(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.)
****************************************************************************
गोष्ट तशी फारशी जुनी नाही. सहा आठ महिन्यांपूर्वी मी माझे गुजरात राजस्थान मधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षीच पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते. त्यांचे एकूणच ज्ञान, गुन्हा हाताळण्याची पद्धती, स्वभाव ह्या सगळ्याचे आपण एकदम फॅन, त्यामुळे पहिल्या रिंगलाच फोन उचलला.
'सुसकाळ साहेबजी. आमची आठवण कशी काय काढली आज?'
'पुण्यात आहेस?' साहेबांनी विचारले. 'असशील तर ताबडतोब ऑफिसला येऊन भेट. महत्त्वाचे काम आहे.' साहेबांचा सूर ऐकूनच काहीतरी बिनसले असल्याचे लक्षात आले, आणि मी 'पोचतोच अर्ध्या तासात' असे सांगत फोन ठेवला.
साधारण साडेबारा एकच्या सुमाराला साहेबांच्या ऑफिसात पोचलो. 'सणावारी तरी सुखाने मोदक बिदक गिळू देत चला की..' असे ओरडतच मी साहेबांच्या केबिन मध्ये घुसलो आणि एकदम चपापलो. केबिन मध्ये कश्यप साहेबांबरोबरच एक अजून साहेब आणि एक मॅडम बसलेल्या होत्या.
"ये रे टोणग्या.." साहेबांनी सुरुवात तरी खेळीमेळीने केली होती. मी यायच्या आधी बहुदा माझाच विषय चालला असावा कारण बाकीचे दोन लोकं प्रदर्शनातले माहितीपत्रक वाचल्यावरती त्या वस्तूकडे बघतात तसे माझे निरीक्षण करत होते.
"प्रसाद, हे इन्सपेक्टर विजय कसाळकर आणि ह्या इन्स्पेक्टर रीटा गोम्स. दोघेही सध्या स्पेशल ड्यूटीवरती आहेत, आणि तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुझ्याविषयी सगळी माहिती मी त्यांना दिली आहेच. जशी तू अधे मध्ये आम्हाला मदत करतोस, तशी त्यांना पण करावीस असे मला वाटते."
"नमस्कार" मी आपले उगाच माझे संस्कार वगैरे दाखवत दोघांकडे पाहून हात जोडले. "कश्यप काकांनी माझ्या बद्दल काय काय सांगितले आहे मला माहिती नाही, पण मला इंटरनेट, हॅ़किंग किंवा तत्सम क्षेत्रातले संपूर्ण ज्ञान खचीतच नाही. जे थोडेफार आहे, त्याच्या मदतीने शक्य ती मदत मी नक्की करेन."
"धन्यवाद प्रसाद. आम्हाला नक्की तुमच्याकडून काय मदत हवी आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो, ते ऐकून तुम्ही तुमचा निर्णय घ्या. अर्थात तुमचा मदतीला नकार असेल, तर इथले झालेले संभाषण तुम्ही बाहेर पडतानाच विसरावेत हे तुम्हाला वेगळे सांगण्याची बहुदा आवश्यकता नसावी. बरोबर?" कसाळकरांनी सुरुवात केली.
"हो मला कल्पना आहे. ह्या आधी मी एक दोन छोट्या प्रकरणात तुमच्या विभागाला मदत केली आहे. त्यामुळे तुम्ही तेवढा विश्वास नक्कीच ठेवू शकता."
"नक्कीच! विश्वासू नसतात तर कश्यप साहेबांनी तुमचे नाव सुचवलेच नसते. पण तरी एकदा खुंट हालवावासा वाटला म्हणून बोललो. राग नका मानू. तर प्रसाद, आम्हाला एक केस संदर्भात तुमची मदत हवी आहे. १५ दिवसांपूर्वी पणजीम जवळच आम्ही एका परदेशी नागरिकाला गर्द विकताना एका तरुणाला पकडले. हा तरुण मूळचा नाशकातला. थर्ड डिग्री लावल्यावरती त्याच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्या आधारे आम्ही अजून एका माणसाला अटक केली. ह्या अटक केलेल्या माणसाचे नाव बशीर आहे. ह्या बशीरकडे मात्र माहितीचा चांगलाच खजिना हाताला लागला.”
