ये 'रेषेवरची अक्षरे' क्या हय?

रेषेवरची अक्षरे's picture
रेषेवरची अक्षरे in जनातलं, मनातलं
26 Oct 2015 - 12:05 pm

'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे. तशी अगदी नावागावापासून सुरुवात करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो. :)

तर - इंटरनेटवर मराठीतून लिहिण्याची सोय होऊन, फ्याशन येऊन आणि त्याचा पायंडा पडूनही आता बर्‍यापैकी वर्षं लोटली. आधी ब्लॉग्स जोरात होते, मग मराठी संस्थळं येऊन स्थिरावली, लोक हळूहळू फेसबुकावर रमले आणि आता फेसबुकही स्थिरावून व्हॉट्सॅपकडे असूयेनं बघायला लागलंय. 'रेषेवरची अक्षरे' मात्र अगदी पहिल्या टप्प्यापासून मराठीतून लिहिणार्‍यांकडे लक्ष ठेवून होतं, आहे. आज पुस्तका-मासिकांतून भेटणारे काही लिहिते लोक 'रेषे'च्या जुन्या दोस्तांपैकी आहेत.

२००८ साली 'रेषे'चा पहिला अंक निघाला. २०१२ सालापर्यंत आम्ही सलग वार्षिक दिवाळी अंक काढत होतो. तेव्हा ब्लॉगविश्व बहरलेलं होतं. तिथे लिहिल्या जाणार्‍या लेखनापैकी निवडक ललित लेखन एका ठिकाणी संकलित असावं, नवख्या वाचकाला इथल्या चांगल्या लेखकांची ओळख व्हावी, आडवाटेचे नवीन ब्लॉग्स हुडकता यावेत; असे अनेक हेतू होते. मग मराठी संस्थळं आली आणि एक नवाच व्हर्च्युअल सामाजिक अवकाश मिळाल्यासारखा झाला. तिथले वाद, चर्चा, थट्टा-मस्कर्‍या यांच्यात लोक रमले. ब्लॉग्स काहीसे थंडावले. आम्हीही थोडे पोटापाण्याच्या उद्योगात रमलो, संस्थळांवर उंडारलो.

ब्लॉग्स आणि 'रेषेवरची अक्षरे' मागे पडली.

यंदा आमच्या व्हर्च्युअल साहित्यप्रेमानं (विशेषणाची जागा तशी जोखमीची निवडली आहे, मान्य आहे!) पुन्हा उचल खाल्ली. ब्लॉग्स अजूनही तसे थंडावलेलेच आहेत. मराठी लोकांना संस्थळांचं ऐसपैस वातावरण काहीसं मानवलेलं दिसतं आहे. तिथे जोमानं आणि नवनवीन प्रयोगांसह ललित लिहिलं जाताना दिसतं आहे. वाचकही त्या मजकुराच्या वाचनीयतेत भर घालत आहेत, असं एक मजेशीर आणि आशादायक चित्र आहे. या सगळ्या अवकाशातल्या - ब्लॉग्स आणि फोरम्सही - गेल्या तीन वर्षांतल्या लेखनाचा ढांढोळा घ्यायचं आम्ही यंदा ठरवलं आहे. काही नव्या दोस्तांची मदत मागितलीय, काही जुन्यांना थडग्यातून लाथा घालून बाहेर आणलं आहे आणि कामाला लावलं आहे. कामाचा एकूण आवाका पाहून दडपण येतं आहे खरं. पण ते हवंच!

या मंथनातून हाती लागलेले निवडक लेख 'रेषे'च्या यंदाच्या अंकात असतील. ब्लॉग आणि संस्थळं यांच्यावरच्या लेखनातली साम्यस्थळं आणि फरक (सोदाहरण!) तपासणारे काही लेख असतील. आणि खेरीज मराठी कवितेकडे काहीसा फेसबुकोत्तर नजरेतून टाकलेला एक दृष्टिक्षेप असेल. त्यात काही जाणते वितरक असतील, काही प्रकाशक, काही वाचक आणि अनेक कवी.

