तेव्हा तू कुठं होता?

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
17 Oct 2015 - 9:25 pm

लंचटाईमला कळलं मला
डब्यात लाडू होता दिला
तिरीमिरीने झटक्यात उचलून
खिडकीबाहेर फेकून दिला
आठवड्यापूर्वी तरसलो होतो जेव्हा
भुकेने कासावीस झालो होतो जेव्हा
ए रासभग्रासा
तेव्हा तू कुठं होता?

घरी येता संध्याकाळला
टॉमी कुत्रा फार आनंदला
घातली कमरेत लाथ त्याच्या
शेपूट हलवत जेव्हा आला
लहान होतो मी जेव्हा
दोन कुत्री चावली जेव्हा
ए दगाबाज कुत्र्या
तेव्हा तू कुठं होता?

बाबा मी पडलो मी गाडीवरून
सांगे मुलगा जवळ येऊन
मोडक्या हाताकडे न पाहता
ओरडलो त्यालाच मी उलटून
शाळेत जायचो मीही जेव्हा
सायकलवरून पडायचो मी जेव्हा
ए सैतानाच्या पोरा
तेव्हा तू कुठं होता?

फाटका माणूस होता मार खात
फिरायला होतो जेव्हा मी जात
मारले मीही दोन-चार दगड
ठेचला सामील होऊन जमावात
गेल्या वर्षी घडलं असंच जेव्हा
गरिबालाच ठेचलं होतं जेव्हा
ए कमनशिबी जनावरा
तेव्हा तू कुठं होता?

मुक्त कवितासमाज

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 Oct 2015 - 9:39 pm | चांदणे संदीप

आत्ता थोड्यावेळापूर्वी हीच कविता हिंदीत होती ना इथे??
असो, हिंदीतली जास्त आवडली होती!

काहीतरी गडबड आहे, धागा नीट प्रकाशित झाला नाहिये बहुतेक. या कवितेसोबत अजून काही होत का??

नगरीनिरंजन's picture

18 Oct 2015 - 4:57 am | नगरीनिरंजन

हिंदी कविता मिसळपावच्या नियमात बसत नसल्याने उडवण्यात आली बहुतेक.

जव्हेरगंज's picture

17 Oct 2015 - 9:45 pm | जव्हेरगंज

हिंदीतली वाचली होती पण काहीच कळाली नव्हती.
मराठीतली ऊत्तम आहे.!

एस's picture

17 Oct 2015 - 10:06 pm | एस

कविता आवडली.

हिंदी मधली राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषकांसाठी तर ही राज्य पातळीवर मराठी लोकांसाठी.

नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा या आधुनिकोत्तर कवितेशी काही संबंध असावा बहुतेक.

सायकलस्वार's picture

18 Oct 2015 - 7:25 pm | सायकलस्वार

आंधळ्यांच्या जगात कंदील विकण्याच्या चिकाटीचे कौतुक आहे ;)

शिव कन्या's picture

20 Oct 2015 - 8:30 pm | शिव कन्या

बरोबर.

अरुण मनोहर's picture

23 Oct 2015 - 3:25 pm | अरुण मनोहर

सुपर लाईक !

अन्या दातार's picture

19 Oct 2015 - 6:05 pm | अन्या दातार

कविता आवडली.
लिहित जा जरा जास्त फ्रिक्वन्सीने.

द-बाहुबली's picture

23 Oct 2015 - 4:08 pm | द-बाहुबली

दारु पिल्यानंतर म्हणावेसे वाटणारे गित.

मनीषा's picture

27 Oct 2015 - 1:46 pm | मनीषा

चांगली आहे कविता ..
खरं आहे हे.. एकदा वेळ टळून गेली कि मिळणार्‍या कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ रहात नाही.

मारवा's picture

27 Oct 2015 - 5:58 pm | मारवा

नगरी निरंजन
सुंदर कविता
तुमची मागे पण एक असामान्य कविता वाचलेली आठवतेय अंधुक अंधुक
वेब लाइफ नॅरेट करणारी
जबरदस्त प्रतिभा
धन्यवाद या कवितेसाठी