लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 6:19 pm

पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत.

ha

कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्‍या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे. एका शेतकरी घरातून आलेल्या लान्सनाईक हनमंतआप्पा ह्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन वर्षाची चिमुरडी आहेत.

कुटुंबात सर्वात लहान असलेल्या हनमंतआप्पांचे केवळ सैन्यात भरती व्हायचे स्वप्न होते. अतिशय खडतर अश्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघत, आपल्या गावापासून सहा किलोमीटरवर असलेल्या शाळेत रोज पायी जात-येत त्यांनी शिक्षण घेतले. सैन्य भरतीमध्ये सतत तीन वेळा अपयश येऊनही निराश न होता, जिद्द न हरता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. चौदा वर्षांपूर्वी ह्याच जिद्दीच्या जोरावर अखेर त्यांना १९ मद्रास रेजीमेंटमध्ये नियुक्ती मिळाली. ही जिद्दच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत कायम होती.

चार वर्षांआधीच त्यांचे लग्न महादेवी यांयाशी झाले, त्यांना दोन वर्षांची एक मुलगीही आहे जिचे नाव त्यांनी नेत्रा ठेवले. सहाच महिन्याआधी आपल्या गावी त्यांचा दौरा झाला होता. आपल्या कमाईच्या पैशातून गावात त्यांनी स्वतःचे घरही बांधले आहे.

हिमस्खलन होण्याच्या अगदी एक दिवस आधीच त्यांनी आपल्या घरच्यांना संपर्क करून सर्वांची ख्यालीखुशाली विचारली होती.

सियाचेन च्या अमानवी वातावरणात, अत्यंत कठिण परिस्थितीत, कायम अलर्ट राहणे हे जगाच्या पाठीवर फक्त आपली सेना करू शकते. हे शक्य होते ते फक्त लान्स नाईक हनमंतआप्पांसारख्या जिगरबाज वीरांमुळे. ही धरती, हे आकाश, इथले पाणी, गवताच्या पात्याचा असलेला, नसलेला प्रत्येक कण अन् कण, प्रत्येक भारतीयाचं तन आणि मन ह्या वीरांचे चंद्र-सूर्य असे पर्यंत ऋणी राहील. अशा पोलादी छातीच्या वीरांमुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना सदैव मनात असणे ह्यापेक्षा जास्त परतफेड आपण सामान्य जनता करूच शकत नाही.

ह्या दुर्दवी अपघातात शहिद झालेल्या सर्व दहा भारतीय सैनिकांची नावे व पत्ते. (नावांच्या उच्चाराबद्दल खात्री नसल्याने ईंग्रजीच ठेवली आहेत)

  1. Subedar Nagesha TT r/o vill Tejur, Hassan Dist, Karnataka.
  2. Havildar Elumalai M r/o vill Dukkam Parai, Vellore Dist, Tamil Nadu.
  3. Lance Havildar S Kumar r/o vill Kumanan Thozhu, Teni Dist, Tamil Nadu.
  4. Lance Naik Sudheesh B r/o vill Monroethuruth, Kollam Dist, Kerala.
  5. Lance Naik Hanamanthappa Koppad r/o vill Betadur, Dharwad Dist, Karnataka.
  6. Sepoy Mahesha PN r/o vill HD Kote, Mysore Dist, Karnataka.
  7. Sepoy Ganesan G r/o village Chokkathevan Patti, Madurai Dist, Tamil Nadu.
  8. Sepoy Rama Moorthy N r/o vill Gudisatana Palli, Krishna Giri Dist, Tamil Nadu.
  9. Sep Mustaq Ahmed S r/o vill Parnapalle, Kurnool Dist, Andhra Pradesh.
  10. Sepoy Nursing Assistant Suryawanshi SV r/o village Maskarwadi, Satara Dist, Maharashtra

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहीद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना मिसळपाव परिवारातर्फे साश्रू नयनांनी विनम्र श्रद्धांजली.

(संदर्भः द हिंदु )

समाजजीवनमानप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

11 Feb 2016 - 6:23 pm | भंकस बाबा

मिपावर कोणीतरी आठवण ठेवली

पियुशा's picture

12 Feb 2016 - 3:54 pm | पियुशा

---/\---

_मनश्री_'s picture

11 Feb 2016 - 6:26 pm | _मनश्री_

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
1

फार वाईट वाटल ही बातमी ऐकून.....

