धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी

कपिल काळे's picture
कपिल काळे in जनातलं, मनातलं
18 Jan 2009 - 9:11 am

न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले.

आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे. उड्डाण सुरक्षेबद्दल आपल्याला विमानात ज्या सूचना दिल्या जातात त्यात अश्या दुर्मिळ प्रसंगी काय करावे ह्याबद्दलही सूचना असतात.

परंतु असा धाडसी निर्णय घेणे आणि त्याची पूर्ण प्रसंगावधानाने अंमलबजावणी करणे हे काम ज्यांनी केले त्या कप्तान सुलेनबर्गर ह्यांना माझा सलाम. विमानातील १५० फक्त नव्हे तर अश्या दुर्घटनाग्रस्त विमानामुळे धोका उत्पन्न झालेल्या , शहरातील इतर लोकसंख्येलाही त्यांनी वाचवले. असा निर्णय घेण्यातील थोडीशी दिरंगाई एका मोठ्या दुर्घटनेचे निमित्त झाली असती.
हडसन नदीतील १ अंश सेल्सियस तापमानात बचावकार्यासाठी फेरी, पोलिस, कोस्ट-गार्ड तत्परतेने आल्यामुळे प्राणहानी झाली नाही. सर्व १५० लोक वाचले.

सगळ्यात शेवटी कप्तान सुलेनबर्गर बाहेर आले. बाहेर येण्यापूर्वी आइल्समधून त्यांनी दोन चकरा मारुन कोणी राहिले नसल्याची खात्री करुन घेतली. त्यांना कॅप्टन करेजियस असेच म्हणावे लागेल.

अमेरिकेच्या हवाई दलातील ह्या निवॄत्त वैमानिकाने आपला अनुभव आणी कौशल्य पणाला लावत, विमान नदीवर उतरवले. लगोलग मदतकार्य सुरु होउन सर्वांचे प्राण वाचले. ह्या घटनेचे विश्लेषण करताना तज्ञांनी असे सांगितले की, विमानातील हवेच्या दाबामुळे बायोनन्सी प्राप्त होते , त्यामुळे विमानाचे दरवाजे उघडले जाइपर्यन्त विमान पाण्यावर तरंगू शकते. पाण्यावर विमान उतरवताना असामान्य कौशल्याशी गरज भासते. पहिल्यांदा शेपटी पाण्यात घालून धक्का कमी करावा लागतो. इथे वैमानिक हवाइ दलात काम केलेला असल्यामुळे त्याने आपला अनुभवाच्या जोरावर ही अशक्य बाब शक्य करुन दाखवली. नदीवर हे लॅन्डींग करताना विमान पूर्णपणे वैमानिकाच्या ताब्यात होते. हे त्यांचे कौशल्य म्हणावे लागेल. अश्या धाडसी, प्रसंगावधानी कॅप्टनला सलाम.

दरम्यान आत्ताच समजलेल्या वॄत्तानुसार ह्या घटनेमागे अल- कायदाचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्या दहशतवादयांनी विमान अपघात घडवून आणण्यसाठी खास प्रशिक्षित पक्षी आपल्या संघटनेत भरती केले असून, असे पक्ष्यांचे थवे मुंबई, हिथ्रो, न्यूयॉर्क अश्या महत्त्वाच्या विमानतळांच्या आसपास सोडून दिले आहेत.

हे पक्षी फिदायीन असून, आपल्या जीवाची पर्वा न करता विमानाच्या इंजिनात घुसतात. विमानाची आणी पर्यायाने त्यामुळे मोठी जिवीतहानी घडवून आणाण्याचा हा मोठा डाव आहे. ह्या पक्ष्यांना अफगाणिस्ताना खास प्रशिक्षण दिले जात असून, हळूहळू जगातील सर्व महत्त्वाच्या विमानतळांच्याआसपास हे पक्षी आपला तळ ठोकतील.
अश्या पक्षांवर मनुष्यहानीस कारणीभूत ठरल्यामुळे न्यूयॉर्क न्यायालयात खटला दाखल झाल्याचेही समजले आहे. मूक मानवाच्या हत्येचा प्रयत्न करणारया पक्षांना इतके दिवस पाठिशी घालणारया मनेका, अल गोर वगैरे प्रभॄतींना सुद्धा ह्या खटल्यात प्रतिवादी केल्याचे समजते.

समाजप्रकटनअभिनंदन

प्रतिक्रिया

सुनील's picture

18 Jan 2009 - 9:27 am | सुनील

उड्डाणापूर्वी दिल्या जाणार्‍या सुरक्षाविषयक सुचना कधी काळी प्रत्यक्षात वापरता येता येत असतील, असे कधीच वाटले नव्हते! वैमानिक सुलेनबर्गर यांच्या कुशलतेचे आणि प्रसंगावधानतेचे कौतुक करावे तेवढे कमीच.