तर - यंदाचा 'रेषेवरची अक्षरे'चा भरगच्च अंक नक्की वाचा, अशी शिफारस.

भेटू - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, रेषेवरची अक्षरे'च्या ब्लॉगवर (reshakshare.blogspot.in)!

***

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

रामराम रेरे. छान कल्पना आहे. शुभेच्छा!

रेषेवरची अक्षरे's picture

26 Oct 2015 - 12:19 pm | रेषेवरची अक्षरे

धन्स एस. यंदाचा अंक नक्की वाचा....

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Oct 2015 - 12:28 pm | बिपिन कार्यकर्ते

रेषेवरची अक्षरे परत आलेली पाहून अत्यंत आनंद झाला आहे. शुभेच्छा.

रेषेवरची अक्षरे's picture

26 Oct 2015 - 12:34 pm | रेषेवरची अक्षरे

हाबार्स! तुम्ही अगदी पहिल्यावहिल्या शुभेच्छुकांपैकी एक. :)

बिन्नी's picture

26 Oct 2015 - 1:46 pm | बिन्नी

बरं. वाचेन.

सूड's picture

26 Oct 2015 - 2:44 pm | सूड

वाचूच!!

रेषेवरची अक्षरे's picture

26 Oct 2015 - 2:51 pm | रेषेवरची अक्षरे

आभार बिन्नी आणि सूड. :)

प्रतीक्षेत!शुभेच्छा आणि अभिनंदन.

रेषेवरची अक्षरे's picture

26 Oct 2015 - 3:28 pm | रेषेवरची अक्षरे

तुम्ही तोवर जुने अंक चाळू शकता... ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या कल्पनांचंही.

अजया's picture

28 Oct 2015 - 12:30 pm | अजया

नक्की!

वाचन-आमंत्रणासाठी धन्यवाद. नक्की वाचू.
शुभेच्छा !

खटपट्या's picture

26 Oct 2015 - 8:21 pm | खटपट्या

मस्त साठा मिळालाय. धन्यवाद रेषेवरची अक्षरे

कंजूस's picture

26 Oct 2015 - 8:36 pm | कंजूस

ब्लॅाग मागे पडले कारण जीवंतपणा गेला. भूल दिलेला रुग्ण अधूनमधून कण्हतो आणि झोपतो तसं झालं.सातत्य आणि एकच लेखक चांगलं लिहिल याची खात्री नाही.शुभेच्छा.

जव्हेरगंज's picture

26 Oct 2015 - 9:06 pm | जव्हेरगंज

ब्लॉग वरच्या दोन कविता वाचल्या. वारलो.
भन्नाट....! :)

रेषेवरची अक्षरे's picture

26 Oct 2015 - 11:16 pm | रेषेवरची अक्षरे

खटपट्या, :) वाचा, वाचा!
कंजूस, असं काही नाही अहो. राजचा ब्लॉग घ्या. नाहीतर संवेदचा ब्लॉग घ्या. मेरा कुछ सामान घ्या. श्रद्धा भोवडचा ब्लॉग घ्या. हे लोक लिहितातच आहेत की सातत्यानं. असे लोक कमी आहेत हे खरंच आहे. पण ते माहीत व्हावेत, म्हणून तर रेषेवरची अक्षरेसारखा उपक्रम...
जव्हेरगंज, वारलात म्हणजे?! इतक्या वाईट होत्या?! की चांगल्या होत्या? छ्या! स्तुती कोड्यात नको बॉ!

जव्हेरगंज's picture

26 Oct 2015 - 11:22 pm | जव्हेरगंज

आवड्या आवड्या!
अहो खाली भन्नाट पण लिवलय की!