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 6:30 pm | उगा काहितरीच

श्रद्धांजली ...

अन्नू's picture

11 Feb 2016 - 6:32 pm | अन्नू

भावपुर्ण श्रद्धांजली.....

अभिजित - १'s picture

11 Feb 2016 - 6:39 pm | अभिजित - १

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मृत्युन्जय's picture

11 Feb 2016 - 6:39 pm | मृत्युन्जय

भावपुर्ण श्रद्धांजली.....

कविता१९७८'s picture

11 Feb 2016 - 6:41 pm | कविता१९७८

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

भावपुर्ण श्रद्धांजली.
बाकी ९ शहिद सैनिकांची माहिती पण धाग्यात अ‍ॅड केली पाहिजे असं वाटतं..

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 6:48 pm | संदीप डांगे

तीच काढतोय. संपादकांना सांगुन अ‍ॅड करतो.

बंट्या's picture

11 Feb 2016 - 6:47 pm | बंट्या

सगळ्या शहिदांना भावपुर्ण श्रद्धांजली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2016 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

_/\_

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 6:56 pm | संदीप डांगे

ह्या दुर्दवी अपघातात शहिद झालेल्या सर्व दहा भारतीय सैनिकांची नावे व पत्ते. (नावांच्या उच्चाराबद्दल खात्री नसल्याने ईंग्रजीच ठेवली आहेत)

(1) Subedar Nagesha TT r/o vill Tejur, Hassan Dist, Karnataka.
(2) Havildar Elumalai M r/o vill Dukkam Parai, Vellore Dist, Tamil Nadu.
(3) Lance Havildar S Kumar r/o vill Kumanan Thozhu, Teni Dist, Tamil Nadu.
(4) Lance Naik Sudheesh B r/o vill Monroethuruth, Kollam Dist, Kerala.
(5) Lance Naik Hanamanthappa Koppad r/o vill Betadur , Dharwad Dist, Karnataka.
(6) Sepoy Mahesha PN r/o vill HD Kote, Mysore Dist, Karnataka.
(7) Sepoy Ganesan G r/o village Chokkathevan Patti, Madurai Dist, Tamil Nadu.
(8) Sepoy Rama Moorthy N r/o vill Gudisatana Palli , Krishna Giri Dist, Tamil Nadu.
(9) Sep Mustaq Ahmed S r/o vill Parnapalle, Kurnool Dist, Andhra Pradesh.
(10) Sepoy Nursing Assistant Suryawanshi SV r/o village Maskarwadi, Satara Dist, Maharashtra

संपादकांना विनंती, शक्य झाल्यास ही नावे मूळ धाग्यात जोडून देणे.

धन्यवाद.

गामा पैलवान's picture

11 Feb 2016 - 6:57 pm | गामा पैलवान

हनुमंताप्पा आणि त्यांच्या साथीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली. व्यर्थ न हो बलिदान.

-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2016 - 7:05 pm | श्रीरंग_जोशी

दु:खद बातमी.

लान्स नाइक हनमंतआप्पा व त्यांच्या तुकडीतील ९ वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 7:06 pm | चेक आणि मेट

भावपूर्ण श्रद्धांजली

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Feb 2016 - 7:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

डोळे भरून येतात....

परत एकदा "लास्ट पोस्ट बिगुल कॉल" वाजणार अन आमचे रक्षण करायला हनुमंतप्पा कायमचे सियाचेनच्या पोस्ट वर घट्ट उभे राहणार

सल्यूट!!

कानडाऊ योगेशु's picture

11 Feb 2016 - 7:12 pm | कानडाऊ योगेशु

सर्व शहीद वीरांना भावपूर्ण श्रध्दांजली.!

संदीप डांगे's picture

11 Feb 2016 - 7:15 pm | संदीप डांगे
स्वाती दिनेश's picture

11 Feb 2016 - 7:24 pm | स्वाती दिनेश

हनमंताअप्पा आणि बाकी सर्व शहीद सैनिकांना मानाचा मुजरा,,
स्वाती

मयुरMK's picture

11 Feb 2016 - 7:56 pm | मयुरMK

सर्व शहीदांना विनम्र श्रद्धांजली!
__/\__

विजय पुरोहित's picture

11 Feb 2016 - 8:00 pm | विजय पुरोहित

सर्व शहीद वीरांना श्रद्धांजली...

