सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे, कोणती घ्यावी????

काकासाहेब केंजळे's picture
काकासाहेब केंजळे in जनातलं, मनातलं
20 Jan 2016 - 3:14 pm

मला सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे.हॅचबॅक प्रकारातली गाडी अपेक्षीत आहे.माझा वापर जास्त नसणार आहे, महीण्याला कमाल १००० कीमी वापर होणार आहे.माझे काही प्रश्न आहेत .जाणकारांनी प्रकाश टाकावा.
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.?
२. डीझेल घ्यावी की पेट्रोल.?
३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत?
४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ?
५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय?
६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे.
धन्यवाद.

प्रवासप्रकटनमत

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

20 Jan 2016 - 3:17 pm | आनन्दा

मारुती घ्या..

बाकी वेल्कम ब्याक!

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Jan 2016 - 3:19 pm | ईश्वरसर्वसाक्षी

घर झाल वाटत नवि मुंबईत घेउन...

भाते's picture

20 Jan 2016 - 3:24 pm | भाते

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती यासाठी हा आहे ना?

जो उठतो तो फालतू धागे काढतो. कुठे नेऊन ठेवलंय मिपा?

संमंस विनंती - हा धागा अप्रकाशित करावा आणि सर्वांना या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन करावे.

उगा काहितरीच's picture

20 Jan 2016 - 3:32 pm | उगा काहितरीच

राहूद्या हो धागा काही होत नाही. रच्याकने मला पण सेम प्रश्न आहेत तेव्हा जाणकारांच्या प्रतिक्षेत...

भाते's picture

20 Jan 2016 - 4:05 pm | भाते

मागे असाच निरर्थक धागा आला होता त्यावेळी सुध्दा मी अशीच प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तेव्हा संमंमध्ये असलेल्या एका मिपाकराने मला अश्या धाग्यांवर 'सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती' या धाग्याचा दुवा देण्याची सूचना केली होती. अश्या धाग्यांमुळेच मिपावर अनावश्यक धाग्यांची संख्या वाढत जाते.

प्रसाद१९७१'s picture

20 Jan 2016 - 4:21 pm | प्रसाद१९७१

त्यावेळी तेव्हा संमंमध्ये असलेल्या एका मिपाकराने मला अश्या धाग्यांवर 'सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती' या धाग्याचा दुवा देण्याची सूचना केली होती

आता कारभारी बदलले आहेत, जुन्या आठवणींचा उपयोग नाही.

मराठी कथालेखक's picture

20 Jan 2016 - 5:06 pm | मराठी कथालेखक

सेकंड हँडसाठी Ikon किंवा फोर्डची दूसरी कोणती सेदान घ्या.
मारुती ५०००० नंतर खर्चिक आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टांगा बेष्ट मुंबईत. वैयक्तीक वापराबरोबरचं उद्योग-धंदाही करता येतो. त्यातुन बाजाररहाटासाठी अंमळ चांगला असतो म्हणतात.

आनंदी गोपाळ's picture

20 Jan 2016 - 11:27 pm | आनंदी गोपाळ

चरायला कुठे सोडायचा?

अनुप ढेरे's picture

21 Jan 2016 - 10:25 am | अनुप ढेरे

आणि लावायचा कुठे तो घोडा?

प्रमोद देर्देकर's picture

21 Jan 2016 - 12:39 pm | प्रमोद देर्देकर

आश्लील अश्लील

काकासाहेब केंजळे's picture

20 Jan 2016 - 7:01 pm | काकासाहेब केंजळे

कृपया योग्य मार्गदर्शन करावे,हा धागा टाईमपाससाठी काढलेला नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jan 2016 - 7:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

1. Alto K series Engine preferably
2. Ford Figo
3. Indica
4. Santro

सेकंड हँड घेताय तर शक्यतो पेट्रोल इंजिनचं घ्या. घेतल्यावर एक सर्व्हिसिंग करुन घ्या. बॅटरी, टायर्सची अवस्था वगैरेंवर विशेष लक्ष द्या. गाडी घेतल्यावर साधारण सुरुवातीचे १००० किमी गाडीच्या वागणुकीवर विशेष लक्ष द्या. खास करुन कुठेही काही घासल्याचे आवाज, वळण घेताना व्हायब्रेशन्स वगैरे वगैरे.