काल हा प्रसंग घडला आणि आजच कलकत्यालादेखिल सधारण असाच प्रसंग घडल्याचे वृत्त आले आहे.

फियादिन पक्षांसंधीच्या वृतात तथ्यांश किती, ते पहावे लागेल. तसे खरोखरच असेल, तर एका वेगळ्या प्रकारच्या दहशतवाचा सामना करण्याची तयारी करावी लागेल, हे नक्की!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनामिक's picture

18 Jan 2009 - 9:29 am | अनामिक

कप्तान सुलेनबर्गर ह्यांना माझाही सलाम!

अनामिक

सखाराम_गटणे™'s picture

18 Jan 2009 - 9:35 am | सखाराम_गटणे™

दरम्यान आत्ताच समजलेल्या वॄत्तानुसार ह्या घटनेमागे अल- कायदाचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्या दहशतवादयांनी विमान अपघात घडवून आणण्यसाठी खास प्रशिक्षित पक्षी आपल्या संघटनेत भरती केले असून, असे पक्ष्यांचे थवे मुंबई, हिथ्रो, न्यूयॉर्क अश्या महत्त्वाच्या विमानतळांच्या आसपास सोडून दिले आहेत.

ह्या बातमीचा दुवा मिळु शकेल काय?
कारण ही नक्की रसमय बातमी आहे.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

अघळ पघळ's picture

19 Jan 2009 - 5:09 am | अघळ पघळ

गटण्या, खरं खरं सांगा हे तू मुद्दाम करतोस का खरंच तू इतका ढढोब्बा आहेस? तुला एकदा भेटलेच पाहिजे बुवा!

बाकी केके, लेख मस्त जमलाय रे! बर्याच दिवसांनी आलास?

अघळ पघळ

मदनबाण's picture

18 Jan 2009 - 9:44 am | मदनबाण

कालच या विमानाच्या क्रॅश लॅडिंगचे फूटेज न्युज चॅनलवर पाहिले,,,तो वैमानिक म्हणजे मला देवदूतच भासला,,स्वतःचे संपुर्ण कौशल्य पणाला लावुन त्याने सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले...
त्या वैमानिकाला माझा सलाम !!!

मूक मानवाच्या हत्येचा प्रयत्न करणारया पक्षांना इतके दिवस पाठिशी घालणारया मनेका, अल गोर वगैरे प्रभॄतींना सुद्धा ह्या खटल्यात प्रतिवादी केल्याचे समजते.

परवा ती पामेला आली होती मुंबईत की कुत्र्यांना मारु नका म्हणुन..आईच्च्या गावातं ,,,,या बयेला काय ठावुक की आमच्या झोपचं खांडोळ ही कुत्तरडी कशी करतात ते !!!!
हे वाचा ती काय म्हणाली ते :-- http://www.loksatta.com/daily/20090116/main.htm

(पेटा ?...)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

पिवळा डांबिस's picture

18 Jan 2009 - 9:55 am | पिवळा डांबिस

हे पक्षी फिदायीन असून, आपल्या जीवाची पर्वा न करता विमानाच्या इंजिनात घुसतात. विमानाची आणी पर्यायाने त्यामुळे मोठी जिवीतहानी घडवून आणाण्याचा हा मोठा डाव आहे. ह्या पक्ष्यांना अफगाणिस्ताना खास प्रशिक्षण दिले जात असून, हळूहळू जगातील सर्व महत्त्वाच्या विमानतळांच्याआसपास हे पक्षी आपला तळ ठोकतील.
हे मस्त!!!!!

ओंकार देशमुख's picture

18 Jan 2009 - 11:40 am | ओंकार देशमुख

अशा फीदाइन पक्षांचा आणि अल कायदाचा भारत सरकार जाहीर निशेध करत आहे.पून्हा जर असा प्रयत्न झाला तर भारत सरकार अत्यंत कडक कारवाइ करेल असा अंतीम इशारा देत आहे, तेव्हा सर्व पक्षांनी घाबरून रहावे...!!!
ओंकारचा ब्लोग-सारथी

सर्वसाक्षी's picture

18 Jan 2009 - 11:51 am | सर्वसाक्षी

वैमानिकाचे प्रसंगावधान व धैर्य तसेच कर्तव्यबुद्धी कौतुकास्पद आहे.

पक्ष्यांविषयी कुतुहल आहे, अधिक माहिती मिळवायला हवी.