थोडे थांबून साहेबांनी पाणी पिले आणि पुन्हा बोलायला लागले. "ह्या बशीरच्या माहितीनुसार सुमारे साडे सात कोटींचे अंमली पदार्थ पोरबंदर मार्गे मुंबईत उतरवण्यात आले आहेत. ह्यातला चार कोटींपेक्षा जास्तीचा माल एकट्या मुंबईतच विकला गेला, तर उरलेला गोव्यात दाखल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात आम्ही अथक प्रयत्न केले, गोव्या बरोबरच मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबईत देखील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. मात्र एखाद दीड कोटीच्या मालाच्या विक्रीचे हिशेब आणि काही लाख रुपये रोख ह्या शिवाय आमच्या हाताला काहीच लागले नाही. जी माणसे पकडली गेली, ती देखील महत्त्वाची काहीही माहिती देऊ शकली नाहीत. पण ह्या सगळ्या जमा केलेल्या माहितीतून एक महत्त्वाची बातमी अशी मिळाली, की आजकाल जेवढा अंमली माल भारतात दाखल होतो, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के माल हा हस्ते-परहस्ते ग्राहकांपर्यंत पोचवला जातो. उरलेला माल इंटरनेटद्वारे खपवला जातो. ऐकूनच आम्हाला धक्का बसला. आम्ही जंग जंग पछाडले, पण आम्हाला एखाद्या ठाम दिशेला नेईल असा कुठलाच पुरावा मिळाला नाही. आम्ही अनेक संशयिताबरोबरच त्यांच्या कॉम्प्युटर्सची देखील झाडाझडती घेतली पण उपयोग शून्य.”
येवढे बोलून कसाळकरांनी अपेक्षेने माझ्याकडे पाहिले. मी चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसणार नाहीत ह्याची पूर्ण काळजी घेत होतो. कसाळकरांना हळूहळू कुठल्या दिशेला जायचे आहे ते माझ्या चांगले लक्षात येत होते, पण जिथे जाण्याचा रस्ता ते शोधत होते त्या दुनियेत मी वावरून आलो असल्याने पुढचा प्रचंड धोका मला घाम फोडत होता.
कसाळकर थांबताच आता रीटा मॅडमनी चार्ज आपल्याकडे घेतला. "प्रसाद येवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज विकले जातात तरी कसे, आणि ते देखील कुठलाही सुगावा लागू न देता? हा आमच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं आमच्या तपासात असेही आढळले आहे, की ह्या मार्गाने फक्त ड्रग्जच नाही, तर शस्त्रास्त्रे आणि सेक्सची देखील धडाक्यात विक्री होते. आणि हेच सगळे खणून काढायला आम्हाला तुमची मदत हवी आहे."
मला ह्याचा अंदाज होताच, त्यामुळे मॅडम बोलेपर्यंत मी माझे उत्तर मनात तयार करायला सुरुवात केली होतीच. त्यांचे बोलणे होताच मी चेहऱ्यावरती गोंधळाचे भाव आणत बोलायला सुरुवात केली, "तुम्ही काय म्हणताय माझ्या अजून लक्षात येत नाहीये. हे सर्व इंटरनेटशी संबंधीत आहे हे कळले पण ह्यात मी काय मदत करणार? कुठला तरी आयपी ट्रेस कर, नायजेरियन फ्रॉड विरुद्ध थोडीफार मदत कर येवढ्यापुरतीच माझी मर्यादा आहे."
