पालखेडची लढाई - पहिले बाजीराव पेशवे

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
8 Dec 2015 - 6:04 pm

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एखाद्या पराक्रमी अाणी बुद्धिवान सेनापतीचे नाव घ्यावे लागले तर ते पहिल्या बाजीरावांचे घ्यावे लागेल. ’पालखेडची लढाई' ही पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची लढाई. ही लढाई 28 फेब्रुवारी 1728 रोजी पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निझाम यांच्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळील पालखेड येथे झाली. या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. पालखेडची लढाई बाजीरावांच्या युद्धतंत्राचे तसेच गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण आहे. बर्नाड मोन्ट्गोमेरी या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली – "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility".

1713 मध्ये छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद दिल्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी मोगल साम्राज्यातील भाग तोडून मराठा साम्राज्यास जोडणे सुरू केले. मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने 1724 मध्ये निझाम-उल-मुल्क यास दख्खनचा वजीर नेमून दख्खनेत पाठवले. त्यावेळेस बाळाजी विश्वनाथांचा मुलगा पहिले बाजीराव पेशवेपदी होत. याच सुमारास साताऱ्याचे छत्रपती शाहू व कोल्हापूरचे छत्रपती संभाजी मध्ये दुफळी निर्माण होऊन यांनी स्वतःला शिवाजी महाराजांचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले. निझामाने याचा फायदा घेऊन कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. तसेच निझामाने दख्खनातील सरदेशमुखी व चौथाई मराठ्यांच्या हवाली करणे बंद केले.

1727 च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होते. छत्रपती शाहूंनी निझामाला धडा शिकवण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्यासाठी बाजीरावांना 25-30 हजार सैन्यासह औरंगाबादकडे पाठविले. जालन्याजवळ बाजीरावांनी निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होण्यापुर्वी उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली. निझामाचा सरदार इवाझ खानाने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले. बाजीराव आपल्याला जाळ्यात आेढत आहे हे लक्षात येउन बाजीरावास शह देण्यासाठी निझामाने पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि सातार्यावर चाल करून छत्रपती शाहूंना धोका निर्माण केला. बाजीरावांनी त्यास भीक न घालता निझामाची राजधानी औरंगाबादवर चाल केली. बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने औरंगाबादचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. औरंगाबादकडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावांनी त्यास सळो कि पळो करुन आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत निझामास नाशिककडे ओढत नेले. 1728 रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी 28 फेब्रुवारी रोजी निझामाने शरणागती पत्करली. जास्त नुकसान न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. सपशेल पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण येथे 6 मार्च 1728 रोजी तह केला. त्यानुसार छत्रपती शाहू हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निझामाने व मोगल बादशाहाने मान्य केले. तसेच मराठ्यांना दख्खनमधील चौथाई व सरदेशमुखीच हक्क परत केला.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

9 Dec 2015 - 10:27 am | महासंग्राम

चांगला लेख पण आधी वाचल्या सारखा वाटतोय

हेमंत लाटकर's picture

9 Dec 2015 - 10:20 pm | हेमंत लाटकर

चांगला लेख पण आधी वाचल्या सारखा वाटतोय

इतिहास एकच असतो. लिहताना प्रत्येकजण आपल्या पद्धतीने लिहतो.

ढकलपत्रांचा परिणाम. दुसरे काय.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2015 - 8:43 pm | परिकथेतील राजकुमार

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एखाद्या पराक्रमी अाणी बुद्धिवान सेनापतीचे नाव घ्यावे लागले तर ते पहिल्या बाजीरावांचे घ्यावे लागेल.

महाराज कोणाचे सेनापती होते?

मालोजीराव's picture

9 Dec 2015 - 9:46 pm | मालोजीराव

पुनर्लेखनवाले 'राजकुमार' ....तुम्हीपण पूर्वी सेनापती असालच कि ;)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2015 - 9:48 pm | परिकथेतील राजकुमार

पुनर्लेखनवाले 'राजकुमार' ....तुम्हीपण पूर्वी सेनापती असालच कि ;)

हो हो.
तेव्हा 'बापट' आडनाव होते माझे.

हेमंत लाटकर's picture

9 Dec 2015 - 9:30 pm | हेमंत लाटकर

महाराज राजे असूनही स्वतः लढाईवर जात. तसेच पहिले बाजीराव पंतप्रधान (पेशवे) असूनही स्वत: लढाईवर जात म्हणून सेनापती.

अंवातर: नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा राज्यकर्ता असूनही सेनापती होता.