सहज's picture

19 Jan 2009 - 7:18 am | सहज

एक फोटो

सचिन's picture

18 Jan 2009 - 1:40 pm | सचिन

त्या कर्तव्यदक्ष वैमानिकाला माझाही सलाम !!
.... त्या सर्व प्रवाशांनाही....ज्यांनी सर्व सुरक्षानियमांचे काटेकोर पालन केले.
.... आणि विमानातल्या स्टाफला ही !!

योगी९००'s picture

18 Jan 2009 - 2:34 pm | योगी९००

माझाही वैमानिकाला सलाम..

फक्त पक्षीच नाही प्राण्यांना सुद्धा फिदायिन प्रशिक्षण दिले जात आहे. आमचा संशय मुंबईतील भटक्याकुत्र्यांवरही असून त्यांच्यावर आम्ही कडक नजर ठेवून असतो.

मागच्याच वर्षी पार्ले येथे अशाच काही कुत्र्यांनी एका मुलीचे लचके तोडले होते. असेच आमच्या एका भांडकुदळ शेजार्‍याचा कुत्र्यांनी पाठलाग करून त्याला गटारात पाडले होते.
त्याचा हात त्यामुळे काही दिवस बांधून ठेवावा लागला होता. जरी आमचे त्या शेजार्‍याबरोबर वैर असले तरी त्याच्यावर झालेल्या या हल्यामुळे आम्ह्यालाही धक्का बसला. तात्पुरते वैर विसरून त्यांच्याबरोबर आम्ही अस्थीरोगतज्ञाकडे गेलो होतो.

खादाडमाऊ

प्राजु's picture

19 Jan 2009 - 2:18 am | प्राजु

खरंच अतिशय कौतुकाचं आहे हे. त्या कॅप्टन सुलेनबर्गर ला सलाम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

19 Jan 2009 - 4:23 am | धनंजय

भारतात विशेषतः हवाई दलाची अनेक विमाने पक्षांशी टक्कर झाल्यामुळे कोसळली आहेत.

पैकी अर्ध्याहून अधिक घटना "रॅप्टर" जातीचे पक्षी (गिधाडे आणि घारी) आदळल्यामुळे झालेले आहेत. भारत सरकार फक्त त्याबाबत हे असले अभ्यास करते, काही कार्य करत नाही.
http://medind.nic.in/imvw/imvw14406.html

ही काय अभ्यास करायची वेळ आहे? आपले शूर वायुसैनिक मारणारे हे फिदायीन पक्षी लगेच सगळे धरून नि:शेष मारून टाकायला पाहिजेत. या नाठाळ पक्ष्यांना बंदुकीच्या गोळ्यांशिवाय वेगळी भाषा कळत नाही.

असो, मनेका गांधी वगैरे आचरट लोकांच्या कनवाळूपणामुळे हे शक्य होत नाही तर नाही. पण कमीतकमी भरतपूर वगैरे ठिकाणी मुद्दामून पक्षी-अभयारण्ये बनवून भारत सरकारने लांगूलचालनाची हद्द केलेली आहे. बरे बाकी राष्ट्रे करतात म्हणून केवळ सौजन्यासाठी कधीतरी घोषित केली असतील, ठीक आहे. पण हवाई दलाचे विमान पडल्याबरोबर पुढच्या दिवशी "अभय" देण्याचे पुचाट धोरण बंद केले पाहिजे. जोवर पक्षीलोक हवाई दलाच्या विमानांवर टक्कर देण्याचे कट बांधणारे आपले जातभाई भारताच्या हवाली करत नाही, तोवर पक्ष्यांची अभयारण्ये देणार्‍या भारत सरकारची मला लाज वाटते.

(वरील प्रतिसादात व्यंग्य आहे हे येथे नमूद करतो. विमानतळांजवळ पक्ष्यांचे या-ना-त्या प्रकारे नियंत्रण करावे, वाटल्यास मारूनसुद्धा नियंत्रण करावे, पण अन्यत्र पक्षी अभयारण्ये शाबूत ठेवावीत, पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ नयेत असे आटोकाट प्रयत्न करावेत - असे माझे गंभीर मत आहे. वरील अभ्यासाचा दुवाही खराखुरा आहे.)

कप्तान सुलेनबर्गर यांना सलाम! (हा सलाम सुद्धा गंभीरच आहे.)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2009 - 11:47 am | बिपिन कार्यकर्ते

फोर लेग्ज गुड, टू लेग्ज बॅड :)

बिपिन कार्यकर्ते

कप्तान सुलेनबर्गर ला सलाम पण ज्या तत्परतेने बचावकार्यासाठी फेरी, पोलिस, कोस्ट-गार्ड आले त्यानाहि लाख लाख सलाम

आमचे पोलिस सगळे झाल्यावर पोहोचतात, शिका काहितरी निकम्मो.