काळा पहाड's picture

20 Jan 2016 - 7:36 pm | काळा पहाड

१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? - बघून घ्यावी
२. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? - पेट्रोल
३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? - मारूती, मर्सिडीझ, ऑडी, व्होल्वो, बीएमडब्ल्यू, बेन्टली, अल्फा रोमियो, रोल्स रॉयस
४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? - सर्व्हिसिंग
५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? - हो
६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. - मारूती, नॅनो

खरेदीचा आनंद मिळेल आणि त्यांची वॉरंटी असल्यानं बाकी काही बघावं लागणार नाही.

ही लिंक उपयोगी होईल

संदीप डांगे's picture

20 Jan 2016 - 10:54 pm | संदीप डांगे

१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.?
आपल्या खात्रीच्या मॅकेनिककडून चांगली तपासणी करून घ्यावी. मॅकेनिक सेकंडमध्येही डील करणारा असेल तर नेऊ नये कारण तो काहीबाही कारण सांगून तुम्हाला त्याच्याकडची एखादी घ्यायला लावेल. दोन मित्र, एखादा तरबेज व्यवसायिक ड्रायवर अशा दोघा-तिघांना सोबत घेऊन जावे. प्रत्येकाला टेस्ट-ड्राइवचा अनुभव विचारावा. शक्यतो ओळखीतली गाडी बघावी. अ‍ॅक्सिडेंट हिस्टरी पोलिसांकडे तपासावी, जमले तर महिन्द्रा-फर्स्ट-चॉइसकडे फिफ्टीपॉईण्ट चाचणी करून घ्यावी. कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच असू नये. टायर नीट बघून घ्यावे, अनियमितपणे घासलेले दिसल्यास सावध. सगळे फ्युज नीट बसवलेले व सारी एलेक्ट्रिकल्स नीट काम करतायत का ते बघणे, एसी तपासून घेणे. दहा मिनिटाच्या राईडमधे एसी चे मेजर प्रॉब्लेम लक्षात येत नाहीत. ब्रेकींग आणि स्पीडब्रेकरक्रॉसिंगला गाडी कशी रीअ‍ॅक्ट करते त्यावर गाडीचे रीफ्लेक्सेस कळतात. अंडरबॉडी गंजलेले वैगेरे आहे का ते बघणे, सर्विस हिस्टरी असणे अनिवार्य असावे.

कोणती काळजी घ्यावी ह्या तीन शब्दाबद्दल तीन हजार शब्दांचा लेख कमी पडेल.... तस्मात् इतुकेच!

२. डीझेल घ्यावी की पेट्रोल.?
जुनी नेहमी पेट्रोल घ्यावी.

३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत?
गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत ह्यावर त्या रीलायबल आहेत की नाही हे ठरतं. एखादी गाडी किती जुनी आहे यावर ठरतं. सेकंडहॅण्ड ही एक व्हेग कंसेप्ट आहे. सहा महिने जुनी पण सेकण्ड हॅन्ड आणि ६० वर्षे जुनी पण सेकंडहॅण्ड. पण सहा महिन्यात २ लाख किमी वैगेरे चाललेली गाडी अजिबात रीलायबल नसेल मग ती अगदी रोल्स रोयस असली तरी. मोरल ऑफ द स्टोरी: इट डीपेण्ड्स ऑन द फर्स्ट हॅन्ड.

४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ?
जे मेकॅनिक सांगेल तेवढेच. गाडीला जे गरजेचे आहे तेच करावे. अशा व्हेग प्रश्नाचे काय उत्तर द्यावे बरे? सहा महिने जुनी एम-एल-२५० चे काय काम करुन घेणार आणि पॅसेंजर ट्रॅवेलींगमधे दहा वर्षे वापरलेल्या जुन्या टवेरा-सुमो-इनोवाचे काय काय काम करुन घेणार असा स्पेसिफिक प्रश्न विचारा जरा.

५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय?
अगेन इट डिपेन्ड्स ऑन सो मेनी थिंग्स.