सुमीत भातखंडे's picture

11 Feb 2016 - 8:01 pm | सुमीत भातखंडे

विनम्र श्रद्धांजली!

अनंत छंदी's picture

11 Feb 2016 - 8:33 pm | अनंत छंदी

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहीद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना विनम्र श्रद्धांजली.

चांदणे संदीप's picture

11 Feb 2016 - 8:36 pm | चांदणे संदीप

हनुमंताप्पा आणि त्यांच्या साथीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सैनिकांचा गौरव करणारी अतिशय सुंदर अशी हिंदी कविता इथे शेअर केल्यावाचून राहवत नाही.

पुष्प की अभिलाषा

चाह नहीं मैं सुरबाला के
गहनों में गूँथा जाऊँ

चाह नहीं, प्रेमी-माला में
बिंध प्यारी को ललचाऊँ

चाह नहीं, सम्राटों के शव
पर हे हरि, डाला जाऊँ

चाह नहीं, देवों के सिर पर
चढ़ूँ भाग्य पर इठलाऊँ

मुझे तोड़ लेना वनमाली
उस पथ पर देना तुम फेंक

मातृभूमि पर शीश चढ़ाने
जिस पर जावें वीर अनेक ।।

- माखनलाल चतुर्वेदी

जयहिंद!

नीलमोहर's picture

12 Feb 2016 - 3:45 pm | नीलमोहर

प्रेरणादायी, प्रभावी आणि समर्पक कविता, खूप दिवसांनंतर वाचनात आली.

सर्व शहीद सैनिकांना भावपूर्ण श्रध्दांजली...

चांदणे संदीप's picture

12 Feb 2016 - 3:50 pm | चांदणे संदीप

प्रेरणादायी, प्रभावी

कायमच अशी वाटत आलेली आहे ही कविता.

एस's picture

11 Feb 2016 - 8:53 pm | एस

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

त्या सर्व वीरांना प्रणाम!

स्रुजा's picture

11 Feb 2016 - 9:03 pm | स्रुजा

विनम्र श्रद्धांजली :(

कृतज्ञता होतीच आज अनेक पटींनी वाढली.

हनुमंताप्पा आणि त्यांच्या साथीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आदूबाळ's picture

11 Feb 2016 - 9:27 pm | आदूबाळ

:( श्रद्धांजली.

अवांतरः दहा शहीदांपैकी पाच एनसीओ आहेत. जवान-एनसीओ गुणोत्तर काय असतं लष्करात?

चलत मुसाफिर's picture

15 Feb 2016 - 9:23 am | चलत मुसाफिर

सर्व जवान "सिपाही" या पदावर भरती होतात. त्यापुढच्या "नाईक" आणि "हवालदार" या पदांना एन सी ओ (Non Commissioned Officer) म्हणतात. या पदांना दर्शवण्यासाठी डाव्या बाहीवर अनुक्रमे दोन व तीन फिती लावल्या जातात. यांच्या हाताखाली सामान्यतः एक "सेक्शन", म्हणजे दहा जवान असतात.

त्यानंतरच्या "नायब सुभेदार", "सुभेदार" आणि "सुभेदार मेजर" या पदांना जे सी ओ (Junior Commissioned Officer) असे म्हणतात.

_मनश्री_'s picture

11 Feb 2016 - 9:44 pm | _मनश्री_

1

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2016 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! :(

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2016 - 11:12 pm | श्रीगुरुजी

सर्व शहीदांना श्रद्धांजली!

त्यांच्या बलिदानामुळेच भारत व भारतीय सुरक्षित आहेत.

आज भारताचे १० वीर जवान मृत्युमुखी पडलेत. काही काळापूर्वी पाकिस्तानचे १५० जवान मृत्युमुखी पडले होते. भारत व पाकिस्तानमधील सरकारने व सैन्याने आपापसात बोलणी करून सियाचीनमधुन दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यासाठी बोलणी केली पाहिजेत. अन्यथा दोन्ही बाजूच्या सैनिकांचे प्राण युद्ध न करताच जात राहतील.