फ्रॅक्चर बंड्या's picture

20 Jan 2009 - 1:42 pm | फ्रॅक्चर बंड्या

आपल्या पुण्यात असे कहि झाले तर मुळा नदित विमान उतरेल का ?

दशानन's picture

20 Jan 2009 - 1:51 pm | दशानन

=))

जबरा प्रश्न !

****

विनोद सोडा.... असा प्रसंग कोणावर ही येऊ नये ह्या मताचा मी आहे... अहो जरासं धुक्यात विमान भरकटले आहे तथा लॅन्ड होण्यसाठी अर्धा एक तास लागेल हे जेव्हा वैमानिकाने आम्हाला सांगितले होते तेव्हा आमचा जीव पार पायाच्या आगठ्याला पोहचला होता मागच्या बर्षी !

प्रभाकर पेठकर's picture

20 Jan 2009 - 2:36 pm | प्रभाकर पेठकर

मुंबई विमानतळाला लागून भली मोठी झोपडपट्टी आहे. तिथे बरेच उकिरडे आहेत तसेच अनेक खाटीकखानेही आहेत. त्यामुळेच मुंबई विमान तळाला पक्षांचा मोठा धोका आहे. धावपट्ट्यांच्या सुरक्षिततेबाबत जागतिक वर्गवारीत मुंबई विमानतळाचा क्रमांक बराच खाली आहे.
माझ्या स्वतःच्या अनुभवात, एकदा मुंबई विमानतळाच्या धावपट्टी पट्टीवरून आकाशात झेपावतानाच्या प्रसंगी, जमीन सोडायच्या आधीच एक पक्षी इंजीनात ओढला गेला. वैमानिकाने ऐनवेळी उडण्याचा निर्णय रद्द करून विमानाला ब्रेक्स लावले. ५-६ गचके खाऊन शेवटी विमान काबूत आले. विमान पुन्हा टर्मिनलला नेण्यात आले असता इंजीनाच्या १२ ब्लेड्स मोडल्याचे निष्पन्न झाले. उड्डाण रद्द झाले. दुसर्‍या विमानाची व्यवस्था होऊन पुन्हा उड्डाण करे पर्यंत २ तास उशीर झाला पण अनर्थ टळला.

विमानतळाशेजारची झोपडपट्टी हटविता येत नाही. सर्व राजकिय पक्षांची ती व्होट बँक आहे. तसा प्रयत्न केला तर पेपरला लगेच बातमी येईल, 'सरकारने, श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी, गरीबांच्या घरादारावर बुलडोझर फिरवला.'

प्रत्येक विमान उतरण्या आणि उडण्याआधी प्रशिक्षित गरूड पक्षी आसमंतात सोडावेत म्हणजे ते इतर पक्षांना पळवून लावतील असा एक पर्याय समोर आला होता पण त्याचे पुढे काय झाले देव जाणे.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

लिखाळ's picture

20 Jan 2009 - 4:42 pm | लिखाळ

प्रत्येक विमान उतरण्या आणि उडण्याआधी प्रशिक्षित गरूड पक्षी आसमंतात सोडावेत म्हणजे ते इतर पक्षांना पळवून लावतील असा एक पर्याय समोर आला होता
माणसाला आकाशात उडता यावे यासाठी पक्षांना असे वेठीस धरणे योग्य आहे का? :)
-- लिखाळ गांधी.

भास्करराव,
लेख आणि टिप्पणी छानच. वैमानिकाचे प्रसंगावधान, धैर्य आणि कौशल्य वाखाणण्याजोगे. तसेच शहरातील अपत्कालीन सेवा इतकी तत्पर आणि वेगवान आहे हे पाहून आश्चर्य आणि कौतूक वाटले.
-- लिखाळ.
उत्कर्ष म्हणजे साडेसाती संपल्याचे लक्षण :)

दशानन's picture

20 Jan 2009 - 4:52 pm | दशानन

तसेच शहरातील अपत्कालीन सेवा इतकी तत्पर आणि वेगवान आहे हे पाहून आश्चर्य आणि कौतूक वाटले.

आमच्या राजधानी मध्ये पाहीले तर त्यांना फिट येईल व कांदा नाकाला लावावा लागेल.... !!

**

लेख आणि टिप्पणी छानच. वैमानिकाचे प्रसंगावधान, धैर्य आणि कौशल्य वाखाणण्याजोगे.

१०१ % सहमत.

अगदी हेच म्हणतो !
मनातील वाक्य गाधी महाराजच ओळखु शकत... नेहरुच्या.... !

तसेच तुम्हि माझ्या मनातील विचार लिहले.... !

तुमचाच,

राज नेहरु !