"पण पॅपिलॉनकडे अमर्याद ताकद आहे... नाही?" कश्यप साहेब खाडकन बोलले आणि मी चांगलाच सटपटलो. "प्रसाद तुझी सगळी कुंडली मी त्यांना सांगितली आहे. हे बघ, हा प्रश्न तुला वाटतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे. ह्या सर्व व्यवसायातून मिळणारा पैसा हा अतिरेकी संघटनांकडे रवाना होतो आणि तो भारता विरुद्ध वापरला जातो अशी आमची पक्की खात्री झाली आहे. हे रॅकेट लवकरात लवकर उद्ध्वस्त व्हायलाच हवे. मागच्या महिन्यात फेसबुकवरती कोणालातरी 'झेंडे फडकवण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करा!' अशी अक्कल शिकवत होतास ना? मग आता तुझ्यासाठी ती वेळ आली आहे, पाठ दाखवू नकोस."
"मला नाही वाटत मला ह्यात काही करता येईल. काका, तुम्हाला तर माहिती आहे, हे सगळे सोडून मला आता एक मोठा काळ उलटला आहे. तंत्र बदलली आहेत, रस्ते बदलले आहेत, नवे नवे ज्ञानी इथे रोज बस्तान बसवत आहेत. मी कसा ह्या सगळ्यातून मार्ग काढणार आहे?"
"उगाच आता कारणे शोधत बसू नकोस. ह्या सगळ्याबद्दल तुला आधी कितपत माहिती आहे ते सांग" कसाळकरांनी दम हाणला.
"माहिती म्हणाल, तर मी तुमच्यापुढे १०० पावले आहे." मी हसून म्हणालो. कसाळकर आणि रीटा मॅडम अविश्वासाने, तर कश्यप 'मला खात्री होती ह्या डांबीस माणसाला थोडी फार माहिती असणारच' अशा कौतुकाने बघायला लागले.
"तुम्ही आम्ही ईमेल, फेसबुक, गूगल अशा अनेक सेवांचा लाभ घेत असतो. आपण ज्याला इंटरनेट म्हणून ओळखतो, त्या व्यासपीठावरती हे सगळे उपलब्ध असते. पण तुम्ही आम्ही ज्याला इंटरनेट म्हणून ओळखतो, त्याच्यापेक्षा तिप्पट मोठे असे एक अजून इंटरनेट अस्तित्वात आहे, ज्याला 'ब्लॅक वेब' अथवा 'डिप वेब' नावाने ओळखले जाते. आपल्या नेहमीच्या ब्राउझर्सनी ना ह्या जगात प्रवेश करता येतो, ना काही सर्फ करता येते. ह्या जगातल्या प्रवेशासाठी ब्राउझर्स पण तेवढीच खास लागतात, जसा की टॉर ब्राउझर. जगातली सगळ्यात जास्ती अनाधिकृत मालाच्या खरेदीची व्हर्च्युअल दुकाने तुम्हाला इथेच आढळतील. ड्रग्ज, शस्त्रास्त्रे, चोरलेली क्रेडिट कार्डस आणि सेक्स सर्व्हिस देखील. इथले व्यवहार चालतात ते बिटकॉईन आणि व्हर्च्युअल मनीच्या आधारे..." मी नकळत बोलायला देखील सुरुवात केली.
************************
(क्रमश:)
प्रतिक्रिया
17 Nov 2015 - 8:19 pm | बाप्पू
मी पयला.
मस्त सुरवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
17 Nov 2015 - 8:24 pm | एस
पेपिलॉन, वेलकम बॅक!
17 Nov 2015 - 8:27 pm | आदिजोशी
असं म्हणायचं असतं. पटापट पुढचे भाग टाक आता.
17 Nov 2015 - 8:28 pm | आदूबाळ
लय भारी. डीप वेबबद्दल ऐकून आहे. बिटकॉईन आणि तत्सम व्हर्चुअल करन्सीबद्दलही. पुढचा भाग लवकर लिहिणे.
17 Nov 2015 - 8:28 pm | प्रचेतस
भन्नाट सुरुवात पण परा मालिका पूर्ण करेल तो सुदिन.
18 Nov 2015 - 9:02 am | नाखु
आहे सुशींच्या चार कथानायकांच्या कथेचे पुढे काय झालयं ते अजून माहीत नाहीय.
अता ही अर्धवट राहू नये म्हणून चिमण्या गणपतीला सव्वा रुपयाचा "प्रसाद" कबूल केला आहे.
