येण्यास जन्मा थोडा उशीर झाला
अन जीवनी सगळाच गोंधळ झाला !
उशीर का झाला ?
गोंधळ का झाला ?
पूर्वजन्मीच्या जीवनाच्या जगण्याचा
करता करता हिशोब पाप-पुण्याचा
शोधताना चुका मागच्या जन्मांच्या
वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला....!
आता हिशेबात चुका नाहीत करायच्या
असा प्रामाणिक निश्चय मनाशीच केला -
मंदिरात जायला थोडा उशीर झाला
अन मंदिराचा दरवाजाच बंद झाला !
उशीर का झाला ?
दरवाजा बंद का झाला ?
देवाच्या देवळात जाताना देवपुजेआधी
माझ्यासाठी व माझ्याच स्वकियांसाठी
काय मागावे ,काय नको ? विचारात याच
वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला !
बंद दाराआडून म्हणालो देवाला
दे सर्व काही ; पण मृत्यू नको मला -
मरतानाही आज थोडा उशीर झाला
अन आत्मा हा माझा स्वर्गही मुकला
उशीर का झाला ?
स्वर्ग का हुकला ?
मोह,माया,मनीषा मनाच्या
संबंध सुटेना यांचा, या जीवनाचा
बंध हे सारे सोडताना, तोडताना
वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला !
तरीही गेली बोलुनी मम मनीची मनीषा
मरते समयी तरी लिही - जीवनाची कविता -
कविता लिहिण्यासही थोडा उशीर झाला
अन जन्म हा व्यर्थ, वायाच असा गेला
शब्दांनी, भावनांनी आणि अववयांनी
देण्यास साथ मला नकार दिला
यांना विनवीताना, समजविताना
वेळ, खूपच गेला अन थोडा उशीर झाला
हि अपूर्ण कविता पूर्ण करावया
जन्म दुसरा तो न कधी मिळाला
बस्स...!
तो मागायला थोडा उशीर झाला...
तो मागायला थोडा उशीर झाला !
प्रतिक्रिया
11 Feb 2016 - 9:18 am | हरिदास
वाह वाह.....