श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी.
कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून.
हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी.
विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :)
कविता कुणाची
कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून
अमृत स्वरूपात आलेली
ती कविता
कुणाची?
त्या कवीची ? कि त्या बोरू ची ?
कि असेल ती त्या कागदाची ?
कि त्या वेड्या कला प्रेमीची
जो प्रत्येक कवितेस आवर्जून वाचतो
प्रेम करतो - निरागस - स्वैर
कविता कुणाची ?
प्रतिक्रिया
21 Dec 2015 - 8:41 pm | मयुरMK
छान
21 Dec 2015 - 8:42 pm | संदीप डांगे
तुमची ही कविता माझ्या नावावर प्रसिद्ध केली आणि जनतेला ती आवडून मला साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यावर लताबाईंनी, आशादिदींनी गाणे बिणे गाऊन मला तहहयात रॉयल्टी मिळायला लागली तर तुम्हाला आक्षेप नसावा. काय म्हणता?
21 Dec 2015 - 8:53 pm | निनाव
:) नक्किच सर. हा सम्मान मिपा चा आणिक मि.पा करांचा असेल असेल. :)
22 Dec 2015 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार
कविता आहे लाडांची
कविता आहे कृष्णमूर्तींची
कविता आहे शेजारच्या गोडबोले काकांची सुध्दा
(कविताप्रेमी) पैजारबुवा,
22 Dec 2015 - 12:16 pm | चांदणे संदीप
कविता माझी!
विषय संपला! :)
Sandy
22 Dec 2015 - 4:57 pm | माहितगार
:)
22 Dec 2015 - 5:49 pm | विवेकपटाईत
कविता बेदाणे आमच्या वर्गात होती... बाकी करून कहाणी होती.
22 Dec 2015 - 7:17 pm | अजया
कोण कविता ?
धन्यवाद.