कविवर्य बोरकरांची मनापासून क्षमा मागून...
आ. बाकिबाबांची मुळ कविता : माझ्या गोव्याच्या भूमीत
माझ्या सोलापुरी मातीत
गड्या आभाळ कोरडे
वेशी-पेठांच्या मधुन
मराठी कन्नड़ चौघडे !!
माझ्या सोलापुरी मातीत
भाषा विविधेची रास
ओठी शिव्यांचे पाझर
मनी माणुसकीचा वास !!
माझ्या सोलापुरी मातीत
'रामपुरें'ची कारागिरी
पाना-फ़ुलांची कुसर
जगीं प्रसिद्ध चादरी !!
माझ्या सोलापुरी मातीत
सदा उन्हाळ्याचा वारा
अंगोपांगी खेळती रे
उष्ण घामाच्या या धारा !!
माझ्या सोलापुरी मातीत
येते लावणी माहेराला
कविवरांच्या वचनांनी
भेटे लावण्य कवितेला !!
माझ्या सोलापुरी मातीत
शिव्या शब्दांचीच फ़ुले
असे राकट रांगडा
जीव मनापासून बोले !!
माझ्या सोलापुरी मातीत
(पद्म)साळ्यांचा रे 'माग'
येते कबिराच्या दोह्यांनी
साखरपेठेला रे जाग !!
माझ्या सोलापुरी मातीत
'मना-मना'चे रे सोने
आतिथ्याचे, अगत्याचे
आम्हां लाभले हे 'देणे' !!
– विकुबाब सोलापूरकर
प्रतिक्रिया
30 Oct 2015 - 11:14 am | किसन शिंदे
एक नंबर! शेवटच्या कडव्याशी मनापासून सहमत.
(सोलापुरकरांचे आदरातिथ्य उपभोगलेला) किसन
30 Oct 2015 - 11:25 am | कैलासवासी सोन्याबापु
शब्दाशब्दाशी सहमत
(दिलखुलास सोलापुरी मित्र असलेला) बाप्या
30 Oct 2015 - 11:37 am | प्रचेतस
एकच नंबर रे भावा.
30 Oct 2015 - 12:29 pm | अत्रुप्त आत्मा
सोलापुरी कानडी मराठी मोड़ ऑन
विशाSSSSSssssल ... काSSssय लिहिलं रेSSSSSssss ते कविता तूSSSSSssss
व्वा व्वा व्वा ! म्हणून गेलो की रेSSSSSssss मना तून..
30 Oct 2015 - 12:31 pm | चांदणे संदीप
माझ्या गावाचा मनुष्य
जेव्हा भेटे दूर देशी
दाटे जिव्हाळा मनीचा
पापण्यांच्या कडांपाशी!
कवितेला आज सोलापूर लाभले!
सुंदर! फारच आवडली!
Sandy
30 Oct 2015 - 12:46 pm | दमामि
वा!!!!
30 Oct 2015 - 12:46 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
30 Oct 2015 - 1:39 pm | मित्रहो
छान कविता
30 Oct 2015 - 2:40 pm | प्रभो
मस्त!
30 Oct 2015 - 3:01 pm | पद्मावति
मस्तं जमलीय कविता.
30 Oct 2015 - 4:10 pm | पैसा
मस्त रे विकुबाब!
30 Oct 2015 - 6:39 pm | जव्हेरगंज
कविता आवडली!
'मसाला' या चित्रपटात असली सोलापुरी माणसे भेटतात. तुफान आवडलेला.
30 Oct 2015 - 9:36 pm | इडली डोसा
लगेच सोलापुरकर मैत्रीणीला लिंक पाठवली.
30 Oct 2015 - 10:57 pm | राघवेंद्र
कविता आवडली.
31 Oct 2015 - 12:02 am | शिव कन्या
जमून आलेय.... खंडकाव्यच घ्या लिहायला ... चार हुतात्मे, कोटणीस,ग्रामदैवत इ इ इ
31 Oct 2015 - 9:37 am | विशाल कुलकर्णी
खंडकाव्याचं बघू कधीतरी. तोपर्यंत हे गद्य घ्या ..
रंग सोन्नलगीचे – अर्थात आमचं सोलापूर !
31 Oct 2015 - 9:38 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
31 Oct 2015 - 12:05 pm | नाखु
विशाल भौ !!!!
31 Oct 2015 - 12:12 pm | प्यारे१
मस्त जमलंय विकु.
(जोडीला बाब म्हणणे न म्हणणे ही नंतरची बाब)
31 Oct 2015 - 11:42 pm | बोका-ए-आझम
हे कसलं बढिया आहे यार!मूळची बोरकरांची कविता तर एकदम नितळ!
2 Nov 2015 - 12:32 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
2 Nov 2015 - 12:53 pm | अभ्या..
अरे इशल्या. मै देख्याच नै तो ये. अपनी गावकी बातां और कैसे नजरंदाज हुई बोलतो मै.
जानछोड. क्या लिखा है बावा. कस्समसे एकदम झबरद्स्तच.
आ बेस मे. चाय पियेंगे.
.
कौन बोलके मत पूछ अब. मैच तो. अभ्या
2 Nov 2015 - 3:02 pm | विशाल कुलकर्णी
आत्याच रे अग्ले म्हैनेमें. होर भी कुछ लोगा होना उदरकु. सबकु लेको आत्या मई. मिलत्येच इस बार ...
2 Nov 2015 - 12:55 pm | कंजूस
व्वा।
2 Nov 2015 - 5:42 pm | मूकवाचक
+१