वाचक नाखु
18 Nov 2015 - 2:18 pm | चिगो
पराशेठ, जबर्या पुनरागमन.. दोन-चार ओळींत, कशाला, दोन-चार शब्दांत माणसाला खिळवून ठेवण्याची तुमची हातोटी 'भन्नाट' आहे.. प्ण टांगून ठेवण्याची लय बेक्कार सवयपण आहे तुम्हाला.. तेव्हा वल्लींशी सहमत होत बोलतो कि साहेब एकदा हात/मेंदू आणि किबोर्ड सुसाट दौडवा आणि मागचा सगळा बॅकलॉग भरुन काढा, प्लिज.. आणि हो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
अवांतर : पराशेठची 'भन्नाट' मालिका वाचायला देऊन सुशिंच्या शैलीची झलक ओळख करवली होती बायकोला लग्नानंतर. पण आता मुलगी तीन वर्षांची झाली तरी त्या गोष्टीच्या प्रतिक्षेत आम्हीपण बॅरीस्टर दिक्षितांसारखी छातीतली कळ घेऊन डोक्यावर खारका मारत बसलोय.. :-(
17 Nov 2015 - 8:30 pm | बॅटमॅन
या शिंच्या डीप वेबबद्दल लै परस्परविरोधी कायकाय ऐकून आहे. लिहा लवकर, वाचतोच आहोत.
17 Nov 2015 - 8:37 pm | पैसा
पटापट पुढचे भाग येऊ देत!
17 Nov 2015 - 9:04 pm | मृगनयनी
मस्त रे पर्या.... उस्स्सुकथा प्रचन्ड ताणल्या गेली आहे!!!! :)
17 Nov 2015 - 9:07 pm | मांत्रिक
हैला ताई तुम्ही पण आलात? जै हो जै हो जै हो!!!
स्वागत स्वागत स्वागत!!!!
17 Nov 2015 - 10:13 pm | अत्रुप्त आत्मा
नयनाही आली परतून..!
अता जुने मिपा परतल्या सारखे वाटू लागले. :)
17 Nov 2015 - 11:38 pm | टवाळ कार्टा
मग अता "तु ये तुला फुक्कट देईन" ची स्किम पण येणार का परतून? ;)
17 Nov 2015 - 8:43 pm | रुस्तम
पु भा प्र
17 Nov 2015 - 8:43 pm | चित्रगुप्त
वा अगदी म्हणजे अगदीच अनोळखी विषयाबद्दल वाचायला मिळणार. आपण सर्वसामान्य नेटकरांनी एकंदरित काय सावधगिरी घ्यावी याबद्दल देखील मार्गदर्शन करावे.
17 Nov 2015 - 8:49 pm | रेवती
सुरुवात चांगली झालीये. वाचत राहीन.
17 Nov 2015 - 8:58 pm | स्वाती दिनेश
बॅक विथ अ बिग बँग..
सुरुवात तर मस्तच. पुभाप्र.
स्वाती
17 Nov 2015 - 8:58 pm | जेपी
पुभाप्र
17 Nov 2015 - 9:03 pm | अनुप ढेरे
भन्नाट!
आयसीस डीपवेबमध्ये खूप अॅक्टीव आहे असं नुकतच वाचलं.
17 Nov 2015 - 11:35 pm | बाबा योगिराज
वाचायला, ऐकायला, षिकायला आवडेल.
17 Nov 2015 - 11:37 pm | मांत्रिक
डीप नाही, डार्क वेब म्हणतात!!!
17 Nov 2015 - 9:04 pm | इडली डोसा
आणि अतिशय रंजक विषयावरची कथा... लवकर टाका पुढचे भाग.
धन्यवाद!
17 Nov 2015 - 9:07 pm | रामदास
मागच्या महिन्यात फेसबुकवरती कोणालातरी 'झेंडे फडकवण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करा!' अशी अक्कल शिकवत होतास ना? मग आता तुझ्यासाठी ती वेळ आली आहे, पाठ दाखवू नकोस."