६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे.
नुस्तं बजेट नाही चालणार. यात मर्सिडीजपण मिळेल दादा., पण तुम्हाला तिचा नंतरचा मेंटेनन्स परवडणार नाही. तुम्ही ओनरशिप कॉस्ट किती परवडेल, किती जुनी हवी १ वर्ष, २ वर्श, ५ वर्ष, दर तीन-सहा महिन्याला ती किती हजाराचे काम काढेल तर तुम्हाला चालण्यासारखे आहे. वैगेरे खूप जंजाळ आहे.

मुळात आपला धाग्यातले प्रश्न फार व्हेग आहेत किंवा मनात कुठलीतरी गाडी धरून टाकलेले आहेत. ते डीटेल्स टाका मग काही चर्चा होईल. सल्ला योग्यच मिळेल. अंधेरेमें तीर चलाके बस टेम्पास होना है....

उगा काहितरीच's picture

20 Jan 2016 - 11:23 pm | उगा काहितरीच

प्रतिसाद आवडला. धन्यवाद .

सुबोध खरे's picture

21 Jan 2016 - 10:28 am | सुबोध खरे

एक सूचना -- जवळच्या मेकॅनिकच्या सल्ल्याने गाडी मुळीच घेऊ नये. कारण गाडी जितकी खराब तितका त्याला नंतरच्या काळात मिळणारा मलिदा. महिंद्र फर्स्ट-चॉइस किंवा मारुती ट्रू व्हाल्यु कडे गाड्या थोड्या (१०-१५ हजार रुपयांनी) महाग पडतील परंतु त्या नक्कीच खात्रीलायक असतात. एकदा तेथे भेट देऊन पहा तरी आपल्या बजेट मध्ये साधारण कोणत्या गाड्या बसतात.
एक सर्व साधारण सूचना -- शक्यतो गाडी ४ वर्षे पेक्षा जास्त जुनी किंवा ५०,००० किमी पेक्षा जास्त चाललेली घेऊ नये. अन्यथा गाडी घरी कमी आणि ग्यारेज मध्ये जास्त अशी वेळ येऊ शकते.

मनोजगोसावी's picture

27 Jan 2016 - 6:21 pm | मनोजगोसावी

छान माहिती दिलीत.

सगळ्या मुद्द्यांशी सहमती. पण जर मुंबईत राहत असाल तर कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच नसलेली गाडी म्हणजे दुर्मिळच.

संदीप डांगे's picture

23 Jan 2016 - 10:09 pm | संदीप डांगे

अहो त्याचा अर्थ असा की डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच आधीच्या मालकाने स्वतः खर्च करून दुरुस्त करून द्यावे. अन्यथा दोन-तीन ठिकाणी जरी ते काम काढलं तर सरळ १०-१२ हजारालाही फटका बसू शकतो. त्यामुळे जे काही काम असेल ते हॅन्ड-ओवरच्या आधी पहिल्या मालकाने नीट करुन दिले पाहिजे. एकदा गाडी ताब्यात घेतल्यावर उपयोग राहत नाही तक्रारीचा.

धडपड्या's picture

27 Jan 2016 - 7:48 pm | धडपड्या

अजून काही जोडता येईल...
बॅटरी, टायर, स्पेअर टायर चेक करावेत.. शक्यतो वॅारंटी कार्डस मागावीत..
मुंबई सारख्या ठिकाणी, खार्या वार्यांमुळे गाड्यांचे पत्रे लौकर गंजतात.. त्यामुळे वरुन कितीही सुंदर दिसत असली, तरी अंडरबॅाडी, ईंजिन कंपार्टमेंटस् चेक करावेत..
सर्व काचांवर प्रॅाडक्शन वर्ष नोंदवलेले असते, त्यामुळे अपघात झाला झोता, अथवा नाही, हे तपासता येउ शकते..
सस्पेंशनचे माउंटिंग चेक करावे.. रबर बूश चेक करावे...
अजूनही बरेच लिहीता येईल..
त्यापेक्षा, सरळ सर्टिफाईड गाड्या घ्याव्यात

आनंदी गोपाळ's picture

20 Jan 2016 - 11:33 pm | आनंदी गोपाळ

तर सेकंडहँड घेऊ नका.
अडीच लाखात मस्त नवी नॅनो येईल. कॅश!

सेकंडच का हवीये?

