सोने की चिड़ियां

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
25 Jan 2016 - 2:44 am

हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच. ह्यात वर्णिलेली परिस्थिती कधीतरी भारतात असेन, मीही तेव्हा कुठल्याना कुठल्या रुपात याच भारतात जगलो असेन. त्यामुळेच मला अजुन ती अनामिक अटॅचमेंट आहे. कुणीही न शिकवता, न सांगता. मन मोहरून उठतं, रोमांचित होतं.

तरी याचं भजं करायचा मोह झालाच. जे झालंय ते असे झाले बघा....

जहाँ डाल्-डाल् पर्
सोने की चिड़ियां करती है बसेरा
तो भारत हो कुठे गेला... तो भारत हो कुठे गेला

जहाँ सत्य अहिंसा और् धर्म् का
कुणी हो मर्डर केला..
तो भारत हो कुठे गेला... तो भारत हो कुठे गेला

ये धरती वो जहां ऋषि मुनि
जपते थे प्रभु नाम् की माला
आता बोम्ब, बस बोम्ब, बोम्बाबोम्ब

जहां हर् बालक् एक् मोहन् है
और् राधा हर् एक् बाला
आणि इथेच घोटाळा झाला

जहां सूरज् सबसे पहले आ कर्
टमरेल झांके मेरा
तो भारत हो कुठे गेला... तो भारत हो कुठे गेला

अलबेलों की इस् धरती के
त्योहार् भी है अलबेले
ते सगळे इतिहास झाले.

कहीं दीवाली की जगमग् है
कहीं हैं होली के मेले
जिथे दारूने किती जण मेले

जहां राग् रंग् और् हँसी खुशी का
पता ढुंढते जीव गेला....
तो भारत हो कुठे गेला... तो भारत हो कुठे गेला

जहां इन्सानियत से झगडे करते
मंदिर् और् शिवाले
किसी नगर् मे किसी द्वार् पर्
कोईभी डाका डाले

प्रेम् की बंसी जहां बजाना
भुला है ये शाम् सवेरा
तो भारत हो कुठे गेला... तो भारत हो कुठे गेला

(काही ही झालेलं नाही. शब्द सुचले म्हणून लिहिलंय. मी देशाबद्दल नकारात्मक वैगेरे काही नाही. २६ जानेवारीला सगळे गोडधोड लिहितात म्हणून जरा बॅलन्स करायला खारट लिहिलंय.. लय काय तीर नाही मारला..... धन्यवाद!)

अनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीभूछत्रीवाङ्मयशेतीसांत्वनाअद्भुतरसविडंबन

प्रतिक्रिया

कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.
सेम हिअर्..

चांदणे संदीप's picture

25 Jan 2016 - 3:55 pm | चांदणे संदीप

तरी याचं भजं करायचा मोह झालाच. जे झालंय ते असे झाले बघा....

=))

भजं चवदार झालंय! ;)

Sandy

नाखु's picture

25 Jan 2016 - 4:06 pm | नाखु

भजे गो विंडमकडे प्रवास.

आगामी धाग्याचा फक्कड विषय .

सुबह सवेरांवाला नाखु

पैसा's picture

25 Jan 2016 - 5:33 pm | पैसा

मूळ गाणं अजून ऐकलं की फार छान वाटतं. अगदी लहान असताना वाटायचं तितकंच. पण हे भजं सुद्धा जमलं आहे. उद्या करून बघू! =))

चांदणे संदीप's picture

25 Jan 2016 - 6:00 pm | चांदणे संदीप

मस्त आहे हे...ऑफीसातली ४ टाळकी जमवून एक समूह गान करायचा विचार येतोय.......
....... ;)

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 6:03 pm | संदीप डांगे

नेकी और पूछ पूछ...? समूहगान कराच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jan 2016 - 6:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ काय वह्य हे!! निराच म्हणजे लैच म्हणजे असं हाय नाई मंग ते!!! :D :D