ल _ _

दमामि's picture
दमामि in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 7:44 am

ल _ _

तोंडात पान ठेवल्यासारखी ती शिवी तिनं दिली,
एकदा... दोनदा... अनेकदा...
मन भरेपर्यंत.
तिथेच उभ्या असलेल्या मला अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं
वाटत होतं.
श्रीदुर्गापूजेचा आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय
नसल्याने आणि
लांब जायचे असल्याने बीईयेष्टी ने प्रवास करावा लागणार होता.
दादरला बसमध्ये चढलो,, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जण बसच्या मागील बाजूस
जेन्ट्सना उभे राहण्यासाठी
हमखास जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघींच
एक वाचाळ मंडळ खिखीखुखू करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून मराठी वाटत होते,
त्यातील एकीने भरपूर (बोचकी) घेतली
होती (त्यातल्या मोगऱ्याच्या वेण्यांचा सुवास पसरला होता). तिच्या बाजुचीला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, तिची गाडी अजून चालू न लागलेली सहज कळत होती.
ती सरळ आमच्या जवळ येऊन रेलू लागली , अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे
चुकून तसं होतंय,आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती.
तिथल्या एका मुलाने गोडीत त्यांना .बायकाच्या राखीव जागी बसण्यास सांगितले ,
तेवढयापुरतं सरकल्यासारखं
करून पुन्हा तिनं तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. .
इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते.
पुढचे एक आजोबा तिला
समज देत होते तर ती त्यांनाच वेड्यासारखे हातवारे करून दाखवीत होती .
अशावेळेस पुरुष जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरची घाबरून काय करेल, रडेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होतो, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभा राहिलो होतो .

त्या मुलालाही मी समजावत होतो की "जाऊ दे अजून थोडा वेळ. सवय आहे मला याची. उगीच नादी लागू नको."

ती अजून बरळतच होती काही-बाही सुनावत होती.

तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेली ती शिवी देऊन मोकळी झाली ..
ल _ _ कु _ _!!

त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी ती माझ्या हाताला स्पर्श करू पहात होती .

मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत तिच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभा .
त्यानंतर मात्र मला राहवेना. ती माझ्या हाताला चिकटलीच . मी त्या छोट्या गोड मुलीला उचलून घेतलं आणि

तितक्यात अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटलं .

आकाशी शर्टावर मोठ्ठा ओघोळ दिसू लागला .

तिची आई मात्र सारखी "लबाड कुठली " म्हणू लागली.

( कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
वाटलं तर एक डायपरची जाहिरात समजा.)

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2015 - 7:47 am | अत्रुप्त आत्मा

ह___

जव्हेरगंज's picture

15 Oct 2015 - 8:01 am | जव्हेरगंज

वाटच बघत होतो.
शेवट अगागा!!!

(पण, आपल्याकडून ह्यापेक्षा जबराटाची अपेक्षा होती, भावना दुखावण्याचा नादात हात आखडता घेतल्यासारखा वाटला):)

जव्हेरगंज's picture

15 Oct 2015 - 5:54 pm | जव्हेरगंज

सकाळी जरा घाईतच वाचली होती. आता पुन्हा वाचली. आणि खरा प्रकार समजला. खतरा जमलीय.(आधीच्या प्रतिसादासाठी माफी)
आवडेश!

चांदणे संदीप's picture

15 Oct 2015 - 8:08 am | चांदणे संदीप

वां_

प्रीत-मोहर's picture

15 Oct 2015 - 8:12 am | प्रीत-मोहर

आवडल

दमामि's picture

15 Oct 2015 - 8:17 am | दमामि

धन्यवाद हो!
स्पष्ट लिहिल्याबद्दल अजून एकदा धन्यवाद!
नाहीतर इतर प्रतिसाद वाचून मी डोकं खाजवत बसलोय.:)

सतिश गावडे's picture

15 Oct 2015 - 8:29 am | सतिश गावडे

नाहीतर इतर प्रतिसाद वाचून मी डोकं खाजवत बसलोय.:)

हे वाक्य "नाहीतर इतर प्रतिसाद वाचून मी डोकं खाजवत बसलेय.:)" किंवा "नाहीतर इतर प्रतिसाद वाचून आम्ही डोकं खाजवत बसलोय.:)" असंही लिहिता आलं असतं काय?

कत्ती, आमी नाय बोल्नाल जा!

अच्चं नै कलायच्चं दमामि (दादा, ताई, ताया....)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2015 - 10:09 am | अत्रुप्त आत्मा

=))

खटपट्या's picture

15 Oct 2015 - 8:59 am | खटपट्या

चांगलंय !!

अजया's picture

15 Oct 2015 - 9:06 am | अजया

निरागस विडंबन! आवडलं!

नाखु's picture

15 Oct 2015 - 9:42 am | नाखु

और आने दो.