नवीनवी शिकलोय, पहिली सेकंढँड घेऊ. ठोकली तर काय प्रॉब्लेम नाय.. असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :)

नवी गाडी घेतली की आपण काळजीपूर्वक चालवतो. ठोकली जात नाही. अन ठोकलीच तर आपणच ठोकतो. मग काय प्रॉब्लेमेय?

असंका's picture

21 Jan 2016 - 11:17 am | असंका

नवी गाडी घेतली की आपण काळजीपूर्वक चालवतो. ठोकली जात नाही.

जुनी गाडी घेतली की आपण निष्काळजीपणे चालवतो आणि ठोकतो नाही का!! काय आनंदीबाई !!

अन ठोकलीच तर आपणच ठोकतो. मग काय प्रॉब्लेमेय?

म्हणजे काय? गाडी आपण ठोकली तर काही प्रोब्लेम नाही? दुसर्‍या कुणी ठोकली तर प्रॉब्लेम आहे?
कसलं अव्वाच्या सव्वा बोलताय...

नवीनवी शिकलोय, पहिली सेकंढँड घेऊ. ठोकली तर काय प्रॉब्लेम नाय.. असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :)

कुणापेक्षा कमी? आइन्स्टाइन पेक्षा? की आपल्या स्वतःपेक्षा?

एखादा विचार चुकला म्हणजे मुळात अक्कलच कमी असल्याचा सरसकट दाखला देणे हे प्रगल्भतेचं लक्षण आहे?
:(

पहिली गाडी ही सेकंड हँड गाडी नसावी याचं कारण जर ती चालवताना काही अडचण आली, तर तुम्हाला कळत नाही की चुक तुमची आहे का गाडीची. नवी गाडी असताना मनात ही शंका यायला वाव कमी असतो.

सनईचौघडा's picture

21 Jan 2016 - 12:48 pm | सनईचौघडा

अहो असंका तुम्हाला कळत कसे नाही ? अहो ते डॉक्टर आहेत. मग त्यांचा बुद्ध्यांक अंमळ जास्तच नाही का इतरांपेक्षा?

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2016 - 8:27 pm | श्रीगुरुजी

फिदी फिदी! फिदी फिदी!! फिदी फिदी!!!

अत्रन्गि पाउस's picture

21 Jan 2016 - 11:46 am | अत्रन्गि पाउस

इमानदारीत सांगायचं,तर सेकंडहँड घेऊ नका. अडीच लाखात मस्त नवी नॅनो येईल. कॅश! एकदम बरोबर

असले विचार कमी बुद्ध्यांकाचे निदर्शक आहेत :) हे कशाला ? प्रत्येक वेळी समोरच्याचा बुध्यांक काढून आपला बुध्यंकाबद्दल टिमकी वाजवणे कधी थांबवणार ?

कपिलमुनी's picture

21 Jan 2016 - 12:20 am | कपिलमुनी

या रेंजमधे Renault Kwid येइल मस्त गाडी आहे

काकासाहेब केंजळे's picture

21 Jan 2016 - 9:52 am | काकासाहेब केंजळे

सर्व प्रतीसादकर्त्यांचे आभार

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Jan 2016 - 2:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

सेकंड हँड घेण्यापेक्षा नवीनच घ्या. २-३ लाख बजेट असेल तर डाउन पेमेंट २ लाख आणि ईतर लोन मिळुन ५-६ ची कार येइल.
घटस्फोटीतेपेक्षा नवीन बरी :)

कपिलमुनी's picture

21 Jan 2016 - 3:09 pm | कपिलमुनी

अरेरे ! काय हा दृष्टीकोन !

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Jan 2016 - 5:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

स्मायली बघितली नाही का?

संदीप डांगे's picture

22 Jan 2016 - 12:19 pm | संदीप डांगे

vg

या बैची नदार लै वंगाळ दिसून र्‍हायली हाय भौ.
कापडंपण दिसनात अंगावर.. :P

मुंबईत प्रीमीयर कंपनीच्या बर्‍याच सेदान क्लास मधील पद्मिनी गाड्या उपलब्ध असतात.
त्या तुम्हाला अगदीच कमी म्हणजे २०/३० हजारात मिळून जातील.
आणखी विषेश म्हणजे त्या गाड्यांची एक खात्री असते की ठोकल्या तरी आपल्याला काळजी नसते. ज्याची गाडी ठोकली जाते त्यालाच काळजी असते.

