सॅचुरेशन पॉइंट

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
16 Dec 2015 - 12:48 pm

एक सूर्य
चांदण्या रात्री संथ जलाशयात
खड़े मारत बसलेला दिसला
'रस्ता चुकलायस का मित्रा?'
त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले
म्हणाला ...
कंटाळा आला राव !
रोज रोज पूर्वेकडे उगवायचं
स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं..
रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु
ते काय म्हणता तुम्ही?
संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा
काहीतरी नवीन..
काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा
एखादी हळुवार कविता ऐकावी
एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं
अगदीच काही नाही तर
गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी
आणि मग...
शांतपणे पाण्यावर उठणारे तरंग पाहात बसला
एक विलक्षण शांतता..
वाऱ्याची नाजुकशी सळसळ
अचानक कुठुनतरी पाखरांची किलबिल कानी आली
आणि गडबडून उठला बिचारा...
जातो मित्रा, अप्रेजलची वेळ झाली
"तुलाही अप्रेजल मिळते?"
हळुवार हसला, म्हणाला..
रोजची सकाळ इथे कुणा ना कुणासाठी
एक आशेचा किरण घेवून येते रे
त्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हेच माझं अप्रेजल
तुला वर्षातून एकदाच मिळतं
माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही
तेवढेच काय ते सुख !
पूर्वा पुन्हा उजळायला लागली होती ...

विशाल

मुक्त कविताशांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

16 Dec 2015 - 1:22 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त विशाल दा

काय सॉल्लिड कल्पना आहे यार

पद्मावति's picture

16 Dec 2015 - 3:02 pm | पद्मावति

वाह! मस्तं कल्पना आहे.

चाणक्य's picture

16 Dec 2015 - 3:24 pm | चाणक्य

.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Dec 2015 - 3:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

कुठून सुचते बे?? ___/\___

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2015 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा

जातो मित्रा, अप्रेजलची वेळ झाली
"तुलाही अप्रेजल मिळते?"
हळुवार हसला, म्हणाला..
रोजची सकाळ इथे कुणा ना कुणासाठी
एक आशेचा किरण घेवून येते रे
त्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हेच माझं अप्रेजल
तुला वर्षातून एकदाच मिळतं
माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही
तेवढेच काय ते सुख !
पूर्वा पुन्हा उजळायला लागली होती ...

टाळया..

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2015 - 4:49 pm | विशाल कुलकर्णी

_/\_

वेल्लाभट's picture

16 Dec 2015 - 5:38 pm | वेल्लाभट

क्लास्स!

पगला गजोधर's picture

16 Dec 2015 - 5:45 pm | पगला गजोधर

मुक्तक

राजाभाउ's picture

16 Dec 2015 - 5:49 pm | राजाभाउ

मस्त कल्पना.जबारा !!!

बाबा योगिराज's picture

16 Dec 2015 - 5:58 pm | बाबा योगिराज

आवड्यास.

मित्रहो's picture

16 Dec 2015 - 6:29 pm | मित्रहो

मस्त कल्पना आहे

जव्हेरगंज's picture

16 Dec 2015 - 6:34 pm | जव्हेरगंज

मस्त!

सचिन's picture

16 Dec 2015 - 6:42 pm | सचिन

अनोखी कल्पना !!

मस्त रे विशाल. आवडले अप्रेजल.

मस्त कविता. बर्‍याच दिवसांत तुमच्याकडून मुक्तछंदातलं काही वाचायला मिळालं नव्हतं. (किंवा माझ्या नजरेतून सुटलं असेल.)

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2015 - 8:46 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी _/\_
एस, खुप दिवसात मुक्तछंदात काही लिहीलेच नव्हते. किमान मराठीत तरी नाहीच. हिंदीत काही लिखाण केलय तितकंच.

वानगीदाखल ...

उस पीपल के पेड के तले
बहुत सी तनहाईयाँ रहती हैं
अपनी ही...
खामोशीयोंमें सिमटी हुयी
एक चाँद आजकल
पीपल केँ...
चक्कर काटते देखा है मैं ने
कुछ मायूस, कुछ तनहा-तनहा
खोया-खोयासा रहता हैं
जैसे निकला हो...
किसी की तलाश में
कसमसा के रह जाता है पीपल
कुछ बोल नही पाता
पर बहुत कुछ बोलती हैं
पत्तीयों में उलझी खामोशियाँ
जैसे महसूस कर रही हो
उस खामोश दर्द कों
मैं जानता हूँ ...
चाँद चुप्पी नही खोलेगा
किसी ना किसी दिन मुलाक़ात होगी
उस की चांदनी से...
पुछूँगा नही मैं हाल-ए-बेकरार
कभी तो रोशनी का मंजर होगा
उजालों से मुलाकात होगी
मैं इंतज़ार करुंगा
उस मुस्कुराहट का !