हा टका कुठं गेलाय काही कळेना.

शोधायचं राज्य आलेला नाखु

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 10:02 am | प्यारे१

बसा. तुम्ही शोधत बसा आणि राज्य घेत बसा.
सात वेळा धप्पा करून गेलंय ते टक्या तुम्हाला. ;)

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2015 - 10:02 am | पिलीयन रायडर

छान आहे.. आवडलं..!!

टवाळ कार्टा's picture

15 Oct 2015 - 10:11 am | टवाळ कार्टा

भें _ _ मस्तय ;)

बाकी कोणी मला "ल _ _ कु _ _" म्हणजे नक्की काय ते कळवेल काय

दमामि's picture

15 Oct 2015 - 10:14 am | दमामि

टक्कूमक्कूशोनू जरा शेवटपर्यंत वाचायचे कष्ट घे की!

टवाळ कार्टा's picture

15 Oct 2015 - 10:46 am | टवाळ कार्टा

खि खि खि

चांदणे संदीप's picture

15 Oct 2015 - 10:30 am | चांदणे संदीप

हुर्रॆ….धतड ततड…!

मी आलोच!

चांदणे संदीप's picture

15 Oct 2015 - 10:47 am | चांदणे संदीप

आर्र…गल्ली चुकली!

स्वारी बर्का! (तुमच चालू द्या… ल_ _ _ कु_ _ _ वैग्रे!)

हेमंत लाटकर's picture

15 Oct 2015 - 10:28 am | हेमंत लाटकर

"ल _ _ कु _ _" म्हणजे काय?

विचारात पडलेला मिपाकर.

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 10:37 am | मांत्रिक

लबाड कुठला!
अरे देवा काय हे अज्ञान?

दमामि's picture

15 Oct 2015 - 10:51 am | दमामि

मांत्रिकभौ, मिपाकर किती निरागस असू शकतो हे तुमच्याकडं बघून कळतं, नाहीतर .....:)

सौंदाळा's picture

15 Oct 2015 - 10:40 am | सौंदाळा

जबराट
शेवटची कलाटणी तर बेहद्द आवडली ;)

बॅटमॅन's picture

15 Oct 2015 - 10:54 am | बॅटमॅन

पु__

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 11:06 am | प्यारे१

पुरष्या???

असंका's picture

15 Oct 2015 - 11:00 am | असंका

एकदम भारी!!!

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 11:06 am | प्यारे१

वरच्या प्रसंगातून एक मोठी सामाजिक समस्या लेखक (की लेखिका हाय तू?) यांनी मांडलेली असून तिच्या उद्भवण्यामागे मुख्यत्वे आर्थिक कारण जे गरीबी हे दिसत असलं तरीसुद्धा व्यक्तीच्या जडणघडणीत भोवताल कसा कार्य करतो याचा मानस शास्त्रीय आढावा घेण्याची गरज आहे. आपल्या विधींची जाणीव नसण्याच्या वयात बरोबरच्या फुलवाल्या बाईकडून कधीतरी ऐकलेल्या वाईट शब्दांची अभिव्यक्ती त्या मुलीच्या मुखातून होते याचा अर्थ लहान मुलांची ग्रहण शक्ती ही जणू टीपकागदासारखी असते. निव्वळ मुलीच्या तोंडची ही भाषा हा तिच्या संस्कारांचाच भाग नसून त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेकपदरी समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.

मूळ लेखातल्या मूळ व्यक्तीबाबत हेच म्हणता येत असलं तरी निव्वळ कारणमीमांसा करून थांबता येत नाही कारण ती किंवा त्या व्यक्ती सामाजिक दृष्टया प्रौढ़ आहेत.

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 11:10 am | मांत्रिक

तुमचा प्रतिसाद वाचून आता कळायला लागलंय की मला कथा नक्कीच कळलेली नाही.
पुन्हा वाचतो आता!!! तरी पण डोक्यात शिरेल असं वाटत नाही.
व्यनि कराल?

मिनेश's picture

15 Oct 2015 - 11:16 am | मिनेश

जमलय विडंबन . =))

-दगडू माधव मिरजकर

नाखु's picture

15 Oct 2015 - 11:20 am | नाखु

आपलाच

मानी मागावी मिसळ

सालस's picture

15 Oct 2015 - 11:26 am | सालस

ल ---कु दमामि!

जातवेद's picture

15 Oct 2015 - 11:34 am | जातवेद

'येड्याची जत्रा' मधे सतिश तारे आमदार म्हणून उद्घाटनाला येतात तो प्रसंग आठवला. एक नंबर!

बाबा योगिराज's picture

15 Oct 2015 - 2:23 pm | बाबा योगिराज

आजची जिल्बी मस्त व्हती....
कुडुन् आन्लि वो....