आम्ही बोलतो तेव्हा आयकतच नाही. पोलीसच पायजेत.
17 Nov 2015 - 9:09 pm | तुषार काळभोर
परा इज बॅक अॅण्ड हाऊ!!
17 Nov 2015 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंट्रेस्टिंग !!!! वेलकम.
कसं जमतं रे परा तुला कथा रंगवणं ?
(पळा)
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 10:18 pm | पीके
मग आम्हाला असेच काहितरी लिहुन वेळ मारून न्यावी लागनार....
डागतरानू ह,घ्या...
17 Nov 2015 - 9:14 pm | सर्वसाक्षी
पुढे वाचायला आवडेल
17 Nov 2015 - 9:25 pm | सिद्धार्थ ४
आता पुढचे भाग पण येऊ दे फ़टाफ़ट. पहिला भाग तर खूपच छान जमला आहे.
17 Nov 2015 - 9:37 pm | बोका-ए-आझम
पुभाप्र!
17 Nov 2015 - 9:48 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
17 Nov 2015 - 9:49 pm | टवाळ कार्टा
जब्रा
17 Nov 2015 - 9:51 pm | अजया
जबराट विषय! पुभाप्र.पुभालटा!
17 Nov 2015 - 9:53 pm | प्रीत-मोहर
हे ह्या आधीही वाचलय. परत वाचुन सुद्धा आवड्याच
17 Nov 2015 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला लिंक व्य नि करा. वाचुन घेतो या पराचा पुढचा भाग कोणत्या वर्षी यायचा ?
-दिलीप बिरुटे
17 Nov 2015 - 10:57 pm | प्रीत-मोहर
तिथे तरी पुर्ण केलय अस वाटतय का तुम्हाला प्राडॉ?????
18 Nov 2015 - 10:39 am | तुषार काळभोर
'तिथे' पण एक वर्षापासून हाच एक भाग (आणि अन्य कथांचे पहिले भाग) पडून आहे.
17 Nov 2015 - 10:08 pm | मित्रहो
लवकरच येऊ द्या
17 Nov 2015 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा
जब्बरदस्त!!! आमाले त ह्ये सगळे नवीणच ना बाबा.
आता फुडचे बाग़ लवकर लवकर ल्हिऊन ह्रां ना!
17 Nov 2015 - 10:41 pm | Maharani
मस्त सुरवात.पुभाप्र..
17 Nov 2015 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त सुरुवात ! येऊद्या पुढचे भाग भरभर !
18 Nov 2015 - 6:57 pm | उगा काहितरीच
खरंच ! जीव टांगणीला लागलाय लवकर येऊ द्या पुढील भाग.
18 Nov 2015 - 9:20 pm | उगा काहितरीच
खरंच ! जीव टांगणीला लागलाय लवकर येऊ द्या पुढील भाग.
17 Nov 2015 - 11:34 pm | बाबा योगिराज
दुत्त दुत्त दुत्त.
पुढचा भाग लवकर टाका.
17 Nov 2015 - 11:49 pm | ब्रिटिश टिंग्या
वाचतोय!
17 Nov 2015 - 11:59 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त
अब आयेगा मजा
17 Nov 2015 - 11:59 pm | पिंगू
पर्या पुढचा भाग आता कधी येणार?
18 Nov 2015 - 12:40 am | महेश हतोळकर
वाट पहातो आहे. लवकर पूर्ण कर.
18 Nov 2015 - 12:46 am | पाषाणभेद
जबरदस्त सुरूवात. वाचकांची उत्सूकता ताणली गेली आहे. लवकर लिहा.
18 Nov 2015 - 3:11 am | प्रभाकर पेठकर
आमच्या पिढीला हे तांत्रिकी शब्द म्हणजे 'मंगळ उच्चीचा आहे आणि शनी वक्री आहे' सारखाच आहे. पण कथानक फार सुरस दिसते आहे. शिकायचा प्रयत्न करतो आहे. पुढील भाग लवकर लवकर येऊ द्या.
