असचं काहीतरी

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 11:19 am

पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले 
मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली  रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर  फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली . 

आजी काय म्हणतेय ते गाडीच्या फायरिंग मध्ये काहीच कळेना.मग चावी फिरवून इंजीन बंद केले. 
"काय म्हणतेस, आजी . मी काॅलेज ला निघालोय"
आजीची टकळी सुरूच होती, " तुमच्यासाठीच करतेय ना सगळे "
"मला मेलीला काय हवाय"
"आजी ,कम टू द पोईंट, काय करायच्य तेव्हढ सांग, इकडचं तिकडच नको " 
"अरे तुम्ही सगळे कामात असता ना…. मला मेलीला काय काम…"
"तो तुझा बाबा ,त्याला हापिस,मिटींगा ,मित्र मंडळ , आई ती नोकरी, महिलामंडळ  आणि ते काय ते कलब, पारलर ,झालाच तर  "
पप्पूने सिरियल मध्ये करतात तसे चेह-यावरून नजर हटवून दुसरीकडे पहिले व परत पूर्ववत आजीकडे पाहून  बोलणे ऐकू लागला ,
" तू आपला अभ्यास, कालेज, परीक्षा यातच जुंपलेला…"
" च्यायला आजी फारच सद् गुणी रंगव्तेय आपल्याला, परीक्षेचा काही पत्ता नसतांना तिने अभ्यास, परीक्षा अशी अॅडीशन घेतली , ते काही नाही ,आज आजी बरोबर ती म्हणतेय तिथे जायचे "
आपण बाजी मारलीय हे अजून आजी ला कळले नव्हते म्हणून तिने डिफेन्स चालूच ठेवला , तोंडावरून हात फिरवून ,
"किती वाळलास रे."म्हणून थोडे कढ काढले 
पप्पूने आपल्या फीट बाॅडीकडे आणि डोलेशोले ,दंडांचे काॅस्मेटीक मसल्स कडे पाहिले ...
"अरे ते रात्र रात्र अभ्यासासाठी जागरण , खाण्याची आबाळ "
बापरे रात्री आपण जगतो,क्लिप्स बघतो ,आजीचे लक्ष आहे ,का दडपून बोलतेय काहीच् कळेना.
"अरे आज गुरुवार ना , मी पाच गुरुवार त्या महाराजांचा उपवास .....

पिक्चर मध्ये दाखवतात तसे आता पप्पूला नुसतेच दृष्य दिसू लागले,आवाज ऐकू येईना...

'गुरुवार म्हणजे कुठलाही नवीन पिक्चर रिलीज होत नाहीये, आज काॅलेज मध्ये कोण कोण येण्याची शक्यता आहे ,कुठल्या पोरी कुठे कुणाबरोबर गप्पा मारत उभ्या रहातील, आपले काॅंपीटीटर  पोरं काय पोटेंशियल डॅमेज करू शकतील याचा ताळेबंद च नजरेसमोर उभा राहिला, एकंदरीत सेफ गेम आहे असा मानाने कौल दिल. हा सगळा विचार करायला ते पण व्हीजुअलाइज करायला पप्पूला काही सेकंद च लागले .

"तर  आज उद्यापन,म्हणजे प्रवचन,आरती होई पर्यंत खायचे नाही "
"आजी उपास कसले करतीयस, ब्लडशुगर खाली जाईल, चक्कर येईल"
"तुमच्यासाठीच तर करतेय ना सगळं, बाबाला बढती मिळावी, आईची प्रकृती सुधारावी... झालंच तर तू चांगल्या मार्कानं पास व्हावा, म्हणूनचं करते ना सगळं "
शेवटचं पास होण्याचं आत्ता घुसडलेलं आहे हे सरळचं कळत होतं

"च्यल," पप्पू ३ इडियट स्टाईलने    "तूssss च्यल "

"या धुडा वर मी बसणार नाही " इंन्फील्ड कडे पहात आजी म्हणाली.

पप्पूने तोंडात बोट न घालताच नुसते ओठ मुडपून, "स्वीsssट" कर्ण कर्कश्श शीळ घातली .

