एक योद्धा होता तो
शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा
जो हात तो धरायचा
त्या मनगटांमधे जोर यायचा
जो माणूस तो जोडायचा
तो पोलादी होऊन जायचा
हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला
ईतकं की पुढे दोनेक पिढ्या
पेटत राहिले होते ते निखारे
त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ
त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे
त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले
उलट जे हात पसरत होते
त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं
की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही
त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं
त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं
आणि त्याची माणसं ? काय कमी पराक्रमी होती ती ?
त्याच्या एका शब्दावर वाटेल तिथे झोकून देत होती स्वतःला
एकएक माणूस म्हणजे आख्खं सैन्यच जणू
अहर्निश कष्ट करून त्याने घडवली होती ती कणखर मने
फार नाही, तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच केली होती त्याने ही मशागत
तो असा काही भरून राहिलाय ईथल्या द-याखो-यात, दगडामातीत
की त्याच्या नुसत्या आठवणीने बाहू फुरफुरतात आमचे
आमचा आहे तो...सांगताना छाती फुगते अभिमानाने आमची
.
.
.
.
.
.
काल आम्ही म्हणे शिवनेरीवर त्याची जयंती साजरी केली
काल आम्ही म्हणे त्याच्या मावळ्यांना आरक्षण देऊ केलं
प्रतिक्रिया
20 Feb 2016 - 2:44 pm | टवाळ कार्टा
गर्वाने??? मराठी येते का? या एका शब्दामुळे नाही आवडली कवीता
20 Feb 2016 - 3:13 pm | चाणक्य
कळलं नाही टका काय चुकलं ते. समजवून सांगतोस का ?
20 Feb 2016 - 5:39 pm | प्रचेतस
इथे गर्वाच्या ऐवजी अभिमान असा शब्द हवा होता. मराठी गर्व = घमेंड, हिंदी गर्व = अभिमान.
20 Feb 2016 - 5:59 pm | चाणक्य
धन्यवाद सांगितल्याबद्दल.
सासं, या कवितेत 'गर्वाने' च्या ठिकाणी 'अभिमानाने' असा बदल कराल का ?
20 Feb 2016 - 6:26 pm | टवाळ कार्टा
हायला...इतक्यात बदलायला पण सांगितले? कस्ले मिपाकर हो तुम्ही....छ्या...पुर्वीचे मिपा राहिले नाही अता ;)
कवीता दणदणीत आहे :)
20 Feb 2016 - 6:34 pm | प्रचेतस
तुम्ही पण संपादकांकडून 'वी' चा 'वि' करून घ्या.
20 Feb 2016 - 7:46 pm | चाणक्य
आता चूक आहे म्हणल्यावर दुरूस्ती करणे आले.
बाकी स्नेहांकिता ताईंना ईथेच धन्यवाद देतो. नाहीतर माझेच प्रतिसाद जास्त व्हायचे.
5 Mar 2016 - 12:35 pm | पीके
गर्व?
आमच्याकडे "गर्वच नाही तर माज आहे..." असं म्हणतात!
20 Feb 2016 - 5:37 pm | प्रचेतस
खूपच सुरेख.
20 Feb 2016 - 6:56 pm | स्पा
चाणक्य इज बॅक
20 Feb 2016 - 7:02 pm | यशोधरा
सुरेख कविता.
20 Feb 2016 - 7:14 pm | सस्नेह
खासच ! अखेरच्या दोन ओळी विशेष भिडल्या.
'अभिमान' असा बदल केला आहे.
20 Feb 2016 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कविता ! मोठ्या विश्रामानंतर केलेल्या पुनरागमनाचे स्वागत ! :)
4 Mar 2016 - 10:00 pm | पद्मावति
सुरेख कविता.
5 Mar 2016 - 10:40 am | एक एकटा एकटाच
चांगली आहे
आवडली
5 Mar 2016 - 11:07 am | हरिदास
सुरेख कविता.
5 Mar 2016 - 12:16 pm | नाखु
शेवटच्या ओळीवरून धाग्यात संसद्+विधानसभा होऊ नये हीच अपेक्षा...
5 Mar 2016 - 12:33 pm | चांदणे संदीप
+१
7 Mar 2016 - 1:20 pm | चिगो
चाणक्य साहेब, कविता आवडली.. जबरा आवडली..
7 Mar 2016 - 1:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सणसणीत आहे...