आजची बोलविती धनीण कोण? =))

दमामि's picture

15 Oct 2015 - 4:20 pm | दमामि

सुडूक मुडूक गोणीत बेडूक
मारतो उड्या टुणटुण
सुडूक म्हणे धनिण कोण?

आता सोडा की (ड)राव, अजून किती दिवस असा लिंगभेद करणार?
त्या अनाहिता अर्थातच त्यांच्यात घेणार नाहीतच ( सांगतही नाहीत एन्ट्रीची पद्धत), आणि तुम्ही पण दूर लोटता.

अस्वस्थामा's picture

15 Oct 2015 - 5:54 pm | अस्वस्थामा

ह्म्म.. मग इकडे आणि तिक़डेही दूर लोटले जाणार्‍यांसाठी तुम्ही LGBT च्या धर्तीवर नवा विभाग (नाव?) मागून घ्यावा असे सुचवेन.
काळजी करु नका. इकडचे इतर आणि तिकडच्या अनाहिता तुम्हाला नक्की समजून घेतील आणि तुमच्या या मागणीस नक्की पाठिंबा देतील याबद्दल खात्री बाळगा.

(मज्जा म्हणून "दक्षिण बाग (south park)" मधला 'द सिस्सी' हा भाग पहा. धमाल आहे.. ;) )

अस्वस्थामा's picture

15 Oct 2015 - 2:40 pm | अस्वस्थामा

द मामी, उत्तम विडंबन हो. :)

आनंदराव's picture

15 Oct 2015 - 2:47 pm | आनंदराव

कसं काय सुचतं ब्वा

द मामी ची बोलविती धनीण कोण आहे ब्रे? पुरुषासारखे लिहिण्याचा अभ्यास बाकी बरा जमलाय =))

बस का बॅट्या, अजून नाय ओळखलं का?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2015 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

पिंपरी व सोलापूर

बॅटमॅन's picture

15 Oct 2015 - 5:01 pm | बॅटमॅन

नाय बा ओळखलं. अता तुम्हीच सांगा ब्रे ओळख.

नीलमोहर's picture

15 Oct 2015 - 2:56 pm | नीलमोहर

हे असंं काही १००% अपेक्षित होतं,
बाकी मूळ लेखापेक्षा हे लेखन थोडं ओघळतं आणि प्रवाही आहे हे विशेष. ;)

' धन्य ' वाद !!

दमामि's picture

15 Oct 2015 - 4:09 pm | दमामि

धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2015 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा

ड__

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Oct 2015 - 4:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अ_ रां__ __दा स__!:क्ष**

पैसा's picture

15 Oct 2015 - 4:52 pm | पैसा

:)

अतिशय अस्वस्थ वाटलं लेख वाचुन... आपण काय करु शकतो अशावेळी ?

दमामि's picture

15 Oct 2015 - 5:38 pm | दमामि

रोफल

दमामि's picture

15 Oct 2015 - 5:46 pm | दमामि

1 ह__
२ वां_
३ झ_ _
४ भें _ _
५ पु__
६ ड__
७ अ _ रां __दा स _!क्ष **
सर्व उत्तरे अचूक देणाऱ्यास सहा वाजता वडा, सात वाजता भात आणि आठ वाजल्यापासून होसूमीयाघ देण्यात येईल.

जेपी's picture

15 Oct 2015 - 5:56 pm | जेपी

टु__

सासं, हा शब्द सुद्धा वरच्या यादीत अॅड करा प्लीज.

जेपी's picture

15 Oct 2015 - 5:56 pm | जेपी

टु__

सासं, हा शब्द सुद्धा वरच्या यादीत अॅड करा प्लीज.

सूड's picture

15 Oct 2015 - 7:55 pm | सूड

आणखी एक भि_र_ _

मित्रहो's picture

15 Oct 2015 - 8:09 pm | मित्रहो

एकदम भारी

प्रसाद गोडबोले's picture

15 Oct 2015 - 8:13 pm | प्रसाद गोडबोले

कोणत्याही प्रकारचे स्वमतांध सरसकटीकरण नसल्याने लेखन आवडले :-)

विद्यार्थी's picture

15 Oct 2015 - 9:12 pm | विद्यार्थी

तितक्यात अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटलं .
आकाशी शर्टावर मोठ्ठा ओघोळ दिसू लागला .
तिची आई मात्र सारखी "लबाड कुठली " म्हणू लागली.

अरेरेरे!!! बाहेर जाताना झाले का बाहेरून घरी? :-)

बोका-ए-आझम's picture

15 Oct 2015 - 9:23 pm | बोका-ए-आझम

मामी द ग्रेट. अशी मामी सगळ्यांणा मिळो. णाही का लोक्स?

किसन शिंदे's picture

15 Oct 2015 - 9:39 pm | किसन शिंदे

रच्याकने लांब म्हणजे कुठे डोंगरीला जायचे होते का?