"इ इ इ इ ई ई अ ह ह ह ह ह ख क्ख ढ ढ ढ खडा खडा खडाखडा"

असा प्रचंड आवाज करत बाजूने जाणारी रिक्षा अर्जेंत ब्रेक लावत रस्त्याच्या बाजूला थांबली, रिक्षावाल्याने डोकावून मागे पाहिले ,
पप्पूने चेह-यावर अजिजी आणत , आजी आहे ,तिथपर्यंत यायला वेळ लागेल असा आविर्भाव केला व आजीला जपून हाताला धरून निघाला, आजी माझी पिशवी राहीली, वरच्या काकूंना निरोप देते म्हणतं होती.
" आता राहू दे"

पप्पूने खुणेनेच साॅरी केले.एकाच वेळा चेह-यावर वेळ होतोय म्हणून अपराधी भाव, तो थांबला म्हणून आभार दर्शक हसू हे परस्पर विरोधी भाव कसे येऊ शकतात याचेच कुणाला आश्चर्य वाटावे.

"असू दे असू दे" अशा अर्थाचा हात हलवत रिक्षावाल्याने मावा बनवायला घेतला.

आजी स्लो मोशन वर निघाली, युगे अठ्ठावीस.......
रिक्षावाला जगाच्या अंतापर्यंतही थांबला असता.

"तुझे कालेज बुडाले रे माझ्यामुळे"
"पण तुझ्या पूजाअर्चामुळे मी पास होईन ना,तूच तर म्हणालीस" पप्पूने आजीच्या गळ्यात  तिचेच बोलणे पलटवले. आजी अचंभित होऊन उभी राहिली, मग हो रे तुमच्या साठीच करते" सुरु झाले

रिक्षा सुरू झाली. एकदा डावीकडे वळतांना वळणावरच ड्रेनेजचा खड्डा आला,जो टाळणे अशक्यचं होते, पप्पूने कचकचीत शिवीचं घातली. रिक्षावाला तोंड वर करुन मावा सांभाळून स्वारी बोलला.

"नाही हो, तुमची चूक नाही, हा काॅपो. इंजीनियर अशिक्षितच राहिला. ऐटीकेटी अजून क्लिअर झाला नाही वाटतं"

पप्पूला आजी असतांना शिवी निघाली म्हणून स्वत:चाच राग आला.
आता खड्डा आला तरी चिडायचं नाही असं ठरवतो तोच रस्त्याच्या खालून ड्रेनेजचा पाईप गेला असल्यानं मानवनिर्मित खड्यांची मालिकाचं लागली. काय चुकवणार, किती चुकवणार.भर घालून रस्ता वर उचलला पण मॅनवे ज रीलीजीयसली खोलचं ठेवली होती. हो, कधीतरी उघडायला लागतील ना.
कबड्डी खेळल्यासारखी स्कूटरचालक/ चालीका खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करीत होती, मागे बस असेल तर ड्रायव्हरचा काळजाचा ठोका चुकत होता.

"च्यायला, कुठल्यातरी समाजसेवी मंडळाच्या मदतीने काॅंक्रीटच भरतो या मॅनमेड खड्यांमध्ये "
पप्पूने त्रागा केला. रीट पिटीशनचं केला पाहिजे जनहीतार्थ.

" पुन्यात एकच रस्ता चांगला बांधला"
रिक्षावाला म्हणाला.
"कुठला हो" पप्पू.
" जंगलीमहाराज रोड, त्यांना नंतर कंत्राटच दिलं नाही..... खायाला भेटत नाही "

"जंगलीमहाराज " आजी भक्तीभावाने हात जोडले.
पप्पू थक्क झाला. काय खरं, काय खोटं. पण " तुम्हारा प्राॅब्लेम ये है के तुम बहोत अच्छे हो " हा डर मधला संवाद आठवला.

"अरे, कधी तुझं शिक्षण होणार, कधी तू कामधंदा शोधणार, मग कधी लग्न करणार"
आजी काळजीने बोलली
"आणि कधी नात किंवा नातू दाखवणार,हेच ना? पप्पूने अॅडीशन घेतली.