विशाल...

सटक's picture

16 Dec 2015 - 9:07 pm | सटक

क्या बात!! तरल!!

एक एकटा एकटाच's picture

16 Dec 2015 - 9:09 pm | एक एकटा एकटाच

वाह

पैसा's picture

16 Dec 2015 - 9:00 pm | पैसा

खासच लिहिलंस! वरची दुसरी हिंदी कविता पण मस्त आहे!

सटक's picture

16 Dec 2015 - 9:09 pm | सटक

एक सूर्य

खूप आवडली ही प्रतिमा!!

रेवती's picture

16 Dec 2015 - 9:39 pm | रेवती

मस्त कविता.

फार सुंदर आहेत दोन्ही कविता.

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2015 - 10:41 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद !

चतुरंग's picture

16 Dec 2015 - 11:05 pm | चतुरंग

कल्पनाच अफलातून आहे! :)

दुसरी हिंदी कविताही गुलजारच्या अंगानं जाणारी वाटली. तीही सुरेख आहे.
--------------------------------

कविता आवडली की आपली दाद अटळ असते......ही घ्या.....

एक नवरा
चांदण्या रात्री काचेच्या पेल्यात
'खड़े' टाकत बसलेला दिसला
'ब्रँड चुकलाय का मित्रा?'
त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले
म्हणाला ...
कंटाळा आला राव !
रोज रोज पहाटेला उठायचं
स्वत:लाच सावरत किचनकड़े जायचं..
रोजचीच पत्ती आणि रोजचीच साखर
ते काय म्हणता तुम्ही?
संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा
काहीतरी नवीन..
काही वेगळं व्हावंसं वाटतय मित्रा
एखादा हळुवार हात चहाचा कप घेऊन यावा
एखाद्या बशीत खारी आणि बिस्किटं असावीत
अगदीच काही नाही तर
गेलाबाजार एखाद्या पहाटे मस्त ताणून तरी देता यावी
आणि मग...
शांतपणे द्रवावर उठणारे तरंग पाहात बसला
एक विलक्षण शांतता..
एसीची गंभीर घरघर
अचानक वरच्या मजल्यावरुन घड्याळ्याचा गजर कानी आला
आणि गडबडून उठला बिचारा...
जातो मित्रा, चाहा मिळायची वेळ झाली
"तुलाही चाहा मिळते?"
ओशाळतं हसला, म्हणाला..
रोजची सकाळ इथे माझ्यासाठी
एक आशेचा किरण घेवून येते रे
चहाच्या कपाने तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हीच माझी चाहा
तुला वर्षातून एकदाच मिळते
माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही
तेवढेच काय ते सुख !
आधण पुन्हा उकळायला लागलं होतं ...

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2015 - 11:28 pm | विशाल कुलकर्णी

मुजरा सरकार ;)

एक एकटा एकटाच's picture

17 Dec 2015 - 10:08 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त

मस्तच

खासच

म्हणुन साला मला मिसळपाव खुप आवडते

ते ह्याच गोष्टी साठी

जव्हेरगंज's picture

17 Dec 2015 - 10:21 am | जव्हेरगंज

g

नाखु's picture

17 Dec 2015 - 10:37 am | नाखु

काव्य पेल्यावर, हा उतारा पेलाही खास...

मिपा असं आहे असंच राहील "जिंदा दील" (न कुठे परीक्षाण येताही)

प्रतिसाद मात्र नाखु

प्रसाद गोडबोले's picture

16 Dec 2015 - 11:26 pm | प्रसाद गोडबोले

खुप छान !

सुंदर कल्पना !!

अवांतर : आजचा दिवस काहीतरी खास असणार ... तब्बल दोन नव्या क्लासिक कविता एकाच दिवसात वाचायला मिळाल्या !!

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2015 - 11:29 pm | विशाल कुलकर्णी

ती किती तरल कविता आहे रे चैतन्यची. प्रचंड आवडली यार. धन्स शेयर केल्याबद्दल !

दोन्ही कविता आवडल्या! हिंदी तर एकदम गुलज़ारचीच वाटतीये!

प्रचेतस's picture

17 Dec 2015 - 9:32 am | प्रचेतस

कमाल लिहिलियेस रे.

सुमीत भातखंडे's picture

17 Dec 2015 - 11:55 am | सुमीत भातखंडे

.

नीलमोहर's picture

17 Dec 2015 - 12:57 pm | नीलमोहर

दोन्ही कविता सुरेख, तरल..!!

चतुरंग यांची 'चहा' वरील कविता ही सुंदर..

निनाव's picture

17 Dec 2015 - 4:32 pm | निनाव

+१ निर्विवाद!