सर्व जवानांना सॅल्यूट!!!

नाखु's picture

15 Feb 2016 - 10:06 am | नाखु

विनम्र श्रद्धांजली !

गुरुजींची इच्छाही रास्तच आहे

पैसा's picture

11 Feb 2016 - 11:18 pm | पैसा

आपल्यापेक्षा लहान लोकांना श्रद्धांजली वहाताना पोटात कसं तरी होतं. सीमेपलिकडच्या मूठभर युद्धखोरांसाठी असे किती जीव विनाकारण जात रहाणार? युद्धात शहीद झालेल्यांच्या घरच्यांना तेवढे तरी आधारासाठी असते. अपघाती गेलेल्यांना तेही नशिबी येत नाही.

लय थंडी पडली म्हणुन आमी चार वाकळा घेऊन झोपतो त्याच वेळी कोणी वीर बर्फात पाय रोऊन आमच्या झोपेसाठी ऊभे होते.

त्या सैनिकांस भावपुर्ण श्रद्धांजली

पाषाणभेद's picture

12 Feb 2016 - 1:23 am | पाषाणभेद

सर्व सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली.

अर्धवटराव's picture

12 Feb 2016 - 2:06 am | अर्धवटराव

आप्पा आणि अन्य ९ विरांना विनम्र श्रद्धांजली.
अजुन किती बळी घेणार हि हीमनदी :(

सर्व शहिदांना श्रद्धांजली.

भावपुर्ण श्रद्धांजली

अल्पिनिस्ते's picture

12 Feb 2016 - 10:27 am | अल्पिनिस्ते

धन्यवाद सर्व राजकीय पक्षांना ज्यांनी ह्यावर अजुनी राजकारण केलेले नाही !

वेल्लाभट's picture

12 Feb 2016 - 10:36 am | वेल्लाभट

काल हे वाचून खूप वाईट वाटलं...
त्याची झुंज यशस्वी व्हायला हवी होती.

मुक्त विहारि's picture

12 Feb 2016 - 10:40 am | मुक्त विहारि

भावपुर्ण श्रद्धांजली

वामन देशमुख's picture

12 Feb 2016 - 11:02 am | वामन देशमुख

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_

आत्तापर्यंत आपल्यासाठी प्राणांची आहूती दिलेल्या सगळ्या अमर जवानांना कोटी कोटी प्रणाम!

जय हिंद! जय भारत!

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 3:35 pm | पिलीयन रायडर

काही तरी चमत्कार होईल आणि इतके दिवस बर्फात झुंज दिली तर डॉक्टर वाचवतीलच अशी मनाला फार फार आशा होती..
वरती सगळ्यांचे फोटो पाहिले.. कळत नाही डोळ्यातलं पाणी कसं थांबवायचं...

लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

नया है वह's picture

12 Feb 2016 - 3:39 pm | नया है वह

__/\__

शरभ's picture

12 Feb 2016 - 5:35 pm | शरभ

:(

"बेबी" मधला संवाद आठवला - "Are we doing enough for them?"

- श

सूड's picture

12 Feb 2016 - 6:13 pm | सूड

.

रमेश भिडे's picture

12 Feb 2016 - 7:48 pm | रमेश भिडे

काय बोलावं?
भ्रष्ट राजकारणी, आत्ममग्न असल्यासारखी वागणारी आम्ही स्वार्थी माणसं या लोकांसाठी या जवानांनी प्राणाची आहुति दिली.

भावपूर्ण आदरांजलि.

काल हे वाचून खूप वाईट वाटलं...
त्यांची झुंज यशस्वी व्हायला हवी होती.

Rahul D's picture

14 Feb 2016 - 3:40 pm | Rahul D

-^-

मित्रहो's picture

14 Feb 2016 - 3:58 pm | मित्रहो

सर्व शहिदांना विनम्र श्रद्धांजली

तर्राट जोकर's picture

14 Feb 2016 - 10:32 pm | तर्राट जोकर

हुतात्म्यांना श्रद्धांजली! त्यांनी वाहिलेल्या रक्ताचा एक एक थेंब ह्या देशाला दिलेलं कर्ज आहे. कधीही न फेडलं जाऊ शकणारं!