रिक्षावाला मावा गिळून हसला.आजीनं खोट्या रागाने पाहीलं.
पप्पूही हसला, मघाचा राग कुठल्याकुठे पळून गेला.

मंदीर आलं.
आजी उतरली, समोर दामलेकाकू दिसल्या.
" नातू आलाय" आजी कौतुकाने
"होक्का. नशिबवान आहात हो, नाहितर आजकालच्या मुलांना कूठे......"

" नाही नाही नाय नाय" इकडे दोघांचा आवाज चढला.
मीटरसारख्या क्षुद्रगोष्टीकडे दोघांचं लक्ष नव्हतं....
" माझीपण आजी नाही का ती भाऊ" रिक्षावाला
"मग पुन्हा रिक्षात बसणार नाही "
पप्पूनं हुकूमीऐक्का काढला,
रिक्षावाला वरमला " तुम्ही म्हणाल तसं"
पप्पूनं पैसे दिले, वर आणखी एक नोट काढली ,"बर, नाष्टा केला का ?"

"आणि एक, तुम्ही भाऊ बोलले ना?"
" हो. तुमी धाकले भाव"
"मग एक रिक्वेष्ट, मावा व तंबाखूचे भाऊबंद सोडा,एकदम बंद, कॅंसर होतो"

रिक्षावाल्यानं बाहीनेच डोळा पुसला.
खाली वाकून दुख-या खांद्याला झटका देवून रिक्षा सुरु करणार इतक्यात समोरच्या पानपट्टीच्या रेडिओवरुन कानावर पडलेल्या गाण्याच्या ओळी ऐकण्यासाठी तो थांबला,

"कितने हसीन लोग थे,
जो मिलके एकबार,
आॅखोंमे जज्ब हो गये,
दिलमे समा गये,"

रिक्षा निघून गेली.

जाणा-या रिक्षाकडे पप्पू पहात होता.

"दम लेके एक लम्हा,
चले जायेंगे फकीर,
सुनके तुम्हारे कूल्द की,
तारिफ आ गये,

एक लम्हा मैकदे में,
जो हम लोग आ गये,
कुछ बातचीत कर गये,
कुछ हॅंसहॅंसा गये...

जीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 11:28 am | अभ्या..

डिटेलिंग, भाषा, शेरशायरी, पुणे, रिक्षा, आजी, डोलेशोले, मावा, कॅन्सर, इमोशन्स, कोर्पोरेशन, करप्शन सगळे आहे.
कथा कुठाय?

बॅटमॅन's picture

3 Nov 2015 - 11:54 am | बॅटमॅन

आशेच म्हंतो.

उगा काहितरीच's picture

3 Nov 2015 - 4:50 pm | उगा काहितरीच

सापडली तर आम्हालाही कळु देत . ;-)

अहो,तुमचं बरोबर आहे.
हा वार्म अप समजा. हा पुर्वार्ध समजा, उत्तरार्धाचा प्लाॅट तयार आहे,कहानी में ट्विस्ट आहे. धारावाहिक पण करू शकतो. आधी किती कोमट / किती जिंदादिल प्रतिक्रिया येतात ते बघतोय.

विक्रान्त कुलकर्णी's picture

3 Nov 2015 - 11:42 am | विक्रान्त कुलकर्णी

काहीतरि खरडल्यासारखे वाटते आहे.....

हे वाक्य तरी पूर्ण करा हो.... !!

असंका's picture

4 Nov 2015 - 1:09 pm | असंका

मजेशीर आहे.

नारायण पेठे लइ दिवस काढले, त्याची आठवण झाली...

धन्यवाद!!

बाजीगर's picture

4 Nov 2015 - 3:39 pm | बाजीगर

तुम्ही एकटेच आधार देणारे.धन्यवाद

कपिलमुनी's picture

4 Nov 2015 - 3:44 pm | कपिलमुनी

बाजीगर ओ बाजीगर !
तेरी कथा है किधर ?