18 Nov 2015 - 5:48 am | रातराणी
पुभालटा!
18 Nov 2015 - 6:26 am | मितान
भन्नाट सुरुवात.
आता लवकर पुढचा भाग टाक.
18 Nov 2015 - 6:48 am | निनाद मुक्काम प...
वाचत आहे .आता नवीन भाग लवकर येऊ दे
नवीन विश्वाची माहिती होत आहे.आभासी जगतातील कृष्णविवारांचे रहस्य पेपीलोन मिपाकरांना उलघडून दाखवत आहे.
18 Nov 2015 - 7:06 am | चाणक्य
हॅकर्स अंडरग्राऊंड.... नंतर परत एक जोरदार लिखाण आलेले आहे. आवडलंय , वाचतोय, पुभाप्र.
18 Nov 2015 - 9:27 am | महेश हतोळकर
हॅकर्स अंडरग्राउंड पूर्ण झाल्याचं मला तरी आठवत नाही. हां सव्यासाची पूर्ण केलं होतं.
18 Nov 2015 - 9:38 am | चाणक्य
हो पूर्ण नव्हतंच केलं पण होतं जोरदार आणि खिळवून ठेवणारं.
18 Nov 2015 - 8:38 am | भाग्यश्री कुलकर्णी
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.
18 Nov 2015 - 9:20 am | किसन शिंदे
जबराट सुरूवात! लई दिवसांनी कायतरी झक्कास वाचायला मिळालं.
पराशेठ, वेलकम बॅक!
18 Nov 2015 - 9:28 am | अभिजीत अवलिया
पहिल्याच चेंडूवर षटकार. पुढचे भाग लवकर येऊ देत.
18 Nov 2015 - 9:40 am | तिमा
आमचा हा एकच 'परा' असा आहे की त्याचा कुणी कावळा नाही करु शकत!
जय हो परा!!!
18 Nov 2015 - 10:48 am | नन्दादीप
उत्कन्ठावर्धक भाग.... पुभालटा....
18 Nov 2015 - 11:02 am | भाऊंचे भाऊ
डार्कनेट मिपावर ? क्या बात हय.
पुभालटा....!
18 Nov 2015 - 11:11 am | असंका
जबरदस्त सुरुवात!!!
धन्यवाद...!
18 Nov 2015 - 11:12 am | बाळ सप्रे
चांगल इंटरेस्टिंग वाचायला लागलं की हे शिंचं "क्रमश:" मधी येतं .. :-(
18 Nov 2015 - 11:27 am | अभ्या..
लिव्हा लिव्हा.
असलं कै म्हैत नसतय आम्हाला. ;)
18 Nov 2015 - 1:26 pm | मृत्युन्जय
वाचतोय. सविस्तर प्रतिक्रिया सगळे भाग झाल्यावरच देइन. पराचा लौकिक बघता शेवटचा भाग येइस्तोवर जामोप्यांचे २०० आयडी बॅन झाले असतील. (सध्यापर्यंत २५ एक झाले असावेत असा अंदाज आहे. पराचा क्रमशः पुर्ण करण्याच्या स्पीड बघता (आणी जामोप्यांचा डुआयडी धारण करण्याचा उत्साहा बघता हा नंबर २०० ते २००० यामध्ये काहिही असु शकतो)
18 Nov 2015 - 6:09 pm | विशाखा राऊत
परा परा परा.. वेलकम बॅक.. पुढचा भाग लवकर येवुदेत :)
18 Nov 2015 - 8:39 pm | पीशिम्पी
उत्सुकता तर ताणली गेली आहे पण एक मोलाचा सल्ला. कादंबरीतील वेगवेगळ्या टर्म्स ऑनलाईन पहातांना सावधानता बाळगा कारन बर्याच बाबी आक्षेपार्ह आहे आणि बरेच जण लक्ष ठेवून असतात.
18 Nov 2015 - 9:56 pm | बिपिन कार्यकर्ते
पुढचं लिहिलं तर प्रतिक्रिया देण्यात येईल.
