नक्कीच प्रयत्न करीन.
15 May 2016 - 10:09 am | माहितगार
वरच्या यादीत, 'पुरेशी झोप' हाही एक महत्वाचा घटक राहून गेला;
(खूप दिवसात सुट्टी टाकली नसेल तर चार-आथ दिवसांची सुट्टी टाकून विश्रांती घेऊन पहा :)
14 May 2016 - 6:39 pm | जेपी
बाकी चे सल्ले वर दिलेतच ..
फारच वाटल तर मिपावर मनमोकळ लिहा..
(मनमोकळा)जेपी
14 May 2016 - 8:16 pm | झेन
तुम्हाला विसराळू पणाचा त्रास आहे हे विसरून जा. नाही मी विनोदाने म्हणत नाही. कश्यामुळे माहित नाही पण मलापण टू व्हिलर च्या किल्ली बद्दल असाच कॉप्लेक्स होता. मी बाकी कुठलीच वस्तू, निरोप, ओफीस चे काम वगैरे विसरत नाही पण ती एकच किल्ली विसरतो, अश्या समजुती मुळे जास्त काळजी घ्यायचो. त्यामुळे नेहमी हरवल्या सारखे वाटायचे. अति विचार करून आत्मविश्वास गंडतो.
14 May 2016 - 8:32 pm | अभ्या..
च्यामारी डॉक्टरला "कधीपासून होतंय असं?" हे ईचारायची पण भीती वाटल.
15 May 2016 - 10:11 am | माहितगार
:) काय फारतर उत्तर मिळणार नाही, अजून काय ?
15 May 2016 - 10:43 am | मार्मिक गोडसे
नाही हो. काय कधीपासून ? असा प्रश्न केला जाईल.
15 May 2016 - 9:35 am | नितिन थत्ते
You will not forget things that "you" think are "important".
बघा विचार करून.
15 May 2016 - 10:58 am | आनन्दा
मला तर हे अनॅल्सिस बाय पॅरॅलिसिस वाटते. तुम्ही मेंदून खूप मोठा गोंधळ करून ठेवला आहे, आणि तुमचा भूतकाळ / भविष्यकाळ तुमच्या वर्तमानावर विजय मिळवतोय असे वाटते.
भूत/भविष्यकाळ स्वीकारा आणि वर्तमानात जगायची सवय करून घ्या म्हणजे सगळे सोपे जाईल..
अवांतर - या प्रतिसादावरून मिपाकरांना एका जुन्या आणि एका नवीन आयडीची आठवण येईल, पण मी त्यांचा डुआयडी नव्हे.
15 May 2016 - 11:00 am | आनन्दा
आणि हो, स्वतःला "गोंडस बाळ" समजायचे सोडून द्या. तुम्ही आता एक पूर्ण पुरूष आहात. आहात ना?
आयडी पण बदललात तरी चालेल.
ह. घ्या.
15 May 2016 - 11:00 am | विवेकपटाईत
सन २०१४ हृदयाच्या बाय पास नंतर मला हि समस्या जाणवली. बहुतेक काही काळ रस्त्यावर बेशुद्ध पडून राहिल्याचा काही परिणाम मेंदूवर झाला असेल. आमची नौकरी म्हणजे पीएस ची. तोडगा काढला. प्रत्येक गोष्ट अर्थात प्रत्येक येणार फोन सुद्धा लिहून ठेवतो. लक्ष्यात नाही राहिले तरी लिहिलेले वाचले कि कळते. प्रत्येक काम जेन्ह्वा च्या तेंव्हा करण्याची सवय लावली. एकाच वेळी एकच काम करण्याची सवय लावली. बाकी नोट बुक सदैव आपल्या जवळ ठेवतो.
15 May 2016 - 2:57 pm | आनन्दा
याच्याशी सहमत.. किंबहुना खरेतर एका विशिष्ट वयात, किंवा विशिष्ट जबाबदारीच्या जागी गेल्यावर आपोआपच स्वतःला नेटकेपणाची सवय लावणे आवश्यक आहे, नाहीतर खूप बोजवारा उडतो. बाकी याच्यावरून रा.ग. गडकरींच्या गोकुळची आठवण आली.
15 May 2016 - 11:06 am | आदूबाळ
आता सरान्ला अज्ञात शक्तींनी बॅन केलं हे सोडा, नाहीतर त्यांनी नक्की मदत केली असती.
15 May 2016 - 11:16 am | अभ्या..
सर थे सर है और सर रहेंगे,
सर एक विचार है
सर एक जीवनपद्धती है
सर एक.....
सर एक......
सर एक.......
15 May 2016 - 12:20 pm | शलभ
हमारे सर आयेंगे..
दुसरा आयडी मेला तरी पहिला आयडी जीवंत झालाय मागेच..
15 May 2016 - 12:51 pm | मार्मिक गोडसे
खरंच की.
15 May 2016 - 12:19 pm | मनीषा
तुम्ही सांगितलेले विसराळुपणाचे प्रसंग अगदी नॉर्मल आहेत हो . अनेकांच्या बाबतीत घडते असे. काही काळजी करू नका.
काही वेळा विसराळु असण्याचा फायदाही होतो.