रेषेवरची अक्षरे's picture

26 Oct 2015 - 11:44 pm | रेषेवरची अक्षरे

हां! :)

रामदास's picture

27 Oct 2015 - 11:02 am | रामदास

स्वागत आहे. आंतरजालावर प्रचारही होत आहे. वाचकांची संख्या वाढत जावी ही सदीच्छा.

रेषेवरची अक्षरे's picture

27 Oct 2015 - 12:24 pm | रेषेवरची अक्षरे

आभार!

(खवचटपणे) तुम्ही काय ब्लॉग अपडेटवून नका हो पण... :(

किसन शिंदे's picture

27 Oct 2015 - 12:45 pm | किसन शिंदे

हा अंक नक्कीच वाचेन.

आतिवास's picture

27 Oct 2015 - 12:54 pm | आतिवास

आहे.

स्वगत: आंतरजालावरील जुनी-जाणती रेषा नवख्या सभासदांसारखी प्रत्येक प्रतिसादाला उत्तर का बरं देत असेल? ;-)

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 6:54 pm | शिव कन्या

उत्तम!!! जरूर वाचणार. येथे त्यावरच्या लेखासह धागा टाकलात तर बरे!

रेषेवरची अक्षरे's picture

28 Oct 2015 - 12:23 pm | रेषेवरची अक्षरे

अंक प्रसिद्ध झाल्यावर लेखांच्या लिंकांसह इथे जरूर अपडेट करू, नक्की वाचा.

बाकी आतिवास, अहो, आमचा ’रिक्षा फिरवणे मोड’ ऑन आहे ना सध्या! म्हणून उत्साहात जमेल त्या त्या प्रतिसादाला उत्तर. ;-)

आतिवास's picture

28 Oct 2015 - 3:42 pm | आतिवास

:-)

अनुप ढेरे's picture

28 Oct 2015 - 3:19 pm | अनुप ढेरे

नावामागचं कारण काये या? रेषेवरची अक्षरे ही तर विंग्रजी अस्त्यात ना?

रेषेवरची अक्षरे's picture

28 Oct 2015 - 3:37 pm | रेषेवरची अक्षरे

रेषेवरची अक्षरे ही तर विंग्रजी अस्त्यात ना?

कशी काय? 'रेषेवरची अक्षरे' म्हणजे चक्क ’online alphabets’. थोडक्यात, जालावर - इंटरनेटवर - लिहिलं जाणारं अक्षर वाङ्मय - पक्षी: ललित साहित्य - ते म्हणजे 'रेषेवरची अक्षरे'. आता 'एका विशिष्ट रेषेच्या वरचा दर्जा असलेलं' असंही म्हणता येतंच. पण ते वाचकांनी म्हटलं, तर गंमत आहे, नाही का? ;-)

अनुप ढेरे's picture

28 Oct 2015 - 3:55 pm | अनुप ढेरे

online alphabets = रेषेवरची अक्षरे हे मिसलं मी. खुलाश्याबद्दल धन्यवाद. विंग्रजी अक्षरे ओळीवर लिहितात त्यामुळे मी कंफ्यूज झालो.

आता 'एका विशिष्ट रेषेच्या वरचा दर्जा असलेलं' असंही म्हणता येतंच. पण ते वाचकांनी म्हटलं, तर गंमत आहे, नाही का?

आम्ही तर म्हणतो ब्वॉ!

दमामि's picture

28 Oct 2015 - 4:02 pm | दमामि

अंकाच्या प्रतिक्षेत!

रेषेवरची अक्षरे's picture

4 Nov 2015 - 8:47 am | रेषेवरची अक्षरे

शुभ दीपावली!

यंदाच्या अंकाचं टप्प्याटप्प्यानं प्रकाशन करतो आहोत. ब्लॉगवर जाऊन (http://reshakshare.blogspot.in/) नक्की पाहा, प्रतिक्रिया द्या, सूचना कळवा...

फेसबुकावर असाल, तर लाईक करा...