25 Nov 2015 - 2:24 pm | चिंतामणी
पुढचं लिहिलं तर प्रतिक्रिया देण्यात येईल.
एकदम बरोबर.
19 Nov 2015 - 2:45 am | पिवळा डांबिस
पहिला भाग मस्त उतरलाय. आवडला.
आता पुण्यात आल्यावर पहिला फोन कुणाला करायचा, बिकाला की पराला, याचा निर्णय नक्की झाला!! :)
बाकी मिपावर ही क्रमशः ची प्रथा कुणी सुरू केली? त्याला धरून झोडला पाहिजे एकदा!!
19 Nov 2015 - 3:08 pm | प्रभाकर पेठकर
मिपावर ही क्रमशः ची प्रथा कुणी सुरू केली? त्याला धरून झोडला पाहिजे एकदा!!
असं म्हणा की 'मिपावर ही क्रमशः लिहून पुढील भाग न टाकणार्यांना झोडलं पाहिजे एकदा.
25 Nov 2015 - 2:25 pm | चिंतामणी
असं म्हणा की 'मिपावर ही क्रमशः लिहून पुढील भाग न टाकणार्यांना झोडलं पाहिजे एकदा.
१००% सहमत.
19 Nov 2015 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) च्यायला... उगाच मधल्या मधे माझा काटा काढलात की ओ पिडां!
बाकी क्रमशः लिहिणार्यांना झोडला पाहिजे हे खरंच. काही लोक तर क्रमशः असं म्हणतात आणि पुढे लिहितच नाहीत. ;)
19 Nov 2015 - 9:00 pm | चतुरंग
'माती' करतात कथेची! ;)
(लालमातीतला)रंगा
19 Nov 2015 - 10:08 pm | प्रीत-मोहर
अगदी अगदी.
19 Nov 2015 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते
कोण माती? धन्यवाद.
- (निरागस) बिका.
;)
24 Nov 2015 - 7:11 pm | सोत्रि
चुकून (निरागस) बोका असं वाचलं! ;)
- (हलकट) सोकाजी
19 Nov 2015 - 5:39 pm | शिव कन्या
पुभाप्र
19 Nov 2015 - 6:30 pm | सुमीत भातखंडे
पुढचे भाग लवकर येऊदेत.
19 Nov 2015 - 8:58 pm | योगी९००
खरा अनुभव आहे का? की कथा आहे? सुरुवात तर एकदम जबरदस्त आहे.
टॉर ब्राउसर डाउनलोड करू का?
19 Nov 2015 - 9:13 pm | भाऊंचे भाऊ
बाकी हो समजा मी अशी साइट बनवुन दाखवली जी नेमका टॉर युजर यशस्वीपणे ट्रॅक करुन दाखवेल तर मला काही बक्षीस मिळेल काय ? इट्स नॉट अॅज अॅनॉनिमस अॅज वि एक्स्पेक्ट.
20 Nov 2015 - 11:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी
या. सुरवात तर केलीत? हे तरी संपवणार का? नाही म्हणजे वाचायच का नाही ते ठरवता येईल. पुढचा भाग आल्याशिवाय हे वाचणार नाही.
स्वगतः साला न वाचल्याशिवाय जमत नाय...
22 Nov 2015 - 1:10 am | कवितानागेश
पुढचा भाग टाक लवकर.
22 Nov 2015 - 10:00 am | नाव आडनाव
आधी प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. पण रोज येऊन पुढचा भाग आला का ते चेक करत असतो. पुढचा भाग टाका लवकर.
22 Nov 2015 - 8:22 pm | सभ्य माणुस
छान लिहिलय. पण " अंमली पदार्थ पोरबंदर मार्गे मुंबईत उतरवण्यात आले आहेत" हे काय पचल नाय.
बाकी पुढील लिखाणास शुभेच्छा. पुढचा भाग लवकर येउ द्या.
24 Nov 2015 - 5:48 pm | मोहनराव
पुभाप्र
25 Nov 2015 - 2:43 pm | रुस्तम
पावडर कथेला विलंब
http://www.misalpav.com/node/33858