कलंत्री's picture

23 Jan 2016 - 3:42 pm | कलंत्री

एकंदरीतच चांगले मार्गदर्शन मिळालेले दिसते. दोन तीन मित्रांशी चर्चा करा, अजून विचारात स्पष्टता येइल.

जूनी गाडी घेण्यापेक्षा नवीनच घ्या.

मनोजगोसावी's picture

27 Jan 2016 - 6:22 pm | मनोजगोसावी

कोन्ती घेतली गाडी?

काकासाहेब केंजळे's picture

27 Jan 2016 - 7:58 pm | काकासाहेब केंजळे

ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे आभार. कालच Ford Figo Duratorq Diesel ZXI 1.4 घेतली , सेकंड हॅण्ड.३ लाख ४० हजारला मिळाली. गाडीचे रनिंग ४०००० किमी झाले आहे. खरे तर जवळच्या अनेकांनी सेदान घ्यावी असे सुचवले होते, व्हीलबेस जास्त असल्याने रस्त्यावर स्टेबल राहते म्हणून, पण शेवटी बजेटचा प्रश्न असल्याने हॅचबॅक घेतली.सर्वांचे आभार

एस's picture

27 Jan 2016 - 10:02 pm | एस

अभिनंदन!

यशोधरा's picture

27 Jan 2016 - 10:06 pm | यशोधरा

अभिनंदन!

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 10:13 am | संदीप डांगे

अभिनंदन...

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे गाडी घेतांना कसे निराकरण केले ते वाचायला आवडेल.

रुस्तम's picture

28 Jan 2016 - 11:11 am | रुस्तम

+१ तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे गाडी घेतांना कसे निराकरण केले ते सर्वानाच वाचायला आवडेल.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2016 - 8:29 pm | श्रीगुरुजी

अभिनंदन नानासाहेब! आता माईंना घेऊन नव्या गाडीतून मस्तपैकी एखाद्या घाटातबिटात फिरायला जा.

पैसा's picture

28 Jan 2016 - 8:45 pm | पैसा

अभिनंदन! किती वर्षे झालीत?

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 8:48 pm | संदीप डांगे

असं काय करता पैतै, त्यांनी म्हटले ना कालच घेतली म्हणून. येवळा बोल्ड फॉण्ट दिसत नै व्हय!

पैसा's picture

28 Jan 2016 - 11:23 pm | पैसा

गाडीला किती वर्षं झालीत विचारायचं होतं! ४०००० रनिंग म्हणाले ते पण त्यावरून गाडी किती जुनी कळत नाही.

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 11:33 pm | संदीप डांगे

आय माय स्वारी बर्का तै!

त्येंना इचारलंच है सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या म्हणून. तेंनी धागा सोडून दिला. काम सरो, वैद्य मरो!

प्रसाद१९७१'s picture

29 Jan 2016 - 10:12 am | प्रसाद१९७१

अगदी अगदी. आणि २.५ लाखाचे बजेट सांगुन ३.४ लाखाची गाडी घेतली. आधीच ३.४ चे बजेट आहे असे सांगितले असते तर माझी गाडी घेताय का म्हणुन तरी विचारले असते.

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 10:18 am | संदीप डांगे

नाय हो तुमचं अन् तुमच्या गाडीचं नशीब हेवढं हुच्च नाय. एका भावी नोबेलविजेता डॉक्टरला तुम्ही गाडी विकली हे समाधान तुम्हाला मिळायचं नसेल.

शलभ's picture

29 Jan 2016 - 1:21 pm | शलभ

:)
रच्याकने हा मोगा चा डुआयडी आहे का ?

संदीप डांगे's picture

29 Jan 2016 - 1:39 pm | संदीप डांगे

नाही. हे पुर्वास्रमीचे ग्रेटथिंकर. मोगाखान वेगळे

अन्नू's picture

28 Jan 2016 - 1:36 am | अन्नू

अरे वा! अभिनंदन!!

_मनश्री_'s picture

28 Jan 2016 - 1:22 pm | _मनश्री_

अभिनंदन !
1