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Nov 2015 - 9:22 am | ब्रिटिश टिंग्या

सवडीने वाचेन. तुर्तास अभिनंदन!

- टिंग्या

बॅटमॅन's picture

4 Nov 2015 - 11:50 am | बॅटमॅन

अभिनंदन!!!!

रेषेवरची अक्षरे's picture

4 Nov 2015 - 12:26 pm | रेषेवरची अक्षरे

नुसतं हाबिनंदन नको लोकहो!
वाचा नि प्रतिक्रिया कळवा!

अभ्या..'s picture

4 Nov 2015 - 12:42 pm | अभ्या..

अभिनंदन.

प्रतिक्रिया कळवल्या व वाचल्या जातील ;)

मुक्त विहारि's picture

4 Nov 2015 - 3:12 pm | मुक्त विहारि

अभिनंदन

सुमीत भातखंडे's picture

4 Nov 2015 - 6:51 pm | सुमीत भातखंडे

नक्की वाचू.

यशोधरा's picture

4 Nov 2015 - 7:09 pm | यशोधरा

Abhinandan!

Nandanchaa lekh aahe ka?

रामदास's picture

4 Nov 2015 - 7:42 pm | रामदास

मी नंदनचाचा वाचलं !!

यशोधरा's picture

4 Nov 2015 - 7:59 pm | यशोधरा

Ramdaskaka _/\_ :)

रेषेवरची अक्षरे's picture

5 Nov 2015 - 9:39 am | रेषेवरची अक्षरे

नंदन'चाचां'नी इतक्यात नवीन काही लिहिलं आहे का?! तुम्हांला सापडलं असेल, तर आम्हांलाही कळवा!

नंदनचाचांना लिहायला लावेल त्याला मी २० गावं इनाम द्यायला तयार आहे. किंवा नंदनचाचांनी स्वतःहून लिहिलं तर अख्खं कॅलिफोर्निया देईन त्यांना! पण रामा, शिवा, गोविंदा!!

वाचतो आहे. मुखपृष्ठ व शीर्षचित्र अक्षरलेखन आवडलं. Masthead कडकडीत झाला आहे.

रेषेवरची अक्षरे's picture

5 Nov 2015 - 7:35 am | रेषेवरची अक्षरे

अर्रे! सगळ्यांचे आभार... :)

रेषेवरची अक्षरे's picture

5 Nov 2015 - 8:39 am | रेषेवरची अक्षरे

आभार मंडळी! आज ललित विभागातले इतर काही लेख आणि 'तुम्ही (नेटावर) काय लिहिता?' (http://reshakshare.blogspot.in/p/blog-page_0.html) हा छोटेखानी विभाग प्रसिद्ध झाला आहे. ब्लॉग्स खरे की फोरम खरे? आणि काय बरे? का बरे?! नक्की वाचा...

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2015 - 10:21 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही आमच्या मचाकचा दिवाळी अंक वाचलात, तर आम्ही पण तुमचा वाचू.

रेषेवरची अक्षरे's picture

6 Nov 2015 - 8:03 am | रेषेवरची अक्षरे

अरे! आम्ही 'मचाक' वाचतोच! त्याला आग्रह कशाला हवा? ;-)

बॅटमॅन's picture

6 Nov 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

या वर्षीचा आलाय का?

(मचाकप्रेमी) बॅटमॅन.

खरंच मचाकचा दिवाळी अंक असतो का?

दरवर्षीचं माहिती नाही, परंतु किमान एका वर्षी तरी विशेषांक निघालेला पाहिला आहे. =))

रेषेवरची अक्षरे's picture

6 Nov 2015 - 8:03 am | रेषेवरची अक्षरे

आजच 'कवितेची गोष्ट'च्या प्रकाशनाला सुरुवात केली. इतर काही ललित लेखही प्रकाशित केले आहेत. नक्की वाचा नि कळवा... :)

हा ब्लॉग सध्या बंद का आहे ?